मुलाचा अभ्यास कसा घ्यावा

Submitted by राज1 on 24 July, 2014 - 04:05

माझा मुलगा 2ND STANDARD (७ वर्षे) आहे.
घरी अभ्यास घ्यायला लागल्या वर T.V. वर किंवा खेळण्यातील गाड्या खेळत बसतो. आमच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. तोंडी उत्तरे पटकन देतो. कधी मारल्यावर ५ किंवा १० मिनटे अभ्यास करतो. नेहमी मारून अभ्यास करून घेणे हि बरोबर नाही. शाळेतील HOME WORK हि नेहमी अपूर्ण आसतो.
त्याचे बोलणे हि थोडे बोबडे आहे. व तोंडात बोटे घालण्याची सवय आहे. या बद्दल कृपया सल्ला द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

sorry for typing in English. Not able to type in marathi.

My daughter is also in 2nd std. We had same story in our home, but few days back realized commanding doesn't work but positive speaking helps.

I told her, your teacher had called me, you do all your study fast in school that too with good hand writing, can you show me at home?

This and other so many examples by saying she can do it fast, we are not having problem in at-least completing homework.

भारतात तर मुलं डोक्यावर बसतील फाजील लाड केले तर असं सांगणारे अनेक जण असतात. ग्रामीण भागात जास्तच. >> याबद्दल संपर्कातून विचारणा झाली आहे. तिथे उत्तर देणं शक्य होतं, पण आणखी कुणाला शंका आहे असं कळालं म्हणून इथेच.

ही परिस्थिती नाकारता येईल का ? मारण्याबद्दल चर्चा चालू झाली म्हणून सांगितलं. हे समर्थन आहे असे अर्थ कसे काय काढले जातात ? अवघड आहे. मुळातच कुणी गैस करून घेतला तर तो दूर करण्याच्या भानगडीत पडू नये हेच खरं.

'अरेरे! सुट्टी का? मग तुझी मित्रमैत्रिणींना भेटायची मज्जा बुडाली गड्या!' असं का सांगत नाही? >>>>++१००%

वाद टाळून खरा उपाय सांगतो .

१)मोठे ताव फुल्सकैप कागद आणून ठेवा .
२)रोज एक कागद चार पाने एकेका विषयाचे धडयातून बघून लिहायला सांगा .अगदी गणिताचा धडासुध्दा .
३)परिणाम महिन्यातच दिसू लागतो .विषय त्याचे त्यालाच समजतात ,शुध्द लेखनामुळे परीक्षेत गुण वाढतात .
३)घरात शांतता राहते .
४)मुले टंगळमंगळ न करता पटकन लिहून खेळायला जातात .करून पाहा .

एस आर डी चा उपाय म्हणजे ब्रेड मिळत नसेल तर केक खा टाइप आहे.
अहो, मुलं शाळेतनं दिलेला पाच सहा पानांचा गृहपाठच लिहित नाहीत तर आणखी चार ताव भरून काय कप्पाळ लिहिणार?
Happy

अतिशय मुद्देसुद पोस्ट्स .. पटल्या नसल्यातरी अतिशय मुद्देसुद.....

नेमका ' अभ्यास घेणे ' याची व्याख्या कुणीतरी लिहली तर चर्चेसाठी एक परफे़ट स्वेअर तयार होइल असे वाटते. आणि त्या आधी 'अभ्यास' याची देखिल व्याख्या केली तर मग पिक्चर अजुन क्लिअर होइल.

मग नंतर अभ्यास का करायचा, त्याचे फायदे, न केल्याचे तोटे, करायलाच हवा का? नाहि केला तर चालणार नाही का? मग करायचाच तर कसा करायचा? तो मुलगा असा करतो, हा मुलगा असा करतो, मग माझ्या मुलाने कसा करायचा? त्याचे पालक असा अभ्यास घेतात, याचे पालक तर अभ्यासाबद्दल बोलतच नाहीत, मग मी काय करावे? कितवीत किती वेळ अभ्यास करायचा?

अभ्यास आणि मार्क्स याचा संबंध आहे का? काय आहे? इत्यादी इत्यादी प्रश्नांच्गी उत्तरे मिळायला सुरुवात होइल.

बाकि पोस्ट संध्याकाळी लिहतो.

साती गाडगीळान्चे अर्धे बरोबर आहे. मुल गृहपाठ करीत नाहीत, आणी लिहायचा पण कन्टाळा करतात म्हणून माझ्या मुलीच्या शाळेने कॉपी रायटिन्गची एक वही दिलीय. त्यात कुठल्याही विषयाचे एक पान कम्पलसरी लिहायला सान्गीतले. मुल करतात तो ही अभ्यास.

निपा पोस्ट आवडली.

१.माझ्यासाठी 'अभ्यास' म्हणजे सध्यातरी शाळेत शिकवल्या जाणार्या गोष्टींची उजळणी अधिक शाळेतून दिलेला गृहपाठ अशी वर्किंग डेफिनेशन आहे.
बाकी इतर शिक्षण, मूल्यशिक्षण, जनरल नॉलेज, खेळ, कराटे, व्यायाम सध्याच्या अभ्यासाच्या वर्किंग डेफिनेशनमध्ये येत नाहीत.

२. अभ्यास घेणे-याच वर्किंग डेफिनेशननुसार सध्या अभ्यास घेणे म्हणजे शाळेतून दिलेला गृहपाठ करवून घेणे आणि त्या त्या दिवशी शिकवलेल्या विषयाची उजळणी घेणे आहे.
तसेच परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षेला असलेल्या सगळ्या अभ्यासक्रमाची उजळणी अधिक एखादी मॉक टेस्ट.

आता पुढचे प्रश्नं विचारा.

आमच्याकडे गेल्यावर्षीपर्यंत सोप्पा अभ्यास असल्याने मुलांच्या आत्येने होमवर्क करून घ्यायचे आणि आम्ही गाणी गोष्टी सांगायच्या पाठ करून घ्यायच्या असे स्वरूप होते अभ्यासाचे.

यावर्षी अभ्यास कठिण झाल्याने आत्येने फक्त लिखाण स्वरूपाचा होमवर्क करवून घ्यायचा आणि आम्ही उजळणी आणि विषय समजवायचा अशी पद्ध्त ठरवून घेतली आहे.
आमच्या भागात शाळा या अगदी दिव्य असल्याने आणि सगळे नियम धाब्यावर बसवून इंग्रजी धड बोलताही न येणार्या शिक्षकांना इंग्रजी माध्यामाच्या शाळेत शिकवायला ठेवल्याने आम्हाला स्वतःला अभ्यास आणि इतर डेव्हलपमेंट या गोष्टीत लक्ष घालावे लागते.
ते इतके की आम्ही दोघांनीही या वर्षीपासून प्रॅक्टीसचे काही तास रद्दं करून मुलांजवळ संध्याकाळी एकतरी पालक असेल अशी तजवीज केली आहे.

मी सांगितलेला उपाय खरा आहे .अभ्यास कर म्हणजे नक्की काय करायचे हे मुलांना समजत नाही .परंतू भाषेंचा धडा बघून फक्त लिहायचा आहे हे बरोबर कळते .त्यातून समज वाढते .एक एक वाक्य पूर्ण वाचून लिहिले की स्मरणशक्ती वाढते .शुध्द लिहिले जाते .विरामचिन्हे वगैरेत सुधारणा होते ,हळूहळू खाडाखोड कमी होते .महिन्याभराचे लिखाण पाहून त्याचे त्यालाच फरक दिसतो .
गणिताचाही धडा दिलेल्या उदाहरणासकट लिहितांना त्याच्या आकलनाच्या गतीने पायरी पायरीने जातांना अपुर्णाँक ,टक्केवारी हे पक्के होते . ज्या मुलास 'वरचे पाहून खाली लिहायला' जमते त्याच्या अभ्यासात प्रगती नक्की होतेच आणि मुख्य म्हणजे महिन्याभरांत त्याचे वर्गातले लक्ष वाढते .परीक्षेत पेपर सुरेख दिसतो लिखाणाचा वेग वाढतो .
रोज एक कागद आणि एक विषय तारीख लिहून द्यावा .
मुबईत जन्मभूमि मार्ग ,सिध्दार्थ कॉलेज समोर एक किलो मोठे ताव सत्तर रुपयात मिळतात .

srd पटतंय हां.
त्या गल्लीत सगळी स्टेशनरीचीच दुकाने आहेत ना? त्याच गल्लीत एका अत्यंत जुनाट लाकडी जिने असलेल्या इमारतीत आमच्या इन्स्टिट्यूटच ICWA ऑफिस आहे.

माझी पाठान्तराची बोम्ब होती, त्यामुळे माझी आई मला कायम लिहायला सान्गायची. मी पाठ करत असलेले छोटे पॅरा मग कच्च्या वहीत वा पानान्वर लिहुन काढत होते. त्यामुळे उत्तर अन्धुकसे जरी आठवले तरी हात आपोआप चालत जायचा.:स्मित:( भुताटकी नव्हे, सवयीचा परीणाम.:फिदी:)

गणित सोडून इतर विषयांकरता एक पद्धत आहे. मागे केव्हातरी मटामध्ये एका लेखात वाचल्यापासून मला ती पद्धत भारी आवडते.

मुलांनाच धडा वाचून त्यातून जास्तीत जास्त प्रश्न काढायला सांगायचे. बस्स!

यामुळे अनेक फायदे होतात.

१. नेहमीसारखं उत्तरं न लिहिता फक्त प्रश्न काढायचे म्हणून मुलं आनंदतात.
२. प्रश्न काढण्याच्या निमित्ताने प्रत्येक परिच्छेद दोन्-तीन वेळा वाचून होतो.
३. प्रश्न काढतानाच याचं उत्तर काय असेल / काय असायला हवंय याची तयारी मनात होते.
४. जास्तीत जास्त प्रश्न काढण्याच्या निमित्ताने बारीक सारीक प्रश्नही लिहिले जातात.
५. लिखाण आपसूक होते.
६. पहिल्यांदा सरळसोट प्रश्न काढणारी मुलं मग हळूहळू आपोआप व्याप्ती वाढवून मोठे प्रश्न काढतात.
७. शिक्षक कसे विचार करत असतील याचे भान मुलांना येतं.

पालकांनी 'बसून' मुलाचा अभ्यास घेण्यास सुरुवात केली की तीच परावलंबीपणाची सवय मुलास लागते .

परदेशांत अथवा इथे केसि संस्थेच्या शाळा कॉलेजात मिळणारी शॉम (SHAUM SERIES) सिअरिजची पुस्तके ज्यानी पाहिली असतील ते सांगतील अभ्यासाची पुस्तके किती चांगली असू शकतात ते.

अहो गाडगीळ ती पुण्यात मिळु शकतील का? म्हणजे ती बाहेरच्याना उपलब्ध असतात का?

मामी बरोबर आहे तुमचे, म्हणजे तुम्ही वाचलेले. या वरुन मुलाना नाविन्यतेची गोडी लागु शकते.

मुळातच आधी दुसरीतला मुलगा किती वेळ अभ्यासासाठी म्हणून एका जागी स्थिर बसू शकतो? Happy त्यांचं वय हे एका जागी बसून लिहिण्याचं नाहीच. तोंडी उत्तरं, पाठांतरं हेच या वयासाठी योग्य. पण दुर्दैवाने आपली शिक्षणपद्धती त्यांना तसं करू देत नाही. पालकही हतबल असतात. गिव्हन दॅट, मग यातून मार्ग कसा काढायचा?

पहिलं म्हणजे, एम्पथाईज. मुलाला एका जागी तासभर अभ्यासासाठी बसणं शक्यच नाहीये हे आधी मान्य करा आणि मग तरीही त्याला बसावं लागत आहे हे त्याच्या जागी उभं राहून डोळ्यापुढे आणा. मग त्याची चालढकल, टीपी सगळं जस्टिफाईडच वाटतं.

मग एक पालक म्हणून त्यातून कसा मार्ग काढायचा? तर वय वर्ष दहापर्यंत तरी त्यांच्याबरोबर अभ्यासाला बसायचं. वेळेअभावी तेही शक्य नसेल, तर किमान सुपरव्हिजन तरी ठेवायची. आणि सगळा खेळ हा जास्तीतजास्त एका तासात संपवायचा. तासचे तास अभ्यासाला बसवायचं नाहीच.

दुसरं म्हणजे मुलं अभ्यासाला बसलेली असताना आपण टीव्ही बघणे, फोनवर गप्पा मारणे बंद करायचं. मुलांना ती अभ्यास करत असताना आपण टीपी केलेला अजिबात चालत नाही. मग तेही टीपी करतात! पण त्या ऐवजी आपण कामच करत असलो तर ते त्यांना चालतं Happy हे पथ्य अगदी अवश्य पाळा.

त्यांच्या अभ्यासात रस घ्या. अक्षरं काढायच्या, शब्द जुळवायच्या, गणिती करामती अशा युक्त्या त्यांना सांगा. त्यांनी केलेला अभ्यास तपासा. सुधारणा सांगा. त्यांचा अभ्यास त्यांनाच करूद्या. तुम्ही करू नका. पण लक्ष मात्र असूद्या.

दहा-बारा वर्ष वयानंतर मुलांना आपोआपच अभ्यासाचं गांभीर्य समजायला लागतं. खरंतर आपल्यालाही त्यांच्या अभ्यास आवाक्याबाहेरचा वाटायला लागतो Happy मग त्यांची ती नेतात पुढे नीट. तेव्हाही आपला आधार, सुपरव्हिजन हवीच. पण ती पुढची गोष्ट.

अजून तरी "अभ्यास" वेगळा घ्यावा लागत नाहीये आम्हाला.

शाळेतलं काम पूर्ण नसतं कधीकधी. ते मुलाला आधी पुर्ण करायला सांगतो. हिंदी किंवा इंग्रजीचे शब्द / अथवा प्रश्नोत्तरे असतात हे काम म्हणजे. दुसर्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना विचारून हे काम डिक्टेट करावं लागतं.

गृहपाठात लिखाण असेल तर मुलगा त्याचा तो पूर्ण करतो. त्याने बरोबर लिहिलंय की नाही. वेलांट्या-उकार बरोबर आहेत की नाही हे चेक करुन करेक्शन्स सांगितली जातात.

शाळेत युनीट टेस्ट किंवा डिक्टेशन असेल तर त्याआधी पोराला धडे, वह्या एकदा-दोनदा व्यवस्थित वाचायला सांगतो आणि नंतर मॉक टेस्ट घेतो. जे चुकतंय ते परत एकदा वाचून मग तोंडी विचारतो. शक्यतो चुका स्पेलींग्जमध्ये किंवा वेलांट्या उकारामध्येच होतात. मग ते बर्‍याच वेळा तोंडी पण जाता येता विचारतो, कोणताही शब्द देवून याचं स्पेलींग काय असेल किंवा यात "ई" आहे का "इ" असं विचारायचा खेळ जाता येता खेळत असतो.

गणितात पण असेच छोट्या छोट्या बेरजा -वजाबाक्या तोंडी विचारतो. Happy

( तटी : मुलगा सहा वर्षाचा आहे आणी अजून पहिलीतच आहे.)

फर्ग्युसनच्या लायब्ररीत पाहा .कॉलेजची असली तरी थोडी झलक पाहता येईल .आपल्या रेल्वे टाईमटेबलसारखी जाड आणि जड असतात शॉमची पुस्तके .गणिताची तर खासच .

मस्त उत्तरे Srd, मामी, पौर्णिमा.
फक्त मुलाला एक तास 'बसावं' लागणार आहे हे त्याच्या 'जागी' 'उभं' राहुन कसं डोळ्यापुढे आणायचं? Proud

रेल्वे टाइमटेबल बघितलेली किती मंडळी आहेत? हात वर करा. Wink

पुन्हा पुन्हा लिहून(आधी कॉपी करून, मग न बघता) उत्तरे डोक्यात फिट करणारी (नववी-दहावीतली)मुले पाहिलीत. मला आधी वेडेपणा वाटायचा. हे वाचून कळलं की हीही एक पद्धत असू शकते.

मामी, कल्पना आवडली.

पुन्हा पुन्हा लिहून(आधी कॉपी करून, मग न बघता) उत्तरे डोक्यात फिट करणारी >>> या उपायाने नुसतीच उत्तरे डोक्यात फिट होतील ना.. प्रश्नाचे स्वरुप बदलले तर त्याचे उत्तर मुलांना मिळणार नाही.

हो. पण मला आता त्यांच्या सवयी मोडून नव्या सवयी लावणं जड जातंय.
साधे गुणाकार आणि हातच्याच्या वजाबाक्या करण्याच्या||(लिहिण्या/मांडण्याच्या) पद्धतीही बदलल्यात आणि त्यांच्या मला आणि माझ्या त्यांना झेपणं सोपं नाही.

राजेन्द्र यांचे आभार मानायचे राहीले हा धागा सुरू करण्याबद्दल.
"प्रश्न विचारणे" हे निमित्त झाले पण महत्वाचं खूप काही वाचायला मिळतंय.

सातीजी धन्यवाद, जर अभ्यास करणे म्हणजे उजळणी असेल (बाकि कुणी व्याख्या लिहलेली नाही म्हणुन तुमचा रेफरन्स घेतला आहे) , तर त्यासाठी मारुन मुटकुन बसवणे (तुमच्या बाबतीत नव्हे), तो अभ्यास करत नाही म्हणणे हे कितपत योग्य ठरते.

अभ्यास कर म्हणजे नक्की काय करायचे हे मुलांना समजत नाही>>>> पालकांना तरी ते नेमके समजलेले असते का? मला वाटतय कि मुलांनी सर्वात जास्त ऐकलेले वाक्य यावर सर्वे करायचा झाला तर ते असेल " अभ्यास कर" आणि दुसर्‍यांना सांगताना " आमचा मुलगा / गी अजिबात अभ्यास करत नाही '

पालकांनी 'बसून' मुलाचा अभ्यास घेण्यास सुरुवात केली की तीच परावलंबीपणाची सवय मुलास लागते .>>> यास प्रचंड अनुमोदन. एस आर डी या वाक्यासाठी धन्यवाद. मला इथुनच सुरवात करायची होती. आमच्या भागात बघितलेला एक पॅटर्न इथे लिहतो. यामध्ये अपवाद म्हणुन पण बरेच असतील. तर ज्यांचे आई-वडील किंवा दोघे (गेलाबाजार व्हेरी क्लोज रिलेटीव्ह जे मुलांचा घरी अभ्यास घेतात) प्राथमिक शिक्षक आहेत ती मुले चौथी स्कॉलर्शिप / सातवी स्कॉलरशिप मध्ये चमकतात. आठवी पासुन शैक्षणिक प्रगती मंदावते बारावी पर्यंत यथा तथा होते कसेबसे कॉलेज शिक्षण होते......
तर ज्यांचे आई-वडील किंवा दोघे माध्यमिक शाळात आहेत त्या मुलांची अशीच अवस्था १२ वी नंतर होते.

याला बरेच अपवाद (माझ्यासारखे Wink ) असतील तो वादाचा मुद्दा असु शकेल, पण आमच्या भागात ही उदाहरणे मी प्रचंड संख्येने बघितली आहेत. आणि याचे कारण म्हणजे मुलाचे झालेले परावलंबित्व. याबाबतीत मी एक उदाहरण नेहमी देत असतो.

लहान मुलांना दात यायच्या अगोदर आपण त्यांना लापशी करुन देतो, नंतर थोडे थोडे दात आल्यानंतर चपाती मिक्सरमधुन बारीक / मऊ करुन देतो. थोडे अजुन मोठे झाल्यावर त्याला आपल्या ताटातले त्याला आवडेल ते खाउ देतो. मग त्याला चपाती चा घास करुन देतो, हळु हळु चपाती चा घास त्याचे त्याला करुन चाउन चाउन खायला शिकवतो. असे करत करत शेवटी तो आपले आपले वाढुन ( जर वाढणार्‍याची उपलब्धता नसेल तर) जेवायला शिकतो. नंतर तर शिजवुन घेउन जेवण करु शकतो. मग नेमकि हिच गोष्ट बरेच्जण अभ्यासाबाबतीत करत नाही. बरेच जण ७ वी पर्यंत त्याला मिक्सरमधुन चपाती बारीक करुन देतात, मग ८वीत एकदम चपातीचा घास घशात अडकतो. ज्यांना १० वी पर्यंत मिक्सर मधुन मिळते त्यांचा घास ११वीत आणि ज्यांना १२ वी पर्यंत मिक्सर मधुन मिळते त्यांचा घास फर्स्ट इअरला अडकतो. (यात मला या सरांनी शिकवलेले लगेच समजते, पण त्यांचे काहि कळत नाही हा प्रकार पण येतो)

यात लगेच अ‍ॅडॅप्ट होणारे देखिल बरेच असतात, पण जे अ‍ॅडॅप्ट होत नाहीत त्यांची खुप ससेहोलपट होते. त्यांचे पालक पण त्रस्त होतात.

म्हणुन अभ्यासाबाबतीत मुले जेवढी लवकर स्वयंपुर्ण होतील, तेवढे चांगले असे माझे मत 'बनले' आहे. वर लिहलेले मिक्सर मधुन काढलेले म्हणजे , हा प्रश्न त्याचे हे उत्तर , असा प्रश्न आला तर त्याचे उतर असे लिहायचे मग इतके मार्क्स मिळतात, यात हे चुकले तर त्याचे इतके मार्क्स कमी होतात, हा प्रकार. मग यात दोन प्रकार येतात. पाठ करणे / लक्षात ठेवणे / रट्टा मारणे इत्यादी. आणि समजुन घेणे. यातील दुसरा मार्ग काटा कुट्यातुन जातो. शिकणार्‍याच्या आणि शिकवणार्‍याच्या दोघांच्याही दृष्टीने. म्हणुन बहुसंख्य लोकांकडुन पहिला मार्ग अवलंबिला जातो. मग अभ्यास म्हणजे 'प्रश्नोतरे' इतकेच शिल्लक राहते.

पालकांनी 'बसून' मुलाचा अभ्यास घेण्यास सुरुवात केली की तीच परावलंबीपणाची सवय मुलास लागते .>>>>एकदम मान्य! पण मूल काहीच करत नसेल तर पालकांनी काय करायचे? मारणं नको,पाळणाघरात मूल रहाते,(आई नोकरीला असते त्याचा विनाकारण गिल्ट असतो) मग जरा लवकरअभ्यासातून मोकळे व्हावे म्हणून
मीही,मुलाच्या बाजूला बसून अभ्यास घेतला आहे.त्याचा परिणाम म्हणून तिसरी-चवथीपासून ,मुलांना ट्यूशनला
पाठवा असेच सांगते.

मला वाटते, मुलांना पालकांबरोबर वेळ आणि अटेन्शन हवे असते. अभ्यास हा इशू न करता टुगेदर टाईम हा महत्त्वाचा आहे हे मुलांस सांगून/ त्याप्रमाणे वागून पालक त्यांचा विश्वास संपादन करू शकतात. मी तुझ्या बरोबर आहे. अभ्यास ही तुझी जबाबदारी आहे ती तुला पार पाडायला हवी पण काही अड्चण आलीच तर मला विचार.
असे मुलास सांगितले पाहिजे. स्ट्रेस किंवा इतर कारणांनी पालक त्रासलेले असल्यास त्यांची सहनशक्ती कमी होते व मुलावर राग निघतो. तसे न व्हावे. ही काहीतरी मजेची आईबाबांबरोबर करायची अ‍ॅक्टिव्हीटी आहे असे स्वरूप दिल्यास चट काम होएल.

देवकी ,"मूल अगदी काहीच करत नसेल तर---" विचार करायला लावणारा प्रश्न आहे .राजेंद्रचाही प्रश्न हाच आहे .मुलास "बघु तुला असच्या असं पुस्तकातून लिहिता येतं का "अशी सुरुवात करून त्याला उद्युक्त करता येईल .करून पाहा .येथे मुलास हे सोपे वाटते कारण बुध्दीचा वापर करायचा नाहीय .गृहपाठ करतांना त्याला न येणारी गणिते सोडवायची असतात ,न येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात त्यामुळे ते मूल अशा 'अभ्यासा'ची टाळाटाळ करते .

मुलाचे शाळेच्या विषयांचे आकलन ,लक्ष ,समज आणि शेवटी माझे मलाच जमतंय या गोष्टीचा आत्मविश्वास वाढण्यास लेखन पध्दती उपयुक्त ठरते .

[मी माझ्या मुलीसाठी रोज एका विषयाचे चार पाने लेखन आणि पाच गणिते (पुस्तकातली सोडवून दाखवलेलीच प्रश्नासह)करायचे काम दिलेले होते .आठवी पासून आणखी चार पाने 'नवनीत'मधली त्याच विषयाची प्रश्नोत्तरे वाढवली होती .प्रश्नासह उत्तर लिहिणे खूप महत्त्वाचे आहे .नुसती उत्तरे नको .बीकॉमपर्यँत कोणत्याही क्लासला गेली नाही .]
बघा जमतंय का .

निवांत पाटील, तुमच्या या अशा विषयांवरच्या पोस्ट्स अगदी उत्तम असतात. पर्फेक्ट उदाहरण दिलेत.
चर्चा उत्तम आहे. इन्पुट देण्यासारखे काही नाही त्यामुळे वाचनमात्र.

Pages