आप कितने अध्यात्मिक हो?

Submitted by रॉय on 20 June, 2023 - 08:26

अमेरिकेने अधिकृतरित्या मानवी आकलन क्षमते पलीकडील आणि मानवी तंत्रज्ञानाला शक्य नाहीत असे UAP आहेत असे पुराव्यासहित जाहीर केलेले आहे. NYT सारख्या प्रतिष्ठित दैनिकाने २०१७ मध्ये प्रसिद्ध केलेले व्हिडीओ खरे आहेत असेही अधिकृतरित्या सांगितले आहेत.

२०२१ नंतरच्या त्या जाहीरनाम्यानंतर काही वैज्ञानिकांनी खूप गंभीररित्या या सर्व घटनांकडे पाहायला सुरुवात केली आहे. डॉ. गॅरी नोलान सारख्या अत्यंत ज्येष्ठ अशा जीवशास्त्रज्ञांनी पृथ्वीवर मानवेतर प्रगत परजीव अस्तित्वात आहेत असे धक्कादायक विधान केलेले आहे. हे लोक मस्करी मध्ये घेण्यासारखे नाहीत. अनेक शास्त्रज्ञांनी कॉस्मिक सोसायटी कशी असेल, मानवी भविष्यावर किंवा त्याचे अस्तित्वावर काय परिणाम होतील यावर गंभीररित्या खल करायला सुरुवात केलेली आहे. युट्युबवरती lex fridman या वैज्ञानिकाने घेतलेल्या अनेक शास्त्रज्ञांच्या मुलाखती जरूर ऐका. पृथ्वीवरील जीवोत्पत्ती विषयी जे सध्याचे संशोधन आहे किंवा नुकतेच नेचर मध्ये आलेले संशोधन पृथ्वीने समुद्र कसे तयार केले हे असेल, त्यावरून आपल्या विषयी किंवा एकंदरीतच जीवन या विषयी आपले आकलन झपाट्याने बदलत आहे हे लक्षात येईल. काही लोक "how natural the nature is" हा प्रश्न देखील उपस्थित करत आहेत. मायकल कॉलिन सारख्या शास्त्रज्ञांनी ग्रॅबी एलियन सारख्या मूलभूत संकल्पना मांडल्या आहेत. डार्विनपासून ते आजपर्यंत देखील आपल्याला अजून सेक्सुअल सिलेक्शन पूर्णपणे समजले नाही. त्यावरदेखील अजूनही वाद झडताहेत.

या सर्व घटनांचा परिणाम म्हणून जर अधिकृत पुराव्यासहित अमेरिकेने नेमके सत्य काय आहे हे जर जाहीर केले तर एकंदरीतच देव या संकल्पनेविषयी मानवाचे आकलन येत्या दशकात पूर्णपणे बदलेल असे मला वाटते.

डी एम टी सारखे रेणू मानवी अध्यात्मिक अनुभवांना कसे कारणीभूत असतात अशा गोष्टी देखील वैज्ञानिकरित्या रीतसर सिद्ध होत आहेत. त्यामुळे विज्ञानानंतर अध्यात्म सुरु होते वगैरे भंपकपणा केव्हाचा मागे पडला आहे आणि त्याही पुढे जाऊन आपले विज्ञान हे तरी मुळातच खरे विज्ञान आहे का यावर देखील शास्त्रज्ञ विनिमय करत आहेत.

नवीन प्रकारच्या औषधांनी येत्या दशकभरात ओबेसिटी सारखे आधुनिक समस्या नष्ट होण्याची शक्यता आहे.

त्यात ए. आय. तंत्रज्ञानाने आपली पहिली दांडगी पावले टाकायला सुरुवात केली आहे.

येती काही वर्षे मानवी इतिहासातील खळबळीची वर्षे असतील.

मात्र भारतीय समजा एकंदरीतच इतिहासातच अडकलेला दिसत आहे. शिवाय ज्या पातळीवर भारतीय लोकांचा पब्लिक डिस्कोर्स चाललेला आहे तो अतिशय उबग आणणारा आणि बोअरिंग आहे. कोणतेही वर्तमानपत्र, मासिक, सो मी, युटूब चॅनेल वगैरे उघडल्यास एक मिनिटसुद्धा काहीही वाचवत नाही इतकी भंकस चालली असते. बायकांनी स्वयंपाकाची युट्युब चॅनेल सुरु केली आहेत तेवढेच काय ते त्यातल्या त्यात पॉसिटीव्ह काँट्रीब्युशन म्हणता येईल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

संदर्भासाठी आणि अजून वाचन करण्यासाठी काही लिंक्स देऊ शकाल का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे ते समजवून घेता येईल आणि मग काही मत मांडता येईल.