कधी रस-रंग-गंधांनी ऋतूंच्या माखले नाही

Submitted by मृण_मयी on 29 June, 2009 - 11:44

कधी रस-रंग-गंधांनी ऋतूंच्या माखले नाही
कधी आषाढ-ओल्या आठवांनी नाहले नाही

तसे लक्षात येण्यासारखे नव्हतेच हे फुलणे
कुणी अंजारले नाही, कुणी गोंजारले नाही

कुणाच्या माळण्यावर का फुलांचा जोखता दर्जा ?
झुडुप का रातराणीचे कधी गंधाळले नाही ?

जगाया चारचौघींच्या प्रमाणे ना नसे माझी
जगाच्या चारचौघांनीच पण स्वीकारले नाही

जशी ओच्यात घेते मी फुलांना पारिजाताच्या
तसे हळुवार का मजला कुणीही वेचले नाही ?

वसे डोळ्यांतुनी पाणी, वसे ओठांवरी गाणे
कधी हे वाहिले नाही, कधी ते थांबले नाही

गुलमोहर: 

अप्रतिम गझल! सगळ्याच द्विपदी आवडल्या.

क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/

कुणाच्या माळण्यावर का फुलांचा जोखता दर्जा ?
झुडुप का रातराणीचे कधी गंधाळले नाही ?>>>>
अप्रतिम.

जगाया चारचौघींच्या प्रमाणे ना नसे माझी
जगाच्या चारचौघांनीच पण स्वीकारले नाही
>> एकदम धारदार!
वसे डोळ्यांतुनी पाणी, वसे ओठांवरी गाणे
कधी हे वाहिले नाही, कधी ते थांबले नाही
>> हे पण खास अगदी..

आवडली गझल.

वसे डोळ्यांतुनी पाणी, वसे ओठांवरी गाणे
कधी हे वाहिले नाही, कधी ते थांबले नाही

मस्त!

कुणाच्या माळण्यावर का फुलांचा जोखता दर्जा ?
झुडुप का रातराणीचे कधी गंधाळले नाही ?>>>
सहीच. Happy

कुणाच्या माळण्यावर का फुलांचा जोखता दर्जा ?
झुडुप का रातराणीचे कधी गंधाळले नाही ?>>>
वसे डोळ्यांतुनी पाणी, वसे ओठांवरी गाणे
कधी हे वाहिले नाही, कधी ते थांबले नाही
>>
क्लासच.

कधी रस-रंग-गंधांनी ऋतूंच्या माखले नाही- अतिशय सुंदर, खुप आवडली...

सगळ्या द्विपदी आवडल्या...

जशी ओच्यात घेते मी फुलांना पारिजाताच्या
तसे हळुवार का मजला कुणीही वेचले नाही ?

वसे डोळ्यांतुनी पाणी, वसे ओठांवरी गाणे
कधी हे वाहिले नाही, कधी ते थांबले नाही

ह्या ओळी विशेष आवडल्या...

*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************

अ प्र ति म्........केव...ळ अप्रतिम !

सगळेच शेर प्रचंड आवडले Happy

केवळ अ प्र ति म!!
मलाही सगळेच शेर प्रचंड आवडले!!!

वसे डोळ्यांतुनी पाणी, वसे ओठांवरी गाणे
कधी हे वाहिले नाही, कधी ते थांबले नाही

हे आणि बाकीचे शेरही सुंदरच. आवडली.

मी ज्याप्रमाणे अर्थ लावला त्यानुसार, रातराणीच्या ऐवजी '" झुडूप का निवडुंगाचे बहरले नाही?"असे हवे होते असे वाटते.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

क्लास गं क्लास...केवळच... जियो..!!!

जबरदस्त गझल...काय आवडले विचारु नका, सगळी गझल इथे टाकावी लागेल Happy

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

मृण्-मयी,
क्या कहु?. बहोत बढीया.. बोले तो एकसे एक शेर..
मजा आ गया..

- अनिलभाई
It's always fun when you connect.

जगाया चारचौघींच्या प्रमाणे ना नसे माझी
जगाच्या चारचौघांनीच पण स्वीकारले नाही

व्वा!!!

अप्रतिम कविता................. पुर्ण कविता सही आहे

कुणाच्या माळण्यावर का फुलांचा जोखता दर्जा ?
झुडुप का रातराणीचे कधी गंधाळले नाही ?

जशी ओच्यात घेते मी फुलांना पारिजाताच्या
तसे हळुवार का मजला कुणीही वेचले नाही ?

ह्या ओळी जास्तच भावल्या.....

कुणाच्या माळण्यावर का फुलांचा जोखता दर्जा ?
झुडुप का रातराणीचे कधी गंधाळले नाही ?
>>>
व्वा हा आवडला

ह्या गझलवरून कार्यशाळेतल्या पूनमच्या गझलेची आठवण झाली Happy

-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

सुरेख, अख्खी गझल छान आहे.
धनु.

अत्यंत सुंदर ग़ज़ल. सर्व द्वीपदी आवडल्या.
शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

अप्रतिम...

वसे डोळ्यांतुनी पाणी, वसे ओठांवरी गाणे
कधी हे वाहिले नाही, कधी ते थांबले नाही >>>> क्या बात है Happy

अप्रतिम...
फार आवडली...
कुणाच्या माळण्यावर का फुलांचा जोखता दर्जा ?
झुडुप का रातराणीचे कधी गंधाळले नाही ?

जगाया चारचौघींच्या प्रमाणे ना नसे माझी
जगाच्या चारचौघांनीच पण स्वीकारले नाही
मस्त....

*********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!

Khupach surekh !!!

" Jashi Ochyat Ghete mee Phulana Parijatachya,
Tase Haluwar Ka Majala Kunihi Vechale Nahi.... "

Apratim !

तसे लक्षात येण्यासारखे नव्हतेच हे फुलणे
कुणी अंजारले नाही, कुणी गोंजारले नाही

जशी ओच्यात घेते मी फुलांना पारिजाताच्या
तसे हळुवार का मजला कुणीही वेचले नाही ?......
मि मायबोलिवर नविन आहे, पण आज प्रथम आले , सार्थक वातले. छान लिहित अहत तुम्हि.

अप्रतिम Happy
***************
अबीर गुलाल उधळीत रंग | नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग ||

नमस्कार्. सुप्रभात.....

मस्तच....
मी खुप खुप आपला आभारी आहे.

कुणाच्या माळण्यावर का फुलांचा जोखता दर्जा ?
झुडुप का रातराणीचे कधी गंधाळले नाही ?

वसे डोळ्यांतुनी पाणी, वसे ओठांवरी गाणे
कधी हे वाहिले नाही, कधी ते थांबले नाही

छान! आवडली!!

अप्रतीम गझल्...अप्रतीम टॅलेंट्...!!!!!
मी वाचलेल्या अप्रतीम गझलांपैकी एक..
लिहा ...असेच लिहा...अजुन लिहा ...म्रिण्मयी !!!

गिरीश

Pages