स्वरचीत आरत्या

जय देव जय देव जय जय गणराया..

27427184.jpg

जय देव जय देव जय जय गणराया
आरती ओवाळीतो वंदूनी तव पाया
जय देव जय देव ||धृ०||

कार्यारंभी तुजला पूजिती जन सारे
विघ्नांतक विघ्नेश्वर प्रार्थती तुजला रे
संकट निवारोनी शुभ शांती द्या या .. ||१||

लाडू मोदक पक्वान्ने तुजला प्यारी

गणपतीची आरती

ही थोड्या वेगळ्या पद्धतीची आरती आहे. म्हणजे आरत्यांमध्ये नेहमी असतो तसा जयजयकार नाहिये.

माझ्या मते, आरती म्हणजे देवाची स्तुतीपर कविता. याला अनुसरून पुढिल आरती मी रचली आहे .................. स्मित

गणनायका विनायका
कार्यारंभी नमितो तुजला

जय देव जय देव जय शक्तिस्थाना

जय देव जय देव जय शक्तिस्थाना
गणनायक खलमारक शुभकारक सगुणा |धृ.|

विद्येचा अधिपति तू, निष्ठेचा गणपति तू
सन्मतिचा दाता तू, सम्यक तू, सुकृत तू
सन्मार्गाला लावी आम्हा गजवदना |१|

तेजोनिधि देवा तू, नवचेतन कर्ता तू,

गणरायाची आरती

जयदेव जयदेव जय जय गणराया
संकटहरा या, आम्हा ताराया

मदमोहांनी दाट जाळे विणले
शंकाकूशंकांनी आम्हा घेरले
कृपाबलाने त्यांना हराया
संकटहरा या, आम्हा ताराया ||१||

सद् भाव भक्तीने मनी जागावा
वर हाच वाटे आज मागावा

स्व रचित आरती:- श्री दताची आरती

श्री गुरु दत्ता जय गुरु दत्ता सद्गुरु हे आई
हे निजसुंदर आरती गुरुवर बाळ तुझे गाई !!ध्रु !!
ब्रम्हा विष्णु महा -ईश तु
अनसुयेचा होई सुत तु
घास भरविते तुम्हा प्रीतीचे
गाते अंगाई !! १ !!
आरती बाळ तुझे गाई

श्री गणरायाची आरती

जयदेव जयदेव जय गणराया,
भक्ति भावाने मी पडतो तुझ्या पाया,

माघ शुध्द चतुर्थीला जन्मा तू आला,
दुःखहर्ता म्हणोनी, भक्ता पावला,
शारदा तुझी भार्या, बंधू षडानन,
उमामहेश्वराचा असशी तू नंदन, जयदेव जयदेव

रक्तवर्णि तुझी कांति असे,

आरती देवीची

ही आरती ही श्री. अरविंद सहस्रबुध्दे यानी मायबोली साठी पाठवलेली आहे.

आरती देवीची

जयदेवी जयदेवी जय अंबाबाई,
सकल जनांची तू आहेस आई, जयदेवी जयदेवी

रत्नजडीत शोभतो मस्तकी मुकुट,
भाळी भरला असशी कुंकवाचा मळवट,