१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली
२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)
४. "हिमभूल" — किन्नौर कैलाश (कल्पा)
५. "हिमभूल" - World's Deadliest Road (कल्पा ते नाको प्रवास)
६. "हिमभूल" - हिमालयातील अजंठा "ताबो"
७. "हिमभूल" - कि आणि ढंकर मॉनेस्ट्री
८. "हिमभूल" - काझा, कौमिक, किब्बर, लांग्झा
========================================================================
========================================================================
प्रचि ०१
परतीचा प्रवास
प्रचि ०२
प्रचि ०३
कुंजुम पास- मनालीहुन येताना कुंझुम हे स्पितीचे प्रवेशद्वार मानले जाते. आम्ही काझाहुन लोसर, कुंजुमपास मार्गे मनालीला निघालो. येथुन जाणा-या सर्व गाड्या येथे असलेल्या कुंजुम देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालुनच पुढच्या प्रवासाला निघतात. कुंजुम पासहुन चंद्रा नदी आणि बर्फाच्छादित शिखराचे विलोभनीय दृष्य दिसते. हा पास पार केल्यानंतर खोकसरहुन एक रस्ता हिमाचलमधील एका सुंदर सरोवराकडे चंद्रतालकडे जातो.
प्रचि ०४
प्रचि ०५
कुंजुम देवी
प्रचि ०६
कुंजुमपासच्या पुढे चांद्रताल आणि बातल येथुन मनालीला जाणारा हा सारा परीसर शीत वाळवंट अर्थात कोल्ड डेझर्ट म्हणुन ओळखला जातो. हा सारा परीसर म्हणजे फोटोग्राफर्सना पर्वणीच. हिमाच्छादित शिखरे, खळाळत बेफाम वाहणारी चंद्रा नदी आणि तिच्या तीरातीराने, दगडधोंड्यातील आणि ग्लेशिअरच्या पाण्यातुन जाणारा रस्ता. इथुन पुढे ग्रांफूपर्यंतचा सारा प्रवास हा चंद्रा नदीच्या सोबतीनेच होतो. चंद्रा आणि भागा या दोन नद्या उत्तरेला सूरजतालजवळ बारालाच्याच्या खिंडीतून उगम पावतात. भागा पश्चिमेला पत्तन दरीत तर चंद्रा दक्षिणेला लाहौल दरीत उतरून बातल येथुन पश्चिमेला वळते. पुढे तंडी या गावी या एकमेकात समरस होताता आणि मग जन्म घेते ती "चंद्रभागा". हिच नदी पुढे कश्मिर आणि मग पाकिस्तानात "चिनाब" या नावाने ओळखली जाते.
चंद्रा नदी
प्रचि ०७
प्रचि ०८
चांद्रतालकडे जाणारा रस्ता (फक्त १४ किमी अंतरावर असलेलं स्वप्न भंगल )
चंद्र ताल - हिमलयातील सर्वात सुंदर तलावांपैकी एक चंद्रताल. खरंतर याचेच फोटो पाहुन हि टूर आखली होती. पण Landslide झाल्याने खोकसरहुन तेथे जाणारा रस्ता बंद असल्याने आम्ही एका नितांत सुंदर अनुभवाला मुकलो. कदाचित पुन्हा जायला काहितरी निमित्त पाहिजे ना.
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
मनाली - काझा रस्ता
प्रचि १५
प्रचि १६
बर्फाच्या भिंती
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
विलोभनीय हिमशिखरे
प्रचि २३
प्रचि २४
पुन्हा एकदा चंद्रा नदी
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
धूssssssssssssम
प्रचि २९
प्रचि ३०
ग्लेशिअर वितळुन रस्त्यावर आलेले थंडगार पाणी
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
ग्लेशिअरचा प्रवाह
प्रचि ३८
ग्लेशिअरच्या पाण्यात अडकलेली गाडी
प्रचि ३९
प्रचि ४०
प्रचि ४१
(पुढील अंतिम भागात "मनमोहक मनाली, रोहतांग पास सहित )
मस्त !! थोडेसे गूढ, थोडे
मस्त !! थोडेसे गूढ, थोडे थरारक
मस्त! ह्या भागात लगोर्या
मस्त!
ह्या भागात लगोर्या रचलेल्या खूप दिसतात
सिनेमात बघून बर्फ किती शुभ्र असेल असं वाटतं, पण आम्ही गेलो होतो तेव्हा रोहतांगला खूप मळकं बर्फ पाहिल्यावर सिनेमा टाईप एकमेकांना बर्फाचे गोळे वगैरे मारायचा आचरटपणा करवलाच नव्हता :खोखो:. वरच्या फोटोंमध्येही बर्फाच्या भिंती मळक्याच.
जबरी.. जिप्स्या ...नेहमी
जबरी..
जिप्स्या ...नेहमी जळवायची काम करतो..
सुंदर.. या भागात कधी जावे हि
सुंदर..
या भागात कधी जावे हि ईच्छा मरायला लागली रे माझी.. इतके सुंदर तर प्रत्यक्ष मला डोळ्यांनीही दिसणार नाही !!
छान आलेत फोटो. विशेषता
छान आलेत फोटो. विशेषता ग्लेशीअर चे आवडले. छोटा धबधबा मस्तच.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मस्त .. आम्ही तुझ्या
मस्त .. आम्ही तुझ्या फोटोग्राफी ला रोज रोज नविन शब्द कुढुन वापरणार
सुंदर!
सुंदर!
मस्त. तुला चांद्रताल ची सफर
मस्त. तुला चांद्रताल ची सफर लवकरात लवकर घडो या साठी शुभेच्छा.
मस्त मस्त मस्त. २५ वा खूप
मस्त मस्त मस्त.
२५ वा खूप आवडला.
रच्याकने त्या नदीचे पाणी खरच एवढे गढूळ आहे की फोटोच्या अँगलमुळे तसे वाटतय?
तुला चांद्रताल ची सफर लवकरात लवकर घडो या साठी शुभेच्छा. >>> आम्हाला चांद्रताल ची सफर लवकरात लवकर घडो या साठी तुला शुभेच्छा.
आम्हाला चांद्रताल ची सफर
आम्हाला चांद्रताल ची सफर लवकरात लवकर घडो या साठी तुला शुभेच्छा. >>> +१
नदीचे पाणी खरच एवढे गढूळ आहे >> माधव.. हिमालयातील बहुतेक नद्यांचे पाणी हे असेच कॉफी सारखे दिसते. कारण तिथली भौगोलीक परिस्थीती. आपल्या कडे पावसाळ्यात जसे चहाचे पाट वाहतात तसे हिमालयात चुनखडी मिश्रीत कॉफीचे पाट वहात असतात.
इंद्रा, माझ्या आठवणीत
इंद्रा, माझ्या आठवणीत सोनमर्गच्या आसपास एक छोटा ग्लेशीयर होता. तो बघायला जाताना एक ओहोळ लागला होता. त्याचे पाणी लांबून बघायला हिरवट रंगाचे आणि जवळून बघताना अगदी स्फटीकसाफ ( ) होते. पाण्याची चव पण एकदम मस्त होती (तहान नसताना पेयाची चव आवडली तर ती खरच भारी असते).
तसे पाणी तुमच्या कोणाच्याच फोटोत दिसले नाही. म्हणून विचारले मी.
वा मस्त फोटो.
वा मस्त फोटो.
सही फोटोज !!
सही फोटोज !!
अहाहा! नयनरम्य! आणि मस्त !!
अहाहा! नयनरम्य!
आणि मस्त !! थोडेसे गूढ, थोडे थरारक>>>>>>>>>>>> ममो +१००
मस्त.... हिमालयाची ओढ आजुन
मस्त.... हिमालयाची ओढ आजुन वाढवलीस...
अप्रतिम ....
अप्रतिम ....