Submitted by सतीश वाघमारे on 15 June, 2009 - 14:27
लिहीन म्हणतो तुझ्याचसाठी सुरेल कविता
मराठमोळी तुझ्यासारखी तजेल कविता
जरा किलकिले करा मनाचे कवाड रसिका
झुळूक थोडी तिला लागुद्या, फुलेल कविता
कठीण इतके असते का हो हसून बघणे ?
कुणी समजवा तिला- अजूनी जगेल कविता
कठोर वचने तिच्यासमोरी नकोस बोलू
सराव मजसारखा तिला ना- रुसेल कविता
नभात दिसता टपोर तारा वेडावुन मी
पहात बसतो-कधी मलाही दिसेल कविता !
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर! क्रा
सुंदर!
क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/
छान
छान
कठोर वचने
कठोर वचने तिच्यासमोरी नकोस बोलू
सराव मजसारखा तिला ना- रुसेल कविता
मस्त आहे..
मनोगतवरच्या आणि इथल्या व्हर्शन्स मधे बराच फरक आहे. आणि दोन्हीमधील काही काही कल्पना आवडल्या.
छान रे...
छान रे... मस्त!!
लिहीन
लिहीन म्हणतो - सुरेख...
*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************
आवडली.
आवडली. मस्त ग़ज़ल!
शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................
आवडली
वा ! छान
वा ! छान आहे.
सुरेल कविता
सर्वांचे
सर्वांचे मनःपूर्वक आभार , सूचनांचं स्वागत आहे !
सराव आणि
सराव आणि तारा शेर फार आवडले!
सतिश बरेच
सतिश बरेच दिवसांनी
रुसणारी कविता आवडली
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा
३ रा ४ था
३ रा ४ था शेर मस्तच!! खुप छान!
*******************
सुमेधा पुनकर
*******************
कठोर वचने
कठोर वचने तिच्यासमोरी नकोस बोलू
सराव मजसारखा तिला ना- रुसेल कविता...
केवळ अप्रतिम!
गोड गझल
गोड गझल
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
आवडली. ..सुस
आवडली.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..
आवडली
आवडली गजल
तुम्हि मारा अजुन वरती मजल .
आपल्याला
आपल्याला बरी वाटली, बरं वाटलं !
कठीण इतके
कठीण इतके असते का हो हसून बघणे ?
कुणी समजवा तिला- अजूनी जगेल कविता
कठोर वचने तिच्यासमोरी नकोस बोलू
सराव मजसारखा तिला ना- रुसेल कविता
हे २ खूप आवडले...
*********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!
लिहीलीत की
लिहीलीत की कविता
आवडली. 
व्वाह!!! पुल
व्वाह!!!
पुलस्तीला अनुमोदन.. मस्त रे..
---------------------------------
देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
छानच होती ही ,सतीश,सध्या गप्प
छानच होती ही ,सतीश,सध्या गप्प का आहेस?
पहिल्यान्दाच तुमची गझल वाचत
पहिल्यान्दाच तुमची गझल वाचत आहे
त्यातून तुमची ओळख झाली खूप बरे वाट्ते आहे
"गझल असावी तर अशी!!" असे जे म्हण्तात ते बहुधा याच गझलेसाठी ...नक्कीच !!