गुरु राश्यांतर

Submitted by बन्या on 19 June, 2014 - 05:06

आजपासून गुरु कर्केत येणार आहे,... त्याचे कर्क धरून इतर राशींवर काय बदल होणारेत, त्याबद्दल कोणी माहितीत देऊ शकेल काय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेश:'११ वा गुरू किती काळ आहे कन्येला ? १२ वा केव्हा सुरू होईल ? तसेच १२ वा गुरू म्हणजे चांगला नसतो का ?
महेश: "ओ, आमच्या २ प्रश्नांची उत्तर द्या की कोणीतरी !"

महेशभाऊ, गुरु महाराज 18-Jun-2014 22:15:24 (भारतीय प्रमाण वेळ, कृष्णमुर्ती अयनांश 23:58:09 , स्विस इफेमेरिज,केपी स्टारवन सॉफ्ट्वेअर - वर्शन 6.7.20) कर्केत दाखल झाले आहेत, ते 13-Jul-2015 19:26:12 (भारतीय प्रमाण वेळ, कृष्णमुर्ती अयनांश 23:58:09 ,स्विस इफेमेरिज, केपी स्टारवन सॉफ्ट्वेअर - वर्शन 6.7.20) रोजी सिंहेत प्रवेश करतील.

असे " 11व्या गुरुची फळे काय आहेत' किंवा '१२ वा गुरू म्हणजे चांगला नसतो का' असे विचारणे म्हणजे डॉक्टर कडे न जाता कोपर्‍यावरच्या केमीस्टला विचारुन औषधे घेण्यातलाच प्रकार आहे.

अशा प्रश्नाची घाऊक (सब घोडे बारा टक्के) अशी उत्तरे मिळवून काही फायदा होणार नाही, कारण अशी घाऊक पद्धतीने सांगीतलेली फलें अर्थातच सर्वांनाच जशीच्या तशी अनुभवास येणार नाही. सध्या 'धोनी' फॉर्म मध्ये आलाय (उदाहरण म्हणुन) म्हणजे त्याच्या कडून चांगल्या परफॉरमन्स ची अपेक्षा ठेवण्यास जागा आहे पण याचा अर्थ भारत नजिकच्या कालातल्या सर्व मॅचेस जिंकेलच असे नाही, कारण त्याच वेळी महत्वाचे सर्व गोलंदाज जखमी/ आजारी असल्याने टीमच्या बाहेर असतिल तर? तेव्हा संपुर्ण टिमचा एकत्रित विचार करायला हवा.

असा बदललेला गुरु एखाद्याला चांगला पैसा मिळवून देईलही पण त्याच वेळी अती दगदगीने . परिश्रमाने, ताणतणावामुळे मोठा आजार निर्माण होऊन काही काळ मोठ्या दवाखान्यात अ‍ॅड्मीट व्हावे लागले किंवा लाचलुचपतीचे आरोप होऊन,पेपरात काहीबाही छापून आले,नाहक बदनामी झाली किंवा डीपार्ट्मेंटल इंक्वायरी सुरु झाली, बढती मिळाली घसघशीत पगारवाढ मिळाली पण त्यसाठी कोठेतरी लांब ,अत्यंत अडचणीच्या जागी बदली स्विकारावी लागली (तशातच मुलांचे 10-12 ची मह्त्वाची वर्षे चालू आहेत / बायकोचे कथ्थकचे क्लासेस जोरात चालू आहेत,ते बंद करुन ती बदलीच्या जागी यायला तयार नाही) तर अशा मिळालेल्या (गुरु ने दिलेल्या) पैशाचे काय सुख?

जन्मपत्रिकेचा सखोल अभ्यास करुनच त्याची काय फलें (रिझल्ट्स) आपल्याला मिळू शकतील,ती कशा प्द्ध्तीने मिळतील, काय पॅकेज डील असेल ते सांगता येईल, तेव्हा एखाद्या चांगल्या ,तज्ञ ज्योतिर्विदाला आपली जन्मपत्रिका दाखवून माहीती घ्यावी असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.

वा सुहास, मस्त प्रतिसाद,

बाकी माझी कर्क रास असुन मागिल काही काळातअचानक न टाळता येणारे खर्च अंगावर आलेत, नोकरीत complication होउन जायच्या मार्गावर आहे, त्यामुळे गुरुलाभ हकत तर नाहीचे, पण अजुन नुकसान मात्र व्हायला लागलेय

एसार्डी, रश्मी, नितिनचन्द्र, बरोबर.......
नितिनचन्द्र, गुरु दिव्याखाली अंधार या स्वरुपात स्वस्थानाची हानी करतो असे वचन आहे त्याबद्दल तुम्ही बोलताहात का?
सुहासजी..... तुम्ही म्हणता ते खर आहे, पण प्रवासाला निघालोत तर एस्टी बस मिळालिये की बैलगाडी की रेल्वे की विमान हे तर नक्कीच गुरुशनिवरुन ठरते, अन लोक रमतात विचार करत की आपल्याला खरच काय वाहन मिळालय...! नै का?
असो. वेळे अभावी तपशीलात लिहीता येत नाही Sad

मी एकदा असा विचार केला की केपी ,रविरास ,चंद्ररास ,लग्नरास ,अंशात्मक ,चलित इत्यादि वेगळ्या पध्दतीने ज्योतिष सूक्ष्म /सखोल सांगितले जाते मग मीपण माझी वेगळी पध्दत (ढोबळ)काढू नये ?

जसे हल्ली नवीन फोन बाजारात आला की त्यांचे परिक्षण करून त्याचे रेटिंग/त्याची उपयुक्तता अथवा चांगले वाईट पणा देतात .
मजबुती ५/१० ,
वापर ७/१० ,
कैमरा ३/१०

तसे जातकाच्या कुंडलीला गुण द्यायचे :
आरोग्य ८/१० ,
शिक्षण ३/१० ,
व्यवहारज्ञान ९/ १० ,
संततिसुख ४/ १०
वाहनसुख २/ १०
सांपत्तिक स्थिती ६/१०
इत्यादी .
गुणांकन दहा ,वीस ,तीस असे वर्षकालासाठीही देता येईल .
यातून काही सूज्ञ जातक आपल्याकडे कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत आणि कोणत्या नाहीत ते समजून जातील.तसेच ज्योतिष विरोधकांनाही पटेल .

बाकी तुमचा गुरू सध्या वामकुक्षी करतोय आणि शनिमहाराज तिजोरीच्या चाव्या आता देणार नाहीत किंवा मंगळाने डोळे वटारलेले आहेत हे काहीही जातकास सांगायचे नाही .

सुहास, धन्यवाद ! Happy
तुम्ही जे लिहिले आहे ते माहिती आहेच, पण मी जे विचारत होतो ते अगदी जनरल (ओवरव्ह्यू) प्रकारचे !

>>>>मी एकदा असा विचार केला की केपी ,रविरास ,चंद्ररास ,लग्नरास ,अंशात्मक ,चलित इत्यादि वेगळ्या पध्दतीने ज्योतिष सूक्ष्म /सखोल सांगितले जाते मग मीपण माझी वेगळी पध्दत (ढोबळ)काढू नये ? >>>>

srd : आणखी एक वेगळी पद्धती आणि ती सुद्धा ढोबळ बनणार असेल तर फारशी उपयोगी पडणार नाही
तुम्ही म्हणताहात त्याच थीम प्रमाणे रोजच्या रोजचे एव्हढेच नव्हे तर तासा तासाचे रिझल्ट टेबल च्या स्वरुपात किंवा र्ंगीबेरंगी ग्राफ च्या स्वरुपात क्षणार्धात उपलब्ध करुन द्यायचे खुप प्रयत्न आज पर्यंत अनेकदा झालेले आहेत आणि फसलेही आहेत, अशा धर्तीची काही सॉफ्टवेअर्स बाजारात उपलब्ध होती ती लौकरच धुळग्रस्त झाली आता त्यांची नावे ही कोणाला माहीत असतील का ही शंका आहे यावरुन या सॉफ्टवेअर्स चे कर्तृत्व अधोरेखित होते. (मला ही माहीती आहे कारण त्यातल्या एका सॉफ्टवेअर चा कोड रिव्हू मी डोमेन एक्सपर्ट या नात्याने केला होता.)

त्याहूनही तुम्हाला प्रयत्न करायचा असेलच तर 'ट्रानसीट्स च्या पलीकडे जावून प्रोग्रेशन्स , डायरेक्शन्स , रिटर्न स, तीही दोन्ही पद्ध्तीने डायरेक्ट / कॉनव्हर्स अशी विचारात घ्यायला लागतील , अचाट प्रमाणात डाटाबेस लागेल, AI Engine लागेल, फझी लॉजीक ' 'न्युरल नेट्वर्क' या तंत्रज्ञानाचा वापर करता आला तर काम काहीसे सुकर होइल ( हे तंत्रज्ञान काही प्रमाणात वापरले आहे )

शुभेच्छा!

धन्यवाद सुहासजी .जातकांस आपण कोणत्या आघाडीवर आयुष्यात कितपत यशस्वी होणार याची एक गोळाबेरीज गुणांकनातून द्यायची एवढाच हेतू आहे .

"काय हो तुम्हाला ज्योतिष येते तर माझी कुंडली बघून सांगा कशी काय आहे ." अशा प्रश्नाला मला असे गुणांकनांचे उत्तर देता आले तरी खूप झाले .

एखाद्याचा शिक्षणाचा योग चांगला असेल ,भराभर परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षण पदरात पाडेल तर ९/१० द्यायचे .

तासातासांचे अथवा वर्षाचे भाकित यात अपेक्षित नाही ।नोकरी करणाऱ्यांना दरवर्षीची बढतीची उत्सुकता असते ।त्यांना फक्त पैसे ,कष्ट याची एक गोळाबेरीज काढायची .

काही मोठे पदाधिकारी निवृत्तीच्या अगोदर (शनि वि० रविच्या वाईट योगाने ) काही वादात सापडतात ,पेँशन अडकते ,आरोप होतात अशांची अगोदरची कारकिर्द कितीही दैदिप्यमान असली तरी ६/१० गुणच द्यायचे .

>>>> "काय हो तुम्हाला ज्योतिष येते तर माझी कुंडली बघून सांगा कशी काय आहे ." अशा प्रश्नाला मला असे गुणांकनांचे उत्तर देता आले तरी खूप झाले .<<<<

srd:

मी ज्योतिषशास्त्राचा नाही म्हणले तरी सुमारे २० वर्षे अभ्यास केला आहे, आणि त्याहूनही जास्त काळ मी 'कॉम्प्युटर सॉफ्ट्वेअर ' या क्षेत्राशी निगडित आहे, आपण म्हणता आहात त्या अंगाने काही सॉफ्ट्वेअर करता येईल का याचा बराच विचार मी एके काळी करत होतो, त्या दृष्टीने काही प्रयत्न केला होता, पण कालांतराने हे अशक्य आहे लक्षात आले. मी आधी म्हणालो तसे ईतरांनी केलेले याच धर्ती वरचे प्रयत्न ही अगदी जवळून बघितले आहेत (डोमेन एक्सपर्ट या नात्याने त्यांचे आख्खे सोर्स कोड माझ्या ताब्यात होते) त्यांनाही काही यश मिळालेले दिसले नाही.

मी १० वर्षा पुर्वी जेव्हा के.पी. शिकलो तेव्हा मला असे वाट्ले की कीती सोपे , सहज, सुट्सुटीत आहे हे सगळे, कोणताही फाफट्पसारा नाही, साधे सरळ सोपे तर्काला पट्णारे , गणिता सारखे नियम आहेत, ग्रहांचे / भावांचे कार्येश ठरवले , द्शा विदशा ची टेबल्स तयार झाली की धाड्धाड भविष्य कथन, हाय काय नाय काय, हे सर्व वापरुन सॉफ्ट्वेअर करता येईल असेही वाट्ले , तसा प्रयत्न ही केला गेला पण लौकरच माझा भ्रमनिरास झाला हे वेगळे सांगायला नको. तो का व कसा हे सांगत नाही, एखादा के.पी वाला / के.पी. वाली (इथे हैत असे आईकलय ) वक्री होऊन मला मारायला धावायचे !

५ वर्षा पुर्वी जेव्हा मी युरेनियन अस्ट्रोलॉजी / प्लॉनेटरी पिक्चर्स शिकलो तेव्हाही मला असेच उचंबळून आले होते पण मागच्या अनुभवातून बरेच काही शिकलो होतो त्यामुळे यावेळी काही सॉफ्ट्वेअर वगैरे बनवायच्या फंदात पडलो नाही.

हे सर्व तुम्हाला सांगण्याचा हेतू तुमच्या उत्साहावर पाणी ओतण्याचा किंवा तुमच्या क्षमते विषयी काही शंका उपस्थित करण्याचा नाही. फक्त मला आलेले अनुभव सांगतो आहे . मला जमले नाही याचा अर्थ दुसर्‍या कोणालाच जमणार नाही असे थोडेच आहे, कदाचित तुमच्या हाताला यश येइल.

सारांश रुपाने मला एव्हढेच सांगता येईल की: "साधे, सरळ, सोपे, सुट्सुटीट केले (आणी हेच कदाचित महाअवघड असू शकेल ! कोणी पहिली दुसरीच्या मुलाला बेरिज वजाबाकी शिकवायचा प्रयत्न केला असेल तर त्याला मी काय म्हणतो ते लक्षात येइल.) तर ते राशी भविष्याच्या पातळीवर येऊन बसते, जे किती हास्यास्पद ठरते हे मी सांगायला नको" आणि जास्त सखोल असे काही करायचे असेल तर कल्पनेच्या बाहेर जाऊन गुंतागुंतीचे बनत जाते.

सुहासजी तुम्ही एवढे प्रयत्न केलेत हे वाचून आनंद झाला .
अगोदर एक मुद्दा आला की आडात नाही तर -- ,मूळचा योगच चांगला नसेल तर गुरूमहाराज दंड घेऊन दरबारात बसल्यावर तरी काय होणार ? शिक्षणाच्या बाबतीत उदा० वेगवेगळ्या पध्दतीने बघून जर ३ /६/९ चे वेगवेगळे गुणांकन येत असेल आणि प्रत्यक्षात वेगळेच अनुभवास येत असेल तर सामान्य लोक शास्त्राबद्दल शंका घेणारच .माझ्या मते एकाने ३ सांगितले तर दुसऱ्याचे फार तर ४ चालेल .

गुरू राश्यांतर या मूळ धाग्याकडे वळून प्रत्येक राशिला (चंद्ररास धरू) आपण गुणांकन देऊन त्यांचे शंका निरसन करायला हवेच .कर्केला ८ ,कुंभेला ३ वगैरे .फार तर ते म्हटतील आठ बोललात आणि चार चे पण काम केले नाही गुरूने आमच्यासाठी . असो .
आमची दशमात सिंह त्यामुळे देवदर्शन ,तीर्थाटन चे काही योग येतात वाटते .

>>>गुरू राश्यांतर या मूळ धाग्याकडे वळून प्रत्येक राशिला (चंद्ररास धरू) आपण गुणांकन देऊन त्यांचे शंका निरसन करायला हवेच .कर्केला ८ ,कुंभेला ३ वगैरे .फार तर ते म्हटतील आठ बोललात आणि चार चे पण काम केले नाही गुरूने आमच्यासाठी . असो .>>>

srd: एव्हढेच पाहीजे ना मग सोप्पे आहे , अष्ट्क वर्ग वापरा ना , तिथे अशीच गुणांकनाची टेवले बनवता व त्याआधारे ग्रहांचे बलाबल ठरवून फ्लितें सांगतात. माझा या विषयाचा फारसा अभ्यास नाही पण या विषयावरची श्री विनय आदित्य यांची दोन चांगली पुस्तके आहेत त्यातले एक 'Dots Of Destini' व दुसरे Practical Ashtakvarga' तसेच Richard Houck यांचे Digital Astrology हे पण एक चांगले पुस्तक आहे. ; C.S. Patel यांचे Ashtakvarga हे पुस्तक आहे, त्याहून जुन्या काळातले श्री आचार्य मुकंद दैवज्ञ यांच्या 'अष्ट्कवर्ग महानिबंध' या मूळ संस्कृत ग्रंथाचे श्री सुरेशचंद्र मिश्र यांनी केलेले हिंदी भाषांतर उपलब्ध आहे.

ही सर्व पुस्तके माझ्या वैयक्तीक ग्रंथसंग्रहात आहेत , एकेकदा चाळली आहेत पण पुढे जाऊन त्यात काही करावेसे वाटले नाही आणि मी माझ्या प्रक्टीस मध्ये अष्ट्कवर्ग वापरत नाही , का ते विचारु नका , कारण परत इथे कोणी अष्ट्कवर्ग वाले काका किंवा ताई असल्या तर माझी पळता भुई थोडी व्हायची !

suhasg , विजय हजारी ह्यांची भाव नवमांश पद्धती बद्दल तुमचे काय मत आहे ? अर्थात त्या पद्धती मध्ये सुद्धा के पी नियम वापरले आहेत .

मला राजे ,काटवे ,देशिंगकर ,दिक्षित ,अलन लिओ यांची पुस्तके वाचायला फार आवडायची .आता ही आणखी नावे कळली .

अन्विता:

>>>विजय हजारी ह्यांची भाव नवमांश पद्धती बद्दल तुमचे काय मत आहे ? अर्थात त्या पद्धती मध्ये सुद्धा के पी नियम वापरले आहेत .<<<

मी त्यांचे एकच पुस्तक वाचले आहे ; 'गुरुकिल्ली' , त्यांनी काही नवा विचार मांडला आहे, पण श्री विजय हजारी यांच्या बद्दल पूर्ण आदर ठेवून मी लिहतो की अजून त्यांच्या पद्दतीवर बरेच संशोधन होणे बाकी आहे असे माझे मत आहे.

तुलनात्मक दृष्ट्या मला श्री एस पी खुल्लर यांची कस्पल इंटरलिंक पद्ध्ती उजवी वाटते, ते सब सब पातळीवर जाऊन विचार करतात ,पण त्यासाठी जन्मवेळ काही सेकंदाच्या घरात अचूक लागते जे शक्य होणार नाही. सबब ही पद्धत फक्त होरारी साठी वापरणे श्रेयस्कर कारण होरारी चार्ट ची वेळ आपण ठरवू ती असल्याने ती पाहीजे त्या अचूकतेने मिळू शकते. तरीही त्यांची 'कस्पल इंटरलिंक ' ही संकल्पना 'सब' पातळीवर सुद्धा यशस्वीपणे वापरता येते . प्रयत्न करुन बघा , चांगले रिझल्ट्स मिळतील.

मला मौज वाटते , के.पी. काय किंवा कस्पल इंटरलिंक काय, त्यांचा मूळ कर्ता / जनक कोण हे कायमच संशयाच्या फेर्‍यात सापडत आले आहे. के.पी. मधल्या सब ची मूळ कल्पना श्री गोपालकृष्ण 'मीना' यांची, त्यावर त्यांनी एक छोटेखानी पुस्तक ही लिहले होते (माझ्याकडे त्याची स्कान्ड कॉपी आहे) , पुढे कित्येक वर्षांनी हेच मूळ संशोधन श्री कृष्णमुर्ती नी के.पी. या नावाखाली प्रसारात आणले (अर्थात कृष्णमुर्ती नी त्यात बरीच भर घातली आहे , त्रृटी दूर केल्या आहेत, एक शिस्त आणली इ.) त्यावेळी श्री बी व्ही रमण यांनी श्री कृष्णमुर्ती यांना सब ची मूळ कल्पना श्री गोपालकृष्ण 'मीना' यांची आहे असे सांगून त्यांना त्याचे उचित श्रेय देण्याबद्द्ल सुचवले , श्री कृष्णमुर्ती यांनी ते मानले नाही. (श्री बी व्ही रमण यांच्या My Experiments in Astrology या आत्मचरित्रपर पुस्तकात हा किस्सा पूर्ण तपशिल वार लिहला आहे, जरुर वाचावा.) म्हणूनच की काय किंवा श्री कृष्णमुर्ती यांनी वैदिक व पाश्चात्य पद्ध्तीची जी मिसळ तयार केली ती श्री बी व्ही रमण यांना रुचली नाही म्हणून की काय, श्री बी व्ही रमण यांच्या म्यागेझिन मध्ये के.पी. बद्दल अक्षर ही कधी लिहले गेले नाही (के.पी. वरच्या टिकेच्या लेखांना मात्र आवर्जून प्रसिद्धी दिली जात होती) पण दोघांत भांडण नव्हते, उलट श्री बी व्ही रमण यांचे चिरंजीव जे डॉक्टर होते त्यांच्या दवाखान्याचे उद्घघाट्न श्री कृष्णमुर्ती यांच्या हस्ते मानाने करवले गेले होते.

कस्पल इंटरलिंक बद्दलचा किस्सा एकीव आहे , मला खात्री नाही पण बोलले जाते ते असे:

कस्पल इंटरलिंक चे मूळ जनक श्री के भास्करन , त्यांनी त्यावर तमीळ भाषेत पुस्तक लिहले, त्यांना ते इंग्रजीत आणायचे होते पण श्री के भास्करन यांना इंग्रजीचा गंधही नाही (आणि तो आजही नाही, आजही त्यांना फोन केला तर ते तुमच्याशी फक्त तमीळ मध्येच वार्तालाप करु शकतात, भाषेचा अभिमान म्हणून नाही तर ती त्यांना खरेच येत नाही) त्यांनी श्री एस पी खुल्लर यांना त्यासंदर्भात मदत करण्याची विनंती केली , श्री एस पी खुल्लर यांनी ती मान्य केली, पण अपेक्षा केल्याप्रमाणे श्री के भास्करन यांच्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद काही बाजारात आला नाही, श्री के भास्करन वाट बघत राहीले आणि दरम्यान च्या काळात कस्पल इंटरलिंक वर एक इंग्रजी पुस्तक जरुर बाजारात आले त्यावर लेखक व कस्पल इंटरलिंक पद्धतीचे जनक म्हणून श्री एस पी खुल्लर यांचे नाव झळकत होते ! श्री के भास्करन यांनी मग दुसर्‍या मार्गानी आपल्या पुस्तकांची इंग्रजी भाषांतरे प्रकाशित केली पण मुद्रण दोषांनी ओसंडून वाहणारी श्री के भास्करन यांची ही पुस्तके केव्हाच विस्मृतीच्या पडद्या आड गेली (अलिकडच्या काळात ती पुन्हा प्रकाशित झाली म्हणतात पण आता त्यांना हात लावायचे त्राण माझ्या अंगात उरले नाही !) इकडे श्री एस पी खुल्लर यांनी मात्र प्रतिष्ठीत प्रकाशक , सुबक मांडणी, उच्च दर्जाची, निर्मीती मूल्ये, सुंदर ओघवती भाषा , समर्पक उदाहरणे यांच्या जोरावर व काही बड्या फिरंगी ज्योतिर्विदांना हाताशी धरता आल्यामुळे (त्यातली एक फिरंगी व एक फिरंगीण माझे फेसबुक फ्रेंडस आहेत हा भाग वेगळा !) आणी इण्तरनेट वर चर्चा ग्रुप्स वर अत्यंत प्रभावी प्रचार करायला जमल्या मुळे ------ बरीच मजल मारली यात शंकाच नाही, त्याच बरोबर त्यांनी कस्पल इंटरलिंक पद्धती आवश्यक असणारे सॉफ्टवेअर बाजारात उपलब्ध होइल याची दक्षता पण घेतली . श्री के भास्करन आणी त्यांची के.बी, पद्धती अजून मदुराईतच रांगते आहे इकडे श्री एस पी खुल्लर मात्र इंटर न्याशनल सेलेब्रीटी !!!

असो फारच विषयांतर झाले !!!!

असा कोतेपणा का करतात मान्यवर (!) दोन कल्पनांचे खरे जनक कोण हे प्रकाशात आणलेत त्याबद्दल सुहासजी धन्यवाद.
प्रसिध्दी माध्यम हाताशी असणारे प्रकाशझोत आपल्याकडे फिरवून घेतात .ठिणगी महत्त्वाची .त्याला वारा घालून मोठी आग करणारा स्वत:कडे श्रेय घेऊ पाहतो .

srd:

देशिंगकर ! !!!!!!!! अगा गा गा हो कोणाची पुस्तकें वाचताय तुम्ही ! ह्या देशिंगकरांचे एकच पुस्तक माझ्या संग्रहात आहे 'नवग्रहाची फळे' चांगले जाडेजुडे पुस्तक वाजवी किंमत वाटले अल्प खर्चात बरेच काही वाचायला मिळेल पण कसले काय , पुस्तक वाचायला सुरवात केली अन हे सगळे कोठे तरी आधीच वाचलय असा 'देजा वु' व्हायला लागला. काही पृष्टे तसेच रेमटून वाचत गेलो आणि एकदम डोक्यात लख्ख प्रकाश पडला श्री व दा भट / श्री म दा भट ,! या देशिंगकरांनी कमालच केलीय , त्यांनी एखादी ओळ नाही , एखादा प्याराग्राफ नाही तर पानेच्या पाने जशीच्या तशी , स्वल्प विरामासहीत ,भटांच्या पुस्तकांतून उचलली आहेत !! एक नाही दोन नाही ४०० / ५०० पानाचे पुस्तक हे असे भरुन काढलय ! काय म्हणायचे याला?

आणी संपूर्ण पुस्तकात कोठेही श्री व दा भट / श्री म दा भट यांचा साधा उल्लेख सुद्धा नाही ! कदाचित नंतरच्या आवृत्त्यात असा उल्लेख केला असेल ही पण माझाकडे जी प्रत आहे त्यात मात्र असा कोणताही उल्लेख नाही.

एक मात्र आहे श्री व दा भट / श्री म दा भट यांच्या पुस्तकांबाहेर मात्र ते गेले नाहीत म्हणजे पुस्तकावर नाव देशिंगकरांचे मजकूर भटांनी लिहलेला, चला उद्या कदाचित भटांची पुस्तके आउट ऑफ प्रिंट झाली तरी देशिंगकर एडीशन आहे !!

दुसरी एक अशीच केस :

उच्च विद्याविभूषीत लेखक , फार मोठ्या आस्थापनांतून फार मोठी पदे सांभाळणारा, एक नाही दोन नाही चांगली एक ड्झन , हो तुम्ही बरोबर वाचले आहे एक डझन पुस्तके नावावर. प्रत्येक पुस्तक ३०० मोठ्या आकाराचा पानाच्या खाली नाही, प्रतिष्ठीत प्रकाशन , दर्जेदार निर्मितीमूल्ये, जाड कागद , मोहोरेदार सुबक छपाई, बहुतेक सर्वच पुस्तके हार्ड बाऊंड आणी अत्यंत वाजवी किंमत , इतकी कमी की शंका यावी एव्हढ्या कमी किंमतीत कसे परवडते हे सारे?

बेंगलोरला सपना मध्ये एक पुस्तक घेतले, प्रवासातच वाचायला घेतले , माझी एक सवय की अगदि प्रस्तावना सुद्धा मन लावून वाचायची , इथे प्रस्तावना वाचतानाच मला हे सगळे कोठे तरी आधीच वाचलय असा 'देजा वु' व्हायला लागला, पण लक्षात येत नव्हते कोठे वाचलेय , सारखे वाटत होते "कुछ तो गडबड है दया कुछ तो गडबड है , दरवाजा तोड दो" पण प्रवासात कोणता दरवाजा तोड्णार?

घरी आल्या आल्या आपला तो 'लख्ख प्रकाश ' डोक्यात पडलाच ! Robert Hand चे Transit वरचे पुस्तक , त्यातली Charles Jayne यांची गाजलेली प्रस्तावना! मस्त ना , कॉपी मारायची तर अशी , प्रस्तावना तरी आपली कशाला लिहायची ? म्याचींग व्हायला नको का , मग, हाणा प्रस्तावनेची सुद्धा कॉपी , हम सब चोर है , जय हो!! आणि हा लेखकु माझा फेसबुक फ्रेंड होता हे आता सांगायची सुद्धा लाज वाटते (अनफ्रेंड केलेय हो केव्हाच !)

आणि सांगू का असे किस्से ??? नको मला ब्यान करतील ईथून...

.

suhasg , इतक्या सविस्तरपणे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
खरेच मला पण हि सगळी माहिती नव्हती .
तुमचे वाचन खरेच अफाट आहे. खुल्लर पद्धती बद्दल काहीच माहित नाही मला पण जमल्यास नक्की वाचेन .

मलापण कल्पना नव्हती .इतकी उचलेगिरी आणि साधा उल्लेख नाही .कधी कुठून पुस्तक वाचायला मिळालं की वाचून काढायचं .काटवे यांचं राहु बद्दल एक खास पुस्तक होतं ते मिळालंच नाही .याबद्दल नवाथेंनाही कौतुक होतं असं ऐकलं होतं .व्यवसाय विचार कोणाचं होतं ते आठवत नाही पण छान होतं .अलन लिओचं काही पानं गेलेलं जुनाट रस्त्यावर मिळालेलं आहे .

बन्या:

आपली उत्सुकता मी समजू शकतो पण गुरु अमका म्हणून ही तमुक फळें अशी स्थूल मानाने सांगणे म्हणजे राशी भविष्याचेच आणखी एक भावंड असे माझे मत आहे. त्यामुळे संपूर्ण पत्रिका तपासल्या शिवाय काही बोलणे मला प्रशस्त वाटत नाही. माझ्या भटारखान्यात फुल्ल गुजराथी थाळी तयार आहे पण ओनियन उत्तप्पा सध्या नाही सर्व्ह करता येणार.

माबो वर (मिलिंद) एमएनसी १२३ ; म्हणून एक सभासद आहेत त्यांचा या विषयाचा जबरदस्त अभ्यास आहे , गेल्या चार पाच महिन्यात ते इथे आलेले आढळले नाहीत पण त्यांचा व्लॉग / वेबसाईट आहे तिथे त्यांनी काही लिहले आहे का ते तपासायला पाहीजे.

अन्विता यांनी ही नुकतेच या संदर्भात त्यांच्या ब्लाग वर एक चांगली पोष्ट लिहली आहे , मला वाटते त्याचा पुढचा भाग अजून प्रकाशित व्हायचा आहे. त्यांच्या ब्लॉग पोष्ट द्वारा ही आपल्या शंकेचे समाधान होऊ शकेल.

माझ्या भटारखान्यात फुल्ल गुजराथी थाळी तयार आहे पण ओनियन उत्तप्पा सध्या नाही सर्व्ह करता येणार. >> माफ करा पण हे म्हणजे तहानलेल्या माणसाने समुद्राकडे पाणी मागण्यासारख चालू आहे. देईन तर रत्ने देईन पण थोडे पाणी देऊन तहान भागवणार नाही.
इतर कुणाला काही ढोबळ कन्या राशीबद्दल सांगता येईल का?

पण वर जर सुहास, असे ढोबळमानाने काही सांगता येणार नाही, गुरू पहिल्या घरात आलाय पण तुमच्या कुंडलीत तो चुकीच्या ठिकाणी असेल तर तो पहिला गुरू तुमच्या शुन्य कामाचा असे लिहिताहेत तर मग आपण प्रतिक्षा करणे चुक आहे ना..

ते जे म्हणताहेत ते पटण्यासारखे आहे.

सिमन्तिनी:

चालायचच , त्याचे काय आहे , नो इनफरमेशन इज फार बेटर द्यान राँग इनफरमेश हे तत्व मी मानतो व पाळतो,

कन्यावाले नोकरीत असाल तर १५ ऑगस्ट पर्यँत चांगले बदल झाले तर होतील .त्यानंतर स्वस्थ बसा .इकडे दर महीन्याचे राशिभविष्य एक तारखेस पशुपति चांगले लिहितात .

पत्रीका न पहाता ढोबळ मानाने मिथुन राशीला आता गुरु दुसरा आहे. दुसरा गुरु सांपत्तीक स्थितीत सुधारणा देतो. रोख, दागिने, एफ डी स्वरुपातल्या संपत्तीत वाढ दर्शविते.

दुसरे स्थान कुटुंबस्थान आहे. गुरुचे कारकत्व वाढ करणे आहे त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या ( नातेवाईक ) संख्येत वाढ होणे अपेक्षीत आहे.

ही फळे जर आपली लग्न रास आणि चंद्र रास जर मिथुन असेल तर खात्रीने अनुभवाला येईल.

>>> दुसरे स्थान कुटुंबस्थान आहे. गुरुचे कारकत्व वाढ करणे आहे त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या ( नातेवाईक ) संख्येत वाढ होणे अपेक्षीत आहे.<<<

सासुबाई , मेव्हणा घरी येऊन तळ ठोकणार, तुमचे लांबचे , मानलेले आफ्रिकेतले काका रहायला येणार बघा आणि गावाकडच्या त्या गोदामावशी त्याही तुमच्याकडेच यायला निघाल्यात म्हणे !!

(हलकेच घ्या!)

गुरू एका राशीत किती काळ असतो?

सुहासजी, अहो नातेवाईकांच्या संख्येतली वाढ म्हणताहेत ते. घरातल्या नातेवाईकांच्या असं नाही. Happy unless गोदामावशी वगैरे फॅक्टर्स अचानक जन्माला तरी येणारेत किंवा 'क्या? आफ्रिकामें मेरा एक काका भी है?' अशी situation येणार आहे Proud

Happy गोदामावाशी दागिने द्यायला येईल म्हणजे सगळ खर होईल बघ!! श्रद्धा ठेव. (दिले तर मला पण एखाद कानातल इ किडूक-मिडूक दे. कन्या राशीला काही धड भविष्य नाहीये. Wink )

सिमन्तिनी Lol गोदामावशी दागिन्यांचा डबा घेऊन एल ए पर्यंत आलीच तर तुला किडूक-मिडूक नक्की देणार!

जाई, विनोद बाजूला ठेव. माझा उद्देश कुणाची मस्करीचा नाही. पण तुला उत्सुकता असेल तर तू-नळी वर एक नादिया शाह नावाची बाई आहे. बर सांगते. गेले १०-१२ महिने मी ऐकतीये.

सिमन्तिनी, मस्तय त्या नादिया बाईंचं analysis! एकदम फील गुड! धन्यवाद! पण ती चंद्र राशीप्रमाणे सांगते की सूर्यराशीप्रमाणे? मी दोन्ही ऐकलं आणि मला दोन्ही पटलं!

हो ग. "फील गुड" बरोबर वर्णन आहे. बहुतेक सूर्यरास असाव. मी सूर्यरास ऐकते आणि ते मला पटत. बाकी जाणकार लोक सांगतील. (नायतर तिलाच व्हिडियो खाली प्रश्न विचार.)
तुला दोन्ही राशी काय बाराही राशी पटल्या तरी ठीकच. फील गुड महत्त्वाच! Happy

सिमन्तिनी , थँक्स
एक उत्सुकता आहे . बाकी काही नाही ग
अस नुसत राशीवरून प्रत्येकाच सांगता येण शक्य नाही याची कल्पना आहे . नथिंग सीरियस Happy

ही फळे जर आपली लग्न रास आणि चंद्र रास जर मिथुन असेल तर खात्रीने अनुभवाला येईल>>>>>>>>.ह्ममम....... सेम पत्रिका असलेल्या व्यक्तीचे गुरूबद्ल झाल्यावर (जून एन्डला) लगेच लग्न ठरलेल मी बघितल......तोवर खूप अड्चणी येत होत्या

कन्या राशीला काही धड भविष्य नाहीये.>>सिंह राशीला तर सर्व पेपरवाले, मिडियावाले, फोरमवाले, तमाम भविष्यवेत्ते समद्यानी उद्धट, आगाऊ इ. सांगून मान खाली घालून रहावे, बोलू नये, असे सांगून पार वाळीतच टाकले आहे. मी ४३ वर्षात एकाही व्यक्तीकडुन सिंह राशीचे चांगले घडेल, अलाणा ग्रह वळला, बदलला, चालला, सर्व सिंह राशीकडे पाठच फिरवतात Sad

सिंह राशीला तर सर्व पेपरवाले, मिडियावाले, फोरमवाले, तमाम भविष्यवेत्ते समद्यानी उद्धट, आगाऊ इ. सांगून मान खाली घालून रहावे, बोलू नये, असे सांगून पार वाळीतच टाकले आहे.>>>>>>..माफ करा डीविनिता, पण अस एकूण निरीक्षण आहे की सिंह राशीवाल्याचे अहं खूप जबरदस्त असतात....बाकिच्या राशीशी तुलना करता आणि सिंह राशीवाले कुठ्ल्याही छोट्या गोष्टीने दुखावले जातात आणि लगेच बोलून समोरच्याला शत्रु बनवून बसतात....म्ह्णून बहुदा अस लिहित असावेत

Pages