देई मातीला आकार - गणपतीची मूर्ती बनवणे -प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत!

Submitted by संयोजक on 11 September, 2015 - 05:37

नमस्कार!

गणेशोत्सवाचे दिवस जवळ येतायत याची चाहूल लागते ती जागोजागी दिसणार्‍या 'आमचे येथे पेणच्या शाडूने बनवलेल्या सर्वांगसुंदर श्रींच्या मूर्ती मिळतील' अशा पाट्यांनी. यंदा आपल्या मायबोलीवरही अशी एक पाटी दिसणार आहे - 'आमचे येथे छोट्या मायबोलीकरांनी बनवलेल्या सर्वांगसुंदर श्रींच्या मूर्ती पाहावयास मिळतील'.

clayganapati.jpg

आपल्या घरोघरी असणार्‍या या छोट्या कलाकारांची क्ले-कला सादर करण्यासाठी तुम्हांला पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील -

१) हा बच्चेकंपनीसाठीचाच उपक्रम आहे. ही स्पर्धा नाही.

२) हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.

३) कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आयडीनेच भाग घ्यायचा आहे. मायबोलीकरांच्या नातेवाइकांच्या / मित्रमंडळींच्या पाल्यांना यात सहभागी व्हायचे असल्यास त्यांच्या पालकांना प्रथम मायबोलीचे सभासद व्हावे लागेल .

४) या उपक्रमासाठी वयोमर्यादा १५ वर्षांपर्यंत आहे. पालकांनी मदत केलेली चालेल.

५) मूर्ती शाडू / माती / क्ले यांपैकी कशापासूनही बनवलेली चालेल.

६) तयार मूर्तीचा फोटो अनिवार्य आहे. मूर्ती बनवतानाचे प्रत्येक पायरीचे फोटो असतील तर उत्तम.

७) प्रवेशिका 'देई मातीला आकार - पाल्याचे नाव' या नावाने द्यावी.

८) प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून, १७ सप्टेंबर २०१५ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, २७ सप्टेंबर २०१५ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.

९) एका प्रवेशिकेत एकापेक्षा जास्त मूर्तींचे फोटो दिले तरी चालतील.

१०) चित्र अपलोड कशी करायची त्याची माहीती इथे मिळेल.
१. लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?
२. पिकासा ते मायबोली फोटो देणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा फारच सुरेख उपक्रम आहे, संयोजक.

आमच्या घरून एंट्री येण्याचा चान्स आहे.

वेळ आणि वेग यांचं कोष्टक काढलं तर यंदाच्या मंडळाची एफिशन्सी भन्नाट आहे. एकामागोमाग एक मस्त मस्त उपक्रम आणि स्पर्धा येताहेत.

लगे रहो संयोजक.

वेळ आणि वेग यांचं कोष्टक काढलं तर यंदाच्या मंडळाची एफिशन्सी भन्नाट आहे. एकामागोमाग एक मस्त मस्त उपक्रम आणि स्पर्धा येताहेत.

लगे रहो संयोजक. >> +१

मस्त! अनेक ठिकाणी शाडूच्या मूर्ती करण्याची शिबिरं भरवली जातात आताशा आणि मुलंही एकाहूनएक सरस गणपती बाप्पा घडवतात. त्यांच्या कलाकारीला मायबोलीसारखा प्लॅटफॉर्म मिळणं म्हणजे दुधात साखर! संयोजक, या उपक्रमासाठी शाबासकी!

बापरे, मला तर ही फार कठीण कला वाटते, चित्रकलेपेक्षा काही पटींनी कठीण.
इथे काय कोण किती काय काय करते हे बघण्यास उत्सुक .. कदाचित आश्चर्याचे सुखद धक्के मिळू शकतात..

आमच्याकडे सहामाही परीक्षा सुरू आहे सध्या पण या उपक्रमाची बातमी दिल्याबरोबर पंधराव्या मिनिटाला एक बाप्पा तयार होऊन बसलाय.

लेकीच्या शाळेत असतो क्ले पासुन गणपती बनविण्याचा उपक्रम. यंदा १५ तारखेला आहे. तर त्याच मुर्तीचे फोटो टाकले तर चालतील काय?

मूर्ती पाल्याने स्वतः तयार केलेली असावी. पालकांची थोडी मदत चालेल.
शाळेत, घरी कुठेही तयार केली तरी चालेल.

मूर्ती पाल्याने स्वतः तयार केलेली असावी. पालकांची थोडी मदत चालेल.
शाळेत, घरी कुठेही तयार केली तरी चालेल. >> धन्यवाद.