इतके भंगार चित्रपट का निघताहेत?

Submitted by रॉय on 11 June, 2023 - 17:48

१. डेटा ड्रिव्हन चित्रपट कथा जवळपास भंगार असतात. (लोकांना काय आवडतं याचा विदा गोळा करून तयार केलेल्या कथा)
२. खूप कथा या एखाद्या वनलायनर पासून विस्तार केलेल्या असतात. त्यामुळे त्या अधिकच पसरट, बोअरिंग होत आहेत. उदा. नेटफ्लिक्सकृत जवळपास ९० टक्के चित्रपट भंगार बोअरिंगच आहेत.
३. सुमार अभिरुचीचे चित्रपट सुद्धा मनोरंजक नाहीत. मनोरंजक चित्रपटसुद्धा निखळ आनंद देत नाहीत. चित्रपट गृहांसाठी चांगले विनोदी चित्रपटही बनत नाहीत. उदा. छिछोरे हा चित्रपट चित्रपटगृहात मस्त आनंद देतो, परंतु तोच चित्रपट लहान ग्रुप मध्ये घरी चक्क बोअर करू शकतो.
४. भारतीय चित्रपटांबद्दल बोलायचे तर दशकातून खूप मोजके अत्यंत दर्जेदार चित्रपट येतात. उदा. शिप ऑफ थिसियस, आंखो देखी इत्यादी आणि उत्तम, मनोरंजक चित्रपट तर वर्षाला दोनसुद्धा निघत नाहीत. अंधाधुन, मूळ दृश्यम, कुंभलंगी नाईट्स इत्यादी. चांगले मसाला चित्रपट सुद्धा खूप कमी उदा पुष्पा. मराठीत तर कुलकर्णीजोड आणि मंजुळे सोडल्यास भंगार चित्रपटांचा रतीबच असतो. तेंडल्या सारखा चांगला चित्रपटसुद्धा त्या रतिबात डावलला जातो. शिवाय ते एकसे एक रद्दड ऐतिहासिक चित्रपट. नाहीतर झी मराठी वाल्यांचा नॉस्टॅल्जिक कारखाना. तो नॉस्टॅलजिया सुद्धा एकदम तुपकट रटाळ. 'घाशीराम कोतवाल' सारख्या नाटकांचे करा की चित्रपटीकरण दम असेल तर.
५. बहुतांश सिरीज सुद्धा एक दोन सीजन नंतर पाहवत नाहीत. सिटकॉम सुद्धा त्याच त्या पहिल्या जातात - उदा. साइनफेल्ड, बिग बँग इत्यादी. सिलेक्शन भरपूर असले तर चॉईस खूप कमी आहे.
६. एकंदरीत सगळीकडे सुमारपणाचा सुकाळ झाला आहे. थंबनेल पाहून व्हिडीओ पाहणारी हुशार जनता आता खूप प्रमाणात आपली आवड निवड कंपन्यांना कळवत आहे. त्यामुळे अजून सुमार कन्टेन्ट येत आहे. गुलाबी चड्ड्या ओवाळून टाकाव्यात अशा एकदम गुळगुळीत के ड्रॅमा प्रसवणाऱ्या दक्षिण कोरिया सारख्या एवढुश्या देशातून पॅरासाईट सारखा इतका जबरदस्त चित्रपट कसा काय निघू शकतो याचे आश्चर्य वाटते. नंतर सुद्धा खूप मस्त चित्रपट येऊन गेले.
७. तुमच्यापैकी कुणाला एकंदरीतच कन्टेन्टचा फटिग आला आहे काय?

अपडेटः

यावर्षी मी मोजून वीस चित्रपट पाहायचे ठरवले आहे. त्यापैकी पाहिलेले दोन चित्रपट :

१. ब्लॅकबेरी : थोडक्यात ब्लॅकबेरी फोन जगातील सर्वात प्रगत फोन कसा झाला आणि नंतर रसातळाला कसा गेला याची सुरस कहाणी. जबरदस्त अभिनय, पेस, एडिटिंग. चित्रपटाचा visual tone अतिशय मस्त. कथा उत्तम फिक्शनलाईज केली आहे. मस्त मस्त.

२. आर यु देअर गॉड ? इट्स मी, मार्गारेट : अहाहा. आपल्या सिनेमांत ९९ टक्के बालकलाकार इतका कृतक अभिनय करतात की बस्स. एकतर ती ओव्हरस्मार्ट नाहीतर डोक्यात जाणारी ओव्हरगोड कार्टी. ठीक आहे आपण जाउं दे न वो म्हणू. त्याचे चऱ्हाट नको. परंतु त्यामुळे जेव्हा बालकलाकार असा जबरी नैसर्गिक वाटणारा अभिनय वठवतात तेव्हा सलाम ठोकावासा वाटतो.
सगळ्या चित्रपटालाच त्या ११ वर्षीय वयाची ट्रीटमेन्ट आहे. बांधेसूद चित्रपट, कादंबरीला यथोचित न्याय देणारा. कदाचित माझा या वर्षीचा सर्वात आवडता चित्रपट.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

जॉनर, लाजर दॅन लाईफ च्या भव्य यशानंतर शब्दभांडारात नवीन पाहुणा = अंडर अ‍ॅक्टींग.
पण मूळ शब्द अंडर प्ले च. मी असंच करतो.

महिला द मार्ग , जॉनर चं स्पेलिंग काय ?

अमितव, काहींना ते तसे चित्रपट सुचवणे कामात येते. इथे काहींना म्हणजे आमच्याकडे तरी त्याचा लाभ घेतला जातो. तर ते सर्वांसाठी टाकाऊ नाही.
स्पेशली ख्रिस्तमस्त आला की आमच्याकडे तिथेच सुचवलेले पिक्चर बघितले जातात एका मागोमाग एक..

अरे सर्वांसाठी सदासर्वदा टाकाऊ आहे असं म्हटलंय का रे कुठे? मला आवडत नाही, त्याला चार लोकांनी +१ दिलाय तू -१ दे संपलं.
त्याच्या युज केसेस आहेतच. आवडत नाही म्हणजे वापरत नाही, नजरही टाकत नाही असं ही नाही. फक्त त्याने झापडबंद फीलिंग येतं आणि म्हणून त्या फीचरचा फार वापर न करता कटाक्षाने बाकी ठोकळ्यांकडे नजर टाकायचा प्रयत्न करतो.
त्यापेक्षा मला मी निवडलेली सिरिअल किती आवडू शकेत त्याच्या परसेंटेजच्या गळाला माझा मासा चटकन लागतो. ते '९८%' बरोबर होतं का चूक हे बघायला मी चक्रमसारखा तो कंटेंट लावतो. Proud
मग काय आवडतोच. थोडक्यात काय जो जे वांछील तो ते लाहो. यात वाद घालण्यासारखं काही नाही. आणि तुझं वरच्या ओळीतलं बेट मी घेणार नाही.

त्याला चार लोकांनी +१ दिलाय तू -१ दे संपलं.
>>>>
त्यालाही प्लस वन मी दिलाच की. तो मुद्दाही बरोबर आहे म्हटलेच आहे की

माझ्या लक्षात आलंय की अमॅझॉनवर जे आय एम डी बी रेटिंग असते ते बहुतेकदा बरोब्बर असते त्यामुळे ५ च्या खाली रेटिंग असेल तर मी क्वचित तो सिनेमा, मालिका पहाते. ५ ते ६ काहीतरी बरे पहायला मिळते. ६ ते ७ थोडेतरी गुंगवुन ठेवणारे असते. ७-८ मस्त आणि ८ च्या वर डोळे झाकुन पहाते. यातले हिंदी बाद कारण तिथेही फालतु सिनेमांना ७, ८ रेटिंग पाहिले.
नेटफ्लिक्सवर ते नाही. मग ते गुगल करुन पहाता येते.

>> यातले हिंदी बाद कारण तिथेही फालतु सिनेमांना ७, ८ रेटिंग पाहिले.
नेटफ्लिक्सवर ते नाही. मग ते गुगल करुन पहाता येते. <<

जवळ जवळ सगळ्या भारतीय सिनेमासाठी आहे हे. असेच स्पॅनिश चित्रपटांबाबत.

अतिशय बिनडोक जनता आहे आपली.

त्यामुळे भारतीय चित्रपट (आयमडीबी रेटिंग - ५) असे धरूनच जावे. अगदी मोजके अपवाद वगळता.

शक्यतो आयमडीबी बघून भारतीय चित्रपट पाहू नयेत. मी तीन चार मित्रांनी सांगितल्याशिवाय ट्रेलरसुद्धा पाहत नाही.

ढीगाने चित्रपट असतात.

एका वर्षातले जगातले उत्तम चित्रपट जरी म्हंटले तरी ते शेकड्याने निघतील. त्यात काही मित्र दिवसाला दोन या गतीने वर्ल्ड मुवीज पाहून जबरदस्त कॉम्प्लेक्स देतात.

त्यातून आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे. म्हणून जितके भंगार टाळू तितके बरे असा विचार करतो. मी फारफारतर महिन्यातून तीन चित्रपट शांतपणे पाहू शकतो इतका कमी वेळ मिळतो. आहे तो वेळ सत्कारणी लागावा हीच इच्छा आहे. त्यामुळे वर्षाला २४ च्या वर चित्रपट पाहायचे नाही असे ठरवले आहे. तसेही पाहून पाहून किती पाहणार म्हणा.

एक वर्ष लेट चित्रपट पाहतो. म्हणजे वेळापत्रक करायला बरे जाते. अगदीच जवळच्या माणसाने रेकमेंड केले असेल तरच या वर्षीचा चित्रपट पाहतो.

मी घरी चित्रपट पाहायला एका लहान खोलीत मोठा सेटअप केला आहे. थिएटरपेक्षा जास्त आनंद मिळतो. एखादी सुंदर बिअर घेत पूर्ण झोकून देऊन चित्रपट आणि आवडत्या सिरीज पाहतो.

शक्यतो सगळ्या हिंदी-मराठी वेब सिरीज कृतक असतात त्यामुळे त्या पूर्णपणे टाळतो. बहुतांश भारतीय कन्टेन्ट फिल्टर होतो.

सध्या mandolorian ही सिरीज पाहतोय. दुसरा सीजन. तिसरा सीजन पुढच्या वर्षी.

धन्यवाद उपाशी बोका. आत्ता आठवले, कादंबर्‍यात कितीतरी वेळा वाचले आहे, “कृतककोपाने ती म्हणाली’ वगैरे.

>>एका वर्षातले जगातले उत्तम चित्रपट जरी म्हंटले तरी ते शेकड्याने निघतील.
त्यामुळे वर्षाला २४ च्या वर चित्रपट पाहायचे नाही असे ठरवले आहे.
एक वर्ष लेट चित्रपट पाहतो
थिएटरपेक्षा जास्त आनंद मिळतो. एखादी सुंदर बिअर घेत पूर्ण झोकून देऊन चित्रपट आणि आवडत्या सिरीज पाहतो. >> ही वरची चार विधानं वाचल्यावर धागा काढताना तुमचा आयडी हॅक झालेला का काय असं वाटुन गेलं. इतकं जर सगळं पर्फेक्टली सॉर्ट्रेड आहे तर नक्की माशी कुठे शिंकते आहे? का या जगात तुमच्या मोजपट्टीनुसार काही कृतक निर्मिती न होवो असा काही उदात्त हेतू आहे? आता असं जर होऊ लागलं तरी तुम्ही फक्त २४ चित्रपट बघणार! मग उरलेल्या कृतक फ्री मालाने कोणाकडे बघायचं? हा एक ज्वलंत प्रश्न बोलेतो क्रायसिस तयार होणार आहे.

एकदाचा वाळवी पाहिला. आवडून घ्यायचा हे ठरवल्याने आणि लुटेरे पाहिलेला असल्याने मनोरंजन झाले. मस्त जमलाय.

पुढचा बर्‍यापैकी जमलेला सिनेमा पाहण्याआधी लुटेरे सारखा सिनेमा हुडकणे गरजेचे आहे.

भंगार चित्रपट ही काळाची गरज आहे. ते कालही होते, आजही आहेत, उद्याही राहतील. भंगार चित्रपट निर्माण नाही झाले तर चांगल्या चित्रपटांना चांगलं कोण म्हणणार? सगळेच चांगले निघाले (ते कृतक की काय ते - ते नसलेले) तर मग ते सगळेच 'साधारण' होऊन जातील. भंगारातूनच चांगले चित्रपट उदय पावतात. वेदांमध्ये म्हणून ठेवलंच आहे - ओम भंगारमदः भंगारमिदं भंगारादुत्तममुदच्यते|'

>>>>>> भंगारादुत्तममुदच्यते|'
Lol Lol

मागे उभा भंगार पुढे उभा भंगार
माझा भंगार माझ्याकडे पहातो आहे
Lol

रॉय. तुमचे बरोबर आहे मला पण नक्की काय बघावे हा प्रश्न पडतो. सर्वत्र मिडिऑकर फेअर अवेलेबल असते. आय एम डीबी चे अ‍ॅप आहे ते घ्या व त्यावर रेटिन्ग चेक करुन सिलेक्षन करा. तीन तास मजेत गेले पाहिजेत. किंवा काहीतरी विचाराला खाद्य असले पाहिजे.

भंगा र चित्रपट जास्त क्वांटिटि बनतात कारण जास्त प्रेक्षक भंगार बघणा रेच असतात. त्याला त्यांची कारणे असतात. पण अभिरुची डेव्हलप झालेली असली की भंगारता बघवत नाही. त्यात अरे इतके पैसे ह्यावर का बरे खर्च केले असे ही वाट्ते. पण इंडस्त्रीची गणिते वेगळी असतात.

प्राइम वर आज सर्फ करताना आयएम डीबी वर टॉप रेटिन्ग वाले चित्रपटच आले तेव्हा तुमची आठवण आली. आप दिल छोटा न करो. तुमच्या मुव्ही थिएटर एक्सपिरीअन्स रूमचे फोटो द्या. होम थिएटर आहे का? इथे माझ्या ओळखीच्या काही लोकांकडे आहेत अशी प्रायवेट होम थिएटर्स.
मी व नवर्‍याने पण अश्या टेकचे डेमो पाहिले होते. तेव्हा तर ओटीटी पण नव्हते. आता एकटीसाठी मी काही इतका खर्च करणार नाही. टीव्ही जंक्षन छान आहे. व ड्रॉइन्ग रूम मध्ये एसी लावला की थिएटर फीलिन्ग च येते. पण मी तेच तेच मस्त सिनेमे बघते.

तुम्ही दिग्दर्शकांच्या नावाने पण सर्च रिफाइन करा. कोरिअन चित्रपट बघा. वर्ल्ड सिनेमा बघा. व रिव्यु लिहा.

'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स' सुद्धा सिनेमातलं समजतं अशी समजुत असणार्‍या काही लोकांना भंगार वाटू शकतो! विचार करायची सवय मनाला लावुन घेतलेली नसली की साधी सोपी समजावुन सांगणारी करमणूक भारी आणि बाकी भंगार असा मामला होतो.
अर्थात आपल्याला झेपेल समजेत ते पहावे आणि सुखी रहावे हेच अंतिम सत्य आहे. त्यात दुसर्‍याला भंगार म्हटलं की आपल्या आवडीला भारीपणाची पुटं चढतात. ती झुल अंगावर घेतली की दोन बोटं वर आपणच आपला रथ हाकायचा!

होम थिएटर आहे का? इथे माझ्या ओळखीच्या काही लोकांकडे आहेत अशी प्रायवेट होम थिएटर्स. >> कधी कधी होम थिएटर् मधे पाहिले कि भंगार सिनेमा पण चांगला वाटू शकतो मग आय एम डी बी च्या रेटींग चे काय करणार ? Wink

हे चांगल्या वाईट चित्रपटाचे निकष प्रचंड म्हणजे प्रचंड प्रमाणात व्यक्तीसापेक्ष आहेत.

नुकतेच चिकवा वर चर्चा चालू होती. तिथे कित्येकांनी एव्हरग्रीन कॉमेडी अंदाज अपना अपना पाच सहा वेळा पाहिला होता. त्यातील एकेक डायलॉग लोकांना चटचट आठवत होते. पण तेच तिथे अशीही जनता होती की त्यांनी चक्क कंटाळून तो चित्रपट अर्ध्यात सोडला. ठिकठाक वाटणे दूर पुर्ण पाहू शकले नाहीत. मग आता ठरवावे कसे काय भंगार आहे आणि काय अंगार आहे?

इथे लोकांना बहुतेक "टू बॅड दॅट इट्स गुड" म्हणजे "इतके भंगार की खरेतर अंगार" ही कन्सेप्ट ठाऊक नाही असे दिसते.

मी अशा चित्रपटांविषयी बोलत नाही आहे.

उदा. रामसे बंधूंचे चित्रपट, गुंडा, मिथुनचे चित्रपट इत्यादी. अंदाज अपना अपना जरा parodyचे वळण घेतो पण तोही खूप कल्ट आहे.

माझे आवडते चित्रपट : द रूम, बर्डेमिक, राताटोईंग, प्लॅन नाईन फ्रॉम औटर स्पेस, द फनॅटीक, मानोस, शार्कनाडो इत्यादी.. मला असे चित्रपट खूप खूप आवडतात. असे चित्रपट कालांतराने कल्ट होतात कारण ते खरेतर जेनुइनली फसलेले असतात. या "टू बॅड दॅट इट्स गुड" चित्रपटांची माझी लिस्ट खूप मोठी आहे.

मी चांगल्या चित्रपटाचा आव आणून बनवलेले मिडीयम दर्जाचे भंगार चित्रपट या अर्थाने भंगार चित्रपट म्हणतो. उदा. कासव, इन्व्हेस्टमेंट असे मराठी चित्रपट.

असो.

गंगोत्री भंगार है, मिठी नदी अंगार है !

काहींना गंगेचे पाणी उगमाजवळ पवित्र वाटते, काहींना वाराणसीत तर काहींना मिठी नदीचे पाणीही पवित्र वाटू शकते. प्रत्येकाच्या आपापल्या श्रद्धा आहेत. ज्यांना मिठी नदीचे पाणी निर्मळ वाटते ते गंगोत्री आणि वाराणसीची उदाहरणे देऊन मिठीच कसे बरोबर हे सांगू शकतात.

चांगल्या चित्रपटाचा आव आणून बनवलेले मिडीयम दर्जाचे भंगार चित्रपट >> कोणते ते जरा उदाहरण द्या मग नक्की कळेल तुम्ही नक्की कशाला भंगार म्हणताय.
परवाच मी चुकुन प्राईमवर एक लावला. काही काम करताकरता पाहिला. लक्ष होते पण काहीही कळलं नाही काय चालु होते. नंतर पाहिलं तर ठळकपणे रेटिंग १.५ होतं. मग काय, आलेला राग स्वतःवरच (मनातल्या मनात) काढला झालं.

अमितव, कृतक फ्री माल >>> Lol

आजकाल तर मी एखाद्या web series चा पहिला भाग आवडला तर शेवटचा भाग, last 15 min, बघते.. जर शेवट बरा promising, positive वाटला तरच सगळे भाग बघते.. नाहीतर सगळी series रोचक असते आणि unrealistic काहीतरी शेवट असतो.. असं वाटतं, का मला दुर्बुद्धी झाली आणि हे पाहण्यात वेळ वाया घालवला..

मी तर सर्व उलट बघतो. किंवा नॉन लिनिअर पद्धतीने बघतो. गाभा काय आहे? हे समजले कि बास. वेळ कुणाकडे आहे?

आजकाल तर मी एखाद्या web series चा पहिला भाग आवडला तर शेवटचा भाग, last 15 min, बघते.. जर शेवट बरा promising, positive वाटला तरच सगळे भाग बघते.. >>>>>>>>>>>
मी सुद्धा हाच फॉर्म्युला वापरतो !
विनाकारण जीव काढून काढून अख्खी सिरीज बघण्यापेक्षा हे परवडत .

Pages