श्री. एकविरा देवीची खोळ पडली.

Submitted by प्रभा on 13 September, 2014 - 13:36

आमच्या येथे म्हणजे अमरावतीला मध्यंतरी एक ऐतिहासिक घटना घडली.येथील अंबादेवी व एकवीरा देवी प्रसिद्धच आहेत. काही दिवसापुर्वी म्हणजे २७ ता. ला श्री. एकवीरा देवी मंदिरात जोरात आवाज झाला. काय झाले म्हणुन सगळे बघायला आलेत व देवी पडली म्हणुन ओरडु लागलेत.. गुरुजींना बोलावल. शास्त्री आलेत.. नीट पाहिल तेव्हा कळल कि देवीची खोळ पडली. . त्यातुन १६ चांदीचे डोळे निघालेत .म्हणजे ८ वेळा शेंदुराचा लेप दिला असावा असा सर्वांचा अंदाज. सध्या जे वयोव्रुद्ध आहेत त्या कुणालाच लेप दिल्याच माहिती नाही. आतमधे मात्र एकदम वेगळीच देवी आहे. काळ्या पाषाणाची. सहजासनात बसलेली, चतुर्भुज हातात त्रिशुल, गदा व तलवार आहे एक हात आशिवादाच्या स्थितीत आहे.. नविन, मुळरुपात नवरात्रा पुर्वी प्रगट्ली म्हणुन मंदिरात आनंदोत्सव साजरा झाला.. हा काय प्रकार आहे कळत नाही.. लेप का दिला असेल? माते तुझा महिमा अगाध. एवढच म्हणु शकतो

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येथेही या विषयातील तज्ञ लोक येताहेत. यावर [मुर्तीच रक्षण करण्याकरिता ] काय करता येइल ते ठरवतील. सोन्याचा मुखवटा आधीच्या देवीचाच आहे. त्याचा आकार बदलवतील. असे वाटते मंजू लोणार च्या मारोतीच दर्शन घडवल. छान वाटल.. हेही देवीच मंदिर बरच पुरातन आहे. बघु या काय होइल ते. . आपल्याला तर काहीच अधिकार नाही याबाबत ठरवण्याचा. नाही का/

अशीच सेम घटना कराड येथे कोटातल्या गणपती च्या देवळात घडली होती....
काही वर्षांपूर्वी अचानक वरचे शेंदुराचे आवरण निख्ळुन पडले आणि अतिशय सुरेख रेखिव अशी काळ्या दगडातली श्री गजाननाची मुर्ती प्रकटली.....:-)
मला वाटते पूर्वीच्या काळी काही कारणास्तव मुळ मुर्तीचे रक्षण करण्यासाठी मुर्तींना असा लेत देत असावेत.....जेणेकरुन कोणी मुर्तीची तोडफोड करु नये...

Pages