लहान मुलांसाठी उपक्रम - 'अक्षरगणेश' - घोषणा

Submitted by संयोजक on 3 September, 2016 - 15:11

मोरया!

सकल कलांचा अधिनायक असा गणपती बाप्पा आणि हा त्याचाच उत्सव! त्याला वंदन करून सादर करत आहोत एक नावीन्यपूर्ण उपक्रम - अक्षरलेखनातून साकारलेला श्रीगणेश! यात स्वतः बाप्पासाठी रचलेली कविता, गणपतीची विविध नावे, अक्षरातून साकारलेला गणपती, गणपतीची विविध स्तोत्रे, आरत्या व श्लोक (प्रताधिकारमुक्त) यांपैकी काहीही देवनागरी लिपीत अक्षरलेखन किंवा सुलेखन (calligraphy) या प्रकारात करायचे आहे. वापरायचे माध्यम रंगाचे खडू, पेन्सिल - वॉटर - पोस्टर - अ‍ॅक्रिलिक, ऑइल असे कोणतेही रंग किंवा अगदी शाई, बॉलपेन, चारकोल यांपैकी काहीही चालेल.

१) हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींसाठी आहे.
३) कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आयडीनेच भाग घ्यायचा आहे.
४) वयोगट - ८ ते १५ वर्षे.
५) पाल्याने काढलेले 'अक्षरगणेश' लेखन स्कॅन करा किंवा त्याचे छायाचित्र/फोटो काढा व इथे अपलोड करा.
६) चित्रे गणेश चतुर्थीपासून, ५ सप्टेंबर २०१६ (भारतीय प्रमाणवेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, १५ सप्टेंबर २०१६ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
७) चित्रे पाठवण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीसाठी ५ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
८) 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
९) याच ग्रुपामध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (’गणेशोत्सव २०१६’ या ग्रुपामधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत.)
१०) नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा -
'अक्षरगणेश' - पाल्याचे नाव आणि वय.
११) ’विषय’ या चौकटीमध्ये उपलब्ध पर्यायसूची (ड्रॉपडाऊन मेन्यू)मधून मायबोली, उपक्रम हा पर्याय निवडा.
१२) शब्दखुणा या चौकटीमध्ये ’मायबोली गणेशोत्सव २०१६’ हे शब्द लिहा.
१३) आता या नवीन धाग्यावर आपल्या मायबोली आयडीनेच मजकुरात प्रकाशचित्र टाका. यासाठी आपल्या 'माझे सदस्यत्व'मध्ये जाऊन 'खाजगी जागेत' इमेज फाईल अपलोड करा. त्या फाईलचे आकारमान १५० kb इतकेच असू द्या.
१४) मजकुराच्या चौकटीखाली 'मजकुरात image किंवा link द्या’, यातील image या शब्दावर टिचकी मारा. एक नवीन विंडो उघडेल. त्यात वरती दिलेल्या पर्यायांपैकी upload हा पर्याय निवडा. मग 'browse' या पर्यायावर टिचकी मारून तुमच्या संगणकावरून योग्य ती फाईल 'upload' करा. फाईल अपलोड झाली की खालच्या करड्या चौकटीत तशी पावती (मेसेज) दिसेल. मग ही फाईल सर्वांत वर दिलेल्या पर्यायांपैकी 'Send to text area' हा पर्याय वापरून तुमच्या मजकुरात समाविष्ट करा.
१६) नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर ’ग्रूप’ असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. ’सार्वजनिक’ या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
१७) Save ही कळ दाबा.
१८) जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल /बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users