सई मला आवडते - पोल, निकाल आणि निष्कर्ष !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 September, 2014 - 01:00

खालील धागा वाचा आणि इथे पोल समजून मतदान करा.

नाही जरी सई तरी

प्रतिसादात मी दोन पर्याय देतो, त्यापैकी एकाला निवडा.

१) सई मला आवडते.

२) सई मला आवडत नाही.

सई = सई ताम्हाणकर = दुनियादारी गर्ल

होऊन जाऊ दे, दूध का दूध, पाणी का पाणी ..

सई आवडणार्‍या मूकवाचकांनी कृपया इथे आपली आवड बिनधास्त नोंदवावी.
आपले मतच बोलेल !!

______________________________________________
______________________________________________

सई मला आवडते - निकाल ! आणि निष्कर्ष !!

नाही जरी ‘सई’ तरी ...
http://www.maayboli.com/node/50822
वरील लेखावर आधारीत चार दिवसांपूर्वी गुरुवारी सकाळी काढलेल्या पोलचा हा रविवारी रात्रीपर्यंतचा निकाल.
(पुढेमागे थोडाफार बदलेन, बदलत जाईल, पण तुर्तास पोलचे उद्दीष्ट साध्य झाल्याने यालाच प्रमाण मानूया)

सई मला आवडते - ३० मते
सई मला आवडत नाही - १२१ मते

पण हा निकाल ईथेच संपत नाही!

यातून निष्कर्ष निघणेही तितकेच गरजेचे आहे, आणि पोलकर्ता म्हणून तो मी काढणे हे माझे कर्तव्य आणि माझी जबाबदारी आहे.

मुळात हा पोल मी का काढला???
सई न आवडणार्‍या लोकांपेक्षा सई आवडणार्‍यांची संख्या जास्त आहे हे मला दाखवायचे होते का???
किंवा तसे झाले असते तर मी जिंकलो असतो का???

तर याचे उत्तर आहे, अर्थातच .. " नाही " !!

माझ्या सईच्या लेखावर, किंवा सईच्या माझ्या लेखावर म्हणूया, कित्येकांनी गरज नसताना नकारात्मक प्रतिसाद दिले. अगदी विरोधालाच विरोध करायचे म्हणून पुरते टोकाचेही दिले. ज्यातून एक असे चित्र निर्माण झाले की अरे हि अभिनेत्री कोणालाच आवडत नाही का? पण अर्थातच हे धादांत खोटे होते. कारण हि वस्तुस्थिती असती तर आज रिलीज होणार्‍या कित्येक महत्वाच्या चित्रपटांमध्ये कोणत्याही निर्मात्या दिग्दर्शकाने तिला घेतलेच नसते. तिच्या गत दोनेक वर्षात आलेल्या आणि भविष्यात येऊ घातलेल्या चित्रपटांची संख्या पाहता तिची जी लोकप्रियता निर्विवादपणे आहे तीच मला आकड्यांची भाषा चटकन समजणार्‍यांना दाखवायची होती...........

आणि ती दिसली!

सर्वप्रथम ‘सई मला आवडते’ या पर्यायाला मत देणार्‍या माझ्यासह सर्वच सभासदांचे मी आभार मानून अभिनंदन करतो.
आणि आता सईची लोकप्रियता दाखवणारा खरा आकडा जोडून दाखवतो, तो असा -- ३० + १२१ = १५१ मते टोटल!

गुरुवारी सकाळी मी हा पोल काढल्यावर १ ल्या तासाभरातच जवळपास ३५ ते ४० जणांनी मतदान केले.
पावणे २ तासांतच ५० शी गाठली गेली..
रात्री झोपण्यापूर्वी मी हा आकडा ९० दीच्या घरात पोहोचलेला पाहिला..
आणि २ र्‍या दिवशी २४ तास उलटून जातात न जातात तोच १०० फलकावर लागले होते!

विकांताचा फायदा उचलत आज रविवार मावळताना केवळ साडे ३ दिवसांच्या मतदानानंतर तब्बल १५१ जणांनी या धाग्यावर हजेरी लावत आपले मत नोंदवले.

हा आकडा मायबोलीची सक्रियता लक्षात घेता छोटा कि मोठा असा विचार करता मला सहज सुचले का नाही याची तुलना भरभरून प्रतिसाद मिळालेल्या गणेशोत्सवातील मतदानाशी करावी, तेव्हा मला खालील आकडे आढळले.

स्पर्धा - मलाही कोतबो - १२१ टोटल मते.
स्पर्धा - आता कशाला शिजायची बात - १४२ टोटल मते.
(मतदानाचा कालावधी - साधारण आठवडा!)

सई ताम्हाणकर - १५१ टोटल मते
(मतदानाचा कालावधी - साडे ३ दिवस!)

आता या निकालाचे आणि निष्कर्षाचे मोजमाप करणारे माझ्या लेखातीलच वाक्य पुन्हा एकदा देतो -
यू कॅन हेट हर, यू कॅन लव हर ..
बट बट बट..
यू कॅन नॉट कॅन नॉट ..
इग्नोर हर!
सई ताम्हाणकर!

- ऋन्मेऽऽष

जाता जाता -- एक प्रतिसाद असा आला कि कोण सई???? तर त्या सद्गृहस्थांना मी सांगू इच्छितो, याचे उत्तर मायबोलीवरील या साडे ३ दिवसांत सक्रिय असणार्‍या त्या १५१ पैकी कोणत्याही सभासदाला नक्की विचारा Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण सई आवडत नाही, ह्याची सेंच्युरी होत आली आहे...आहात कुठे
>>>>>
अरे हो की, ते मी पाहिलेच नाही .. मला फक्त ती किती जणांना आवडते हे बघण्यात ईंटरेस्ट असावा बहुतेक Happy

मी खोचक पणे नाही विचारत आहे....पण या धाग्याने नक्की साध्य काय होतेय???

लोकांना ती आवडत नाही...आणि तुम्हाला फक्त ती आवडतेय म्हणुन सर्वांनी तीला आवडुन घ्यायची आणि तुमच्या लेखाला / आवडत्या नटीला छान म्हणायचे.....मग तुम्हाला बरं वाटेल असा काही प्रकार आहे का???

मी खोचक पणे नाही विचारत आहे....पण या धाग्याने नक्की साध्य काय होतेय???
>>>>>>>
मी सुद्धा टाळाटाळ नाही करत पण प्रामाणिकपणे सांगतो की याचेही उत्तर मी रविवारीच येथील बहुतांश मतदान आटोपले की देईन.
तुर्तास ऑफिसचे काम करायला रजा घेतो. Happy

बाकी काही नाही तरी शनिवार रविवार किती लोक माबोवर येतात याचं उत्तर मिळेल.

तुम्ही माबोवर वीकडेज मध्ये येता की वीकेण्डला असा सर्व्हे घ्यावा काय? (हाही सर्वेक्षणाचा विषय असू शकतो) Wink

गजाल खरी काय हे गाण ऐकायला मस्त आहे की.
कोणत्या चित्रपटातील आहे?

मी मत दिलय.
आणि सई मला आवडत नाही ह्यालाच मत दिलय.

झक्य गजाल खरी काय 'नारबाची वाडी' मधलं गाणं आहे.

बाकी मी आता सई ताम्हणकर वर एक केस स्टडी कम व्हाईट पेपर लिहायला घेते Proud

गजाल खरी काय हा काय प्रकार आहे प्रकाश पडा प्लिजच Wink

१८ नाही किमान ७-८ असतीलच Wink
बाकीचे प्रोफाईल्स मित्रांचे Wink
ए बायकोचं
१० झाले की नाही? Wink

एक निरीक्षण - सई ताम्हणकरच्या बिकिनीवर टीका केलेले बहुतेक लोक पुणेरी आहेत. पुढच्या वेळी या टीकेने अस्वस्थ होऊन निर्मात्याने समुद्रातून तिला नऊवारी साडीत येताना दाखवली तर हेच लोक म्हणतील " का तिच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणता ? तिला वाटतंय ना हॉट तर तुम्ही का थंड पडता ?"

रिया आणि गण्या , सईची मते २१ झाली .......... चला आता माझ्या ड्यूआयडीची संख्या पण वाढवा Lol

जोक्स अपार्ट, ड्यूआयडीची चर्चा उगाचच जास्त झाल्याने पोलचे गांभीर्य जाईल म्हणून या विषयावर या धाग्यावर माझी शेवटची पोस्ट !

सई ताम्हणकरच्या बिकिनीवर टीका केलेले बहुतेक लोक पुणेरी आहेत>>>>>>>>>>. हे कुठुन शोधलत????? त्या बिकिनीत ती हॉट न दिसता ढपचर दिसत होती... तीची फिगर कमनीय वगैरे नाही तर चांगली तगडी वाटली... आणि राहीला प्रश्न पुणेकरांचा तर ही टिका मुंबई कर आणि इतर करांनी ही केलीय....उगाच पुणेरी बिणेरी वाद करु नका

ऋन्मेऽऽष ,

तुम्ही लोकान्कडे जास्त लक्श देउ नका. स्वतः काहिहि नसताना दुसर्याना नावे ठेवायचि सवय असते त्याना.....
सध्य्या जवळ्जवळ निम्म्याहून जास्त बर्यापैकी चालणार्या मराठी चित्रपटात तीच मुख्य नटी असते हेच सत्य आहे. जे कीतीही असल्या फालतू कमेन्टस आल्या तरी बदलनारे नाहीये......

अनिश्का, पुणेरी पोस्ट उगाच टाकलेली काडी आहे तर तिला इग्नोर करा, इथले बहुतांश सभासद अश्या काड्या इग्नोर करतात असा आजवरचा अनुभव Happy

धन्यवाद प्राश,

काही कॉमेंटस फालतू असतात, काही उगाचच लिहितात, कबूल.
पण काही जणांचे मत प्रामाणिकही असतेच.
आपल्याला कोणाचाही खरा हेतू माहीत नसल्याने प्रत्येकाच्या मताचा आदर करायला हवा. Happy

मी लक्ष देतो, पण विचलित होत नाही. मला याची कल्पना असती तरी मी हा लेख इथे प्रकाशित करण्यास कचरलो नसतो कारण मी माझ्या मताशी आणि आवडीशी प्रामाणिक आहे याची मला कल्पना आहे ना. Happy

मी लक्ष देतो, पण विचलित होत नाही >>
संत ऋन्मेष महाराज असा आयडी घ्या, पण मग तुम्हाला सईदेवींची भक्ती करता येणार नाही त्या केसमध्ये Light 1

बिलकुल आवडत नाही अन कधीच आवडली नाहि.. तोंडावरची माशीपण हलत नाहि असा अभिनय पहिल्यापासुनचा तिचा..
दक्षे Lol

हा धागाच काडी आहे Lol
हाच काय एकामागोमाग एक धागे काढणे ही काडी नाही काय ? Wink
माझ्या मते सई ताम्हणकर ही चांगली अभिनेत्री नाही हे सिद्ध करण्याचा हा रिव्हर्स उपद्व्याप असावा. खुंटा हलवून मजबूत करण्यासाठी आपणच आधी तिची बाजू घ्यायची म्हणजे मग सगळे तुटून पडतात.

माझ्या मते सई ताम्हणकर ही चांगली अभिनेत्री नाही हे सिद्ध करण्याचा हा रिव्हर्स उपद्व्याप असावा. खुंटा हलवून मजबूत करण्यासाठी आपणच आधी तिची बाजू घ्यायची म्हणजे मग सगळे तुटून पडतात.>>>>>>.. मलाही आधी असच वाट्ल होत.... पण ऋन्मेऽऽष नी लिह्लेला लेख वाचल्यावर तस वाट्त नाही.........खर तर त्यानी तिच जे वर्णन केलय ते मूळ तिच्यापक्षा जरा जास्तच जास्त आहे( त्याला नाईलाज आहे कारण प्यार अन्धा होता है:P :D) ...पण त्यामुळेच लोकानी जास्त विरुद्ध प्रतिक्रिया दिल्या आहेत....... नाहीतर कुणी एवढया विरुद्ध प्रतिक्रिया दिल्या नसत्या

एक निरीक्षण - सई ताम्हणकरच्या बिकिनीवर टीका केलेले बहुतेक लोक पुणेरी आहेत. पुढच्या वेळी या टीकेने अस्वस्थ होऊन निर्मात्याने समुद्रातून तिला नऊवारी साडीत येताना दाखवली तर>>>>>>>>> नऊवारी साडी मिरवण्यासाठी असते........ भिजवण्यासाठी थोडीच असते................ Lol Proud

ऋन्मेऽऽष | 19 September, 2014 - 02:21
जोक्स अपार्ट, ड्यूआयडीची चर्चा उगाचच जास्त झाल्याने पोलचे गांभीर्य जाईल

?? कहर आहे!!!

सुम धन्यवाद,
आणि येस्स, मी माझ्या लेखात सईचे वर्णन जास्त केले असण्याची शक्यता कबूल.

पण ते तर होणारच ना, हे काही चित्रपटाचे परीक्षण नाही तर सईच्या चाहत्याने लिहिलेला लेख आहे.

आणि ज्याला नुसते सई मला आवडते एवढेच बोलून न थांबता पब्लिक फोरमवर लेख लिहावासा वाटतो त्याच्या चाहतची कल्पना आपण करू शकताच Happy

विदूषक,
धाग्याच्या सुरुवातीला एक लेख डकवला आहे तिथे क्लिक करा, त्या लेखात सईचा फोटो आहे. फोटो आवडला तर लेखही वाचाल. तो ही आवडला तर इथे सई मला आवडते म्हणून मत द्याल. Happy

अमा, धन्यवाद
गण्या, २९ मते सई मला आवडते आली आहेत, त्या काड्या कोणी कोणी केल्या याचा शोध घ्या किंवा ऋन्मेषचे २८ फेक आहेत अशी दवंडी पिटा Happy

का बरं ? ३५० आहेत असं तुम्हीच जाहीर केलंय ना एका तोंडानं ?
बाकी प्रत्येक प्रतिसादाआड तुमचा एक प्रतिसाद मायबोलीला उभारी देतोय. किमान हजार होईपर्यंत व्रत सोडू नका.

धागा माझा असल्याने मला उद्देशून कोणी काही लिहिल्याने तात्काळ प्रतिसाद द्यावाच लागतो, नव्हे ते माझे कर्तव्यच असते, जसा की आपल्याला हा प्रतिसाद.
मात्र माझ्या धाग्यावर आपली उल्लेखनीय हजेरी याबद्दल आपले विशेष कौतुक !

आता विषयावर आणि सईबद्दलच बोलूया,
वाटल्यास ऋन्मेष मला आवडतो, ऋन्मेष मला आवडत नाही, ऋन्मेष माझ्या डोक्यात जातो वगैरेसाठी आपण वेगळा धागा चालू करुया. तुम्ही केलात तरी चालेल. Happy

यापुढे अवांतर पोस्ट मी माझ्यातर्फे इथेच थांबवतो.

ऋन्मेऽऽष | 21 September, 2014 - 13:04 नवीन
1
Vote up!

धागा माझा असल्याने मला उद्देशून कोणी काही लिहिल्याने तात्काळ प्रतिसाद द्यावाच लागतो, नव्हे ते माझे कर्तव्यच असते, जसा की आपल्याला हा प्रतिसाद. >>>

तो प्रतिसाद अमांना उद्देशून होता, तुम्हाला नाही.

गिरे तो भी नाक उपर..............
गिरे तो भी टान्ग उप्पर?? >>>>>>>>>>>>>.. खरचं.....जर हे सो कॉल्ड मतदान घेउन मतांचा आकडा बघुन...दुध का दुध पानी का पानी झालयं तरी मोठेपणा संपत नाही......कठिण आहे.... इग्नोरास्त्र टाकण्यात आले आहे.....या धाग्यावर मतदान करुन आणि काही कमेंट्स वाचुन जो मुर्खासारखा वेळ घालवलाय तसे या पुढे करणार नाही...
शेवटी गाडी तिथेच आहे जिथे सुरुवातीला होती.... माझंच खरं हे आधी ही ऐकलं आणि आताही तेच...मतदानाचा उपयोगच नाही थोडक्यात....

या बाफवरचं लेखकाचं वागणं हे वेड घेऊन पेडगावला जाण्यासारखं आहे. जिथे सेन्सीबल असेल तिथे जरूर पाठिंबा देऊ. आमचं आयडीशी वैर नाही, खटकणा-या पोष्टींशी आहे. इथून पुढे अशा पोस्ट्स फाट्यावर मारण्यात येतील.

गण्या,
आमचं आयडीशी वैर नाही, खटकणा-या पोष्टींशी आहे.
>
हे सांगावे लागते ? Happy

असो, वरील प्रतिसादांचा सर्वसाधारण रोख एकच आहे त्याला प्रामाणिक उत्तर देतो. हरलो किंवा चुकलो बोलण्यात कसलाही कमीपणा नसतो हि आज्जीची शिकवण. पण तुर्तास ऑफिसकामात बिजी. सहकार्य अपेक्षित Happy

शेवटी गाडी तिथेच आहे जिथे सुरुवातीला होती.... माझंच खरं हे आधी ही ऐकलं आणि आताही तेच...मतदानाचा उपयोगच नाही थोडक्यात....
>>>>>>>> + १

Pages