गणपती घरगुती कार्यक्रम नियोजन - अमेरिका

Submitted by नम्रता निकम on 21 July, 2023 - 09:08

अजून गणपती यायला २ महिने अवकाश आहे पण नेहमी प्रमाणे माझी अति-उत्साही तयारी जसे कि आरास काय करायची, कुणाकुणाला आमंत्रण द्यायची आणि जेवण किंवा नाश्ता चा बेत काय करायचं अशी एक अतिशय ढोबळ आखणी सुरू होते..
गेल्या काही अनुभावां नंतर या वर्षी थोडं नीट प्लॅन करायचे आहे.. त्यासाठी तुमच्या सल्ले /अनुभव ऐकायला आवडेल

साधारण ५-६ वेगवेगळे ग्रुप्स धरून , लहान -मोठे असे १०० तरी लोकं होतात ..फक्त १ शनिवार संध्यकाळ मिळते निवांतपणे तयारी करून आमंत्रण देता येतील असे .. मी दर वर्षी पूर्ण जेवण च ठेवते ..पण बरीच जण आणि दुसरीकडे जाणार असतात त्यामुळे थोडा च वेळ येऊन जाणार किंवा काही म्हणतात नंतर येऊ ..तर माझे प्रश्न आहे कि तुम्ही हे कसे हॅन्डल करतात .. एकाच वेळी सगळ्यांना बोलावतात , कि जेवणाचा घाट न घालता साधंच काहीतरी ठेवतात..

जे दिलेल्या वेळेत न येता नंतर येणार असले तर कसे करतात ?

Group content visibility: 
Use group defaults

नम्रता, इकडे आम्हांलाही एका विकेंडला ४,५ ठिकाणी आमंत्रणं असतात आणि प्रत्येक ठिकाणी पूर्ण जेवण. सगळीकडेच पूर्ण जेवायची भूक आणि वेळ नसतो. जी मंडळी अशा कॅटेगरीत येतात त्यांच्याकरता लाईट स्नॅक्स ठेवता येतील का?

शीर्षकातलं २३ गोंधळात टाकतंय. गणपतीनिमित्त २३ घरगुती कार्यक्रमांचं नियोजन असं वाटलं. हा प्रश्न काही फक्त यावर्षीपुरता नाही, तेव्हा २३ काढून त्याजागी अमेरिकेत / भारताबाहेर असं लिहिलं तर बरं होईल.

@सायो ...तेच सुचत नाहीये .. कारण जेवण बनवायचे कष्ट आणि उरले कि परत चिडचिड हे optimize करायचे आहे..
साधारण ४-५ तासांची वेळ देऊन सगळ्यांना एकाच दिवशी बोलावून , इडली चटणी / वडा पाव /ढोकळा असे काहीतरी सुटसुटीत आणि प्रसाद असे ठेवावे कि छोटे-छोटे ग्रुप्स करून शनिवार - रविवार पकडून ४ वेळा होतात त्यात manage करायचे .. फारच गोंधळ होतोय माझा

Make an excel sheet rows guest list columns days available. Break into groups
Keep focus on praying and spirituality rather than on food. Offer just the days Prasad. One sweet . One tetrapack drink . one fruit. One tissue paper. One dry khara item for example gulab jamun samosa fruity pack and one apple.

तुमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असेल तर साहजिक तुमची धावपळ होत असणार. आशा वेळेस एक च काही म्हणजे पाव भाजी / पुलाव कढी / मिसळ पाव अशा टाईप चे काही ठेवता येईल.
आणि 5 दिवस असेल तर जेवण ठेऊ शकता ज्यात तुम्हाला दगदग होणार नाही, हेलपिंग हॅन्ड नसेल तर एकटीने पटापट मॅनेज होईल असा मेनू ठरवा. नाहीतर पाहुण्यांना जेवण घालण्यात च वेळ जाईल आणि मग तुम्हाला कोणाला भेटता बोलता येणार नाही...

@अश्विनीमामी - पॅकेट ची कल्पना आवडली आहे..ग

अनिश्का - आमच्या कडे १० दिवस गणपती असतात पण ऑफिस मुळे सोम-शुक्र कुणाला बोलावणार नाहीये .. मध्ये एकच वीकेंड मिळतोय..

आवडता विषय Happy

तर माझे प्रश्न आहे कि तुम्ही हे कसे हॅन्डल करतात .. एकाच वेळी सगळ्यांना बोलावतात , कि जेवणाचा घाट न घालता साधंच काहीतरी ठेवतात..>>>>>>>>>>> माझ्याकडे ५ दिवस असतो गणपती गौरी. मीही सगळे दिवस ऑफिसला जाणारी असल्याने सोम-शुक्र मधेच आले गणपती तर एकच कोणत्यातरी दिवशी सगळ्यांना बोलावते. मग त्या वेळी अगदी पूर्ण जेवण असं नाही कारण कोणी मदतीला नसतं आणि ऑफिसनंतर काही करायला जमत नाही. मग थोडं बाहेरून थोडं घरचं असं एक-दोनच काँबि आयट्म्स ठेवते, बाकी लोक काही ना काही आणतातच ते पण सगळ्यांना थोडं थोडं म्हटलं तरी खूप होतं. वाटलं तर फळं चिरायची. माझे दर वर्षीचे बर्‍यापैकी किती लोकं बोलवायची ते ठरलेलं आहे. खाण्याचं वगैरे मॅनेज होण्याइतपत अंदाज घेते आधीच ग्रुप्सवर विचारून.

त्या पाच दिवसात अगदीच फक्त दर्शनाला येऊन जातो म्हणणारे आहेत त्यांना पंचखाद्य (करून ठेवलेलं असतंच ५ दिवसांचं) ते आणि सोबत फळं वगैरे देते केळी, सफरचंद, पेअर. अक्खेच प्रसाद म्हणून, कापून वगैरेच्या भानगडीत नाही पडत. तळणीचे मोदक करून ठेवायला जमले तर ते करून ठेवले असतात आधी ते सोपे होतात प्रसाद म्हणून द्यायला.

विकेंड आला तरी शक्यतो कोणत्या तरी एकाच दिवशी बोलवते. कारण गौरींच पण असतं नंतर, सवाष्ण्/ब्राह्नण असतात आणि थोडा बाप्पालाही वेळ द्यायला हवा ना! Happy लोकांची सरबराई करण्यातच वेळ निघून जातो नाहीतर. अर्थात हा ज्याच्या त्याच्या भावनेचा प्रश्न! मला खूप मरमर करून लोकांना खायला घालूनच जीवाला शांतता मिळते असं नाहीये. एकटीला काहीतरी मॅनेजेबल होईल असं बघते.

हे मेनू सोयीचे पडतात.

१. सुरळीची वडी/कोथिंबीर वडी/ अळू वडी/मिनी बटाटेवडे/सामोसे/ढोकळा/साबुदाणा वडा यातलं काही. अर्थात बाहेरून आणी सोबत भाताचा प्रकार घरी (मसालेभात, लेमन राईस, पुलिहोरा, टॅमरिंड, कोकोनट राईस.) - विकडेज साठी बेस्ट!
२.पुर्‍या/पोळ्या बाहेरून, भाजी घरी (कोरडी बटाटा, मटकी उसळ, चना, मटार/बटाटा, फ्लॉवर/मटार - सगळ्या बिन कांदा लसूण) श्रीखंड पण घरीच. सोबत वरपैकी एखादा स्नॅक्स. - विकेंडला चालेल. श्रीखंड करून ठेवता येईल आद्ल्या दिवशी.
३. उपमा - सोबत वरच्या स्नॅक्स मधलं काही. गोडात - गुजा, बर्फी, मावा मोदक. - विकडेज साठी
४. पावभाजी शक्यतो नाही कधी केली (कारण कांदा लसूण बरेच लोकं खात नाहीत या दिवसात) पण जैन स्टाईल करायची असेल तर त्यासोबत शिरा, जिलेबी वगैरे. - विकेंड
५. दलियाची खीर /मसालेभात/ तोंडली भात - वरीलपैकी एखादा स्नॅक्स हेही विकडेज ला होईल.

बापरे बरीच लांबड लावली Happy थांबते आता.

खुप उपयोगी धागा आहे, नम्रता.
आवडता सण आणि विषयही.
आमच्याकडे दहा दिवसाचा गणपती असतो. रोज संध्याकाळच्या आरती साठी शेजारी etc मिळुन १५-२० लोक असतातच. दर गणपतीची एक theme असते. जसे एक वर्षी संत व वारकरी संप्रदाय अशी theme होती. ५-८ मुले आहेत. सर्व जाती धर्माची असतात. तर रोज १-२ मुले एखाद्या विषयावर तयारी करुन येतात व ५ मिनिटे बोलतात. स्वातंत्र्य सैनिक, वैज्ञानिक अशा themes घेतल्या आहेत व मुले उत्साहाने तयारी करतात. त्यानिमित्ताने मुलांना आपल्या संत परंपरेची, भारतीय तत्वज्ञान, स्वातंत्र्य सेनानींची ओळख होते. आता हे ईथे अपेक्षित होते की नाही माहित नाही. पण लिहीलय खरं. Happy
कमी वेळात, कमी कष्टात होईल असा नैवेद्य व प्रसाद ठेवतो. जसे की फळे, dry fruits and nuts, राजगिऱ्याची वडी/लाडु, सुंदल, पंचखाद्य, lemon rice, tamarind rice सारखा भाताचा प्रकार किंवा लाडु वैगेरे आधी करुन ठेवले असतील तर ते. शिवाय येणारी मंडळी पण काही ना काही आणतातच.
एका विकेंडला जेवण असते. जवळ जवळ ७५ तरी लोक असतात. थोडे घरी, थोडे order करतो. हे मात्र आम्ही to go boxes मध्ये pack करुन ठेवतो. (compostable take out containers). मेन्यु साधा व ठरलेला असतो. वेज पुलाव, छोले, एक गोड पदार्थ, फळ व समोसा/ढोकळा असं काही.
खुप मोठी पोस्ट झाली. इथपर्यंत वाचली असेल तर धन्यवाद.:)

बरेच planning करावे लागते पण सगळ्यांनी मिळुन केले तर मजा येते.

अंजली_१२ आणि शर्वरी...धन्यवाद सविस्तर प्रतिसादासाठी ...तुमचे अनुभव, सल्ले /सूचना नक्कीच मला उपयोगी ठरतील ...:)