Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
Simple Favor चा sequel-
Simple Favor चा sequel- Another simple Favor आलाय. पहिला भाग बरा होता. Thriller , mystery . हा कैच्याकै वाटला. फटाफटा माणसं मारतातं. काही ठिकाणी विनोदी संवाद बर्यापैकी जमलेत. त्या 365 days वाल्या हिरोला वाया घालवलयं . Comedy करताना केविलवाणा दिसतो बिचारा. Blake मला आवडते.
हेच लिहायला आले होते. मला
हेच लिहायला आले होते. मला बराच आवडला. विनोदी आहे, मला बर्याच ठिकाणी हसायला आलं. मुख्य मुलीने मस्त काम केलंय. ब्लेक गॉर्जिअस आहे. पहिल्यात तर इतकी गॉर्जिअस दिसते की बास!!!
नेटफ्लिक्सवर जॉन अब्राहमचा 'द
नेटफ्लिक्सवर जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट' पाहिला. कुमुद मिश्रा व सादिया खतीब हे दोघेही मुख्य कलाकार म्हणून आहेत. सादिया मला माहिती नव्हती आताच कळाली. सुचित्रा कृष्णमूर्ती सुषमा स्वराज यांच्या भूमिकेत आहे, त्या तेव्हा परराष्ट्रमंत्री पदावर कार्यरत होत्या तेव्हा (२०१७) घडलेल्या सत्यकथेवर आधारित आहे. प्रेरित वाटला नाही, आधारित वाटला. कारण अतिरंजित नाही.
उम्जा अहेमद नावाची भारतीय तरूणी मलेशियात नोकरी शोधण्यासाठी येते व एका पाकिस्तानी टॅक्सी ड्रायव्हरच्या- तारिकच्या प्रेमात पडते. तिला एक छोटीशी मुलगी असते, जिला थालसेमिया हा रक्ताचा दुर्धर आजार असतो. तारिक तिला पाकिस्तानमधे या आजारावर नैसर्गिक उपचार केले जातात तुला पाकिस्तानला यावं लागेल असे सांगून घोर फसवणूक करतो. ती तेथे गेल्यावर तिला बुनेर सारख्या रिमोट गावात नेऊन अशाच पळवून आणलेल्या बायकांसोबत कोंडून ठेवतात. तिथे तिच्यावर अनेकवेळा बलात्कार होतात, मारहाण केली जाते. कसे तरी ती पाकिस्तानातील भारतीय एम्बसी गाठून सुटेकेचे प्रयत्न करते. या प्रयत्नांत एक राजदूत - डिप्लोमॅट जे पी सिंह - जॉन अब्राहम तिला अचाट धाडसाने मदत करून वाघा बॉर्डर क्रॉस करवून देतो. सुरवातीच्या कोर्टातही तिची सगळे कशी मदत करतात हे दाखवले आहे.
काहीकाही वेळा मला ती अतिशय महामूर्ख वाटली पण खरी कथा आहे कळाल्यावर विश्वास ठेवावा लागला. ती स्वतः हून शिकार होते, पण कधीही प्रेम न मिळालेले व अडचणीत असलेले लोक नवख्या लोकांवर तारतम्य बाजूला ठेवून विश्वास ठेवतात ही ह्यूमन सायकॉलॉजी आहे. जॉन अब्राहमची कसलीही फाईटिंग नाही, चित्रपट स्ट्रेटफॉरवर्ड आहे. बलात्काराचे सीनही अंगावर येत नाहीत. ते मुद्दाम तसेच केले असावे, कारण उम्झा आणि तिची मुलगी दिल्लीत राहतात व खरे लोक आहेत. डिप्लोमॅटच्या आंतरिक धैर्याची कथा आहे, त्याने कॅरेक्टर मधे राहून कसलीही हिंसा केलेले दाखवले नाही. अतिरेक्यांनी जी केली आहे तेवढीच, त्यामुळे बऱ्यापैकी रिअल वाटला. खूप छान नाही पण एंगेजिंग आहे.
सुचित्रा कृष्णमूर्ती सुषमा
सुचित्रा कृष्णमूर्ती सुषमा स्वराज यांच्या भूमिकेत आहे >>> रेवती आहे ती.
बाकी सगळ्या पोस्टला मम. मला पण खरी कथा आहे हे शेवटीच कळले. पण एकंदरीत पाहता 'द डिप्लोमॅट' नाव सार्थ करणारं बरंच काही असावं त्या केसमध्ये असे वाटले. पण अगदी ढिसाळ पटकथा आणि सुमार अभिनय, त्यामुळे ती डिप्लोमसी जराही अधोरेखीत झाली नाही.
जॉन अब्राहम मॉडेल म्हणून ठीक होता पण अभिनेता म्हणून खूप कंटाळवाणा आहे. यात तर त्याच्या केशभूषेमुळे तो विचीत्रच दिसतो. जे काही थोडे मुत्सद्देगिरीचे प्रसंग दाखवले आहेत ते पण त्याच्या सुमार अभिनयामुळे गडगडले आहेत. त्याच्यापुढे तो अमीर (उझ्माचा मलेशीयातला मित्र) जास्त डिप्लोमॅट वाटला. त्याचा प्लॅन जबरदस्त होता आणि अशी धक्कादायक बातमी मिळाल्यावर हादरून न जाता त्याला तो सुचला - खरा डिप्लोमॅट!
जेपीच्या गतआयुष्यातला प्रसंग उगाच ओढून ताणून दाखवला आहे आणि मग 'रोंदनेसे बचा पाना' अशी लिंक लावायचा प्रयत्न केला आहे. पण त्या रोंदण्याच्या छटा इतक्या भिन्न आहेत की ती लिंक पटली नाही. (आणि त्या गतआयुष्यातल्या प्रसंगाच्या फ्लॅशबॅकमुळे आणि सिनेमातल्या सुरुवातीच्या एकंदर वातावरणामुळे सिनेमा दहशदवाद्यांवर असाच समज झालेला माझा)
ताहीरने कोर्टात केस फाईल केल्यावर हे लोक तातडीने केस का फाईल करतात ते मला कळले नाही. आणि मागे जाऊन पुन्हा बघण्याइतका पेशन्स नव्हता. कुणाला समजले असल्यास सांगा.
साउंडट्रॅक खूप गंडला आहे. बरचसे संवाद कळतच नाही इतका हळू आवाज आहे.
संगीतकारात एक नाव रहमानचे आहे - हल्ली त्याचे संगीत या सिनेमासारखेच रटाळ असते. मागे मायबोलीवर रहमान भारी का आरडी भारी असा वाद झाला होता. तेंव्हा मला दोन्ही बाजू पटायच्या पण आता आरडी उजवा ठरायला लागला आहे. त्याने इतकं टुकार संगीत कधी दिले नव्हते.
सुचित्रा कृष्णमूर्ती सुषमा
सुचित्रा कृष्णमूर्ती सुषमा स्वराज यांच्या भूमिकेत आहे >>> रेवती आहे ती.>>yes.. Love picture मधली ना.... sathiya ये तुने क्या किया
डिप्लोमॅटचा शाळेच्या ग्रुपवर
डिप्लोमॅटचा शाळेच्या ग्रुपवर रेको मिळाला होता तर नवरा म्हणे त्याला कुणीतरी वाईट रेको दिला. आता बघेन मी.
डिप्लोमसी जराही अधोरेखीत झाली
डिप्लोमसी जराही अधोरेखीत झाली नाही
+ १
साउंडट्रॅक खूप गंडला आहे, संवाद कळतच नाही इतका हळू आवाज
+ ११
जॉन डिप्लोमॅट कमी नी average दिल्लीकर “लालाजी” जास्त दिसतो त्या विचित्र हेयरडू मधे 😁
डिप्लोमॅट पाहिला चुकुन.
डिप्लोमॅट पाहिला चुकुन. सत्यकथा असली तरी त्यात कसलाच थरार नाही ज्यावर दोन तासाचा चित्रपट बनेल. आवर्जुन पाहावे असे मुळ घटनेत नसावे किंवा यांना दाखवता आले नसावे. ती हेर वगैरे असावी का, तिला इतक्या लगेच पाक सोडुन जायला द्यावे का याबद्दल मध्येच जो ट्रॅक सुरु केला तोही नंतर अर्धवट सोडुन दिला.
त्याचा प्लॅन जबरदस्त होता आणि अशी धक्कादायक बातमी मिळाल्यावर हादरून न जाता त्याला तो सुचला - खरा डिप्लोमॅट!>>>>
कसला जबरदस्त प्लॅन?? मी जे पाहिले त्यात तो तिला तु इन्डियन एम्बसी गाठ, तिथुन मदत मिळेल एवढेच सुचवतो. लग्न झाले, भेट म्हणुन माहेरचे पैसे देतील, एम्बसीत माहेरचा माणुस कामाला आहे त्याला भेटुन पैसे मिळवायचे असे खोटे सांग हा प्लॅन तो हिला सांगतो का? माझा पेशन्स संपला त्यामुळे मी पळवत पाहिला.
रेवती राईट - गडबड झाली.
रेवती राईट - गडबड झाली. थॅंक्यू.
जॉनची त्वचा, वय आणि मेकअप ह्या सगळ्याने तो मला भाजलेल्या लिज्जत पापडासारखा दिसला.
दिल्लीकर “लालाजी” जास्त दिसतो त्या विचित्र हेयरडू >>>
थरार नसण्याचे कारण त्यांना अतिरंजित नको असेल असे मी स्वतःला समजावले. कुठलाही सीन अंगावर येत नाही हे बलात्कारापुरतं ठेवायचं असतं. पण कुठल्याही भावनिक तीव्रता सुद्धा पोचत नाही. एका मध्यम रेंज मधे राहतो चित्रपट. जॉन अब्राहमला आंतरिक धैर्याचे काम न देऊन मारामारी करू द्यायला हवी होती किंवा भूमिका तशी असायला हवी होती. तो मर्यादित क्षमतेचा अभिनेता आहे. साऊंडट्रॅकची माझ्या मनावर कसलीही खुण उमटली नाही म्हणजे बंडलच असावा. मलाही ताहीर आणि टोळी दहशतवादी आहेत की काय असे शेवटपर्यंत वाटले पण नक्की कळालेच नाही. इंडियन एम्बसी गाठ मलाही अचाट वाटले, कशी गाठणार होती ती? आधी ती जशी सहज फसली, तसा तो ताहीर नंतर फसला असं वाटलं. त्या पाकिस्तानी ऑफिशयलचा युक्तिवादही बंडल होता. कुमुद मिश्रालाही वाया घालवले आहे.
डिप्लोमॅट पाहिला -- संवादाचा
डिप्लोमॅट पाहिला -- संवादाचा आवाज कमी आणि म्युझिकचा आवाज जास्त. बऱ्याच वेळा subtittle वाचावे लागले. जॉन अब्राहमची छाप पडत नाही. ती दूतावासात सत्य इतक्या उशीरा सांगते ते का ते कळत नाही. सत्य घटनेवर आहे म्हणून पहावा फक्त. सिनेमा म्हणून काही खास नाही.
मला तरीही एकुण आवडला. खरी
मला तरीही एकुण आवडला. खरी घटना आहे हे कळल्यामुळे सगळं नाट्यमय नसुनही नाट्यमय वाटत राहिलं. आणि अशा प्रसंगात सापडल्यावर काय मनस्थिती होईल ते जाणवले.
super boys of malegaon हा
super boys of malegaon हा चित्रपत पाहिला. खुपच आवडला. फर्हान अख्तर निर्माता आहे, त्याच्या आधिच्या काहि चित्रपटान्प्रमाणे यात मैत्रिचा बन्ध कसा घट्ट होत जातो हे खुप सुन्दर दाखवलय
हल्ली बसल्या जागेवरुन करायची
हल्ली बसल्या जागेवरुन करायची कामे करताना जुने चित्रपट पाहते. सतत पडद्याकडे पाहा हे बंधन नसते आणि उठायचे असेल तर पॉज करता येते.
काल त्रिशुल पाहिला. रिलिज झालेला तेव्हा थेटरात पाहिलेला त्यामुळे ते अँब्युलन्स वगैरे सगळे माहित होते. प्राईमवर आहे, थोडीफार काटाकाटी केलीय.
हेमा इतकी आकर्षक दिसत होती की न राहवुन तिचे त्यावेळचे वय चेक केले. ती तेव्हा तिस वर्षांची होती पण दिसत होती पंचविशीची. राखी व ती एकाच वयाच्या पण राखी पस्तिशीची वाटत होती.
वहिदा, संजिव व शशी १९३८च्या. तिघेही तेव्हा चाळिशीचे होते पण शशी कपुर मुलगा व संजिव कुमार बाप. अमिताभ यांच्यापेक्षा ४ वर्षाने लहान पण चित्रपटात शशी कपुरचा मोठा भाऊ.
चित्रपट पाहताना कुणीही अजिबात मिसफिट वाटत नाहीत.
गंमत वाटली एकुणच.
पुढे दिवार दाखवत होते आणि त्यापुढे गहरी चाल. ग चा बघितलाय एकदा पण अमिताभ गुन्हेगार की जितेंद्र ते आठवत नाही. बघेन परत. परवाना बघायचाय पण कुठेच नाही.
त्याआधी गुड्डी पाहिला, फक्त धरमसाठी.
त्यात परवानाचा एक शॉट पाहिला. परवाना खुप शोधला बट नो लक. 
बेनाम व दो अंजाने पाहिले दोन तिन आठवड्यांपुर्वी. दोन्ही आधी दु द वर पाहिले होते. दो अं तितकासा आठवत नव्हता त्यामुळे मजा आली. पण बेनामचा तेव्हा जितका थरार वाटलेला तितका आता वाटला नाही. मजबुर पाहायचाय. तो थोडा थोडा आठवतोय.
दादा कोंडकेंचे भरपुर चित्रपट प्राईमवर आलेत. त्यातले सोंगाड्या पुर्ण व राम राम गंगाराम अर्धवट पाहिले. रारागं थेटरात पाहिला होता. अशोक सराफ तेव्हा स्टार बनला नव्हता हे आठवतेय.
वहिदा, संजिव व शशी १९३८च्या.
वहिदा, संजिव व शशी १९३८च्या. तिघेही तेव्हा चाळिशीचे होते
>>> खूप प्रौढ दिसली या पिक्चरमध्ये मला. सुरुवातीच्या भागात संजीवकुमार सोबत तिची जोडी फारशी पटली नाही मला. पण नंतर स्वाभिमानी आणि मुलाला सूड घ्यायला उद्युक्त करणारी स्त्री म्हणून तिचं कॅरॅक्टर चांगलं वाटलं.
माझेमन, सहमत. वहिदा संजिव
माझेमन, सहमत. वहिदा संजिव जोडी बरोबर दिसत नाही, वहिदा प्रौढ व थकलेली वाटते.
सुरवातीला नावे दाखवताना यांचे गाणे आहे. आपकी महकी हुयी झुल्फों को कहते है घटा..मला हे त्रिशुलमधले हे आठवत नव्हते. गाणे खुप गोड आहे पण पडद्यावर तितकेसे आवडले नाही.
गाणे खुप गोड आहे >>>>
गाणे खुप गोड आहे >>>>
हो पडद्यावर काही खास वाटत नाही.
पण येसूदासचा आवाज, संजीवकुमारचे स्माईल आणि (जरी प्रौढ वाटत असली तरी) वहिदाचे विभ्रम गोड आहेत....संजीवकुमारला एवढ्या रोमँटिक अंदाजमध्ये बघायची सवय नाहीये खरं तर.
'रिअॅलिटी शो' बद्दल इथे
'रिअॅलिटी शो' बद्दल इथे लिहीले तर चालेल का? अमेरिकाज सायकिक चॅलेन्ज - प्राईम मला वाटतं किंवा मॅक्स असेल.
मस्त करमणुकप्रधान शो होता. काहीतरी १६ सायकिक्स होते आणि एलिमिनेशन राऊंडस. शेवटपर्यंत मजा आली. सायकिक क्षमता असावी यावर, थोडाफार विश्वासही बसला म्हणजे जो अंदाज फक्त होता , त्याचे कणभर विश्वासात रुपांतर झाले.
हो पडद्यावर काही खास वाटत
हो पडद्यावर काही खास वाटत नाही. >>> ७०ज/८०ज मधे अमिताभच्या एण्ट्रीच्या आधी त्याच्या पालकांची "रोमॅण्टिक" गाणी हा ऑल्मोस्ट एक स्वतंत्र जॉनरा होऊ पाहात होता तेव्हा
हे त्रिशूल मधले संजीव-वहिदाचे गाणे, शक्ती मधले दिलीप कुमार-राखीचे गाणे - ही दोन आठवतात. लावारिस मधले राखीचे अमजद बरोबर सोलो मेरे अंगने मे आहे - ते रोमॅण्टिक कॅटेगरीत नाही (ती गायिका असते बहुतेक) पण साधारण असेच.
हेमा त्रिशूलमधे आकर्षक दिसते हे बरोबर. यश चोप्राचे पिक्चर सहसा पंजाबी कल्चरमधे बुडवून काढलेले असत. त्यात त्रिशूल तर दिल्लीत घडणारा. पण हेमाचे स्टायलिंग ज्या कोणी केले आहे त्यांनी एकदम तिला फिट्ट बसवली आहे आणि तिनेही मस्त काम केले आहे. शशी व हेमा चे फ्लर्टी संवादही एकदम धमाल आहेत त्यातले.
हे मी माबोवरच कोठेतरी लिहीले होते - पण सलीम जावेदच्या अनेक स्क्रिप्ट्स मधे जसे "विजय" हे एक सलग कॅरेक्टर आहे तसेच शशीकरता लिहीलेले "रवी" हे ही त्या पिक्चर्स मधे कन्सिस्टंट कॅरेक्टर आहे. आउटगोईंग, फ्लर्टी, गमत्या टाइप. विजय च्या १८० डिग्री विरूद्ध.
सामो वेगळा धागा काढा की.
सामो वेगळा धागा काढा की. तुमचा अनुभव काय होता आणि काय कार्यक्रम होता त्याबद्दल.
त्रिशूल >> बहुतेक सलीम जावेदच्या स्क्रिप्ट पैकी हे माझे सगळ्यांत आवडते स्क्रिप्ट असेल. काय डायलॉग लिहिले आहेत. आणि अमिताभ - संजीव कुमार ने ते भन्नाट डिलीव्हर केले आहेत. कधी कधी तर दीवार पेक्षाही त्रिशूल कांकणभर जास्तीच आवडतो.
धनि मला वेगळा धागा माहीत
धनि मला वेगळा धागा माहीत नव्हता आणि शोधलाही नाही. यापुढे रिअॅलिटी शोबद्दल इथे लिहीणार नाही.
>>> शशी व हेमा चे फ्लर्टी
>>> शशी व हेमा चे फ्लर्टी संवादही एकदम धमाल आहेत त्यातले.
हो हो!
>>>
'आप ने नाम क्या बताया था अपना?'
'नाम तो मैंने अभी बताया ही नहीं'
'फिर भी, बतातीं तो क्या बतातीं?'
<<<
हा माझा फार्फार आवडता आहे!
'काला पत्थर'मधले शशी कपूर आणि परवीन बाबीचेही डायलॉग्ज फ्लर्टी विटी आहेत तसेच.
>>>
'आप अपने आप को समझती क्या हैं?' (हा डायलॉग कदाचित काहीसा निराळा असू शकतो.)
'क्यूँ भई, अच्छेखासे इन्टेलिजेन्ट हैं, खूबसूरत हैं, और फिर हम में वो इक बात है जो तुम जैसे लोगों को बहुत पसंद आती है!'
<<<
>>> अमिताभच्या एण्ट्रीच्या आधी त्याच्या पालकांची "रोमॅण्टिक" गाणी हा ऑल्मोस्ट एक स्वतंत्र जॉनरा होऊ पाहात होता तेव्हा
तो निरुपा रॉयने एकहाती हाणून पाडला का मग?
रिअॅलिटी शोबद्दल इथे लिहीणार
रिअॅलिटी शोबद्दल इथे लिहीणार नाही >> खरे तर फार इंटरेस्टिंग विषय आहे. त्यामुळेच वेगळा नवीन धागा काढा असे लिहिले. म्हणजे नवीन गोष्टीबद्दल सगळ्यांना कळेल. आणि डिटेल मध्ये वाचता येईल
धन्यवाद धनि. पण मोस्ट ऑफ देम
धन्यवाद धनि. पण मोस्ट ऑफ देम आर ट्रॅश शोज. फार ड्रामा चालतो आणि अगदी खालच्या थराची करमणूक असते. सवंग. त्यामुळे बघत नाही पण हा शो आवडलेला मात्र लिहीण्याइतके मटिरीअल नाही.
असो.
चित्रपटांची मस्त चर्चा चालू आहे ती एन्जॉय करते आहे
तो निरुपा रॉयने एकहाती हाणून
तो निरुपा रॉयने एकहाती हाणून पाडला का मग? >>>
तसेच दिसते.
हा माझा फार्फार आवडता आहे! >>>
हो आणि तो महिला इतक्या स्वतंत्र झाल्या आहेत त्याबद्दल तिचे अभिनंदन वगैरे करतो ते ही
"कहते डरती हो, दिलमे मरती हो" गाणेही त्याच टोन मधे आहे.
चुप भी रहिये, ये क्या कयामत है
आपकी भी अजीब आदत है
इतना हंगामा किसलिये आखिर,
प्यार है या कोई मुसीबत है
हे काही फार डीप मिनिंग नसले, तरी लताचा खेळकर टोन व हेमा - एकदम जमले आहे.
काला पत्थर मधे परवीन त्याच्याबरोबर कोठेतरी जायचे असते तेव्हा त्यालाच म्हणते की मीच काहीतरी मिसचिफ करेन बहुधा, तुमसे तो ऐसी कोई उम्मीद नही
आणि शशीचा कोळशाबद्दलचा मोनोलॉग तर ऑटाफे आहे. परवा शोधत होतो यूट्यूबवर पण सापडला नाही.
बाकी जुन्या गीतकारांपैकी साहिर व मजरूह ने बर्यापैकी ब्लेण्ड केले स्वतःला ७०ज च्या गाण्यांकरता. तरी साहिरचे यश मर्यादित होते असे दिसते. बहुतांश फक्त यश चोप्राकडे. त्यामानाने मजरूह पार कयामत से कयामत पर्यंत लिहीत होता. पुढेही असेल एखादेवेळेस.
एकदा निरूपा राय तरुण असतानाचं
एकदा निरूपा राय तरुण असतानाचं रोमॅन्टिक गाणं युट्यूबवर पाहिलं.
पण सतत वाटत होतं कि कुठून तरी विजय आणि रवी भूक भूक करत येतील आणि मग हिला गाणं आटोपतं घेऊन मुरमुऱ्याचा रिकामा डबा चेक करायला लागेल.
त्रिशूल >> बहुतेक सलीम
त्रिशूल >> बहुतेक सलीम जावेदच्या स्क्रिप्ट पैकी हे माझे सगळ्यांत आवडते स्क्रिप्ट असेल. काय डायलॉग लिहिले आहेत. <<
मेरे जख्म़ जल्दी नही भरते..
>>> शशीचा कोळशाबद्दलचा
>>> शशीचा कोळशाबद्दलचा मोनोलॉग
ओह तो 'कोयला दो तरह का होता है. एक तरह का कोयला काला होता है. दूसरी तरह का...भी कालाही होता है' तो का?
>>> तुमसे तो ऐसी कोई उम्मीद नही
हो हो!
>>> मेरे जख्म़ जल्दी नही भरते..
अगदी अगदी!!
'एक सेकंद के लिये लगा मेरा अपना ही खून है'!
आता धनि म्हणेल कि संवाद कसा
आता धनि म्हणेल कि संवाद कसा वाटला ह्याविषयी नवा बाफ काढा
लेकीन कोई और... मेरे सामने
लेकीन कोई और... मेरे सामने... उनके बारेमे ऐसी बात करे....
.....
..... ये मुझे मालूम नही था.
त्यामानाने मजरूह पार कयामत से
त्यामानाने मजरूह पार कयामत से कयामत पर्यंत लिहीत होता. पुढेही असेल एखादेवेळेस
>>
डिसेंबर ९५ च्या अकेले हम अकेले तुम ला पण
Pages