जयपूर, जोधपूर, उदयपूर वगैरे

Submitted by आर्च on 25 July, 2015 - 15:09

येत्या भारताच्या ट्रिपमध्ये ६ दिवस ५ रात्र वरील ट्रिप करायचा plan आहे. यु.एस. मधून अशी trip कोणी plan केली आहे का?

१. कोणती travel कंपनी वापरावी?
२. होटेल्स, कार आणि इतर सोय त्यांनीच करावी
३. मागच्या वेळी काश्मीरसाठी Indigo Airlinesच vacation package घेतल होतं. पण राजस्थानच तस package दिसत नाही.
४. अधीक कोणती ठिकाणं add करता येतील का?

Thanks in advance for any suggestions!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अधीक कोणती ठिकाणं add करता येतील का?》》》》

माऊंट आबू ( जैन मंदिरे. ) आजिबात चुकवु नका.
जैसलमेर ला पटवा हवेली पण छान आहे.

फार पाल्हाळ न लावता थोडक्कात सांगायचे तर
१)इथल्या टुअरवाल्यांस राजस्थानांत अगोदर काय पाहिले आहे, किती दिवस ,बरोबर लहान मुले आहेत का हे सांगून वैयक्तिक सहल आखून अॅार्गानाइज करायला सांगा .
२)शहरांतील दोनशे किमी अंतरे कार/विमानानेसुद्धा अर्धा दिवस मोडतोच.
३) त्यांच्या ग्रुप सहलीत फार कंटाळवाणे होऊ शकते.
४)महालांतल्या वस्तु चित्रे हत्यारे वगैरे तोचतोचपणा आणि मुलांना बोअरिंग वाटते.

आम्ही गेलो तेव्हा एका ट्रॅवल कंपनी (ईशा ट्रॅवल्स मुम्बइ) तर्फे हॉटेल्स चे बुकिंग केले होते आणि त्यांनी एक इनोवा अरेंज केली होती. (आम्ही ७ जण होतो ४ प्रौढ ३ मुले). तिथला अनुभवी ड्रायव्हर होता. आम्ही माउंट आबु, उदयपुर, चित्तोड आणि जयपुर पाहिले.
http://www.ishatours.net

एसआरडी - छान सजेशन्स. - आम्ही दोघेच जातोय. पर्सनल टूरच हवी आहे. धन्यवाद.
मनस्मी, इमेल टाकली आहे ईशाला. धन्यवाद.
अतरंगी, बघू कसं जमतं ते. ट्रॅव्हल एजंटला विचारते. धन्यवाद.

अजून कोणाला खात्रीदायक ट्रॅव्हल एजंट माहित असले तर जरूर सांगा.

http://www.indiabycaranddriver.com/

या ट्रॅवल कंपनीचा आमचा अनुभव चांगला आहे. आम्ही मागच्याच वर्षी गोल्डन ट्रँगल केलं. तेव्हा या माणसाची गाडी वापरली होती. इकडे परत आल्यानंतर काही अमेरीकन सहकार्‍यांनाही सुचवली होती. त्यांनाही खूप चांगला अनुभव आला होता. तुम्हाला हवी तशी ट्रीप आखून देतात. त्यांचे दरही बाकी ट्रॅव्हल कंपन्यांपेक्षा कमी वाटले होते.

कुठल्याही हॉटेलचे Tripadvisor वर रेटींग बघून घ्या. हॉटेल्स आम्हीच ठरवली होती. आग्रा, जयपूरला काही प्रॉब्लेम आला नाही पण दिल्लीत वेबसाईटवरचे फोटो आणि प्रत्यक्ष हॉटेलमधे फरक जाणवला.

http://goholidays.in/rajasthan

ह्या साईटवर चेक करा.. तुम्हाला पाहिजे तश्या टूर्स अ‍ॅरेंज करुन देतात.. आणि मार्गदर्शन ही देतात

मी via.com वरुन हॉटेल्स आणि कार ड्रायव्हरसहीत गेले काही वर्ष बुक करत आहे, अजुन तरी चांगला अनुभव आहे. सजेस्ट केलेली हॉटेल्स वेबसाईटवर चेक करतो, त्यांची रेटींग्स पसंत नाही पडली तर हॉटेल्स बदलून घेतो. फार थोड्या वेळा हॉटेल्स बदलून घेतली आहेत.

जोधपूरहून उदयपूर, जयपूर, बिकानेर, जेसलमेर ही सगळी ठिकाणे २००-२५० किमी अंतरावर आहेत, तेव्हा ट्रीप जोधपूरहून सुरु करुन जयपूरला शेवट करावा. जयपूरहून फ्लाईट्स किंवा रोड्/रेल कनेक्टीव्हीटी पण चांगली आहे.

via.com वरचा ट्रॅव्हल कोऑर्डीनेटर ओळखीचा आहे. माझ्या मित्रांच्या/ऑफिस कलीग्जच्या टुर्स त्याने ऑर्गनाईज करुन दिल्या आहेत. त्याच्या मोबाईल नंबरसाठी मला संपर्कातुन मेल पाठ्वाल का प्लीज.

आर्च : नमस्कार, कशी आहेस?

www.makemytrip.com वरून तुला पाहिजे तसं customized टुर्स घे. मी बर्‍याच टुर्स केल्या आहेत त्यांच्याथ्रु. सो नॉट टु वरी ................. Happy

मी दिल्ली जयपूर ट्रेनने गेल्ते मजा म्हणून. शताब्दि. मग तिथे ट्रायडंट हॉटेल. त्यांनीच कार डायवर दिला तिथे पूल व रात्री पपेट शो, इतर कल्चरल अ‍ॅक्टिवीटी दाखवतात. ३० सप्टेंबर परेन्त ट्रायडंट व इतर हॉटेल्स मध्ये डिस्काउंट असतात मग त्यांचे फिरंग साठीचे रेट चालू होतात. तसेच एकदा ऑबेरॉय राजविलास मध्ये ऑफ सीझनत जाणार आहे. दोन दिवसाचे तुलनेने स्वस्त पॅकेज आहे. मला
आवडते दोन दिव्सांची राजपूत राणी व्हायला. ट्रायडंट ऑनलाइनबुकिन्ग नाहीतर मेक माय ट्रिप.

मी ही टूर केसरी टूर्स कडून कस्टमाइझ्ड करुन घेतली होती. केसरीचा स्ट्रॉबेरी हॉलिडेज हा भाग अशा कस्टमाइझ्ड टूर्स प्लॅन करुन देतो. हॉटेल बूकिंग, कार अरेंज करुन देतात व आपणांस जी ठिकाणे पहायची आहेत त्यानुसार प्रत्येक दिवसाचे शेड्युल बनवून देतात. ब्रेकफास्ट व डिनर बहुतांशी ज्या हॉटेलमधे राहिलो आहोत तिथे असते व लंच आपण आपल्या मर्जीनुसार कुठेही घ्यायचे. कस्टमाइझ्ड टूर असूनही हॉटेल्स वगैरे केसरीच्या ग्रूप टूर्सना देतात तिच असतात व त्यामुळे अगदी छान असतात.
आमची ही ट्रीप खूप छान झाली होती.
मुंबई ते अहमदाबाद, तेथून माऊंट अबू, उदयपूर, जयपूर व परत मुंबई अशी ट्रीप केली होती आम्ही.

Ashika, How much cost difference in customised tour and package tour by kesari? Did you compare?

Arch, how are you? If you ever plan any south tour I maybe able to help Happy

Ashika, How much cost difference in customised tour and package tour by kesari?>>>> अंदाजे रु. ४०००/- ते ५०००/- माणशी. ग्रुप टूर्समध्ये बसेस असतात, त्यामुळे सेविंग होते. पण मग आपण आपल्या मर्जीनुसार भटकू शकत नाही,शेड्युल बर्‍यापैकी टाईट असतं ग्रुप टूर्सचं जे नको होतं आम्हाला.

अरुण आणि राजसी मी मजेत. तुम्ही कसे आहात?

सगळ्यांचे मनापासून आभार. आता बघते एकेकांना कॉन्टॅक्ट करून.

अमेरिकन लोकांसाठी, हाय एंड लक्झरी हॉटेल्स चे रेट्स भारतीय नागरिकांपेक्शा जास्त आहेत. उदा. ओबेरॉय उदयविलास $६००+, बट इट्स वर्थ द प्राइस...