किल्ले माहुलीच्या जवळच वसलेले हे जैन धर्मियांचे भगवान पार्श्वनाथ यांचे मंदिर आसनगाव रेल्वे स्थानकापासुन ६ किमी अंतरावर आहे (आसनगाव ते मानस मंदिरला जाण्यासाठे स्थानकाबाहेर रिक्षा उपलब्ध असतात). मुंबई-नाशिक हायवेवर शहापुरच्या अलिकडेच असलेला एक रस्ता आपल्याला या मंदिरापर्यंत नेतो. हाच रस्ता पुढे किल्ले माहुलीला जातो. हिरव्यागार पार्श्वभुमीवर सफेद रंगाचे हे जैन मंदिर मनाला निश्चितच भुरळ घालते. एका छोट्याशा टेकडीवर हे मंदिर वसले आहे. येथे छोटी छोटी अनेक मंदिरे पाहताना जणु काहि आपण देवळांच्या गावातच फिरतोय असा भास होतो. पांढर्या दगडावरचे कोरीवकाम बघण्यासारखे आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातुन एक दिवस मोकळा ठेऊन या मंदिराच्या प्रांगणात येऊन शांततेचा अनुभव नक्कीच घ्या.
अशीच हिरवीगारं पार्श्वभुमी असलेले सुंदर मंदिर लोणावळा - पौड मार्गावर दुधिवरे येथे (श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर) आणि कोळवण जवळ हाडशी येथे (साई मंदिर) आहे.
==================================================
==================================================
प्रचि १
योग्या, देवदूताचं काम चोख
योग्या, देवदूताचं काम चोख बजावतो आहेस. योगेश बाबामहाराज सातारकरांनी बांधलेल्या प्रतिपंढरपूर मंदिराचे फोटो पण लवकरात लवकर टाक.
सुंदर देरासर..
सुंदर देरासर..:)
माहुलीला जाताना बघितलंय पण
माहुलीला जाताना बघितलंय पण दुरूनच. फोटोंबद्दल नव्याने काही लिहीत नाही. समझनेवाले को ....
सुंदर मंदिर आहे हे. मला
सुंदर मंदिर आहे हे. मला माहिती नव्हती याची. (किती बघायचे राहिलेय !!)
पूर्वी शहाडचे मंदिर तेवढे माहीत होते, पण ते टिपिकल बिर्ला मंदिर असल्याने, आता तिथला वावर कमी झालाय, असे वाटते.
योगेश एकदम छान
योगेश एकदम छान फोटो.
माहूलिच्या किल्ल्यावर गेलो होतो तेव्हा ह्या मंदिरचा उल्लेख तिथल्या गावकर्यानी केला होता. तेव्हा मंदिराचे बांधकाम चालू आहे असेही त्यांनी सांगितले होते. उन्हाच्या प्रचंड तापामुळे तिथे गेलो नाही.
तुझ्यामुळे आता ते प्रत्यक्ष पहायला मिळाले.
धन्यवाद...
कसल्या रम्य परिसरात आहे
कसल्या रम्य परिसरात आहे मंदीर!
योगेसबाबू... सुंदर फोटो.
धन्यवाद,इतके छान मंदिर
धन्यवाद,इतके छान मंदिर आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल! उंचावर आहे का हे मंदिर?
धन्यवाद!!!! उंचावर आहे का हे
धन्यवाद!!!!
उंचावर आहे का हे मंदिर?>>> अंजली, जास्त उंचावर नाही आहे. थोड्या पायर्या आहेत. जर स्वतःची गाडी असेल तर थेट मंदिरापर्यंत जाता येते.
साळावच्या बिर्ला मंदिराची
साळावच्या बिर्ला मंदिराची आठवण झाली...
नेहमी प्रमाणे सुंदर प्रची...
खुपच छान फोटो ! आम्ही
खुपच छान फोटो ! आम्ही शहापूरलाच रहातो पण अजून मानस मन्दिर पहायचा योग आला नाही.
सुंदरच. मंदिराचे लाँग शॉट्स
सुंदरच. मंदिराचे लाँग शॉट्स तर फारच भारी आहेत.
ठाण्याहून कसं जायचं ते सविस्तर कळवशील का विपुत?
फारच सुंदर फोटोज्
फारच सुंदर फोटोज्
फारच सुंदर फोटो,
फारच सुंदर फोटो, नेहमीप्रमाणे...
मस्त परिसर हिरवागार, आणि त्यात हे सुंदर शुभ्र मंदिर, आणि त्यात भर त्या दाटलेल्या ढगांची
<<<साळावच्या बिर्ला मंदिराची आठवण झाली...>> अगदी
सुंदर फोटो
सुंदर फोटो
नेहमीप्रमाणे छान
नेहमीप्रमाणे छान फोटो!
गेल्यावर्षी कॉलेजच्या पहिल्या आठवड्यात (ऑगस्टमध्ये) आमच्या १५-१६ जणींचा ग्रुप गेला होता. पण तिथले रिक्शावाले फार मनमानी करतात. आम्ही एका रिक्शामध्ये ४ जणी आणि प्रत्येकीचे १५ रू. याप्रमाणे ६ कि. मी. साठी जायला ६० आणि यायला ६० (अशा ४ रिक्शा) असे जवळ जवळ ५०० रू. मोजले.
माझं गाव शहापूरमध्येच आहे त्यामुळे प्रत्येक माणसाला पाहिल्यावर उगीचच असं वाटत होतं की, अरे या माणसाला कुठेतरी पाहिलंय...
पण मंदिर छान आहे. त्यामुळे पैसे गेल्याचं दु:ख नाही.
आणि ट्रेनमधून परत ठाण्याकडे येताना कल्याणच्या आसपास कळलं की एका मैत्रिणीला ड्रॉप लागलाय(पण आम्ही हे तिला सांगितलं नाही, आमच्या एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू असा प्रकार झाला होता...)
तुमच्या फोटोंच्या निमित्ताने या आठवणी ताज्या झाल्या...
ललिता-प्रिती, ट्रेनने जाणार
ललिता-प्रिती, ट्रेनने जाणार असाल तर आसनगाव स्टेशनला उतरायचं व माहुलीला जाण्याचा रस्ता पकडायचा. जाताना उजव्या हाताला हे मंदिर नजरेस पडेल.
व्वा! सुरेख, प्रशस्त मंदिर
व्वा! सुरेख, प्रशस्त मंदिर आणि निसर्गरम्य परिसर!
मला का कोण जाणे, सारखी पुण्याच्या शत्रुंजय मंदिराची आठवण येत होती फोटो बघताना!
सही आहेत रे फोटो...
सही आहेत रे फोटो...
व्वा! सुरेख, प्रशस्त मंदिर
व्वा! सुरेख, प्रशस्त मंदिर आणि निसर्गरम्य परिसर!
सही आहेत रे फोटो.
सहियेत !!!! आसनगावच्या जवळ
सहियेत !!!!
आसनगावच्या जवळ असं काही आहे हे माहित पण नव्हतं..
नेहेमीप्रमाणेच मस्त! बरं झालं
नेहेमीप्रमाणेच मस्त! बरं झालं वॉटरमार्क टाकतोयस ते!
मस्त फोटो. सुरेख परिसर आणि
मस्त फोटो. सुरेख परिसर आणि मंदिर.
सही.......सर्वात आवडला तो
सही.......सर्वात आवडला तो तुझा फोटो...... (प्रचि ११ वाला :हाहा:) अतिसुंदर
सुन्दर..... शाहापुरला जातांना
सुन्दर..... शाहापुरला जातांना डावीकडे या मंदिराच कलस नेहमी दिसायचा.... पण जाण्याचा योग मात्र कधी आला नाही... ते आता तुज्या फोटोमधून पाहता आल
फोटो मस्तच आहेत पण 'जग्गू' टच
फोटो मस्तच आहेत पण 'जग्गू' टच नाहीये कुठे - म्हणजे वेगळा अँगल, वेगळी मांडणी नाही दिसली
बाकी इतक्या छान मंदिराची ओळख करून दिल्याबद्दल (आणि ते पण कसे जायचे ते सांगून) धन्यवाद. नक्की जाणार. तुला संपर्कातून मेल केली आहे.
योगेश खुप सुंदर फोटो...
योगेश खुप सुंदर फोटो...
फोटो नेहमीप्रमाणे सुरेख
फोटो नेहमीप्रमाणे सुरेख .मंदीराच मेंटेनन्स पण छान वाटतय .प्रसन्न वाटल .
सह्ही .... हल्लीच माहुलीला
सह्ही .... हल्लीच माहुलीला जाउन आलो.. पण मंदीर दुरुनच बघितले..
अहाहा .. मस्तच देवदर्शन झाले.
अहाहा .. मस्तच देवदर्शन झाले. फोटो तर छानच.
भव्य आणि सुंदर!!! पण फोटोंची
भव्य आणि सुंदर!!!
पण फोटोंची संख्या जरा जास्तच आहे
Pages