जेन्टस रुमाल घ्यायचा आहे .. (ब्रांडेड)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 November, 2014 - 14:26

यंदा दिवाळीचा बोनस सर्व काही करून सवरून शिल्लक राहिल्याने आता जरा स्वत:च्या छोट्यामोठ्या हौसमौजेवर खर्चा करायचे ठरवले आहे. सुरुवात माझ्यासाठी मूलभूत गरजांमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या रुमालानेच करूया म्हटले. आजवर रस्त्यावरच सस्त्या मध्ये रुमाल घेत आलो, पण यापुढे चांगल्याचुंगल्या ब्रांडचाच वापरायचे ठरवल्याने हा धागा.

सुरुवातीला थोडाफार माझा रुमालाचा वापर सांगतो - मला सर्दीचा तूफान त्रास असल्याने मी कुठेही जाताना खिश्यात दोन रुमाल ठेवतो. अर्थात, दोन्ही वेगवेगळ्या खिशात. एक नेहमीचा हात-तोंड पुसायला, तर दुसरा गळणारे नाक साफ करायला. संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर दोन्ही रुमाल एकत्रच वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकतो. त्यामुळे पुढच्या वेळी तोंड पुसायच्या रुमालाने सर्दीचा समाचार घेणे आणि व्हायसे वर्सा होण्याची शक्यता असल्याने, दोन्ही रुमाल भेदभाव न करता एकाच क्वालिटीचे वापरतो. तसे पाहता नाक गळायचा त्रास माझा लहानपणापासूनचा आहे. तेव्हा टेलरच्या दुकानातील चिंध्या गोळा करून त्या धुवुन सुकवून स्वच्छ करून वापरायचो. पण आता एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला लागल्याने ते बरोबर दिसत नाही.

मी इथे धागा काढायच्या आधी माझ्या वतीने ईंटरनेटवर शोध घेतला होता. मला किरकोळ वस्तू खरेदी संदर्भात "जॉकी" नामक एकच ब्रांड माहीत असल्याने तिथेच शोधले. पण तिथे रुमाल वगळता इतर सर्व सटरफटर वस्तू सापडल्या. (त्यातही रुमालाला ईंग्लिशमध्ये काय म्हणतात हे माहीत नसल्याने तो शोध त्रासदायकच झाला)

असो, माझ्या इच्छा आणि अपेक्षा खालीलप्रमाणे,

१) बजेट - १७५ रुपये अर्धा डझन किंवा २७५ रुपये पुर्ण डझन.

२) रंग - प्रत्येकाचा ठसठशीतपणे वेगळा. तसेच त्यात पांढर्‍या भागाचे प्रमाण कमीत कमी जेणेकरून त्याची मळखाऊ वृत्ती वाढीस लागेल.

३) कापड - पाणी शोषून घ्यायची क्षमता जास्त असणारे आणि लवकरात लवकर सुकणारे. (मुसळधार सर्दीच्या वेळी हा गुणधर्म उपयोगी पडतो.)

४) साईज - उन्हापावसापासून संरक्षण करायची वेळ आल्यास डोक्याला गुंडाळून पाठीमागे व्यवस्थित गाठ मारता आली पाहिजे ईतपत मोठा.
तसेच त्याचवेळी मोबाईल पावसापासून वाचावायला त्यालाही दुसर्‍या रुमालामध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवता आले पाहिजे. (माझा मोबाईल - सॅमसंग गॅलक्सी ग्रॅंड आहे)

५) छापाकाटा नको - दोन्ही बाजूंनी एकसारखाच हवा. घाईगडबडीत कुठल्याही बाजूने घडी घातली तरी चालून जावे.

६) भडक रंगांना जास्त प्राधान्य - रोजच्या ट्रेनप्रवासात खिडकीतून रुमाल टाकत जागा पकडताना त्याच प्रयत्नात असलेल्या इतर सहप्रवाश्यांना उठून दिसायला हवा. नाहीतर मागाहून लफडे होतात.

तर, आपण कुठल्या ब्रांडचे रुमाल वापरतात आणि आपले अनुभव काय आहेत हे जाणून घेणेही माझ्यासाठी उपयुक्त ठरेल.

थॅन्क्स इन्ह अ‍ॅडव्हान्स,
आपलाच ऋ ... (माल)

या धाग्यावर आधारीत हा धागाही नक्की वाचाल,
http://www.maayboli.com/node/51604
Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह.बा. आपला सल्लाही अगदी योग्य आहे पण आपला ब्रँड चुकला, लेखकाला एकच ब्रँड माहिती आहे (लेखात लिहिल्यालं हाये ते, ""जॉकी" नामक एकच ब्रांड माहीत असल्याने "),
मल्टीनॅशनल कुंपनीत कामाला असल्यामुळे आणि गफ्रे असल्यामुळे देशी ब्रँड वापरत नसावेत बहुतेक.

अग रिया ऋन्मेश पण भाबडाच आहे ग् Happy बिचार्याला सगळ्या गोष्टी आई आणि गर्लफ्रेंडकरुन करुन घ्यावा लागतात्...त्याला बाहेरच्या जगातले काय माहित असणार गो? Wink Proud Lol

काहीही कारण, संबंध नसताना बळंच ओढूनताणून भलत्याच कुणावर तरी शेरेबाजी करणे हे अशा तिरस्करणीय धाग्यांपेक्षा खेदजनक आहे.

मल्टीनॅशनल कुंपनीत कामाला असल्यामुळे आणि गफ्रे असल्यामुळे देशी ब्रँड वापरत नसावेत बहुतेक. << अग्नीपंख, लाड करणारी आई आणि गफ्रे शीच लग्न करणार हे विसरलात. जिथे जिथे चानस मिळेल तिथे तिथे ह्या सगळ्याचा उल्लेख झालाच पाहीजे नाहीतर पाप लागेल Wink

काहीही कारण, संबंध नसताना बळंच ओढूनताणून भलत्याच कुणावर तरी शेरेबाजी करणे हे अशा तिरस्करणीय धाग्यांपेक्षा खेदजनक आहे.>> +१

रुमाल घेन्या विषयी जी माहिती विचारली आहे ती मला स्वच्छतेशी निगडीत वाटतिय.
प्रत्येक जन आपाआपल्या अनुभवा नुसार माहिती पुरवतो आहे म्हनजे अंडरवेअर घेऊन किंवा बनियान घेऊन रुमाल बनवने. लंगोट घे लुंगी (मल्टीपर्पज्) घे म्ह्नुन सल्ले देने अनुभव असल्याशिवाय कोन देईल का ?

ऋन्मेऽऽष खादिभांडार मधे चांगले खादिचे रुमाल मिळतात. साईज पन मोठा असतो डोक्याला गुंडाळून पाठीमागे व्यवस्थित गाठ मारता येईल ईतपत मोठा.किंमत मला आठवत नाही.
{ निरीक्षन केलेली आनखी एक गोष्ट सर्दी मधे रुमाला एव़जी शर्टाच्या बाह्याचा उपयोग करनारे हि असतात त्याच्यासाठि तोच रुमाल असतो अस काही करन्यापेक्षा दोन रुमाल ठेवन केव्हांही चांगले }

प्रत्येक जन आपाआपल्या अनुभवा नुसार माहिती पुरवतो आहे म्हनजे अंडरवेअर घेऊन किंवा बनियान घेऊन रुमाल बनवने. लंगोट घे लुंगी (मल्टीपर्पज्) घे म्ह्नुन सल्ले देने अनुभव असल्याशिवाय कोन देईल का ?>>>>> सुरेख इथे चूक होत नाहीये का? रुमाल कुठे मिळतो हे विचारणे म्हणजे जवळच किराणा दुकान असताना साखर कुठे मिळते असा अती सामान्य प्रश्न विचारणे होते.

रुमाल हा दुर्मिळ चीज आहे का? मुम्बई मध्ये आणी पुण्यात लक्ष्मी रोडसाईडला डझनावारी फेरीवाले/ विक्रेते बसलेले असतात. दुकानात पण रुमाल मिळतातच. कुठल्याही मॉलमध्ये ते मिळतात. रुमाल म्हणजे काय पैठणी आहे का की कुठे मिळु शकेल म्हणून धागा काढायचा.

नाहीतर ऋन्मेष शनीवार-रविवार रिटेच असेल, मग गफ्रे बरोबर जाऊन त्याने तो शोधायला हरकत नाही. गफ्रेला भाऊ असेल तर ती सुद्धा सान्गु शकेल. ऋन्मेषला बाकी मित्र, भाऊ नाहीत का, की ज्याना तो ह्याबद्दल विचारु शकतो? मायबोली नक्की कशासाठी आहे?

रश्मी..तुझ सगळे बरोबर आहे.ऋन्मेष चे विचारने कदाचित अनावश्यक असेल मग वाचुन सोडुन द्याना
अनावश्यक प्रतिक्रीया कशासाठी.

काहीही कारण, संबंध नसताना बळंच ओढूनताणून भलत्याच कुणावर तरी शेरेबाजी करणे हे अशा तिरस्करणीय धाग्यांपेक्षा खेदजनक आहे.>> +१०

एखाद्याला कानफाट्या नाव पडल की तेच Happy

इथे मला "दणकट पायजमा, मुलायम बंडी" या रिक्षाच्या मागे लिहील्या जाणार्‍या जाहीरातीची आठवण झाली. तो ब्रँन्ड चालतो का बघा.

भडक रंगाचे रुमाल वापरु नका जर तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीत असाल तर. शक्यतो पाढंरे, किंवा लाईट शेड्चे वापरा.
तसेच, मोजे कधी ही पांढरे किंवा लाइट शेड चे वापरु नका. >> +१

handkerchief / hanky म्हणून गुगलून बघा... असंख्य आकार,प्रकार, रंग, बजेट पर्याय मिळतील. जेन्ट्स क्लोद्स मिळतात तेथे बजेटनुसार प्रकार असतात. समजत नसेल तर मालकालाच विचारावे. तो पर्याय सुचवतो.

कोसळणारी सर्दी असेल तर होमिओपॅथी ट्रिटमेंट घ्याच!! बरेच प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील.

>>मला सर्दीचा तूफान त्रास असल्याने मी कुठेही जाताना खिश्यात दोन रुमाल ठेवतो. एक नेहमीचा हात-तोंड पुसायला, तर दुसरा गळणारे नाक साफ करायला.
>>भडक रंगांना जास्त प्राधान्य - रोजच्या ट्रेनप्रवासात खिडकीतून रुमाल टाकत जागा पकडताना त्याच प्रयत्नात असलेल्या इतर सहप्रवाश्यांना उठून दिसायला हवा.

अरारा! लोक जिथे बुडं टेकवून बसतात तिथेच आपला रुमाल टाकायचा, नंतर तोच रुमाल वापरून नाक शिंकरायचं किंवा हात-तोंड पुसायचं! बाकड्यावर टाकायला म्हणून तिसरा रुमाल ठेवायलाच हवा. Proud

@ मृण्मयी

<< अरारा! लोक जिथे बुडं टेकवून बसतात तिथेच आपला रुमाल टाकायचा, नंतर तोच रुमाल वापरून नाक शिंकरायचं किंवा हात-तोंड पुसायचं! बाकड्यावर टाकायला म्हणून तिसरा रुमाल ठेवायलाच हवा >>

तुम्ही पूर्ण लेख नाही वाचलात का हो? नाही तर केवळ तीन नाही अजून बरेच रूमाल घ्यायला सुचविले असते. वाचा पाहू हे आधी -

<< उन्हापावसापासून संरक्षण करायची वेळ आल्यास डोक्याला गुंडाळून पाठीमागे व्यवस्थित गाठ मारता आली पाहिजे ईतपत मोठा.
तसेच त्याचवेळी मोबाईल पावसापासून वाचावायला त्यालाही दुसर्‍या रुमालामध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवता आले पाहिजे. >>

इतके सगळे रुमाल हे लेखक महोदय खिशात कसे काय ठेवणारेत? उगाच का मी लुंगी सुचविली होती त्यांना? तिच्या निर्‍यांमध्ये मोबाईल देखील लपविता येतो. पार्टनर सिनेमात दाखविल्याप्रमाणे तिने नाक देखील पुसता येते. तशीच वेळ आली तर आणिबाणी च्या वेळी कमरेची सोडून डोक्यालाही गुंडाळता येते. कितीही मोठं डोकं असलं तरी खात्रीने गुंडाळलं जाईल. तसंच ट्रेनचं आख्खं बाकडं देखील बुक करता येईल त्यांना खिडकीतूनच लुंगी टाकून. फक्त एक कोपरा रिझर्व ठेवायचा लुंगीचा त्याने फक्त तोंड / चेहरा पुसण्याकरिता.

हा माणूस आणि असले सगळेच डुप्लिकेट चिरकूट कोण आहेत हे अ‍ॅडमिन उघड का करत नाहीत? किंवा सरळ हाकलून का देत नाहीत?

मायबोली उघडलं की ह्यांचे फालतू धागे दिसतात आणि पुढे काहीच वाचलं जात नाही.

स्वातंत्र्य वगैरे ठिक आहे, पण अति होतंय हल्ली असल्यांचं.. ह्यांना कशाची काही फ़िकीरच नाहीये.

ऋन्मेष पेडगावकर दादा, ते ब्लॉग बनवायचं काय झालं? तो काय तो ब्लॉग बनवा पाहू लवकर. आणि पुढचे प्रश्न तिथे विचारा.

तुम्ही कोण आहात हे सर्वांना माहिती आहे. लोकं चांगुलपणामुळे उघड बोलत नाहीयेत. त्याचा असा फायदा घेऊ नका.

ऋन्मेष म्हणजेच तुमचा अभिषेक (व बहुतेक म्हणजेच अंड्या) असे नाही आहे का?

मी हा आय डी ओरिजिनल समजत होतो.

हा ड्यु आय डी आहे असे मला वाटलेच नाही.

क्वचित कधीतरी इथे येणार्‍या ऋयामला हा आयडी कोण हे माहितेय आणि इथेच असणार्‍या मला माहित नाही. बहुत नाईन्साफी हय.

हा आयडी तुमचा अभिषेक असेल असं अजिबात वाटत नाही. वर रीया म्हणतेय तसे उगाच काड्या करायला बीबी उघडून मजा बघायची. टाईमपास एकेकाचा. अ‍ॅडमीनलाही चालतंच आहे.

हा आय डी 'तुमचा अभिषेक' आहे किंवा 'अंड्या' आहे हे मी इथेच वाचलेले होते, त्यामुळे तसे म्हणालो.

बेसिकली, जर सगळ्यांना किंवा अनेकांना हे माहीत आहे की हा ड्यु आय डी आहे तर त्याच्या धाग्यावर त्याची कणीक तिंबण्यासाठी एवढी अहमअहमिका कशासाठी?

तुमचा अभिषेक याच आयडीचा अंड्या हा ही आयडी होता Happy
त्यामुळे किंवा शब्दाला अर्थ नाही Happy

बरं अनेकदा हा आयडी अभिषेकदादाचा आहे असं इथे मांडण्यात आलं तेंव्हा कधीच त्याने एकदाही 'मी हा नाही' हे का सांगितलं नसावं बरं? Uhoh

हा जर एरवी मायबोलीवर उजळ माथ्याने वावरणारा एखादा ओरिजिनल आय डी असेल आणि निव्वळ मजा म्हणून हा ड्यु आय डी काढून हा धागा निर्माण केला असेल तर हा धागा 'शिंक यावी म्हणून नाकात घालण्याच्याही' पात्रतेचा नाही.

>>>स्वातंत्र्य वगैरे ठिक आहे, पण अति होतंय हल्ली असल्यांचं.. ह्यांना कशाची काही फ़िकीरच नाहीये. <<<

ऋयाम, माफ करा, पण ठळक केलेल्या शब्दामुळे विचारावेसे वाटले. तुम्हाला ह्या प्रतिसादातून माझ्याबद्दल काही म्हणायचे असल्यास कृपया स्पष्टपणे म्हणावेत अशी विनंती!

माझा गैरसमज असल्यास क्षमस्व!

धाग्याचा विषय आवडला नाही म्हणून ,इतर धागे मागे पडताहेत म्हणून अॅडमिनला सांगून धक्के मारून बाहेर काढणे फारच होतंय. वारंवार प्रतिसाद टाकून 'संयमित चर्चा'(श्रेय=फूल) कोण बरं घडवत आहे? केवळ वाचून गप्प राहिल्यास धागा वर कसा येईल?

मी कुठलाही शब्द ठळक केला नाही आहे.

बरेच दिवस मायबोलीवर यायला वेळ मिळत नाही, आणि कधी वेळ मिळाला तर इथे आल्यास दिसणारे असले धागे पाहिले की वाटतं, "कशाला आलो?"

यावर "तुम्हाला कोणी आमंत्रण दिलंय" वगैरे उत्तर असेल, तर तेही मान्य आहे. पण लिहील्याशिवाय राहवलं नाही.

ऋयाम,

माझ्या मनात तुमच्याबद्दल निखळ मैत्रीशिवाय काहीही नाही.

पण तो नुक्ता (लॅपटॉपची स्क्रीन पुसून पाहिले), तो शब्द, ह्यामुळे विचारले. ते टिंब अजून मला स्वतःलाच धड देता येत नाही. केश्विनींनी शिकवले तरीही! Happy

असो!

काय झाले?

इथे येतानाचे गांभीर्य ज्यांना आठवते त्यांना इथे आल्यावर इथे येतानाचे गांभीर्य खरंच आठवते का? Happy

शिर्षका मधेच अजुन काही धाग्यांचे पोटेन्शियल आहे

लेडीज रुमाल घ्यायचा आहे .. (ब्रांडेड)

जेन्टस रुमाल घ्यायचे आहे .. (ब्रांडेड)

लेडीज रुमाल घ्यायचे आहे .. (ब्रांडेड)

जेन्टस रुमाल घ्यायचा आहे .. ( नॉन-ब्रांडेड)

लेडीज रुमाल घ्यायचा आहे .. (नॉन-ब्रांडेड)

जेन्टस रुमाल घ्यायचे आहे .. (नॉन-ब्रांडेड)

लेडीज रुमाल घ्यायचे आहे .. (नॉन-ब्रांडेड)

आपण सगळेच ईनोस्न्ट, होउन जाउद्या.

काही प्रतिसाद बघून व्यथित झालो.. पण ते सोडले तर काही मस्त विनोदही वाचायला मिळाले. Happy
एवढेच नव्हे तर सर्दीवरही सल्ले मिळाले. त्यावर सांगू इच्छितो, माझी सर्दी अ‍ॅलर्जीची आहे आणि त्यावर सर्व पथींचे शक्य ते उपचार चालू आहेतच.

असो, माझी खरी गरज रुमालाची होती, किंबहुना अजूनही आहेच, कारण ते आता वीकेंडलाच घेणे होईल. पण सांगायला आनंद होतोय की त्या आघाडीवर देखील काही उपयुक्त सल्ले इथे मिळाले. विविध ब्रांड किंमतीचा अंदाज आला. एका मायबोलीकरांनी तर संपर्कातून सुचवले. (त्यांचे नाव नाही घेत कारण त्यांनाच ते उघड करायचे नसल्याने त्यांनी इथे लिहिले नसावे, तर त्यांच्या इच्छेचा मान ठेवायलाच हवा. मात्र आपल्या आसपास जे काही सकारात्मक घडते ते सर्वदूर पोहोचले पाहिजे या हेतूने इथे सांगतोय.)

तर, माझीही चूक मान्यच. धागा गुंफलाय थोडासा भोळेपणातच. पण रुमाल घ्यायचाय हे मात्र खरे.. आणि त्यातले मला काहीच माहीत नाही हे ही तितकेच खरे..

आजवर मी स्वताहून कधीच रुमाल विकत घेतला नाही, घरचेच आणून द्यायचे. पण मॉलमध्ये शॉपिंग करताना तेथील बॉक्समध्ये छानपैकी गुंडाळून ठेवलेले रुमाल बघायचो.. फक्त बघायचोच, कारण एकदोनदा तो बॉक्स उचलून किंमती बघितल्या आणि बस बघितल्याच.. त्या बॉक्समध्ये तीन नग असतात की सहा नग हे देखील मला माहीत नाही. पण जर धाग्यात बजेट म्हणून लिहिलेल्या किंमती कमी असतील तर वाढवू शकतो. वा त्या बजेटमध्ये ६ च्या जागी २ रुमाल आले तरी चालून जाईल. कारण खरेच ती किंमत योग्य आहे की नाही हे तर आता वापरल्यावरच समजेल.

गडद रंगाच्या सल्ल्याबाबतही बरेपैकी सहमत, कारण बरेच लोकांना फिकट रंगाचे रुमाल वापरतानाच पाहिलेय. आणि मॉलमध्ये जे काही पाहिलेय त्यातही सारे असेच पाहिलेत. पण माझी मूळ आवड गडद रंगाची असल्याने...... पण असो, सगळीकडेच आवड जपता येत नाही. सवय केली तर ते पांढरेफटक रुमालही जमू लागतील.

पुन्हा एकदा धन्यवाद, अगदी सर्वांचेच.. अजूनही काही उपयुक्त सल्ले आले तर आवडतीलच.. तसेच कोणाला या पोस्टचीही चीरफाड करायची असेल तर......... तर काय बोलू, कधी घेतलाय का आजवर मी आक्षेप Happy चॉईस इझ युअर्स .. चीअर्स !!

अहो, सर्वात आधी तुम्ही मी नाही आहात हे सांगा प्लीज Proud

इथे तसं काहीतरी मत करून घेण्यात आनंद मानणे चाललेले दिसतंय! Proud

ऋन्मेऽऽष तुमचे फक्त इतकेच चुकले की तुम्ही हा धागा विनोदी व विरंगुळा मधेही काढायला हवा होता. Proud Happy

तुमचे धागे कमीत कमी सर्वांचे मनोरंजन तरी करत आहेत.आणि यंग कॉलेजच्या मुलांमुलींमधे तुम्ही नक्कीच फेमस आहातते केवळ ऋन्मेऽऽष म्हणुनच Wink .त्यांच्या साठी तरी लेखन सुरु ठेवा. Happy सगळे सहमत असावेत. Happy

ह्यावरुन एक कोडे आठवले,
अस काय आहे ज्याला, गरिब माणुस फेकुन देतो, पण श्रीमंत माणुस खिशात सांभाळून ठेवेतो. Happy

अहो, सर्वात आधी तुम्ही मी नाही आहात हे सांगा प्लीज फिदीफिदी>>>या जन्मी सुटायचा नाही तुमचा हा प्रॉब्लेम Proud

बेफिकीर,
कमाल आहात हा खरेच.. वर मी ड्यू आयडी असल्याच्या चर्चेत मोठ्या हिरीरीने भाग घेत होतात, आणि आता ते आपल्या स्वत:च्या अंगाशी आल्यावर माझीच मदत मागत आहात Happy

असो, पण मी मनावर नाही घेणार, अपना दिल हि कुछ ऐसा है,

तर मित्रांनो, मी बेफिकीर नाही आहे,
मी ` फ़ ' ला ` फ ' लिहितो ..

Pages