अकोल्यातले मायबोलीकर

अकोल्यातल्या मायबोलीकरांचं हितगुज.

Submit to kanokani.com

डीळीप

समस्त अकोलेकर.............................. नमस्कार....

समस्त अकोलावासीयांना नमस्कार

हाय अकोलेकर,

आताच मी अकोल्याला जाउन आली, १.५ वर्षानतंर... अकोला आता खुप वेगळं वाट्लं. म्हणजे नवीन शो-रुम्स सुरु झाल्या आहेत, नवीन changes आहेत. फक्त आपल्या इथे एक मॉल आणि चांगल सिनेमाघर हवं.

तुम्हाला काय वाटंत अजुन काय नवीन गोष्टी आल्या पाहिजे अकोल्यामधे?

--
किट्टु

आंतर-राष्ट्रीय विमानतळ!!!!

व्हायला हवे. मॉल्स मुळीच नकोत.

स्मित)

साधं राष्ट्रीय विमानतळ झालं तरी खुप होईल... आंतर-राष्ट्रीय नंतर बघु!!!

आंतर-राष्ट्रीय उद्दिष्ट ठेवा... म्हणजे राष्ट्रीय मिळेल.

फक्त आपल्या इथे एक मॉल आणि चांगल सिनेमाघर हवं.
--- सर्वांना 'गरजे पुरते' पाणी...

--- सर्वांना 'गरजे पुरते' पाणी...
उदय३२१, अनुमोदन! अकोल्यात नदी असून(?) पिण्याच्या पाण्याचे हाल, विचित्र विरोधाभास आहे.

किती सुंदर होती मोरणा पुर्वी म्हणजे २५ वर्षांपुर्वी. चांदण्या रात्री पाय पाण्यात सोडून आम्ही नदीच्या काठी बसायचो आणि मग हळूच बारक्या माशा पायांना गुदगुल्या करायच्यात.

>>किती सुंदर होती मोरणा पुर्वी म्हणजे २५ वर्षांपुर्वी

खरं कि काय? कारण मी कधीही नाही पाहिलि....फोटो असेल तर नक्की टाका...

तेंव्हा त्या वेळी कसला कॅमेरा बिमेरा होता जवळ. माझेच बालपणीचे फोटू नाहीयेत स्मित

खूपच कोरडी पडली आहे नदी. जलकुंभ वनस्पतीमुळे खूप हानी झाली या नदीची. एक खूप जुना पुल होता तो तोडला. खडक उद्धस्त केलेत. फक्त एक मंदीर आहे तिथे आणि अधूनमधून फिरकणारे धोबी. पुर्वी घरोघरी नळ नव्हते. सार्वजनिक नळावर धुणे धुता येत नव्हते. त्यावेळी घरातली बायामाणसे धुनी धुवायला याच नदीवर येत. लहान मुले आयांच्या पाठी असतं. दुपारी तरुण मुले पोहायला येत. १० वी १२ वी त नापास झालेल्या काही मुलांनी आणि असफल प्रेमीकांनी हीच नदी निवडली त्यांची जीवन-यात्रा संपवायला. कोजागिरीला जागरण करायला या नदीचा विस्तृत काठ निवडला जायचा. गणपतीचे विसर्जन इथेच होत असे. हरतालीकेला बायका वनस्पती वहायला इथेच येत असतं. पण आता यातलं काहीच शिल्लक राहिलेलं नाही. या नदीच्या काठी डोंगरा ऐवढ वारूळ होतं. ते नष्ट झालं. आजूबाजूल हिरवागार कुरण होतं. पहाटेची कोवळी उन्हे या कुरणावर पडली की आजूबाजूचा परिसर स्वच्छा प्रसन्न वाटायचा.मासळी टिपायला तिथे बगळे यायचे. घोडे चरायला यायचे. पावसाळ्यात ही नदी नेहमी पुर येऊन अनिकट खाली करायची. उन्हाळ्यात सर्कस आली की उंट, हत्ती हे प्राणी आमच्या घरासमोरून जायचे. मग तुडुंब भरलेल्या नदीच्या पात्रात एक एक हत्ती असा शिरायचा आत की नदी हेलकवायची.

अरेव्वा....

सही.... कारण मी जेव्हा पासुन ही नदी पाहाते आहे तेव्हा पासुन ती ही अशीच आहे पाण्याशिवाय...

नाही म्हणायला एकदा मोरणेचा पूर पण पाहिला आहे... अरेरे

बी, तुमची लेखनशैली 'वरचा क्लास' आहे. लहानपणी पुलावरुन जाता-येतांना अगदी असंच चित्र दिसायचं..नदिचं पात्र कमी पाण्याचंच आठवतंय..खरं तर इतकं उत्कट वर्णन वाचून भरुन आलं. ह्या सगळ्या पोस्टी वाचुन अकोल्याला जाण्याची तीव्र इच्छा होते आहे.

धन्यवाद! आठवणी अशाच तरल असतात कधी आनंद देतात तर कधी कढ आणतात.

अकोलेकर पावसात भिजतायेत का?
इथे कोणिच नाही.

ए शाणे, एक बात सुन. ये घाटीतात्या है ना, ये भोत बडा पंटर. इसने जो घोडे पे पेटी लगाया, वो घोडा कित्ता भी चमनचिंधी होयगा तोभी जितेगा ! क्या, समझा ना ? बोले तो, ये तात्या का जो घोडे के साथ मांडवली, वो घोडा एकदम तेज... एकदम ghoda.jpg ये घोडे के माफीक !

ऐसा ये तात्या अभी पच्चास साल का हो गयेला है, बोले तो पचासवा हॅप्पी बड्डे, क्या ? वो आप्पुन मनायले रैले है इस दिवाली क्को. अभी ये दिवाली पे माब्बो को दसवा पंख आयेला है (क्या रे पक्या ?... हां हां ठिक है) बोले तो, माब्बो का दसवा अंक आयेला है. एकदम झक्कास ! तो उस टायम ये तात्या पे लिखने का. ये बंदेने कैसा कैसा पंटरगिरी कियेला है अब तक वो लिखने का... मतबल, ये पिछ्छू के पचास साल में तात्या ने इत्ता कुछ किया उस पे कुछ लिखने का... और बोले तो तात्या अब्बी कैसा कैसा धंदापानी करेला है वो बी लिखने का... क्या ? समझा ना ?

और तू भी ए शाणी ! क्या ? बोले तो, ये शाणेको बोला है तो तेरे को अल्लग से बताने का क्या ? ये मराठी जात भोत ढासू. बोले तो, जिधर बी गया, उखाड के आयेला है ! क्या ? ये अपना सच्चूभाय और माधुरी बी वोहीच... बोले तो, मराठी. तो ये मराठी लोग के बारे में कुछ भी लिख डालने का.

तो सब लोग ये दिमाग के अंदर घुसा लो, क्या ? दिनभर ये पब्लिक सिरफ ये बाफ से वो बाफ पर भटकती रहती है... भटकती आत्मा की पनौती तेरी तो... !! आप्पुन को मालूम, इधर पे लोग भोत लोचा करेले... गाना लिखेले, शायरी करेले, कैसा कैसा श्टोरी लिखेले, चिकने चिकने फोटो निकाल रैले... ये कुछ भी लोचा किया तो बी आप्पुन के पास आने का लोचा लेके, समझा क्या ? आप्पुन का नाम (पक्या, क्या नाम बोला रे?... हां हां) संपादक हटेला, आप्पुन करता जेब फटेला, समझा क्या ?

और एक बात दिमाग में फिट्ट रखने का, क्या ? इत्ता टायम है सोच के टायम की खोटी नही करने का. बोले तो, ५ सितंबर के अंदरीच ये सब आप्पुन को भेजने का , समझा क्या ? चल चल, अब थोडी हवा आने दे.

समस्त अकोलेकरना रवि चा नमस्कार....

समस्त अकोलेकरांना प्रसन्नचा नमस्कार,
माझ्या बालपणीची मोर्णा नदी आणी निर्गूणा नदी (मी सस्तीकर आहे) ही माझ्या जीवनात फ्क्त दोनदाच पुर आलेला पाहिला.

ही निर्गूणा नदी कुठे आहे?

नमस्कार,
मी नंदकुमार केळकर, केरळ मधील कोचीन या मध्यवर्ती ठीकाणी आमचे होम-स्टे आहे.
ज्याचा लाभ खुप लोकांना झाला आणी होत आहे. आपणाला पण तो व्हावा
म्हणुन त्याची माहिती पाठवत आहे.आपल्याला शक्य असल्यास ही माहिती
आपल्या परिचीत लोकांना तसेच मित्रमंडळींना कळवा.

स्वत:च प्लान करा केरळची सहल कुटुंबाबरोबर किंवा मित्र मैत्रिणिंबरोबर
अगदी कमी खर्चात आणि घरगुती वातावरणात आपल्या माणसांबरोबर.

तसेच या लिंक पण तपासुन बघा
http://jahirati.maayboli.com/detail.php?id=1015
अथवा
http://nkelkar.spaces.live.com/

कळावे आपला विश्वासु
नंदकुमार केळकर

खुषखबर! खुषखबर!! खुषखबर!!!

माँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....
खास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत...
लक्ष ठेवा www.maayboli.com/node/16873 ह्या बाफवर..