सदस्य प्रवेश |
आभाळा... (दीर्घ गझल)![]() तू करुणेचा विशाल सागर आभाळा तुझ्याच पोटी सर्व चराचर आभाळा व्यापलेस तू विश्वातिल काने कोने तू साकी हो, घे सुरई चैतन्याची थकून जातो मावळून हा तव चरणी विलीन मी तुझियामध्ये होण्यापूर्वी निर्मिल्यास का समोर या इतक्या वाटा? तुला पाहता एकदाच मी शांतपणे तुझा आसरा घेत राहती ग्रह तारे... शाश्वततेच्या पोटी यावी शाश्वतता... लोपली कुठे करुणा अन पाऊस तुझा? तापुन धरणी नभी लोटले बाष्प तरी... आम्ही करावी तुझी प्रार्थना सत्वर अन आपल्याच धुंदीमध्ये जगतोस सदा... विराट दर्शन तुझे पाहता हे कळते भोग द्यायचे मला असावे थेट सदा दिसायचे जर रूप तुझे तर स्पष्ट दिसो कशास माझा जीव ठेवला तू असल्या अजून आहे भोगत सगळे शाप तुझे तसा राहिला सदैव माझा ताठ कणा... किती जपू मी, कधीतरी ही फुटायची कधीतरी करशील बेरजा जीवांच्या... फिरून थांबे कालचक्रही ह्याच क्षणी तुझ्याप्रमाणे व्यापक तरिही पोकळ मी भास असूनी जगण्याची का ओढ अशी? रणांगणी दुमदुमणारा पांचजन्य तू पहाटवेळी अनंतरंगी छटा नभी रिती राहते पोटाची खळगी तेव्हा जन्महि नव्हता हाती, मृत्यूही नाही तुझ्याच पोटी नांदतोय मी किती युगे खुळी अपेक्षा कशास ही वैराग्याची? हाकतोय मी गुरेच आणिक तू तारे निर्मितोस तू कसे नव्याने ग्रहतारे? पहाटवेळी गर्द जांभळे वस्त्र तुझे एकामागुन एक तुफाने किती तुझी? अवर्षणावर बोलताच तू पूर दिले तुझे वागणे कसे असावे, असू नये, माग तुझा घेणे ना जमले कधी मला विश्व निर्मिती तुझी जराशी चुकली का? कितीक तार्यांच्या गंगा आल्या गेल्या किती युगे मी झेलत राहू वार तुझे? चाकोर्या सोडून जाहलो धुमकेतू असह्य झाले जरी तुला जगणे इथले सांग मला तू अस्तित्वाचे रूप कसे तुझ्या संप्रती येण्यासाठी प्रवास हा रोज अंबरी दूध चांदणे आटवते अस्तित्वाच्या पल्याडही अस्तित्व तुझे अनंत वर्षे सुरूच आहे खेळ तुझा जीवन सारे तुझ्याच उदरी सामावे अर्थहीन शब्दांनी रचले गीत तुझे [आभाळा या दीर्घ गझल मधे शंभरहून अधिक शेर आहेत! मायबोलीच्या दिवाळी अंकातल्या 'इंद्रधनुष्य' या खास विभागासाठी प्रसाद यांनी त्यातले निवडक ७ x ७ = ४९ शेर पाठवले आहेत!] -Prasad_Shir
24 ऑक्टोबर, 2007 - 14:35 prasad_shir
|
|