सरल विधि-विधान; कमी खर्च मधे वार्षिक श्राद्ध करायचा आहे

Submitted by Miaris on 13 May, 2023 - 03:29

नमस्कार मी इन्दौर मधे राहतें माझे मिस्टर १४ जुन २०२२ ला वैकुन्ठ वासी झाले सासु सासरे कोरोना मधे २०२२ अमाला सोडुन गेले | माझा मुलगा २० वर्षा चा आहे | माझ्या मिस्टरा न ला किडनी प्राब्लम होता | We are fighting since last 5 years with this disease but ultimately lost him . आर्थिक स्थिति खुब ख़राब आहे | कमी पैसे वर्ष श्राद्ध करु शकतो का? My budget is 1000 rs ..I asked many pandit but they demand at least 4000 rs ..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाचून वाईट वाटलं.
मला यातली काहीही माहिती नाही. पण एवढी अडचण असेल आणि श्राद्ध करण्याची तीव्र इच्छा असेल तर दरवर्षी पुण्यतिथीला तुमच्या मिस्टरांना ज्याची आवड होती, त्यासंदर्भात काही करता आलं तर पहा. उदाहरणार्थ त्यांना झाडा-फुलांची आवड असेल तर एखादं फुलझाड लावा, मुलांची आवड असेल तर अनाथ मुलांच्या आश्रमाला यथाशक्ती देणगी द्या, शिक्षणासंबंधी काही काम केलं असल्यास एखाद्या शाळेला देणगी द्या.
असं काहीही जमणार नसेल तरी अपराधी भाव मनात न बाळगता जे जमेल ते करा.
नकळत काही कमीजास्त लिहिलं असल्यास क्षमस्व.

Thank you so much my son also wants to the same ..my husband wants to do free dialysis for some kidney patients..

वाचून वाईट वाटलं.परमेश्वर तुम्हाला यातून लवकर सावरण्याची शक्ती देवो.
ज्ञान प्रबोधिनी च्या स्वयंसेविकाना कॉन्टॅक्ट करा.ते ऑनलाईन मीटिंग वर शास्त्रोक्त श्राद्ध करून देतात. आर्थिक अडचण समजावून सांगितल्यास ते कन्सिडर करतील.
https://www.jnanaprabodhini.org/paurohitya/
हिरण्य श्राद्ध नावाचा प्रकार आहे.त्यात ब्राह्मणाला (किंवा श्राद्ध विधी हँडल करणाऱ्या व्यक्तीला, जाती स्पेसिफिक नाही) अल्पोपहार(केळी, उपास पदार्थ) देऊन सकाळच्या वेळेत अल्प विधी केले जातात.
यातले काहीच जमत नसेल तर वर सर्वांनी सुचवलेले उपाय(दान, झाडं लावणे इत्यादी) हेही करता येतील.
जे काही करताय त्यावर स्वतःची श्रद्धा, स्वतःचा पूर्ण विश्वास असुदे.मुख्य मनाची शांती महत्वाची.

जमल्यास श्राद्ध कराच करा. अनुने सांगीतलेले उपाय फार आवडले.
शक्य असल्यास दक्षिणेस तोंड करुन विष्णु सहस्रनाम म्हणुन पहा. स्वतः वाचायचे. दक्षिण ही यमाची व पितरांची दिशा मानली जाते.

mi_anu +++१
पण ते त्यांच्या पद्धतीने करतात.
सर्व क्रिया कर्म. त्याचा अर्थ आणि का हे समजाऊन सांगतात. समाधान वाटते .
मी घाटावर केले नाही. जावे लागत नाही. घरीच करता येते. हा निर्णय मला वाटत दुसऱ्या दिवशीच घ्यावा लागतो. ते त्यांच्या चार्ट प्रमाणे आकार घेतात. पावती देतात. त्यांच्याशी बोलाच.

>>>>>>>हिरण्य श्राद्ध नावाचा प्रकार आहे.त्यात ब्राह्मणाला (किंवा श्राद्ध विधी हँडल करणाऱ्या व्यक्तीला, जाती स्पेसिफिक नाही) अल्पोपहार(केळी, उपास पदार्थ) देऊन सकाळच्या वेळेत अल्प विधी केले जातात.
हे माहीत नव्हते. विस्कॉन्सिनला असते वेळी माझ्या साबा गेल्या. तेव्हा सकाळी आटोपशीर श्राद्ध केले होते. नंतर काही दिवस मी विष्णु सहस्रनाम म्हटलेले (स्वप्रेरणेने. कोणी सांगायची गरज नव्हती. माहीत होते.),

हिंदु धर्मात चार प्रकाराने श्राध्द केले जाऊ शकते.

१) संकल्प करुन श्राध्दाचे पदार्थ श्राध्दासाठी बोलावलेल्या ब्राह्मण लोकांना देणे

२) संकल्प करुन फक्त शिधा देणे

३) संकल्प करुन एका वेळेच्या भोजना इतकी दक्षिणा देणे

४) दक्षिण दिशेला श्राध्द तिथीला तोंड करुन प्रार्थना करणे, असर्मथता व्यक्त करणे

श्राध्दात श्रध्देला फारच महत्व आहे.

तिकडे जानप्रबोधिनी पध्दतीने श्राध्द कोणी करते का याची ही चौकशी करावी,

सहवेदना _/\_
समजू शकते तुमची स्थिती

श्राद्ध विधि म्हणजे मृत व्यक्तीच्या आत्म्याला
१) इथून मुक्त करणे,
२) तो आत्मा स्वर्गात जाऊ शकत नाही कारण या जन्मीची पापं. त्याचं परिमार्जन म्हणून दान देणे. यांचे मंत्र म्हणणे.
३) आत्म्यास अन्न लागते ते पोहोचवण्यासाठी ब्राह्मणास (एक/दोन) जेवू घालणे. त्यांच्यामार्गे ते अन्न पोहोचते मानतात. हे काही इच्छा बोलतात ती पूर्ण करणे. त्यातून मृतात्म्याची इच्छा पूर्ण होते असे मानणे.

यासाठी खर्च येतो.
( वरील क्रम २ चा खटाटोप केल्याबद्दल -'आत्म्यास स्वर्गात ढकलणे' - हे विधि करणाऱ्यांना प्रायश्चित्त करावे/घ्यावे लागते. चार तास मंत्रजप करावा लागतो. )

मरणासन्न व्यक्ती कधीकधी बोलून ठेवतात की माझा आत्मा सरळ स्वर्गातच जाणार आहे तरी उगाच श्राद्ध विधिचा खटाटोप करू नका. तर मग काही करायला नको. निश्चिंत राहावे.

परिस्थिती समजतो आणि अशाच अनुभवातून गेलो आहे.

तुम्ही काहीच धार्मिक विधी केले नाही, दान दिले नाही किंवा दुसर्‍या टोकाला २५ लाखाचे / कोटीचे दान केले , हजारो लोकांना जेवण दिले... या पैकी कुठल्याच कृत्यामुळे गेलेल्या व्यक्तीला काहीही फरक पडत नसतो.

मनुष्य गेल्यावर त्याचे आयुष्य पूर्ण होते. जे काही विधी करत असतो/ करणार असतो ते केवळ मागे राहिलेल्या लोकांच्या समाधानासाठी. त्यामुळे कुठलेही विधी करायलाच हवे याचे कुठलेही धार्मिक बंधन नाही.

आर्थिक स्थिती नाजूक असतांना असे काही करणे धर्माविरुद्ध आहे. जगणे सुकर , सुरक्षित व्हावे यासाठी जगण्याचे धार्मिक नियम मानवाने बनविलेले आहेत. काळानुरुप ते बदलता आले तरच धर्म टिकतो आणि समृद्ध होतो.

स्वत: कडे प्रथम लक्ष द्यायचे, मुलाचे शिक्षण आणि स्वत: च्या उर्वरित आयुष्यासाठीचे आर्थिक स्वालंबन मिळविणे हे सर्वात महत्वाचे आहे. जेव्हा शक्य असेल तेव्हा (अ) गेलेल्या व्यक्ती बद्दलच्या चांगल्या आठवणींना उजाळा द्यायचा. (ब) झाडे लावा असा स्तुत्य सल्ला वर आलेलाच आहे, (क) गरजू उपाशी व्यक्तीला जेवण बनवून द्या. एकाला दिले तरी चालेल, सहज झेपेल तेव्हढेच.
हे सर्व १४ जून रोजी किंवा ठराविक तिथीने किंवा पितृपक्षातच करायला हवे असेही नाही. तुमच्या सोईने तुम्ही केव्हाही करायचे.

जे काही करायचे ते माणूस जिवंत असताना करावे.
'बैल गेला झोपा केला' काय उपयोग (वैयक्तिक मत आहे).

सर्वानच मनः पुर्वक धन्यवाद । ज्ञान प्रबोधिनी मधे सम्पर्क झाला आहे । आन लाइन श्राद्ध करण्यात येइल । आपण सर्वांचे सजेशन्स लाख मोला चे आहे । माझ्या आणि मुला चा मना चा ताण कमी झाला । Thank you so much,..
We need your blessings..My son Manu is preparing for Bank and SSC exams. Please give him blessings

श्राद्ध करायचे आहे त्यामुळे तो करावे का नाही हा विषय नाही. फक्त कसे आटोपते करावे हा विचार होता तो मार्ग सापडला. आनंद आहे. इच्छापूर्ती महत्त्वाची.

Miaris, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला अनेक शुभेच्छा! त्याला घवघवीत यश मिळो. आतापर्यंतचा प्रवास खडतर होता, पुढील प्रवास अनेक चांगले अनुभव देणारा असो.

ओम।शांती

धागा वाचला तेव्हा अपेक्षित माहिती माझ्याकडे नसल्यामुळे उत्तर दिले नव्हते.
Update वाचून कळाले की तुमचे काम होत आहे.
एकूण परिस्थिती विषयी वाचून तुम्हाला सहवेदना कळवतो
तुम्हाला आणि तुमच्या मुलासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा

मियारीस तुम्हाला व लेकाला शुभेच्छा पुढील वा टचाली सा ठी. इथे एक एकटे पालक गृप आहे तिथे पण तुमचे पुढचे बाफ काढू शकता. त्या आधी गृपचे सभासदत्व घ्यावे लागेल.