तू तेव्हा तशी

Submitted by Ajnabi on 22 March, 2022 - 04:07

राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट 'तू तेव्हा तशी', स्वप्नील जोशीची आणि शिल्पा तुळसकर यांची नवी मालिका
झी मराठीवर रात्री ८ वाजता
कलाकार : स्वप्नील जोशी
शिल्पा तुळसकर
अभिज्ञा भावे
सुनील गोडबोले
सुहास जोशी

Group content visibility: 
Use group defaults

आता वीस बावीस वर्षांपूर्वी त्याला कोण आवडत होती त्याचा शोध घेत आहेत मावशी आणि पटी. त्याने काय फरक पडणार आहे त्यांनाच ठाऊक. आज रात्री आठ वाजता आहे एक तासाचा भाग.

सुलू तुम्ही चाळीस असणार >>>>>>> अहो नाही हो

अनामिकाची आई आणि सौरभची मावशी मस्त. दोघींचं काम छान आहे. >>>>>>>> ती अनामिकाची आई नाही, सासू आहे म्हणे. मुलाने कायतरी वाईट काम केल असेल म्हणून त्याला सोडून ती अनामिकाबरोबर राहते.

सुलु पन्नासच्या वरचे पण म्हातारे नसतात हा Wink .

मावशीला फोटो सहज मिळतो, जणू तिच्यासाठी काढूनच ठेवतो पट्या.

मावशीला बातम्या देणारा नील, पटीच्या घरात काय करत असतो. मी मधे मधे बघते म्हणून माहीती नाही.

अच्छा असं आहे का, थॅंक यु निधी. मी समजत होते पट्याच्या ऑफिसमध्ये काम करतो आणि मावशीकडे जेवतो.

सुरुवातीच्या भागात पट्याने त्याला मावशीकडे बघितलेलं असतं पण असो. हा रॉजर काय प्रकार आहे.
काल प्रवीण तांबे चित्रपटात चंद्याची बायको दिसली. छोटासा रोल आहे.

सुरुवातीच्या भागात पट्याने त्याला मावशीकडे बघितलेलं असतं >>> अच्छा.

तो राधाचा bf बाहेर सगळं कांदा, बटाटा, लसूण खातो आणि पटीने राबून एवढा स्वयंपाक केला, तिथे मी हे खात नाही, ते खात नाही करून पुरी लोणचे खातो. राधाला तोंड नाही का बोलायला, तू बाहेर सर्व तर खातो, माझ्या आई आजीने केलेल्या अन्नाचा का अपमान करतोस.

पट्या किती बावळट आहे, खूप दिवसांनी जेवायला नीट मिळालं बहुतेक त्याला पटीकडे. स्वत: कमावतो तर मावशीकडे का नाही नीट जेवत, डबा नेत. वल्लीला पैसे कमी द्यायचे, तू नीट देत नाहीस मला सांगायचं. पोटासाठी राबायचे मग सोय असताना आपल्या पोटावर का अन्याय करायचा.

स्पेशल एपिसोडस मधले काही सीन्सच बघितले.

आज नाही बघता आला. उद्या दाखवला परत तर बघेन. दुपारी अकराला दाखवतात पण बहुतेक शनिवारचाच भाग लावतील कारण रिपीटचे वेळापत्रक ठरलेले असते.

दुपारी अकराला दाखवतात पण बहुतेक शनिवारचाच भाग लावतील >>> हो mostly .

मी फुडी असल्याने मला सर्वात राग, वल्ली पट्याला खायला नीट देत नाही त्याचा येतो. भले वन मिल डिश किंवा टू मिल डीशेस कर पण नीट खाण्यासाठी योग्य तर कर.

सुलु पन्नासच्या वरचे पण म्हातारे नसतात हा >>>>>>> Happy Lol

आज मावशी चक्क गात होत्या.

पट्टयाला पहिल्यान्दाच आज मोकळेपणाने हसताना बघितल.

राधा स्वतः ला पुढारलेली समजते, तिची आई तिच्यापेक्षा दोन पावले पुढे आहे हे जर तिला कळत तर ती झीट येऊन पडेल.

अनामिका पुलाव केला असही म्हणत होती. ताटात तर दिसत नव्हता कुठे पुलाव.

माईमावशी पाठमोरी तिच्यासमोरच बसलेली, तरीही तिला दिसली नाही?

मला तो राधेश (राधाचा bf, नाव लक्षात नाही राहत त्याचं, हितेश आहेना बहुतेक) , एकेक पदार्थ काढून ठेवत होता त्यापेक्षा फक्त पुऱ्या शेजारच्या डिशमध्ये ठेऊन ही का बाजूला करत नाही, एवढा वेळ का घालवतो असं वाटलं. बाकी सर्व भरलेलं ताट बघून तिथे जाऊन मलाच जेवावसे वाटत होतं, आयते आहे म्हणून, हाहाहा.

पट्याने पण काही पदार्थ काढून ठेवले ना, भजी वगैरे की काय, ते फार समजलं नाही पण न्याय दिला स्वयंपाकाला म्हणून बरं वाटलं.

स्वयंपाकाचं एवढं कौतुक करताय तर त्यासाठी ऍपवर बघावाच लागेल हा भाग. आता शनिवारचाच भाग दाखवताहेत. नवीन प्रोमो बघितला. राधा म्हणते प्रेम करायचं नाही. तिला काय माहित तिची आई लग्न झालेल्या माणसाशी विबासं करायला तयार होती आणि तिच्या आजीचा त्याला पाठिंबा होता. अनामिका खरंच आधी खूप desperate वाटत होती. आता थोडी शांत झालीये.

स्वयंपाकाचं एवढं कौतुक करताय तर त्यासाठी ऍपवर बघावाच लागेल हा भाग. >>> हाहाहा. मला जे जे दिसलं ते लिहिते, असा साग्रसंगीत स्वयंपाक काहीजणांकडे रोज होतही असेल, इथे वल्ली जे करते त्याच्याशी नकळत तुलना केली जाते.

पुऱ्या, तीन भाज्या त्यातली एक बटाटयाची होती. अळूवडी, कांदाभजी, सांडगी मिरची, लोणचे, लाल चटणी हे सर्व दिसलं मला (पापड पण होता की काय तो राधेश काढून ठेवताना आठवत नाही), कोशिंबीर पण होती बहुतेक . खीरीचा उल्लेख होता. वरण भात, पुलाव वगैरे असेलच पण मला दिसला नाही. मी येता जाता आमचा माफक स्वयंपाक करताना बघत होतेना, हाहाहा. इतके सर्व प्रकार मी सणासुदीला किंवा पाहुणे वगैरे जेवायला येणार असतील तरच करते. अर्थात पटीनेही राधेश जेवायला येणार म्हणून एवढं केलं असावं.

खादाडीच्या जाहिरातीसाठी मालिका काढली असे वाटत आहे Lol वल्ली नावाची वचवच काल आणि आज नसल्याने शांतता होती. माईमावशी काही पट्याच्या डोकयावर अक्षता पडल्याशिवाय शांत बसायची नाही. आज मेड इन इटलीमध्ये पट्या त्या माणसाला काय धाक दाखवतो, या चमच्यासारखा वाकडा करीन? ऑफिसतच का नाही विचारत स्पष्ट रेस्टॉरंटबद्दल. अनामिका तर रोजच नटून थटून असते. तिला काय सारखं सगळे आज काय विशेष नटलीस विचारतात.

"आम्ही पुण्याचे बामण हरी" ह्या घाशीराम कोतवालमधील एका गाण्याची ट्युन वल्लीचा डुक्कर आप्पा स्क्रीनवर आला की मागे वाजवतात.

खादाडीच्या जाहिरातीसाठी मालिका काढली असे वाटत आहे >>
दिग्दर्शक, संवादलेखक,पूर्ण टीम च खवय्या आहे की काय असे वाटते....
सुजाता मस्तानी, बेडेकर मिसळ,गिरिजा चा चिकु मिल्कशेक, दुर्वांकुर-श्रेयस चे उल्लेख, बटाटा भाजी-पुरी-कुर्मा-खीर-पुलाव-भजी-अळुवडी असे पटी च्या घरचे भरलेले ताट ,आंबेडाळ, लाडु, नारळ वड्या, रिसोटो, रॅविओली,लझानिया.... आणि काय काय... इतके पदार्थ ऑल्ररेडी येउन गेले...
प्रत्येक एपिसोड मधे एक तरी पदार्थ किंवा उल्लेख असतोच असतो....
मागे झी वर सुकन्या मोने, प्राजक्ता माळी, ललित प्रभाकर ची अशीच सिरीअल होती... सारखं खाणं किंवा रेसिपी दाखवयचे ते लोक... Happy

पटयाच्या मोबाईलला लॉक नाही का. संध्याकाळी जाऊ असा मेसेज पाठवतो ना निल. अनामिका पैसे देते की काय मिक्सरचे. स्वयंपाक, खाणं आणि खायला घालणं या विषयाभोवतीच फिरतेय मालिका.

वल्ली किती डोक्यात जाते, असं इतकं कोणी असतं का. कित्ती तो अतिरेक.

वल्ली बाबा का कुटत असतात, सचिन पण कुटू शकला असता ना त्या दगडीत. पट्याने मिक्सर घ्या म्हणायच्याऐवजी सचिन तू कुट किंवा वल्ली तू कुट सांगायचं. बाबांना लसूण सोलायचे काम द्यायचं. तसंही त्यांनी कुटले तरी काय हरकत होती म्हणा, चकाट्या तर पिटत असतात. मावशी एवढी कामं करते ते कधी दिसत नाही पट्याला. वल्लीबाबांचा पुळका येतो.

सचिनलाच कुटला पाहिजे. काहीच कामाचा नाही तो. पट्या मावशीकडे जाऊन फक्त हादडतो आणि तिचे गालगुच्चे घेतो, मदत कधीच करत नाही. अनामिका सरळ बोलते, आपल्याला अजून एकत्र वेळ घालवायला मिळाला हे बरे झाले. आता अजून काय डोंबल प्रपोज करायचं राहलंय. तरी बरेच पाणी ओततील असे वाटत आहे. दोन्ही म्हाताऱ्या भेटतील कदाचित. ते आंबेडाळीचे कोडे काही सोडवले नाही. विसरले बहुतेक.

सचिनलाच कुटला पाहिजे. काहीच कामाचा नाही तो. >>> हाहाहा, सहीच.

ते आंबेडाळीचे कोडे काही सोडवले नाही. विसरले बहुतेक. >>> हो ना, बिचाऱ्या पट्याला आंबेडाळ मिळलीच नाही.

अनामिका आणि तिची सासू दोघींकडे सारख्याच चवीची आंबेडाळ असते. सासूकडे कुठून येते ते दाखवलंच नाही. तिने नीलचा डबा चोरला असेल.

मागे झी वर सुकन्या मोने, प्राजक्ता माळी, ललित प्रभाकर ची अशीच सिरीअल होती... सारखं खाणं किंवा रेसिपी दाखवयचे ते लोक...>>>>>>> छे त्यात उठसूठ गोडाचा शिरा असायचा. इथे बरीच व्हरायटी आहे. मालिकेचं नाव जुळून येती रेशीमगाठी

अनामिका चक्क लाईन मारतेय सौरभवर.
आवडतेय ही सिरीयल.
पण आवडणार्या सिरीयल नावडत्या कशा करायच्या हे झी म ला बरोबर येतं.

सासूकडे कुठून येते ते दाखवलंच नाही. तिने नीलचा डबा चोरला असेल.~~ नीलला मावशीच देते डबा अनामिकाच्या आईला द्यायला, "योग्य ठिकाणी पोहोचव" असे सांगून.

पण मावशी अनामिकाच्या आईला ओळखत नाही. तो डबा अनामिकासाठी होता. निल त्याच्या मॅमला डबा न देता तिच्या आईला का देईल.

सचिनलाच कुटला पाहिजे. काहीच कामाचा नाही तो. >>> खरच. मुळात अश्या काहीही कामधाम न करणार्या मुलाच्या लग्नाची एवढी घाई काय होती Uhoh वल्लीशी प्रेमप्रकरण आणि लग्नाच्या अधीचे मुलं अस पण काही नाहिये.

ते एका प्रोमामध्ये राधा अनामिकाला ' तु प्रेमात पडू नकोस' म्हणते तो भाग झाला का? माझ्याकडून तो मिसला गेला असेल.

आज राधा हरवलेली दाखवलीये.

राधा कसली आगाऊ आहे! आणि दरवेळी 'हितेन माझे सगळे लाड पुरवतो' हे पालुपद का म्हणे? तिच्या आईने तिचे लाड पुरवलेच नसतील असं वाटत नाही शितु कडे पाहून. तो मुलगा गपगुमान त्याच्या बाबांच्या मागे निघून गेला ते पण दिसत नाही का तिला?

Pages