पाळणाघराचा अनुभव

Submitted by cha on 8 May, 2015 - 06:19

पाळणाघर

माझ्या भाच्याला ५ तास पाळणा घरात घातलाय ,,,, आणि तो खूप एन्जोय करतो ...पण माझ्या मुलीच्या बाबतीत माझ धाडस नाहीये होत पाळणा घरात घालायचं (मुलगी १ वर्षाची आहे)

घरी आजी-आजोबा आहेत बघायला … आणि मावशी येतात सकाळी १० - ५ ..

तुम्हाला आलेला पाळणाघराचा अनुभव इथे शेअर करा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या घराजवळ मला चांगले पाळणाघर मिळत नाही आहे. नाहितर मी माझ्या मुलाला २-३ तास पाळ्णा घरात ठेवायचा विचार करत होते. घरी सासुबाई असतात आणि सांभाळायला एक मावशी सुद्धा असतात १० ते ६. पण इतर मुलांमध्ये मिसळता यावे म्हणुन थोडावेळ बाहेर ठेवायचा विचार होता. दुसरे कारण म्हणजे माझा मुलगा खुप मस्ती करतो. तो थोडावेळ बाहेर राहिला तर घरातल्या मंडळींनाहि थोडा आराम मिळेल.

माझी भाची जंपिंग जिनियस नावाच्या पाळणाघरात असते. त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी शाखा आहेत. याचा अनुभव अतिशय चांगला आहे. तीथे अगदी छान लक्ष ठेवतात मुलांवर. एक टिचर येऊन थोडावेळ काहितरी आर्ट क्राफ्ट वगैरे शिकवते. झोपण्यासाथी वेगळी रूम आहे. बेड्स आहेत. मुलांना भरवतात. औषधे वेळेवर देतात.

खरंतर स्वतःच्या मनाला जे पटेल ते पालकांनी करावे, इथे-तिथे विचारुन फार काही उपयोग होत नसतो. आपल्या मनात ठरलेल्या निर्णयाला आर्ग्युमेंट्स मिळतात फक्त.

खरं आहे पण इतरांचे अनुभव ऐकुन निर्णय घेणं सोपं होतं. जर पाळणाघरात ठेवलं तर काय संभाव्य तोटे/ धोके असू शकतात हे माहित असल्याने काळजी घेतली जाऊ शकते.

माझा मुलगा २ वर्षाचा असल्यापासून पाळणाघरात राहतो . सुरवतीला त्याला अवघड वाटले पण आता तो इतका रमतो कि उलट तो आम्ही कोणी घरी असलो तरी म्हणतो काकूंकडे पाळणाघरात जायचं आहे.जेव्हा पाहिलान्द्या मी त्याला पाळणाघरात ठेवले तेव्हा पहिले १५ दिवस त्याला ठेवताना खूप रडले होते वाटत होते कि सोडावी ती नौकरी .पण नशिबाने मला पाळणाघर चांगले भेटले आणि मी नौकरी न सोडण्याच निर्णय घेतला तो बर झाले असे आता वाटते, ते फक्त माझ्या पालानाघारच्या काकुंमुळे ..........

पाळणाघरच्या काकू खूपच प्रेमळ आहेत आणि तिथले वातावरण अगदी घराच्यासारखे असल्यामुळे सर्व मुले खूप मजा / मस्ती करतात ,डब्बा सर्व मुले एकत्र बसून खातात , लहान बाळ जर त्यांच्यात असेल तर त्याची खूप काळजी घेतात म्हणजे ते झोपले असेल तर हळू आवाजात बोलणे ,ते जर रडत असेल तर त्याला हसवणे अशी खूप मज्जा करतात . त्यामुळे शेअरिंग करणे ,स्वावलंबी होणे, एकमेकांबरोबर खेळणे , स्वतःच्या वस्तू नीट सांभाळून आणणे हे सर्व मुले पाळणाघरात शिकतात . माझातर पाळणाघराचा अनुभव चांगला आहे .

Pages