बॉटल आर्ट

Submitted by sanjana25 on 19 December, 2023 - 03:25

मागे मायबोली गणेशोत्सवाच्या निमित्ताने जेव्हा ग्लास बॉटल पेंटिंग केलं, तेव्हा लक्षात आलं की कितीही कोट लावले तरी रंग ग्लास बॉटल वर तितकासा नीट बसत नाही. मग यूट्यूब वर Gesso बद्दल समजलं.
m2.jpeg

हे Gesso दिसायला अगदी वॉटर / Acrylic कलर सारखंच दिसतं. कोणत्याही सर्फेसला सर्वात आधी Gesso अप्लाय केल्यामुळे एक बेस तयार होतो आणि smoothly कलर करायला मदत होते.
आधी पूर्ण बॉटलला Gesso लावून घेतलं आणि त्यावर पेन्सिलने चित्र काढलं.
बेसिक स्केच नंतर कलर करायला सुरुवात केली.
m3.jpeg

बॉटलची एक बाजू
m4.jpeg

आणि ही दुसरी बाजू
m5.jpeg

ह्या दुसऱ्या बॉटल वर केलेली आर्ट “बोहो आर्ट” चा एक प्रकार आहे.
m6.jpegm7.jpegm8.jpeg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वा

काय क्लासी दिसतायत बाटल्या.अश्याच्या अश्या उचलून आय टोकरी किंवा चुंबक च्या वेबसाईटवर विकायला ठेवता येतील..गेसो बघते.लोकपेंटेड अल्युमिनियम किटल्या टाकायचे फेसबुकवर तेव्हा प्रश्न पडलाच होता की यांच्या अल्युमिनियम पृष्ठभागावर रंग बसतो कसा.

जाई, किल्ली, मनिम्याऊ, सामो, एस, मनमोहन, पुरंदरे शशांक, अन्जू , ऋन्मेऽऽष, mi_anu, .... धन्यवाद!!❤️
@ mi_anu, हे सगळं सहज आवड म्हणून करते. बाकी जर आपण कधी भेटलो तर तुमच्यासाठी खास तुमच्या आवडीचं डिझाईन करून मी अशी एक छान बॉटल आणेन! किटकॅट मिल्कशेक प्यायला तितकाच बहाणा Lol ह्या सगळ्या bottles मिल्कशेक च्या आहेत.

छान झाल्यात दोन्ही बाटल्या.
काचेवर gesso पेक्षा जास्त चांगले finish भिंतीला लावतात तो प्लास्टिक emulsion paint प्रायमर म्हणून वापरला तर येतं.
किटली वर करताना मी gesso आणि पांढरा acrylic colour हे दोन्ही वापरले आहेत प्रायमर म्हणून. स्पंज नी dab करत लावलं की बसतो रंग. आधी बेस कलर करून decoupage केलं आहे पूर्वी किटली ला.
ऑईल पेंट ( डबीत येतो तो, hardware मधून आणलेला) पण चांगला बसतो मेटल वर पण त्यात कमी रंग असतात. आणि त्यावर acrylic colour वापरता येत नाही नंतर. ऑईल पेंट च वापरावा लागतो. एकदा स्टील च्या ५-६ ताटल्या रंगवल्या होत्या करवा चौथ साठी ऑईल पेंट वापरून.

अल्पना, धन्यवाद!
तुमचे अनुभव शेअर केल्याबद्दल thankyou! ❤️
नवीन माहिती मिळाली.