याचे काय करू

Submitted by बागुलबुवा on 15 July, 2009 - 02:01

कॅनॉनच्या साध्या पॉवरशॉटने काढलेला हा फोटो. हा चांगला आलाय हे जाणवतय पण ह्यावर काय संस्करण करायच आणि कुठच्या सॉफ्टवेअरमध्ये ते कळत नाहिये. फोटोग्राफीच्या धुरंधरांनो मदत करा.
Sona_Engagement_021.jpg

गुलमोहर: 

o wow. ready to pounce!!! sorry cant help , but at least I can appreciate the good work!! Happy

फारच छान
जे.डी. भुसारे

अमित,
अरे हा बलिष्ठ प्राणी कोणत्याही कंपनीत बॉस म्हणून परफेक्ट शोभेल. खतरी बोका आहे हं!
-------------------------
धुक्यात न्हाली पहाट ओली...

दूध पोळी खायला घाला Wink

याला दूधपोळीनं काय होणार? चांगले गलेलठ्ठ उंदीर लागतील दोन-तीन तरी! मस्त बेरकी बोका आहे!

क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/
http://ruhkishayari.blogspot.com/

ए बोक्या आणि बोकिणींनो, ती मांजर आहे. (खरच) Biggrin
बादवे मी तीच नाव राखी ठेवणार होतो. (ग्रे कलरमुळे) पण बायकोने ज्याम बदडलं (मांजराला नाहि) Wink

राखी ठेवणार होतो >>> अरे मग तिचे पण स्वयंवर करायला लागले असते ना तुला.. Proud

ती मांजर आहे. >>>> female बोक्याला भाटी म्हणतात. by the way कुठल्या जातीची आहे ?
खुप छान आहे.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

साईडने फोटो काढला असता तर ती किती पुर्णपणे राखी रंगाची आहे ते कळले असते सगळ्यांना (मी पाहिलंय हे मांजर अमितच्या घरात)
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

आज किती मांजरं बघायला मिळाली Happy
छान आहे, मांजर सयामी आहे का?
धनु.

सयामी तुळतुळीत असतात रे. हे पर्शियन आहे.

मनीमाऊ फारच छान .

अमित छान फोटो आहे.
मांजरही छान आहे आणि पोज ही !
संस्करणाचं म्हणाल तर तुम्ही फोटोशॉप, पिकासा किंवा लाईटरुम मध्ये फोटोवर थोडेसे काम जसे की, एक्सपोजर, कर्व्ह, ऑटो कॉन्ट्रास्ट वगैरे थोडे बहुत केले तरी हा फोटो अतिशय छान होईल.....

(तसा मी काही फोटोग्राफीमधला धुरंधर नाही त्यामुळे काही चुक असल्यास खरोखरच्या फोटोग्राफीच्या धुरंधरांनाची माफी मागुन त्यांच्याकडुन मार्गदर्शन अपेक्षित आहे....)

फारच छान ! फोटोशॉपमध्ये करता येईल.
आधी माऊ सिलेक्ट करून त्याचा नवा लेअर केला. त्यात इमेज अ‍ॅड्जेस्ट्मेंट मध्ये सॅच्युरेशन वाढवले. मग मूळचा फोटो ( जो खालच्या लेअर मध्ये आहे तो) थोडा ब्लर केला अन थोडा डार्क केला.
फोटोशॉपमध्ये काम करताना नेहमी कन्ट्रोल जे ने मूळ फोटोचा एक लेअर करून घ्यावा. ज्या मुळे मूळ फोटो सुरक्षित रहातो. शिवाय सेव्ह करताना वेगळे नाव देणे होईलच .
बघा आवडतेय का?
amitdesai1.jpg

छान फोटो आलाय !
आरती, गूड जॉब! Happy

अम्या 'राखिचे' असे फोटो काढून मनिषा पुर्ण करायलायंस होय? Proud

ए गपे, राखी अन मनिषा दोघींच्या नावान चांगभल होईल माझ. बायकोबुवा कट्ट्यावर वावरतायत माझे. Happy

अमित, पण आरतीने सुंदर संस्कार केलेत ना राखीवर?
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

>> अमित, पण आरतीने सुंदर संस्कार केलेत ना राखीवर? >> अश्वे Rofl

अश्वीनी Lol
--------------------------------------------
कैसे मुझे तुम मिल गयी .......

>>> अमित, पण आरतीने सुंदर संस्कार केलेत ना राखीवर?<<<
छे छे माझी काय टाप लागून गेलीय . नारे बाबा हे धाडस माझ्यात नाही, आश्विनी !

Pages