Submitted by सतीश वाघमारे on 11 July, 2009 - 16:26
( काफिया न वापरता रचनेचा प्रयत्न आहे, मार्गदर्शन आणि सूचनांचं अर्थातच स्वागत आहे ! )
ढगांची नभी वाढती फौज आहे
इथे आठवांची मनी फौज आहे
मला एकटयानेच जिंकून गेला
वृथा आणली केवढी फौज आहे
नवी शांतिदूतासवे लष्करेही
अहिंसा, म्हणे कालची फौज आहे !
मनासारखे लाभले दान थोडे
उभी मागण्यांची नवी फौज आहे
तसा शूर आहे तिचा हा अबोला
सवे आसवांची छुपी फौज आहे !
************************
आणि एक स्फुट द्विपदी...
तुला भेटणे वेगळी मौज आहे
मला रोखण्या केवढी फौज आहे !
गुलमोहर:
शेअर करा
पूर्ण गझल
पूर्ण गझल छान आहे.
दुसरा शेर समजला नाही.
शेवटचा आणि स्फूट सुंदर.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..
अलका, तुम्ह
अलका,
तुम्ही वेळ देऊन दखल घेतलीत, मनःपूर्वक आभार !
सतिश, मला
सतिश,
मला ही ग़ज़ल आवडली. म्हणून मी तुझे इतर साहित्य वाचले. ते सुद्धा खूप आवडले. रसिकांनी फारशी दखल घेतली नाही याचे आश्चर्य वाटले नाही. कारण इथे फक्त साहित्यमूल्य इतकाच निकष नसतो; असा माझा समज आहे. (कदाचित गैर असू शकेल.)
प्रस्तुत गज़ल विषयी बोलायचे झाले तर माझ्यामते सहज सुंदर आहे. कुठेही द्वीपदी रचताना ओढाताण झालेली नाही. यतिभंग, मात्रादोष सकृतदर्शनी आढळत नाही.
<<<मला एकटयानेच जिंकून गेला
वृथा आणली केवढी फौज आहे
नवी शांतिदूतासवे लष्करेही
अहिंसा, म्हणे कालची फौज आहे !>> या द्वीपदी जास्त आवडल्या.
<<<तुला भेटणे वेगळी मौज आहे
मला रोखण्या केवढी फौज आहे !>>> ही द्वीपदीसुद्धा अत्यंत आवडली; पण ती वेगळी का ठेवली आहे ते समजले नाही.
शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................
मस्तच आहे.
मस्तच आहे. आवडले सगळेच शेर.
खुपच छान!
खुपच छान!
तिसरा आणि
तिसरा आणि पाचवा शेर फारच आवडला.
>> तसा शूर
>> तसा शूर आहे तिचा हा अबोला
>> सवे आसवांची छुपी फौज आहे !
वाह!
~~
उस डोंगा परी रस नाही डोंगा , काय भुललासि वरलिया रंगा.
सगळी गझल
सगळी गझल सही! स्फुट द्विपदी तर कळस!
क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/
http://ruhkishayari.blogspot.com/
प्रतिसादा
प्रतिसादांमुळे धीर आला, आभार!
तसा शूर
तसा शूर आहे तिचा हा अबोला
सवे आसवांची छुपी फौज आहे !
छानच...
*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************
तसा शूर
तसा शूर आहे तिचा हा अबोला
सवे आसवांची छुपी फौज आहे !
... सहज सुंदर ..
सुंदर ! तसा
सुंदर !
तसा शूर आहे तिचा हा अबोला
सवे आसवांची छुपी फौज आहे ! >>> खासच !
धन्यवाद !
धन्यवाद !
मार डाला!!! <<<तसा शूर आहे
मार डाला!!!:स्मित:
<<<तसा शूर आहे तिचा हा अबोला
सवे आसवांची छुपी फौज आहे !>>>
<<<तुला भेटणे वेगळी मौज आहे
मला रोखण्या केवढी फौज आहे !>>>>
जियो!!!
>>मनासारखे लाभले दान थोडे उभी
>>मनासारखे लाभले दान थोडे
उभी मागण्यांची नवी फौज आहे
तसा शूर आहे तिचा हा अबोला
सवे आसवांची छुपी फौज आहे !
हे शेर आवडले.
मजा आ गया !
मजा आ गया !
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
मजा आला.
मजा आला.
पुनःप्रत्ययाचा आनंद ! अभिनंदन
पुनःप्रत्ययाचा आनंद ! अभिनंदन !!!
आपणां सर्वांचे मनःपूर्वक आभार
आपणां सर्वांचे मनःपूर्वक आभार !