गंगा शुद्धीकरण -एक शिवधनुष्य

Submitted by उडन खटोला on 8 June, 2014 - 21:18

पन्तप्रधान नरेंद्रजी मोदी यानी निवडणूक प्रचारादरम्याने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रत्यक्षात काम करण्यास सुरुवात करुन गंगा शुद्धीकरणाचे शिवधनुष्य उचलले आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनन्दन!

प्रधानमंत्री पदाच्या दुसर्या आठवड्यातच याबाबत ठोस पावले उचलण्यात आलेली असून त्यानुसार सुमारे २०० इज्रायली कम्पन्यानी या प्रकल्पात रस दाखवला आहे .

या महाकाय प्रकल्पातील मोठी आव्हाने-

१, गंगा किनार्यावर असणार्या प्रदूषणकारी प्रकल्पांचे विस्थापन

२, साबरमती प्रकल्पाच्या धर्तीवर गंगेचे दोन्ही काठ कॅनॉल प्रमाणे बांधून दोन्ही तीरावर मोठी गटारे बांधणे

३, धार्मिक व अन्य कारणामुळे होत असलेले प्रदूषण रोखणे , ज्यात मॄतदेह गंगेत फेकणे / गंगाकिनारी प्रेत जाळून राख नदीत फेकणे इत्यादी गोष्टी ना(श्रद्धा न दुखावता) पर्यायी व्यवस्था निर्माण करणे

४,वाराणसी व गंगा किनारी राहणार्या रहिवाश्यांचे प्रबोधन करून गंगा शुद्धीकरण व स्वच्छता नियमांचे महत्त्व पटवणे , ज्यायोगे भविष्यातही गंगा शुद्ध राहिल .(असे नको की वारेमाप पैसा खर्च करून सरकारने गंगा स्वच्छ आणि शुद्ध करायची आणि लोकानी पुन्हा ये रे माझ्या मागल्या करत पुन्हा अशुद्ध करायची )

५, वाराणसी ते कोलकाता एवढ्या प्रचण्ड अन्तराच्या भागावर ही योजना राबवणे व त्यासाठी आवश्यक त्या प्रचंड खर्चाची तरतूद करणे / कामाचा दर्जा उच्च राखणे

अशी अनेक आव्हाने आहेत . तरीही काल वर्तमान-पत्रात आलेल्या या बातमीने मन हरखून गेले -

http://timesofindia.indiatimes.com/india/A-waterway-from-Varanasi-to-Kol...

अशी कल्पना ज्याच्या डोक्यात आली त्या महापुरुषाच्या प्रतिभाशक्तीला लाख सलाम!

कोलकाता ते वाराणसी हा जलमार्ग टूरिस्ट क्रूझ साठी तसेच धार्मिक पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास ते एक अद्भुत आश्चर्य ठरेल यात संशय नाही!

तसेच यातून गंगा शुद्धीकरण प्रकल्पावर होत असलेला प्रचंड खर्च देखिल वसूल होईल अशीही शाश्वती वाटते!

आपणास काय वाटते?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या आधीही गंगा शुध्दीकरण प्रकल्प राबविण्यात येत होता व त्यावर हजारो कोटी रुपये खर्च झालेला आहे पण त्याचा म्हणावा तसा परिणाम झाला नाही. परंतु आता नरेंद्र मोदींनी ह्या कार्यात स्वतः लक्ष घातल्यामुळे अपेक्षित परिणाम दिसण्याची आशा आहे. त्याच्या कार्याला मनःपुर्वक शुभेच्छा.

माने म्हणताहेत तसे राजीव गांधींंच्या काळातही असे प्रयत्न झाले होते. त्या आधी गंगा कावेरी जोडण्याचा प्लान होता. तो जास्त महत्वाचा आहे.

<<हजारो कोटी रुपये खर्च झालेला आहे>> गंगा जळीमध्ये कुणी कुणी हात धुवून घेतले; किती पैसे गंगेला मिळाले; किती गंगेत वाहून गेले; किती गंगार्पण झाले वगैरे गोष्टी महत्वाच्या आहेत. Wink

गंगा शुद्धीकरणाचा प्रकल्प राजीव गांधींच्या काळात ८६ साली सुरु झाला होता. गंगा अ‍ॅक्शन प्लान. याची फेज १ संपली आहे आणि बहूतेक दुसरी फेज अजूनही चालू आहे (याबद्दल नक्की माहित नाही) यामध्ये फक्त गंगेचं सुशोभीकरण किंवा काही ठरावीक घाटांवर शुद्धता असं प्रकल्पाचं स्वरूप नसून, गंगेच्या काठावरच्या मध्यम व मोठ्या शहरांमध्ये हा प्रकल्प राबवला गेला. त्या शहरातल्या सांडपाण्याच्या व्यवस्थेत सुधारणा, कचर्‍याचं व्यवस्थापन, तिथल्या मनपा /नपा यांच सशक्तीकरण ज्यायोगे मनपा/नपा सांडपाणी शुद्धीकरण आणि कचरा व्यवस्थापन योग्य रितीने करु शकतिल असं काहीसं प्रकल्पाचं स्वरूप होतं.

मी या (गॅप) सारख्याच यमुना अ‍ॅक्शन प्लानवर २-३ वर्ष हरियाणामध्ये काम केलं आहे. त्यामूळे प्रकल्पाचं थोडं स्वरूप माहित आहे. नुसती वरवरची सफाई न करता कचरा /घाण होवू नये म्हणून तिथल्या अर्बन लोकल बॉडीजना फायनांशियली आणि टेक्निकली सशक्त बनवणं हा पण या प्रकल्पाचा एक भाग होता.

साबरमती रिव्हरफ्रंट डॅव्हलपमेंट प्रोजेक्टची तुलना गॅप किंवा यॅप शी करता येवू शकत नाही. यॅपमध्ये हरियाणा, युपी आणि दिल्ली ही तिन राज्य होती सेकंद फेजमध्ये इतकं आठवतंय. गॅपमध्ये बहूतेक युपी आणी एमपी ही राज्य होती. साबरमती नदीचा प्रकल्प फक्त अहमदाबादपुरताच मर्यादित होता. आणि सॅनिटेशन पेक्षा प्रकल्पाचा जास्त भर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट वर होता. (या प्रकल्पावरही विद्यार्थी दशेत काम केलं आहे. गांधी आश्रमाच्या मागच्या स्ट्रेचवर मी काम केलं होतं प्लानर म्हणून विद्यार्थी दशेत

अहमदाबादमध्ये साबरमती नदीमध्ये खूप चांगले बदल झालेत. नाल्यासारखी वाहणारी नदी आता देखणी झालीये ही फॅक्ट आहे. पण तरीही या प्रकल्पाची आणि गंगा अ‍ॅक्शन प्लानची तुलना करता येत नाही. दोन्ही प्रकल्प पुर्णपणे वेगळे आहेत.

अल्पना, सुंदर प्रतिसाद दिला आहे तुम्ही.
मला एकच शंका आहे की साबरमतीचं जे रूप अहमदाबादमध्ये दिसतंय ते सर्वत्र आहे का? कारण बरेच रिपोर्टस असं सांगत आहेत की साबरमती प्रचंड प्रमाणात प्रदूषित आहे. त्या पाण्याचं BOD (Biological oxygen demand) खूप जास्त आहे. अशा पाण्याने रोगराई पसरू शकते. विशेषतः पचनसंस्थेचे रोग आणि कर्करोग.
ह्याबद्दल काही माहिती असेल तर सांगाल का?

मी मोदी-विरोधी आहे. त्यामुळे मी त्यांच्या प्रत्येक दाव्याकडे जरा जास्त बारकाईने बघते हे मान्य. पण प्रसारमाध्यमांची सध्याची अवस्था बघितली तर सत्य बाहेर येणं अवघड होऊन बसलंय. नागरिकांनाच जास्त जागरूक व्हावं लागणार.
तटी- मी मोदी-विरोधी असले तरी काँग्रेस समर्थक नाही. दोन्ही पक्ष एकच आहेत हे निवडणूक आणि त्यानंतरच्या अनेक घटनांनी दाखवून दिलंय.

गेल्या दहा वर्षांमध्ये मी गुजरातमध्ये गेले नाहीये. त्यामूळे बाकी ठिकाणी साबरमतीचं स्वरूप कसं आहे याबद्दल खात्रीशीर काही सांगू शकत नाही.

एक प्रामाणिक शंका. बहुतांश प्रसारमाध्यमे ही मोदी विरोधक आहेत असे म्हटले जाते. मग खरे काय मानायचे?

एक प्रामाणिक शंका. बहुतांश प्रसारमाध्यमे ही मोदी विरोधक आहेत असे म्हटले जाते. मग खरे काय मानायचे?>> आधी होती. पण काँग्रेसचे एकेक घोटाळे बाहेर आले आणि जनता काँग्रेसला निवडून आणणं शक्य नाही हे जवळजवळ ठरूनच गेलं. मग अचानक जादूची कांडी फिरल्याप्रमाणे मिडिया मोदीसमर्थक झाली. नमो-नमो गुणगान सुरू झालं...परिणाम आपल्यासमोर आहे.
ह्या सगळ्याच्या मागे कोण आहे हे ओळखण्यासाठी कुठलंही बक्षिस नाही !

अल्पना आपला प्रतिसाद आवडला. गंगा शुध्दीकरण प्रकल्प हे सोप काम नाही आहे आणि त्यासाठी अजुन खुप काळ जावा लागणार असे दिसत आहे.

महत्वाचा विषय. शिवधनुष्य हाच योग्य शब्द अशा आव्हानांसाठी .अल्पना यांचा प्रतिसादही अभ्यासपूर्ण, अनुभवाधिष्ठित.
शेवटी नद्यांचे नाले करण्याचे महाप्रकल्प गावोगाव , शहरोशहरी राबवले जात आहेत वर्षानुवर्षे , त्या पार्श्वभूमी वर मोदींना शुभेच्छा .. व्यवस्था कार्यान्वित करण्यात त्यांना यश येवो !

मी मोदी-विरोधी आहे. त्यामुळे मी त्यांच्या प्रत्येक दाव्याकडे जरा जास्त बारकाईने बघते हे मान्य.
----- हे अचुक बरोबर आहे... बारकाईने बघणे चुक नाही आणि प्रत्येक दावा तपासायला हवा.

साबरमती कुठे वहाते आहे याबाबत येथे काही माहिती उपलब्द आहे,
http://www.cpcb.nic.in/water.php

साबरमती नदीचा प्रकल्प फक्त अहमदाबादपुरताच मर्यादित होता. आणि सॅनिटेशन पेक्षा प्रकल्पाचा जास्त भर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट वर होता.

अहमदाबादमध्ये साबरमती नदीमध्ये खूप चांगले बदल झालेत. नाल्यासारखी वाहणारी नदी आता देखणी झालीये ही फॅक्ट आहे.

>>> अल्पना तुझ्या वाक्यात विरोधाभास आहे. सॅनिटेशन नसेल तर नदीतले पाणी देखणे कसे होऊ शकते?

साबरमती अहमदाबाद मध्ये येऊन बाहेर वाटवा इंडस्ट्रीयल इस्टेस्ट मधून बाहेर पडते. वाटवामध्ये येईपर्यंत अपस्ट्रीम आहे. तिथे आधी प्रेतं, कचरा, अ‍ॅनिमल वेस्ट, निर्माल्य वगैरे इतर सर्व नद्यांसारखेच होत असे. ते आता पूर्ण बंद आहे. म्हणूनच ते पाणी क्लिन दिसतं अन्यथा ते क्लिन कसे दिसणार?

मी मागचे दोन आठवडे तिथे येणे जाणे करतोय मला शहरातून दिसणार्‍या नदीत फुलाची पाकळीही दिसली नाही ! मग शहरात स्वच्छ अन जिथून शहरात प्रवेश करते तेथे नाही असे पटत नाही.

सिटीतून बाहेर वाटवा इथे इडंस्ट्रीयल वेस्ट येऊन मिळते. (अजूनही) पण सरकारी नियमांनुसार आता सर्व इंडस्ट्रीजना वॉटर ट्रिटमेंट करणे आवश्यक आहे त्यामुळे आज जे पाणी सोडले जाते ते ट्रीट करून.

गंगेचा मोस्ट पोल्युटेड पार्ट हा वाराणसी आहे. आणि तेथील प्रदूषण हे इंडस्ट्रीयल कमी अन भाविकांचे (धर्मातील समजूतींनुसार) जास्त आहे.

वाराणसी मधील प्रदुषन कमी झाले तरी अर्धे प्रदूषन नाहीसे होईल ही फॅक्ट आहे. आणि करायचे असेल तर मूळ धार्मिक समजुतीवर / रुढींवर नियत्रंन बसवणे आवश्यक आहे. जर साबरमतीमध्ये (भले अहमदाबाद शहर, वादासाठी) हे होऊ शकते तर मोदी सरकार गंगेतपण हे करून दाखवतील. उलट ह्या सर्वात मोदी ह्यांची हिंदू विरोधी (धर्मविरोधी) छबी पण दोन एक वर्षात. तयार होईल कारण अस्थी विसर्जण, प्रेत सोडणे, निर्माल्य टाकणे हे आपण हिंदू लोक करतो. इतर करत नाहीत. मोदी ह्यातून तरले ( ह्या वादातून) तर ते लार्जर देन लाईफ होणार. आधीच्या सरकारांनी गंगचे प्रदुषण वाराणसी मधून ह्याच धार्मिक कारणामुळे थांबवले नाही.

जे शिवधनुष्य उचलणे रावणाला अशक्य आणि रामाला कठीण गेले त्याच्याशी सीता लहानपणी खेळत होती ना ?
---- खेळण्यासाठी खेळणे स्वत:ला उचलावे लागतेच असे नाही.... सहा राज-कर्मचार्‍याकडुन शिवधनुष्य इकडचे तिकडे हलवता येते.

आभार उदय Happy

धर्माचा पगडा जितक्या लवकर उतरेल तितका चांगला. वाहत्या पाण्याला दोष नाही हा सार्वत्रिक समज पण आपण त्यात किती घाण घालतोय याचा मात्र विचार नाही.
माझ्या आठवणीत गावाला नदीचे पाणी पिण्यासाठी वापरलेले बघितले आहे. परत ते दिवस कधी येतील ?

गंगेचा मोस्ट पोल्युटेड पार्ट हा वाराणसी आहे. आणि तेथील प्रदूषण हे इंडस्ट्रीयल कमी अन भाविकांचे (धर्मातील समजूतींनुसार) जास्त आहे >> केदार.. हिंदूस्तान टाइम्स मधे दिलेल्या आकडेवारीनुसार सगळ्यात जास्त प्रदूषण कानपूरमधे होतं. तिथल्या टॅनरीजचं पाणी गंगेत तसंच सोडलं जातं. चांगले ट्रीटमेंट प्लँट्स आणि या टॅनरीजचं रि-लोकेशन खूप गरजेचं आहे. अर्थात वाराणसीमधलं भाविकांनी केलेलं प्रदूषणपण रोखलंच पाहिजे आणि आताचं सरकार ते करू शकेल. मोदिंनी हे काम केलं तर त्याला धार्मिक रंग कोणी देणार नाही (होपफुली). दुसरं कुठलंही सरकार हे काम करायला गेलं तर भाजपामधूनच त्याला विरोध होइल हे मात्र नक्की Happy

तुम्ही लिहिलेली शेवटची ओळ वाचुन भाजपा हा लबाड आणि हलकट पक्ष आहे असा निश्कर्श काढता येतो.

Happy

केदार, त्या प्रकल्पामध्ये सॅनिटेशन हा भाग नाही असं मी म्हणत नाहीये. नदी मुळात स्वच्छ नाही झाली तर तिचं सुशोभीकरण काय डोंबल्याचं करणार. मी फक्त इतकंच म्हणतेय की साबरमती प्रोजेक्ट हा फक्त रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट होता आणि रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट करताना गरजेचं होतं म्हणून नदीचं पात्र स्वच्छ करणं /नदी प्रदुषित होवू नये याची काळजी घेणं ह्या बाबी केल्या गेल्या पण त्या फक्त अहमदाबाद शहरामध्येच.

साबरमती वाहत असलेल्या बाकी शहरांमध्ये या प्रकल्पाअंतर्गत तरी काही काम झालं नव्हतं हे नक्की. याशिवाय दुसरा एखादा प्रकल्प साबरमती संदर्भात राबवला गेला असल्याचं (माझ्यातरी) ऐकिवात नाहीये.

http://www.sabarmatiriverfront.com/37/vision इथे साबरमतीच्या प्रकल्पाची सगळी माहिती मिळेल.

(आता लिहिता लिहिता डोक्यात आलंय... कदाचीत साबरमतीच्या काठावर प्रदुषण करणारी खूप मोठी शहरं नसतिल दुसरी..अ‍ॅज कंपेअर टु अहमदाबाद. हे जरा बघावं लागेल)

पण गॅप किंवा यॅप जसे कॉम्प्रिहेंसिव्ह प्रोजेक्ट होते आणी अनेक शहरांमध्ये राबवले गेले तसं साबरमतीच्या बाबतित झालं नाहीये. म्हणून साबरमती प्रकल्पाप्रमाणे एखाद्याच शहरामध्ये गंगेसाठ प्रकल्प राबवून चालणार नाही. जो काही प्रकल्प सरकार राबवणार असेल तो जुन्या गॅप चेच एक्सेटेंशन असावे.

रैना, सात वर्ष झाली ग यमुना अ‍ॅक्शन प्लान वर काम करून. आता तर या फिल्डशी काहीच संबंध उरला नाहीये. त्यामूळे लेख काय लिहू.

Pages