सध्या मी US किंवा UK मध्ये नोकरी करण्याविषयी विचार करत आहे . Google वर search करून बऱ्यापैकी माहिती मिळाली . काही consultancy ला mail सुद्धा केला. पण तरीही अजून विचार करत आहे कारण निर्णय य्खुप मोठा आहे. इथे एवढ्यासाठी लिहितोय कि जेणेकरून तुम्ही तुमचे अनुभव सल्ले देवू शकता. मला काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे मिळाली तर निर्णय घ्यायला खूप मदत होईल.
प्रश्न :
१. साधारण सुरुवातीला किती खर्च येईल (VISA सकट)? म्हणजे मला किती hard cash बरोबर ठेवावी लागेल?
२. कमीतकमी किती पगार मिळाला तर फायद्याचं राहील US आणि UK दोन्ही देशात?
३. कोणत्या कोणत्या अडचणी येवू शकतात?
४. बायकोला लगेच न्यावे का नंतर स्थिर झाल्यावर?
५. चांगली consultancy कोणती आहे?
६. साधारण प्रोसेस ला किती दिवस जातात?
७. सुरक्षितते बाबत काही काळजी करण्यासारखे आहे का?
Note:
मी Mechanical Engineer आहे आणि सध्या एका MNC मध्ये काम करतो. विवाहित आहे पण मुल नाही.
अजून काही सल्ले असतील ते ते पण द्या खूप मदत होइल.
चेतन.. तूम्हाला एखाद्या जॉबची
चेतन.. तूम्हाला एखाद्या जॉबची ऑफर आलीय का ? ती आली कि मग इथे चौकशी करा. हे दोन्ही देश फार मोठे आहेत त्यामूळे असे इन जनरल सांगणे इथल्या सभासदांना अवघड आहे.
सध्या मी US किंवा UK मध्ये
सध्या मी US किंवा UK मध्ये नोकरी करण्याविषयी विचार करत आहे .
अरेरे, वाईट वाटले वाचून. अश्या सुशिक्षित तरुणांनी खरे तर एम एन सी ऐवजी भारतीय कंपनीतच काम करून भारत देशाची प्रगति होण्यास मदत करावी, असे मला वाटते. असे भारतात देखील बर्याच जणांना वाटते.
आता अनुभव मिळवून त्याचा भारताला फायदा करून द्यायचा या उद्देशाने येत असाल तर विचार स्तुत्य आहे. दुर्दैवाने साधे वेळेवर येणे, वेळच्या वेळी कामे करणे, व इतर शिस्त पाळणे इ. अत्यंत मूलभूत बाबतीतच भारतीयांची बोंब आहे असे बर्याच जणांकडून ऐकले. ते सुधारले तर इतर देशांकडे पहायची काही गरज नाही. केवळ याच गोष्टींवर भर देऊन इथले लोक कॉलेजातली डिग्री, एम बी ए इ. काही नसूनहि अत्यंत यशस्वी झाले आहेत.
बाकी नोकरी करता येईल अश्या प्रकारचा व्हिसा असल्याखेरीज इथून नोकरीची ऑफर येणे कठीण.
एक मार्ग आहे - कुणी श्रीमंत नातेवाईक तुम्हाला सहा महिने इथे ठेवून घ्यायला नि व्हिसा मिळवायला मदत करणार असेल तर टुरिस्ट व्हिसा घेऊन निघूनच या.
नि इथे येऊन एकदा अर्ज केलात की कदाचित सहा महिन्यांहून जास्तहि राहू शकाल.
पण इथेहि नोकरी मिळायला कुणाची तरी ओळख लागते. किंवा इथल्या कॉलेजात शिक्षण घ्यावे लागते. ओळख काढणे तसे सोपे आहे.
चेतन, ब्रिटन चे माहीत नाही पण
चेतन, ब्रिटन चे माहीत नाही पण अमेरिकेत तरी नोकरी करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीने थेट स्वतः व्हिसासाठी अॅप्लाय केल्याचे मी ऐकले नाही. काही कॅटेगरी असूही शकेल तशी, पण सहसा नाही. अमेरिकेतील एखाद्या कंपनीने परदेशी व्यक्तीला नोकरी देण्यासाठी व्हिसाचा अर्ज करावा लागतो. त्यामुळे ही संधी मिळण्यासाठी काय करावे लागेल हे आधी पाहा. ते झाले तर बाकी प्रश्न तुलनेने सोपे आहेत. कोणी पैसे घेऊन व्हिसा करून देतो वगैरे म्हंटले तर मात्र जपून, कारण त्यात फसवले जाण्याचीच शक्यता आहे.
एक मार्ग हा आहे की अमेरिकेत इमिग्रेशन लॉयर्स असतात त्यांना मेल वा फोन करून काय पर्याय आहेत ते पाहा. इमिग्रेशन फोरम्स आहेत, खालच्या लिन्कसारखे (इतरही आहेत). तेथेही माहिती मिळेल.
http://www.immihelp.com/forum/