निफ्टी नॉर्मल डिस्ट्रिब्युशन

Submitted by बोकलत on 8 March, 2021 - 04:11

मी मागे एकदा महाबळेश्वरला गेलो होतो. महाबळेश्वरची बाजारपेठ माझ्या आवडत्या बाजारपेठांपैकी एक आहे. खरं तर थंड हवेच्या सगळ्याच बाजारपेठा मला आवडतात. तर या बाजारपेठेत फिरताना एका दुकानाजवळ आलो तिथे विविध खेळ होते. ते नाही का असतात पन्नास रुपये देऊन रिंग टाका, बंदुकीने फ्रुटी पाडा, फुगे फोडा वैगरे वैगरे. त्यात एक खेळ होता ज्यामध्ये एक लाकडी बॉक्स असतो त्याच्या तळाला दहा एक खाचे केलेले असतात. आपण वरून लहान चेंडू सोडायचा तो घरंगळत खाली जातो ठराविक खाच्यात गेला कि पैसे दुप्पट तिप्पट होतात. तर मनात नसतानाही तो खेळ खेळलो आणि ते पन्नास रुपये गमावून बसलो. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना स्टॉप लॉसची सोय असते तशी जुगारात नसते यात स्टॉपलॉस १००%च असतो. तर हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे मी काही दिवसांपूर्वी एक संकल्पना पाहिली ज्यात एका अशाच बोर्डचा रेफरन्स घेऊन निफ्टीची पुढील काही दिवसांची चाल काय असेल त्याबद्दल अंदाज काढला होता. तर सगळ्यात प्रथम तुम्ही खालील चित्र पहा समजा वरून शंभर चेंडू एकेक करून सोडले तर ते कुठल्या खाच्यात पडतील असा तुमचा अंदाज आहे? सगळ्या खाच्यांत सारखेच पडतील, उजवीकडे/डावीकडे जास्त पडतील कि रॅन्डमली कुठेही पडतील. अंदाज बांधून झाला कि लिंकवर जाऊन व्हिडिओ बघा आणि नंतर लेख वाचा.
https://youtu.be/Vo9Esp1yaC8
https://youtu.be/6YDHBFVIvIs
1.JPG

तर या बोर्डला Galton Board म्हणतात आणि चेंडूची जी विभागणी झाली त्याला नॉर्मल डिस्ट्रिब्युशन/बेल कर्व म्हणतात. हि विभागणी भरपूर गोष्टींमध्ये नैसर्गिकरीत्या घडून येते. उदा. जर तुम्ही वर्गातल्या मुलांच्या गुणांची सरासरी काढलीत तर त्या सरासरीच्या जवळपास बहुतेक मुलांचे गुण एकवटलेले दिसतील जसजसे तुम्ही त्या सरासरीपासून दूर जाल तसतशी हि संख्या कमी होत जाईल. माणसाचं ब्लड प्रेशर, उंची, फळांचे वजन, कंपनीतला पगार यासारख्या भरपूर गोष्टींमध्ये हे नॉर्मल डिस्ट्रिब्युशन नैसर्गिकरित्या तयार झालेलं असतं. प्रायोगिक तत्वानुसार किती चेंडू कुठल्या खाच्यात पडतील याचा एक थम्ब रुल आहे. जे पहिलं स्टॅंडर्ड डेव्हिएशन(१ SD) असतं त्यात ६८ चेंडू पडतील म्हणजेच ६८% डेटा हा पहिल्या स्टॅंडर्ड डेव्हिएशनमध्ये एकवटलेला असतो जर आपण डेव्हिएशनची रेंज वाढवली(२ SD) तर त्यात ९५ चेंडू पडतील म्हणजे ९५% डेटा हा दुसऱ्या डेव्हिएशनमध्ये एकवटलेला असतो. तसेच तिसऱ्या डेव्हिएशनमध्ये ९९.७% डेटा एकवटलेला असतो. तर आता आपण याचा उपयोग करून आपण निफ्टीची पुढील वर्षाची, या महिन्याची चाल ओळखू .

1.1.JPG

१. सगळ्यात प्रथम निफ्टी वेबसाईटवर जाऊन निफ्टीचा मागील एक वर्षाचा डेटा डाउनलोड करायचा. मी मार्च २०२० ते फेब २०२१ डेटा डाउनलोड केलाय.
123.JPG

२. आता आपल्याला निफ्टीचा डेली रिटर्न काढायचा आहे. यासाठी फॉर्मुला आहे =LN(current day close/previous close). यानुसार आपल्याला मागील महिन्यापर्यंत प्रत्येक दिवसाचा डेली रिटर्न मिळेल.
Daily return 2.JPG

३. या ज्या डेली रिटर्न्सच्या किमती मिळाल्या आहेत त्यांचा ऍव्हरेज काढला तर तो ०. ११% येतो. आणि स्टॅंडर्ड डेव्हिएशन काढलं तर २.०४% येतं.
3.JPG

४. आता आपल्याला वर्षाची निफ्टी रेंज काय असेल ते काढायचं आहे. तर आता आपल्याला सगळ्यात प्रथम निफ्टीचा ईयरली रिटर्न आणि ईयरली स्टॅंडर्ड डेव्हिएशन काढायला लागेल .

निफ्टी ऍव्हरेज ईयरली रिटर्न = डेली रिटर्न(०.११%) * २५२ = २७.६%

निफ्टी ईयरली स्टॅंडर्ड डेव्हिएशन = डेली स्टॅंडर्ड डेव्हिएशन (२.०४%) * square root (२५२)= ३२.३७%

५. जे पहिलं स्टॅंडर्ड डेव्हिएशन असतं त्यात ६८% डेटा एकवटलेला असतो हे आपण वर पाहिलंय. निफ्टीची एका वर्षाची रेंज असेल

वरची रेंज% = निफ्टी ऍव्हरेज ईयरली रिटर्न(२७.६%) + निफ्टी ईयरली स्टॅंडर्ड डेव्हिएशन(३२.३७%)= ५९.४३%

खालची रेंज%= निफ्टी ऍव्हरेज ईयरली रिटर्न(२७.६%) - निफ्टी ईयरली स्टॅंडर्ड डेव्हिएशन(३२.३७%)= -५.३१ %

निफ्टी २६फेबची क्लोजिंग = १४५२९.१५

वरची रेंज= १४५२९.१५ * exponential(५९.४३%) = २६३२२

खालची रेंज= १४५२९.१५ * exponential(-५.३१ %) = १३७७७

म्हणजे ६८% शक्यता आहे कि निफ्टी एका वर्षात(मार्च २०२१-फेब २०२२) २६३२२- १३७७७ या रेंजमध्ये फिरेल.

६. दुसऱ्या डेव्हिएशनमध्ये ९५% डेटा असतो. त्यामुळे जर आपल्याला अचूकता वाढवायची असेल तर दुसऱ्या डेव्हिएशनची रेंज काढायला लागेल.

रची रेंज% = निफ्टी ऍव्हरेज ईयरली रिटर्न(२७.६%)+ २*निफ्टी ईयरली स्टॅंडर्ड डेव्हिएशन(३२.३७%)= ९१.७९%

खालची रेंज%= निफ्टी ऍव्हरेज ईयरली रिटर्न(२७.६%) - २ * निफ्टी ईयरली स्टॅंडर्ड डेव्हिएशन(३२.३७%)= -३७.६८ %

वरची रेंज= १४५२९.१५ * exponential(९१.७९%) = ३६३८३

खालची रेंज= १४५२९.१५ * exponential(-३७.६८ %) = ९९६७

म्हणजे ९५% शक्यता आहे कि निफ्टी एका वर्षात(मार्च २०२१-फेब २०२२) ३६३८३- ९९६७ या रेंजमध्ये फिरेल.

७. आता मार्च २०२१ या एका महिन्यात निफ्टीची काय रेंज असेल ते काढू.

निफ्टी ऍव्हरेज मंथली रिटर्न = डेली रिटर्न(०११%) * २२ = २.३६%

निफ्टी मंथली स्टॅंडर्ड डेव्हिएशन = डेली स्टॅंडर्ड डेव्हिएशन (२.०४%) * square root (२२)= ९.५६%

वरची रेंज% = निफ्टी ऍव्हरेज मंथली रिटर्न(२.३६%) + निफ्टी मंथली स्टॅंडर्ड डेव्हिएशन(९.५६%)= ११.९३%

खालची रेंज%= निफ्टी ऍव्हरेज मंथली रिटर्न(२.३६%) - निफ्टी मंथली स्टॅंडर्ड डेव्हिएशन(९.५६%)= -७.२%

निफ्टी २६फेबची क्लोजिंग = १४५२९.१५

वरची रेंज= १४५२९.१५ * exponential(११.९३%) = १६३६९

खालची रेंज= १४५२९.१५ * exponential(-७.२ %) = १३५१९

म्हणजे ६८% शक्यता आहे कि निफ्टी एका महिन्यात (मार्च २०२१) १६३६९- १३५१९ या रेंजमध्ये फिरेल.

९५% अचूकता.
निफ्टी ऍव्हरेज मंथली रिटर्न = डेली रिटर्न(०११%) * २२ = २.३६%

निफ्टी मंथली स्टॅंडर्ड डेव्हिएशन = डेली स्टॅंडर्ड डेव्हिएशन (२.०४%) * square root (२२)= ९.५६%

वरची रेंज% = निफ्टी ऍव्हरेज मंथली रिटर्न(२.३६%) + २*निफ्टी मंथली स्टॅंडर्ड डेव्हिएशन(९.५६%)= २१.५० %

खालची रेंज%= निफ्टी ऍव्हरेज मंथली रिटर्न(२.३६%) - २*निफ्टी मंथली स्टॅंडर्ड डेव्हिएशन(९.५६%)= -१६.७७%

निफ्टी २६फेबची क्लोजिंग = १४५२९.१५

वरची रेंज= १४५२९.१५ * exponential(२१.५०%) = १८०१२

खालची रेंज= १४५२९.१५ * exponential(-१६.७७ %) = १२२८६

म्हणजे ९५% शक्यता आहे कि निफ्टी एका महिन्यात (मार्च २०२१) १८०१२- १२२८६ या रेंजमध्ये फिरेल.

वरील जी काही रेंज दिली ती ब्रेक करून निफ्टी खाली वर होऊ शकतो. जसे कि मागील वर्षात कोरोनामुळे अचानक क्रॅश आला होता. अशी ईतरही अनेक कारणं असतात ज्यामुळे निफीमध्ये अचानक मोठी मुव्हमेंट बघायला मिळते अशा घटनांना ब्लॅक स्वान इव्हेंट म्हणतात त्या कधीही घडू शकतात.
हे जे प्रेडिक्शन आहे ते वर्षाचं न घेता जेथून ट्रेंड सुरु झालाय अशा थोड्या कालावधीसाठी घेतलं तरीसुद्धा अचूकता व्यवस्थित मिळते असा माझा अंदाज आहे.

माहितीचा स्रोत
१. झेरोधा वर्सीटी
२. www.statisticshowto.com
३. Youtube
४. NSE India

Disclaimer:-
(अतरंगी तुमची क्षमा मागून तेच कॉपी पेस्ट करतोय. )
मी सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागार किंवा आर्थिक सल्लागार नाही. माझ्याकडे शेअर मार्केट, आर्थिक गुंतवणुकीसंबंधित काहीही पात्रता नाही. वर लिहिलेली सर्व माहिती एक शेअर मार्केटचा अभ्यास या दृष्टीने केलेली आहेत. वर लिहिलेल्या सर्व कॅल्क्युलेशन मध्ये चूक, human error असू शकतो. वरील लिखाणावर विसंबून कोणीही गुंतवणूक करू नये. केल्यास, लेखक जबाबदार नाहीत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना आपल्या सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हे सर्व tabular format मधे लिहा म्हणजे सर्वांना समजायला सोप्पे जाईल. शिवाय तुम्ही Drift पण विचारात घ्या.

Drift= avg daily returns-(variance/2)
drift ची जी व्हॅल्यू मिळेल ती std dev मोजताना अधिक / ऊणे करायची

ईथपर्यंत आलाच आहात तर पुढे Monte Carlo Simulations पण पहा.

रच्याकने,

चार्टस वरून हळूहळू ओपन ईंटरेस्ट आणि आता statistical tools कडे येताय Happy

अभिनंदन !

मी पण सध्या statistical tools वरच काम करत आहे.

@अतरंगी, अधिक माहितीबद्दल धन्यवाद. हो हे टॅब्युलर फॉर्म मध्येच करायला हवं. वेळ मिळेल तसा एक्सेल स्क्रीनशॉट टाकतो. मोंन्टे कार्लो पण इंटरेस्टिंग टॉपिक दिसतोय. स्टॅटिस्टिकल टूल्स मला जरा बरे वाटताहेत. मागच्या दोन तीन आठवड्यात खूपच मदत झाली या नॉर्मल डिस्ट्रीब्युशनची पण चार्ट आणि ओपन इंटरेस्ट यांची सांगड घालायलाच लागली. बघू पुढे काय काय शिकवतंय हे मार्केट. Happy

खूप चांगली माहिती बोकलत.

Submitted by BLACKCAT on 8 March, 2021 - 19:14
>>>>>
अरे वा, इथे सर्व माहिती उपलब्ध आहे, ही वेबसाईट माहिती होती पण हे पेज माहीत नव्हते,धन्यवाद BLACKCAT.
____________________________

Manual calculation साठी
स्टॅंडर्ड डेविएशन कॅल्क्युलेटर:-(इथे No of days आपण टाकू शकतो.)

http://stocksrin.com/#/sdrangeCalculator

Annualised validity %: मध्ये India Vix ची value टाकावी.

धन्यवाद ब्लॅककॅट, हो वेगवेगळ्या साईटवर ही माहिती उपलब्ध आहे. पण त्यात मला तफावत जाणवली. एकदा एक्सलला फॉर्म्युला लावून ठेवला की आपल्याला हवं त्या दिवसाची रेंज एक क्लिक मध्ये मिळते.
@swwapnil धन्यवाद. तुम्ही दिलेल्या साईटवर ऍव्हरेज बहुतेक विचारात नाही घेतला.

मी वापरत असलेल्या पद्धतीने आलेल्या किंमती

Nifty 22 days
+1 std dev:- 16319.65, -1 std dev 13438.67

+2 std dev:- 17984.1, -2 std dev:-12194.9

Nifty 252 days
+1 std dev:- 25118.05, -1 std dev:-13016.4

+2 std dev:- 34892.6, -2 std dev:-9370.1

स्टॅटिस्टिकल टूल्स मला जरा बरे वाटताहेत.>>>

मी गेले दिड वर्षं फक्त statistics, ओपन ईंटरेस्ट वर ट्रेडिंग करत आहे.

मागच्या दोन तीन आठवड्यात खूपच मदत झाली या नॉर्मल डिस्ट्रीब्युशनची पण चार्ट आणि ओपन इंटरेस्ट यांची सांगड घालायलाच लागली. >>>>>

तुम्ही डे ट्रेडर आहात ना? याचा वापर कसा आणि कुठे करत आहात?

मी हे मॉडेल ऑप्शन सेलिंग साठी वापरत आहे.

@अतरंगी. याचा वापर करून पुढच्या आठवड्यात काय रेंज असेल ती प्लॉट करतो. त्यामुळे एक ओव्हरऑल आयडिया येते. आता आठवत असलेला ट्रेड म्हणजे asian paint मागच्या आठवड्यात अप्पर रेंज जवळ असताना शॉर्ट केला त्यात 1% प्रॉफिट घेऊन बाहेर पडलो. पण हे ही खरं आहे की तो पुढचे काही दिवस अप्पर रेंजजवळ ट्रेड करत राहिला आणि नन्तर कधीतरी क्लोजिंग वर दिली. असेच अजून काही स्टॉक होते त्यांनी व्यवस्थित ही रेंज फॉलो केली त्यात पोझिशन घेणार होतो पण रेंजजवळ असल्याने घेतली. ही रेंज माहीत नसती तर कदाचित पोझिशन घेऊन लॉस बुक करायला लागला असता. अजूनही काही शेअर्स होते ज्यांनी ही रेंज फॉलो नाही केली जसे की बजाज ऑटो आणि पेल होता बहुतेक आता नक्की आठवत नाही. पण ओव्हरऑल एक व्ह्यू मिळतो कुठे लॉंग करायचा, कुठे शॉर्ट करायचा ते.

ह्याला बेल कर्व्ह म्हणतात

2 स्टँडर्ड डेव्हिएशन चा ऑप्शन सेलिंग ला काडीमात्र उपयोग नाही
18000 आणि 12000 चे ऑप्शन विकून 40 , 40 पैशे मिळतील

2 स्टँड डेव्हिएशन चा ऑप्शन सेलिंग ला काडीमात्र उपयोग नाही
18000 आणि 12000 चे ऑप्शन विकून 40 , 40 पैशे मिळतील>>> अभ्यास वाढवा.

कॅलेंडर स्प्रेड करून 2000 रु प्रॉफिट आले
40000 रु भांडवल , 20 दिवसात 2000

अजून थांबलो असतो तर 2500 आले असते

स्वतंत्र लेख लिहीन

बोकलत, मनापासून आभारी आहे तुमचा.
हे सर्व मला नवीन आहे.
माझ्या एका B.SC च्या भावाकडून आइकलेले की तो निफ्टी kheLato.
पण माझे MuuL २ प्रश्न आहेत!
शेअर्स ट्रेडिंग मध्ये अधिक फायदा होतो की निफ्टी मध्ये?
जास्त रिस्क ही शेअर्स मध्ये असते की निफ्टी मध्ये

आणी एक KaLicha प्रश्न, अगदी मनापासून,
Engineering side च्या लोकांनी याचा अभ्यास करणे कितपत फायदेशिर ठरते ?
की Field च बदलालयासारखे होईल??

शेअर्स ट्रेडिंग मध्ये अधिक फायदा होतो की निफ्टी मध्ये?
जास्त रिस्क ही शेअर्स मध्ये असते की निफ्टी मध्ये

दोन्हीत रिस्क असते

निफ्टी kheLato.
>>>
Bcci ने आयपीएल स्पॉन्सर upstox केल्यामुळे लोक
Nifty पण खेळायला लागलेत.

शेअर्स ट्रेडिंग मध्ये अधिक फायदा होतो की निफ्टी मध्ये?
जास्त रिस्क ही शेअर्स मध्ये असते की निफ्टी मध्ये
>>>
@Blackcat यांनी सांगितल्याप्रमाणे दोन्हीत रिस्क असते ,
ती manage करावी लागते.

आणी एक KaLicha प्रश्न,....
>>>
मी इंजिनिअर आहे,आणि हे देखील करतो.
प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे.
आवड असेल तर मोकळ्या वेळेत शिकून , अंदाज घेऊ शकता.

बोकलत, मनापासून आभारी आहे तुमचा.>>> धन्यवाद.
शेअर्स ट्रेडिंग मध्ये अधिक फायदा होतो की निफ्टी मध्ये?>>>> हा गहन चर्चेचा विषय ठरू शकतो. काहींना शेअर्स ट्रेडिंगमध्ये फायदा मिळत असेल तर काहींना निफ्टी ट्रेडिंगमध्ये. शेअर्स ट्रेडिंगमध्ये किती रक्कम गुंतवणूक करावी हे तुमच्यावर अवलंबून असते. म्हणजे तुम्ही एक शेअर घेऊ शकता व अनेकही. तसं निफ्टी मध्ये लॉट साईझ असते. जर एक लॉट घ्यायचा असेल तर जी काही ठराविक रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला गुंतवावी लागेल. एका लॉटची किंमत जर दहा हजार असतील तर तेव्हडे पैसे तुम्हाला गुंतवावे लागतील. ना त्याच्यापेक्षा जास्त ना कमी. दोन लॉट घायचे झाले तर वीस हजार अँड सो ऑन.
जास्त रिस्क ही शेअर्स मध्ये असते की निफ्टी मध्ये>>> दोन्हीत रिस्क असते. रिस्क सगळीकडे असते बँकेत पैसे ठेवलेत तर बुडायची रिस्क, जॉब करत असाल तर बेरोजगार व्हायची रिस्क, गाडी चालवत असाल तर अपघात व्हायची रिस्क, पण या रिस्कसोबत रिवॉर्ड पण जोडलेला असतो. त्यामुळे जर आपण रिस्क कमीत कमी ठेऊन रिवॉर्ड मिळवण्याकडे कल ठेवला तर त्या क्षेत्रात यश मिळण्याचे जास्त चान्सेस असतात.

Engineering side च्या लोकांनी याचा अभ्यास करणे कितपत फायदेशिर ठरते ?
की Field च बदलालयासारखे होईल??>>>फिल्ड बद्दलल्यासारखे होईल म्हणजे? फिल्ड आता आहे तेच ठेवायचं. साईड बाय साईड हे सुरू ठेवायचं. मी पण एक इंजिनिअर आहे. मी जॉब करतो आणि सोबत ट्रेडिंगपण. इंजिनिअरिंग फिल्ड आहे म्हणून मला एखादी समजायला अवघड जाते असं मला अजूनतरी कुठे जाणवलं नाही.

जास्त रिस्क ही शेअर्स मध्ये असते की निफ्टी मध्ये>>>>>

शेअर्स मधे जास्त रिस्क असते. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा धागा आहे त्या धाग्याला धरुन लिहायचे झाल्यास Statistics च्या भाषेत ज्या financial instrument चे Standard deviation कमी, त्याची Volatility कमी, त्यात रिस्क कमी.

जसे निफ्टी मधे रिस्क कमी आहे तसंच त्याचे रिटर्नस पण कमी आहेत. रिस्क आणि रिटर्न बॅलन्स करता यायला हवे.
आपण जेव्हा पोर्ट्फोलिओ तयार करतो तेव्हा आपण किती रिटर्न साठी किती रिस्क घेत आहोत हे महत्वाचे असते. कमीत कमी रिस्क घेउन त्यात जास्तीत जास्त रिटर्न मिळवून देणारा स्टॉक शोधता यायला/ पोर्ट्फोलिओ तयार करता यायला हवा.

Harry Markowitz यांची Modern Portfolio Theory वाचून पहा. त्याचा Volatility(risk)in % Vs Expected returnचा ग्राफ पहा आणि समजून घ्या.

जास्त रिटर्न मिळवायला जास्त रिस्क (Volatility) घ्यावीच लागते असेही काही नाही.
या बद्दल जास्त माहिती हवी असेल तर High Returns from Low Risk हे Pim Van Vliet यांचे पुस्तक वाचा.

तुम्ही एक शेअर घेऊ शकता व अनेकही. तसं निफ्टी मध्ये लॉट साईझ असते. जर एक लॉट घ्यायचा असेल तर जी काही ठराविक रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला गुंतवावी लागेल. एका लॉटची किंमत जर दहा हजार असतील तर तेव्हडे पैसे तुम्हाला गुंतवावे लागतील. ना त्याच्यापेक्षा जास्त ना कमी. दोन लॉट घायचे झाले तर वीस हजार अँड सो ऑन.>>>>

का बरे? निफ्टी ५० वर आधारित कित्येक ETF आहेत. दिडशे दोनशे रुपयात एक युनिट घेता येते.

त्यामुळे जर आपण रिस्क कमीत कमी ठेऊन रिवॉर्ड मिळवण्याकडे कल ठेवला तर त्या क्षेत्रात यश मिळण्याचे जास्त चान्सेस असतात.>>>>
+१

बोकलत वरील चार्ट योग्यच आहेत त्याने एक ब्रॉड आयडिया येते पण या बरोबर इन्व्हर्स हॅमर अँड upwards हॅमर , कप पॅटर्न , बटर फ्लाय पॅटर्न , dubble टॉप , dubble bottem हे ही अब्यासा म्हणजे अंदाज चुकणार नाहीत ,आजच बँक nifity cha inverse hammer pahila ani 34100 pe ghetala std dev. Pramane nifty upside disat hoti tar invese hammer pramane down side ani exp la nifty 33856 la close zali so think on it before trade

Black cat, स्वप्नील, बोकलत आणि अतरंगी मन:पूर्वक धन्यवाद.
मला शिकायला नक्की आवडेल.
माझं Engineering Mathematics अगदीच वाईट आहे.
मुळात गणित चांगलं नाहीये
याचा काही फटका बसेल का शिकताना

दुसरी गोष्ट शाळेत आणि डिप्लोमा ला असताना Statistics and Probability chapters hote.
आवडायचे मला... पण आता त्याचा परत अभ्यास केलेला नसल्याने मी ते सगळे विसरल्यात जमा आहे.

सध्या माझे तिसरे वर्ष संपल्यात जमा आहे.
एप्रिल मध्ये युनिव्हर्सिटी च्या परीक्षा ऑनलाईन होतील.
मग माझ्याकडे एकच वर्ष असेल.
मग यासाठी सुरवात्त आत्तापासून च करायची झाली (शिकण्याच्या दृष्टिकोनातून) तर नेमकी कुठून सुरवात्त करावी?

@अतरंगी आपण जी थिअरी आणि पुस्तकांची नावे सांगितली आहेत... तीच पहिली पायरी आहे का?

माझी अशी चुकीची समजूत होती की निफ्टी हे CA , Cs ani Accounting related लोकच करतात. आणि शेअर्स ला तर हर्षद मेहता मध्ये दाखविल्या प्रमाणे माणूस असतो सांगणारा तुम्ही इकडे गुंतवा, आज ह्या कंपनीचे घ्या वगैरे वगैरे...

पूर्णपणे आपल्याच डोक्याने आपलेच पैसे निफ्टी वा शेअर्स मध्ये गुंतवणे याला खरंच धाडस लागतं Happy
संपूर्णपणे जबाबदारी आपलीच झाली ना मग तिथे!?

@अतरंगी आपण जी थिअरी आणि पुस्तकांची नावे सांगितली आहेत... तीच पहिली पायरी आहे का?>>>>

नाही. तुम्ही डायरेक्ट निफ्टी नॉर्मल डिस्ट्रिब्युशन च्या धाग्यावर आलात, रिस्क/ रिटर्नचा विषय होता म्हणून त्या reference ने लिहिले.

तुम्ही अगदीच नवखे असाल, शेअर मार्केट संबंधी काहीच माहिती नसेल तर बेसिक वाचना पासून सुरुवात करा.

Zerosha Varsity चे अ‍ॅप/ वेबसाईट पहा. तिथे बेसिक माहिती व्यवस्थित दिलेली आहे. मी तिथेच सुरुवात केली होती.

माझ्या एका नुकत्याच जॉब ला लागलेल्या भावाने युट्युबवर विवेक बजाज यांची Learn2trade सिरिज पण बरी आहे असा review दिला होता. मी स्वतः पाहिली नाही, त्यामुळे त्याच्या कंटेंट विषयी कल्पना नाही.

का बरे? निफ्टी ५० वर आधारित कित्येक ETF आहेत. दिडशे दोनशे रुपयात एक युनिट घेता येते.>>> ओके. हे माझ्यासाठी नवीन आहे. अधिक माहिती मिळवून बघतो.

इन्व्हर्स हॅमर अँड upwards हॅमर , कप पॅटर्न , बटर फ्लाय पॅटर्न , dubble टॉप , dubble bottem हे ही अब्यासा म्हणजे अंदाज चुकणार नाहीत >>> धन्यवाद, खरं सांगायचं तर यातलं मी काहीही अभ्यासात नाही. यापुढेही अभ्यासण्याचे चान्सेस कमी आहेत.

सध्या माझे तिसरे वर्ष संपल्यात जमा आहे.
एप्रिल मध्ये युनिव्हर्सिटी च्या परीक्षा ऑनलाईन होतील.>>>>

या वयापासून शेअर मार्केटविषयी माहिती घ्यायला सुरुवात केलीत या बद्दल अभिनंदन.

माझी अशी चुकीची समजूत होती की निफ्टी हे CA , Cs ani Accounting related लोकच करतात. आणि शेअर्स ला तर हर्षद मेहता मध्ये दाखविल्या प्रमाणे माणूस असतो सांगणारा तुम्ही इकडे गुंतवा, आज ह्या कंपनीचे घ्या वगैरे वगैरे...>>>>

आपले स्वकमाईचे पैसे कोणत्याही ऐर्‍या गैर्‍या माणसाच्या सांगण्यावरुन गुंतवू नये.

माझे माझ्या तुटपुंज्या अनुभवावर फुकटचे सल्ले. .....
जेव्हा गुंतवणूकीला सुरुवात कराल तेव्हा शक्यतो चांगल्या ईंडेक्स फंड/ म्युच्युअल फंड मधून करा. शेअर्स चे स्विंग ट्रेडींग/ डे ट्रेडींग करावे वाटल्यास अगदी कमी पैसे घेऊन सुरुवात करा. मोजके स्टॉक निवडून त्यातच ट्रेडींग करा. तीन ते चार वर्षे प्रॅक्टीस करा. मग हळूहळू अकाउंट साईझ वाढवत न्या. डेरिव्हेटिव्हच्या नादी लागू नका.

इ टी एफ

हाही एक शेअरच झाला, तो एफ अँड ओ नव्हे

अतरंगी आणि महेंद्र धवन पुन्हा एकदा धन्यवाद.
मी अत्ताच या ग्रुपचा सभासद झालोय
कृपया कुणीतरी मार्गदर्शन करेल का
की धागा निवडक १० मध्ये कसा समाविष्ट करावा
हा धागा & अतरंगी यांचे या ग्रुपमधील धागे घ्यायचे आहेत त्यात.