Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 18, 2008

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » पाळीव प्राणी - पक्षी » Archive through April 18, 2008 « Previous Next »

Ladtushar
Tuesday, April 15, 2008 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच पुलंचे पाळीव प्राणी आणि पक्षी ऐकले.... आणि ही कल्पना सुचली, आपल्या कड़े किंवा शेजारी-पाजारी आपणही कधी न कधी लहान पणा पासून एक किंवा अनेक पाळीव प्राणी नाहीतर पक्षी पाळलेले नाहीतर पाहिलेले तरी असतातच! कुत्रा मांजर, गाय, बैल, पोपट, असे अनेक मूक विविध प्राणी नाहीतर पक्षी पाळले जातात, आपण त्याच्या वर जीवापाड प्रेम करतो, ते ही आपल्यावर तितकाच जिव लावून प्रेम करतात, त्याना पाळताना आपल्याला अनेक बरे वाईट अनुभव वाट्याला येतात. त्यांच्या काही सुखद, हर्षित नाहीतर काही दुःखद आठवणी आपण नेहमीच जवळ बाळगुन असतो. अगदी सुरवातीला पाळीव प्राणी न आवडनारे लोक ही नंतर त्यांचेच गुण गायला लागतात. अगदी पुलं च्या दुष्यंत सारखे, "हो की नाही रे दुष्यंत....."

Dakshina
Tuesday, April 15, 2008 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या लहानपणी आमच्याकडे एक मांजर होती, तिचा एक असा रंग नव्हता.... काळा, पांढरा, भुरकट असे सगळे रंग मिक्स होते. तीचं नाव असं ठेवायचं म्हणून नाही, पण घरातले मोठे, छोटे सगळे तिला "मावडी" म्हणायचे. थोडीशी रागिट होती, पण कधी चावायची नाही. माणूसघाण होती. कुण्णाला जवळ फ़िरकू द्यायची नाही. कुणी जवळ जायचा प्रयत्न केलाच तर फ़िसकारायची.
तिला दर ३ महिन्यांनी पिल्लं व्हायची. (अर्थात आम्ही कधी मोजलं नाही, पण तिला वारंवार पिल्लं होत असत हे खरं.) पिल्लं होण्या अगोदर ती अगदी सूस्त होत असे, आमचं घर जुनं होतं, शेवटच्या दिवसात तर ती अख्खं घर हुंगत फ़िरत असे, आमची आई आणी माझा चुलत भाऊ यांना तिचा विशेष लळा होता. पिल्लं होणार असं वाटेल त्या दिवशी मावडी घरातून कुठेही हलायची नाही... एकाच ठिकाणी पडून.. मग आई आणि माझा चुलत भाऊ, घरातल्या एका भिंतीतल्या लाकडीकपाटाच्या तळाशी तिच्यासाठी जागा करत. जुनी साडी, मध्ये (उपलब्ध) असल्यास कापूस, दुधाची आणि पाण्याची वाटी पण भरून ठेवत. पहील्या एक दोन वेळी आमची आई तिच्याबरोबर जागत बसली होती, तेव्हा तिने जरा उशिर लावला, पण मग तिला कळले, की या लोकांपासून आपल्याला काही धोका नाही ते. मग नेहमीच आई जागू लागली तिच्यासाठी...
बहुतेक करून तिला ३ पिल्लं होत, कधी सगळी जगत, कधी सगळीच मरत. कधी एखादं मरे. शेजारी पाजारी कळलं की सगळे खेळायला येत, आणि थोडी मोठी पिल्लं झाली की घेऊनही जात. पण कधी कधी एखाद्या लॉट मधलं एखादं पिल्लू राहूनच जायचं ते कोणी न्यायचं च नाही. अशी सांभाळत सांभाळत एकदा तर मला आठवतायत त्याप्रमाणे ६ मांजरं होती आमच्या घरी. एकाचा पोट मोठं होत, म्हणून त्याचं नाव 'नगारा' एकाचा डोळ्यापासून शेपटीच्या शेवटच्या टोकापर्यंत रंग एकसारखा मधासारखा होता.... त्याला ही आम्ही छान नाव ठेवलं होत, (ते आता आठवत नाहीए)
दरवेळी कोणी पिल्लू नेलं की माझा लहान चुलत भाऊ रडायचा.... कमीत कमी २ दिवस तरी जेवायचा नाही.

आमच्याकडे या मांजरांमुळे विशेष आठवणीत राहतील असे काही प्रसंग घडले नाहीत. पण चालत जाताना, कॉटच्या खालून येऊन आमचे पाय पकडणं, दोर्‍याची रिळं पळवणं, बाहेरून दूध घेऊन आल्यावर त्यांनी मांडलेला उच्छाद, देवाला आणलेल्या फ़ूलाच्या पूड्यातल्या त्यांनी पळवलेल्या दुर्वा...... एक ना अनेक... सर्वात म्हणजे.... थंडीत असेल त्या सापडेल त्या पांघरूणात घुसून मिळवलेली ऊब. आणि मग त्यांच्या घशाची घरघर.... त्यांनी चाटलेलं नाक, गाल, छोट्या पिलांच्या डोळ्यातले निरागस भाव..... सगळं सगळं अविस्मरणिय आहे.


Ladtushar
Tuesday, April 15, 2008 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, मांजरे खूपच छान असतात, माझ्या आजीला खुप आवडतात, ती तिच्या मांजरीला मांजरू म्हणत असे... मांजरू... कसा आहे ना हां शब्द एकदम एखाद्या पिल्लाने फीसsss केल्या वर कसे केस उभे राहतात अगदी तसा. तुमच्या मांजरीने तर रेकॉर्डच केलेला दिसतोय ....अग अश्याप्रकारेच माझ्या एका मित्र कड़े तर चक्क १९ मांजरे होती.. मस्त तांबूस रंगाची आणि मागितली तर देत नसत का तर तुम्ही नेले आणि काय झाले त्याला तर पाप आम्हाला लागेल असे सांगायचे...

Dakshina
Wednesday, April 16, 2008 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंय रे तुषार, मांजरं फ़ाऽऽऽर फ़ोड असतात. त्यांचा एकदा लळा लागला तर सूटत नाही अजिबात.
आमच्या मावडीचं असंच एक पिल्लू (पांढरं आणि कालं मिक्स) जन्मापासूनच थोडं नाजूक होतं, डोळे उशिरा उघडले, चालू ही उशिरा लागलं कायम मागे रहायचं... बाकीची पिल्लं खेळायला शिकली... आमचं घर ४ थ्या मजल्यावर, आणि त्याला गॅलरी होती, आम्ही या पिल्लाना गॅलरीच्या गजांतून पडण्यापासून वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करायचो. एके दिवशी खोलीतून पळत पळत आलं आणि ते नाजूक पिल्लू, गजातून सरळ खाली, आम्हाला धडकी भरली. जनरली, मांजर कितीही उंचावरून पडलं तरिही ते पायावर पडतं असं म्हणतात. पण या पिल्लाला काय झाले माहीती नाही, ते पडल्यावर निपचित पडून राहिले खालीच... ते जिथे पडलं होतं तिथे बिल्डिंगचा दगडी जिना होता, त्याच्या अडोशाला आम्ही पोतं घालून त्याला तिकडे थोडावेळ झोपवलं. दिवस पावसाळ्याचे होते. दूध घातलं पण ते त्याला पिता येईना, नाकातून बाहेर यायला लागलं. आम्हाला काहीच कळेना... खूप वाईट वाटू लागलं, माझा चुलत भाऊ तर दिवसातला जास्तीत जास्त वेळ त्याच्याच जवळ घालवायला लागला. आमच्या आईने क्रोसिन चि अर्धी गोळी दूधातून त्याला चमच्याने घातली पण ते खूप अशक्त झालं होतं. अखेर अम्ही त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलोच. त्यांनी सांगितलं की माणसाला न्युमोनिया होतो तसंच काही झालंय. पण हे जगणार नाही. पडल्यावर बहूतेक त्याच्या मेंदूलाही मार बसला होता, कारण ते जेव्हा उठायचा प्रयत्न करायचं तेव्हा धडपडायचं.अखेर ३र्‍या दिवशी संध्याकाळी ते पिल्लू गेलं.

आम्ही दरवेळी म्हणायचो की या वेळी मवडीला पिल्लं घरात घालू द्यायची नाहीत..
पण तसं कधीच झालं नाही.

आत्ता एकदम ते पिल्लू आठवलं आणि वाईटंच वाटलं.


Ladtushar
Wednesday, April 16, 2008 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे रे रे.... खुप वाईट झाले त्या बिचारया पिल्लाचे.... कदाचित त्याचे आयुष्य तेवधेच असेल.

Dakshina
Wednesday, April 16, 2008 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना, एकवेळ कुणी ती पिल्लं घेऊन गेल्यावरचं दुःख बरं पण हे नको. पण आपण तरी काय करू शकतो?

एक गंमत आठवली... माझी रूममेट आहे तिच्या घरी कुत्री होती, त्यांनी मोठ्या प्रेमाने तिचे नाव 'डायना' ठेवले होते. मी जेव्हा जेव्हा तिच्याबद्दल ऐकायची तेव्हा मला तिला पाहण्याची उत्सुकता लागून राही. एकदा गणपतीला मी तिच्या घरी गेले, आणि मला; जरा कमी शॉकच बसला कारण ही कुत्री म्हाणजे एक गावठी म्हणजे अक्षरशः गावठी कुत्री होती. अजून एक हाईट म्हणजे... यांच्याच कडे एक मांजर... मांजराचं नाव 'गौरी' आणि मूळामधे ही गौरी बोका होती....आणि हे म्हणे पहीले बरेच दिवस यांच्या घरात कुणाच्या लक्षातच आलं नव्हतं.


Ladtushar
Wednesday, April 16, 2008 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मांजराचं नाव 'गौरी' आणि मूळामधे ही गौरी बोका होती.. आणि गावठी कुत्री चे नाव डायना.... डायना प्रिंसेस ला कळले असते तर ती ने आत्महत्या केली असती. सही किस्सा हा दक्षिणा ह. सु. ह. सु. पु. वा.
हो पण नावात काय आहे कदाचित ही कंट्री डायना असेल.. तसे पण लोकाना काय हौस असते इंग्रजी नावाची ना. तसे आम्ही पण लहान पणी आमच्या श्वान सवंगडयानची नावे इंग्रजी मधेच ठेवली होती उदा. गोल्डी, टोमी, जिमी, टायगर इत्यादी परंतु ते सगळे परदेशी जातीचे होते, कदाचित त्यावेळी आमचा समज असा असेल की या परदेशी जातिच्या कुत्र्यांना मराठी नावे कळत नसतील.


Dakshina
Thursday, April 17, 2008 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार, अरे जनरली कुत्र्या-मांजरांची नावं ही विंग्रजी ठेवायची फ़ॅशनच होती मधल्या काळात.
ब्रुनो, ल्युसी, टायगर, जिम्मी, टॉमी, मॉन्टी, रॉजर.... मी तरी इतकीच ऐकली आहेत.

माझ्याही जन्माच्या पुर्वी म्हणे आमच्याकडे कुत्रं होतं, त्याचं नाव टिपू होतं. तो फ़ार भुंकायचा म्हणे, आणि पोस्ट्मनला पण वरती येऊ द्यायचा नाही. (पूर्वीचे पोस्ट्मन पार ४थ्या मजल्यावर येऊन पत्र टाकत असत.... नाहीतर आता बघा) तर मी त्या टिपू बद्दल फ़क्त ऐकलेच होते बाबा आणि आत्याकडून.....
एके दिवशी... टी.व्ही. वर कसलीतरी कुत्र्यांच्या खाण्याची जाहीरात बघऊन बाबा म्हणाले असला होता टिप्या.... मी म्हणल लॅब्रेडॉर?
तेव्हा म्हणे तो असाच सापडला होता... आता सापडेल का लॅब्रेडॉर...
विकत घ्यायचा म्हटला तरी तोंडाला फ़ेस आल्याशिवाय रहाणार नाही...


Tanyabedekar
Thursday, April 17, 2008 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कुत्र्यांची नावं आपली मराठीच आवडतात बुवा.. मी लहान असताना दोन कुत्री होती घरात ती छोट्या आणि गोट्या.. मामीकडे एक कुत्रा होता माझा लाडका.. त्याचं नाव काळु.. मग एक कुत्री आणली.. तिचं नाव चिंटी.. आणि माझा होता तो वान्या..

Dakshina
Thursday, April 17, 2008 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वान्या? हे कसलं नाव?

Tanyabedekar
Thursday, April 17, 2008 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलमोहरवर जाउन वाच वान्याबद्दल.. त्यात आहे त्याचे नाव तसे का ते..

Savyasachi
Thursday, April 17, 2008 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>वान्या? हे कसलं नाव?

:-) म्हणजे
तिकडे एवढे रामायण लिहून झाले आणी :-)

नेमस्तक, पहील्या पोस्टमधे कृपया दुष्यंत अस कराल का? दुशंत अस नाव नाहीये ते, आणि पुलंच्या पुस्तकात देखील दुशंत अस मुद्दाम म्हटलेल नाही.


Dakshina
Friday, April 18, 2008 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, मला माहीती नाही वान्याबद्दल 'तिकडे' कुठेतरी इऽऽऽतकं लिहीलंय ते.....
ही नविन मायबोली सुरू झाल्यापासून कुठे काय वाचावं आणि शोधावं कळत नाही.
बेडेकर, तेव्हढी लिंक पाठवून द्याल का?


Ladtushar
Friday, April 18, 2008 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा साठी:

Vanu's Snaps
/node/1733

भाग 1 (Vanya) /node/1633

भाग 2 (Vanu with friends) /node/1681

भाग 3 (Vanya a Papilon) /node/1686

भाग 4 (Vanu Pinal Code) /node/1713

भाग 5 (Vanu a great Guard )/node/1726

भाग 6 (Smart Vanu) /node/1748

भाग 7 /node/1735

भाग 8 /node/1773

भाग 9/node/1792

आहो Savyasachi मी तो लेख वाचला नाही हो ऐकला होता पुलं च्या ध्वनी मुद्रित कथांतुन. अत्ता ते दुशंत मी तरी बदलू शकत नाही नेमस्तकांनाच कृपया चुक सुधारावी ही विनंती.


त्यान्या, अरे तू जसा वानु ची कानावर फूक मारून छेड़ काडायाचास आणि वानु तुझ्या कड़े अगदी भाव पूर्ण बघायाचा ते आवडले.... अगदी तसाच मी देखील आमच्या गोल्डी ची छेड़ काडायाचो. आणि हो मी अत्ता तर तुमच्या वानु चा पंखा झालोय...



Dakshina
Friday, April 18, 2008 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार, आभारी आहे, तुला ह्या लिंक्स शोधायला फ़ार कष्टं पडले असतील.

Ladtushar
Friday, April 18, 2008 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही नाही काही कष्ट नाही पडले. अग ही लेखमाला खूपच सुरेख आहे मी तिच्या लिंक्स माझ्या कड़े सेव्ह करून ठेल्यात. तुला देखील वाचून खुप आवडेल बघ वानु... तसे तुला सर्व मायबोली वरील ताजे लेखन पहायाचे असेल तर इथे जात जा इथे तिन भाग(Tab) आहेत गुलमोहर, रंगीबेरंगी, आणि जुने हितगुज. त्या त्या भागा नुसार तू वृक्ष सदृश देखावा (ट्री व्हू) पाहू शकतेस.
/node/968

Dakshina
Friday, April 18, 2008 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेडेकर, सगळ्या लिंक्स उघडून मधून मधून थोड्या थोड्या वाचल्या... तुम्ही फ़ार सेन्सिटीव्हली लिहीलं आहे सगळं. मी अजुनी संपूर्ण नाही वाचलं, पण तरिही वाचताना डोळ्यात पाणी आलं. पाळीव प्राण्यांचा लळा अत्यंत वाईट असतो. त्यातल्या त्यात कुत्र्यांचा...

मी मागच्या पोस्ट मध्ये ज्या डायनाबद्दल लिहीले आहे, ती ही बरीच वर्ष जगली. सीमाच्या घरच्यांनी तिची अगदी तुम्ही घेतली होती तशीच काळजी घेतली होती. तुमच्या वानूने मात्रं खूप भोगले. डायना वृद्धापकाळाने गेली, तिला दिसत नव्हतं. एक दोन महिन्यात तिला जाऊन एक वर्षं होईल.

मी ही बर्‍याच वेळेला कुत्रा पाळण्याचा विचार केला, सगळ्यांनी सांगितले, की प्राण्यांचे खूप करावे लागते, आणि ते फ़ार अवघड काम आहे. पण मला त्यांच्या ताटातूटीची जास्ती भिती वाटते.

माझ्या काकाकडे पण एक लांब लांब केसांचा कुत्रा होता, ते सगळे केस त्याच्या डोळ्या.वर येत, त्यामूळे त्याचे डोळे ही दिसत नसत. (मला कुत्र्यांच्या जाती कळत नाहीत) त्याचं नाव टायगर.... तो ही जवळ जवळ १२ वर्षं जगला. काका आर्मीत आहे, त्यामूळे दर दोन वर्षांनी बदली होऊन सुद्धा त्याने त्याला कधी अंतर दिले नाही. सगळीकडे त्याला घेऊनच फ़िरला. जेव्हा काका बेळगावला होता तेव्हा... १ वर्षं मी त्याच्याकडे अभ्यासासाठी राहीले होते. तेव्हा टायगरचे सगळे काम मीच करत असे. केस विंचरणे, फ़िरवणे, खाणे...सगळं. टायगर खूप शांत आणि समाधानी होता.... थोडक्यात शहाणा कुत्रा होता. त्या वर्षभरात मला त्याचा खूप लळा लागला. बेळगावातच तो बर्‍यपैकी थकला होता.....मी बेळगाव सोडून आले, काकाची अयोध्येला ट्रान्सफ़र झाली. दरम्यान फोन वर बोलता बोलता मी काकाला विचारले की टायगर कसा आहे? तर काका म्हणाला की आम्ही त्याला इंजेक्शन दिले. मी काय समजायचं ते समजले. काका त्या क्षणी खूप कठोर आणि क्रुर वाटला.

पुढे बर्‍याच दिवसांनी याच गोष्टीचा रेफ़रन्स ने काकूशी बोलणं सुरू होतं, म्हणजे मी तिला सुचवत होते कि आता अजुनी एक कुत्रा पाळा म्हणून, तर ती नाही म्हणाली.... कारण टायगरला इंजेक्शन काकानेच दिले (तो डॉक्टर आहे) देताना, दिल्यावर काका खूप रडला होता... शिवाय बरेच दिवस डिस्टर्ब ही होता असं तिने सांगितलं.

तुमच्या वानूची गोष्टं वाचून, मला टायगरची आठवण आली. त्याच्या मृत्यू माझ्यासमोर झाला नाही, तर मी आणि तो वेगळे झाल्यानंतर ही बर्‍याच दिवसांनी झाला. तरिही आतमध्ये कुठेतरी तूटलं तो गेल्यांचं ऐकल्यावर.

पण वानूचं सगळं तुमच्यासमोर घडलं, त्याची सगळी वेदना तुम्ही पाहीली आणि काही प्रमाणात त्याच्याबरोबरीने भोगलीत सुद्धा..

खरंच खूप धीराचं आणि मोठं हृदय लागतं हे सगळं करायला.... मला खूप भरून आलं. Really hats off to you.


Tanyabedekar
Friday, April 18, 2008 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, ती लेखमाला मी नाही लिहिलेली.. माझ्या आईने लिहिले आहे.. आणि त्यातला थोडा भाग माझ्या वडीलांनी.. त्या दोघांनी वानुचे खुप केले.. माझ्या दुर्दैवाने मी इथे नेदरलंड मध्ये होतो वान्या गेला तेव्हा.. आजदेखील, परत घरी गेल्यावर अंगावर उड्या मारत वान्या येणार नाही ही कल्पना पण नकोशी वाटते..

Dakshina
Friday, April 18, 2008 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद तुषार. तु सांगितल्याप्रमाणे नक्की करून पाहीन.

Dakshina
Friday, April 18, 2008 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेडेकर, बेडेकर, वाईट वाटलं वाचून

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators