Internship बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by Ashwini_९९९ on 28 November, 2023 - 11:41

नमस्कार

B.Tech mechanical (last year)विद्यार्थ्यासाठी चांगली internship कुठे शोधायची? ( B.Tech mechanical - Specialisation- Honour's in Automobile and Autonomous Technology. Experienced Formula Student Team Leader and Chief Engineer.
Designing manufacturing and fabrication of the structural components, also Piloted car as
inaugural driver with precision).

College मधून आत्ता ज्या internship येत आहेत त्या सर्व data science च्या आहेत. त्या नको आहेत.. ॲक्च्युअल शॉप फ्लोअर वर किंवा manufacturing युनिट मध्ये काम करायला मिळालं तर चांगलं.

कोणाला माहिती असेल तर प्लिज शेअर करा.

Group content visibility: 
Use group defaults

ॲक्च्युअल शॉप फ्लोअर वर किंवा manufacturing युनिट मध्ये काम करायला मिळालं तर चांगलं.>>>
Data Science का नको आहे? शॉप फ्लोअर किंवा manufacturing मध्ये काही दिवसांनी तांत्रिक आणि आर्थिक वाढ खुंटते हे माझे वैयक्तिक मत आहे.

@ झम्पू दामलू
त्याला अजिबातच इंटरेस्ट नाहीये डाटा सायन्स मध्ये...

( B.Tech mechanical - Specialisation- Honour's in Automobile and Autonomous Technology. Experienced Formula Student Team Leader and Chief Engineer.
Designing manufacturing and fabrication of the structural components, also Piloted car as
inaugural driver with precision) >>
या अशा गुणवत्तेला कॉलेजकडून Data Science च्या इंटर्नशिप्स येत असतील तर हा ट्रेंड मला चिंताजनक वाटतो. असो, तुम्ही गुगलवर automotive industry internship in india असा सर्च करुन बघितले का? तुम्हाला बरेच पर्याय मिळतील.
Internshala च्या जोडीला LinkedIn, Naukri.com, Indeed आणि Glassdoor यावर इंटर्नशिपसाठी शोध घ्या. त्याशिवाय ऑटो /एरो इंड्स्ट्रीतल्या कंपन्यांच्या वेबसाईटवरही इंटर्नशिपच्या संधींबद्दल माहिती असते.

आधी पण लोक B.Tech mechanical करुन सोफ्ट वीअर मधे यायचे , कोम्प्युटर वाल्याना खुप राग यायचा

बीटेक मेक करुन पट्नीत नोकरी वगैरे ३० वर्षांपूर्वी मी देखील बघितले आहे मात्र तो त्या व्यक्तीचा चॉईस असे. सामान्यतः विद्यार्थी ज्या विषयात शिक्षण घेत आहेत त्याच्याशी सुसंगत अशा इंटर्नशिपच्या/नोकरीच्या संधी कॉलेजकडून उपलब्ध होत होत्या. सरसकट काँप-आयटी एवढाच पर्याय असे नव्हते.
इथे अमेरीकेत धागाकर्तीने लिहिले आहे त्या गुणवत्तेला एरो/ ऑटोचे इंटर्न म्हणून कँपसवर रिक्रुट केले जाते. माझ्या मुलाला कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून तशी संधी मिळाली आणि आता तो त्याच्या alma mater साठी कंपनीतर्फे रिक्रुटर म्हणून येतो.

मला फारशी माहिती नाही या क्षेत्रातली पण ऑटोमिबाइल वाचुन महिन्द्रा आठवले. तुम्ही पुण्यात असाल तर भोसरी इथे काही कंपन्यांचे प्लांट आहेत तिथे प्रयत्न करु शकता.

सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद....
@ साधना...महिंद्रा मध्ये त्यानी apply केलंय.. रिप्लाय ची वाट बघतोय...
@ स्वाती २...indeed आणि नोकरी वर internship करता काही मिळत नाहीये..जॉब्स च आहेत...

लिंक्डइन वर ही कधी पोस्टस असतात. किंवा कोल्ड कॉल सारखं लिंक्डइन कॉन्टॅक्टला (नसेल तर बनवुन) कोल्ड मेल करुन विचारणा करणे.

बॉश, टाटा मोटर्स, गेब्रियल, अशिक लेलॅन्ड, मारुती उद्योग अशा अनेक कंपन्या आहेत जे इंटर्नशिप देतात..... किती दिवसांची इंटर्नशिप हवी आहे, काय स्वारस्य आहे? तुमच्या कॉलेजचे टीपॉओ मदत करू शकतील.... इन फॅक्ट, शॉप फ्लोअर वर काम करण्यास उत्सुक असणारे इंजिनियर विरळा आहेत.
मला विपु कराल का?
मी त्या फिल्ड चा आहे

@ स्वाती २...indeed आणि नोकरी वर internship करता काही मिळत नाहीये..जॉब्स च आहेत...>>
अश्विनी, बरेचदा ट्रेनी इंजीनीअर- अनपेड अशा प्रकारे इंटर्नशिपची जाहिरात असते. अजुन एक महत्वाचे म्हणजे इंडस्ट्रीतल्या लोकांशी LinkedIn वर कनेक्ट होणे.
महिंद्रात अप्लाय केले असेल तर तेवड्यावरच थांबू नका. त्यांच्या सप्लायर्सकडेही अप्लाय करा. ऑटोपार्ट्स सप्लाय करणार्‍या फाउंड्री इंडस्ट्रीचाही विचार करा.

युनिव्हर्सिटी मधल्या सिनियर स्टूडंटशी संपर्क साधता येईल का ? ३-५ वर्षे आधी ग्रॅजुएट झालेल्यांनी कुठे इंटर्नशिप केली होती ते शोधून तिथे अप्लाय करता येईल.

अश्विनी मायको( बॉश्च ग्रुप) पुणे आणी नाशिक दोन्हीकडे भरती चालू होती मधे...तिथे शॉप फ्लोअर अनुभव मिळेल..तिकडे बघितलत का?

@किल्ली... वीपु मध्ये काही दिसतं नाहीये.
@प्राजक्ता... विचारते त्याला..
@mi- अनु,- प्लिज विपू चेक करा.

Job Summary

GE Renewable Energy Careers Oppoprtunities Details:
Roles and Responsibilities for GE Renewable Energy Internship:
Internship follows one of the tracks listed below
A successful DT internship with GE Digital Healthcare can lead to opportunities such as:
Qualifications/Requirements for GE Renewable Energy Internship:
Desired Characteristics for GE Renewable Energy Internship:
How to Apply For GE Renewable Energy Internship 2024?

https://shorturl.at/aiJ59

Automobile engineering साठी Bridgestone Tyre Pune, IAC (International Automotive Components) चाकण, ARAI मध्ये internship मिळू शकेल. Mercedes Benz पुणे मध्ये सुद्धा मिळेल. विशेषतः तिथे पेंटिंग डिपार्टमेंटमध्ये मुले हवी असतात.

नमस्कार...घरच्या लग्नात बिझी असल्यामुळे रिप्लाय नाही देता आला... मुलाला internship मिळाली..२६ तारखेपासून जॉईन झाला...त्याला जस हवं होत तसच जॉब प्रोफाइल आहे.
सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांच्याच प्रतिसादाचा चांगला उपयोग झाला.