रुद्राक्षी, अजानवृक्ष

Submitted by पुरंदरे शशांक on 12 May, 2014 - 07:05

काल सकाळी अचानक थोडे बाहेर जावे लागले. अंजूही बरोबर होती. सहाजिकच काही झाडे पहात चाललो होतो ...

कदंब आणि टेंभुर्णीची झाडे पाहिली - त्यांचे काही फोटोही काढले ....

मग एक वेगळेच झाड दिसले - अगदी बारीक पिवळी फुले लागलेली होती त्याला - त्याच्या फुलांचे, पानांचे फोटो काढेपर्यंत कॅमेर्‍यात "लो बॅटरी" सिग्नल यायला लागला - मग पुढे काही फोटो काढता आले नाहीत ......

तेवढ्यात एक " कीटक महाराज" दिसले ...... प्रेइंग मँटिसचा हा कात टाकल्यासारखा प्रकार काय आहे हे विचार करेपर्यंत अंजूने - "चल पहिले इथून"चा धोशा लावला ....
मी म्हणत होतो - अगं त्याची फक्त कात आहे ही ..... तरीपण तिला वाटत होते की न जाणो हा उडी मारुन आलाच आपल्या अंगावर तर काय घ्या .....

वाटेत एक छोटेसे पांढरे फुल पाहिल्याबरोबर अंजूला आठवले - अरे ही अजानवृक्षाची फुले .... कॅमेर्‍याच्या बॅटरीने संप पुकारलाय म्हटल्यावर (अंजू नको नको म्हणत असतानाही) एक बारीक फांदी तोडलीच मग मी .... म्हटलं जरा बॅटरी रीचार्ज झाल्यावर काढू काही फोटो ...
(बॅटरी रीचार्ज होईपर्यंत अजानवृक्षाची ती बारीक फांदी पाण्यात ठेवल्याने काही फोटो काढता आले... )

आज सकाळी सहज दिनेशदांनी रुद्राक्षी म्हणून जे नाव दिले ते गुगलून पहात होतो तो काय आश्चर्य - काल आम्ही जे पिवळ्या फुलांचे झाड पाहिले तेच होते ते नेमके .....

हे ते रुद्राक्षी म्हणजेच ( Guazuma ulmifolia )

r1.JPGr2.JPGr3.JPG

प्रेइंग मँटिसचा "सांगाडा" ??? नाही नाही - कात टाकलीये या महाशयांनी ....

pm.JPG

ही अजानवृक्षाची पाने, फुले, फळे ... ( Ehretia laevis )

el1.JPGel2.JPGel3.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो.
आणखी काहि झाडांचे नाव पत्ते द्यायचा विचार आहे !
अजानवृक्ष हे नाव घेतले कि माऊलीच आठवते. तिथला अजून दिमाखात ऊभा आहे, पण लोकं पाने तोडून नेतात म्हणून जाळी बसवलीय.
गोपिका तो सांगाडा नाही, कात आहे.

मस्त माहिती आणि फोटो. अ़जाणवृक्षाला फुले आणि फळे येत असतील असं वाट्लच नव्हतं. का कोण जाणे पण वाटत होत त्याला फक्त पानच असतील.

मस्त माहिती आणि फोटो.
अजानवृक्षाबद्दल माहित होते पण रूद्राक्षीची फुले पहिल्यांदाच पाहिली. Happy
Flowers of Pune पहायला एकदा पुण्यात यायलाच पाहिजे. Happy

Flowers of Pune पहायला एकदा पुण्यात यायलाच पाहिजे.>>>> जिप्सीभौ, "एकदा" येऊन कसे भागेल ??? जेव्हा जेव्हा त्या फुलांचा हंगाम (सिझन) असेल तेव्हा तेव्हाच ती फुले पहायला मिळणार ना ????
थोडक्यात वारंवार किंवा त्या त्या सिझनला यावे लागेल - ती ती फुले पहायला- हे सिझन्स शांकली किंवा डॉ साने मॅडम किंवा अजून कोणी तज्ज्ञ व्यक्तिच सांगू शकतील .... Happy

Happy Happy :जिप्सी, बहावा छानच...किती वेळा पाहिला तरी बघावासाच वाटतो....

शशांक जी, खुप सुंदर फोटोज.. अजानवृक्षाची फुलं तर अगदी चांदण्या सारखी भासतायत...आणि पाने
खुपशी मोगर्‍यासारखी दिसतायत.... तसेच रुद्राक्षी चे फळ म्हणजे रुद्रक्ष असते काय? खुप गोड आहेत फुलं.
प्रेइंग मँटिसचा हा कात टाकल्यासारखा प्रकार काय आहे हे विचार करेपर्यंत अंजूने - "चल पहिले इथून"चा धोशा लावला ....:) Happy :

सुंदर अनुभव....शशांक जी...

या निमित्ताने एका जुन्या चर्चेची आठवण झाली....जुन्या म्हणजे आंतरजालाच्या उगमापूर्वीची.....अजानवृक्षाचा आणि ज्ञानेश्वरमाऊलीचा संबंध आहे हे तर सत्यच, पण त्या वृक्षाला "अजान = अज्ञात" असे नाव का मिळाले असावे? चर्चा झडल्या बर्‍याच पण अगदी कोल्हापूरातील त्या काळातील दोन तीन प्रतिष्ठित अभ्यासू नावांपर्यंत ही चर्चा गेली असली तर अजानच्या उगमाविषयी ठोस उत्तर मिळाले नाहीच. अजान म्हणजे प्राचीन असा एक सोईस्कर अर्थ निघाला होता. तुम्हाला तसेच लेख वाचकांना कुठे संदर्भ आढळल्यास कृपया त्या संदर्भातील माहिती अथवा लिंक द्यावी.

आज या प्रकाशचित्रांच्या निमित्ताने ते सारे आठवले.

वा वा सुंदर. मलापण दोन्ही अपरिचित. नि ग वर रुद्राक्षीबद्दल नुकतंच दिनेशदानी लिहिले होते.

ग्रेट शशांकजी आणि शांकली.

अजानवृक्षाचा आणि ज्ञानेश्वरमाऊलीचा संबंध आहे हे तर सत्यच, पण त्या वृक्षाला "अजान = अज्ञात" असे नाव का मिळाले असावे? >>>> खरंच काय नक्की अर्थ आहे या "अजान" शब्दाचा ????
मलाही कायम "अजानवृक्ष म्हणजे माऊलींचे समाधीस्थळ" एवढेच जाणवत आलंय. आळंदी परिसरात खूप प्रमाणात अजानवृक्ष दिसतात एवढे मात्र खरे...... Happy

शशांक....

महाराष्ट्र राज्य विश्वकोशात "धंत्रग" किंवा "दंत्रग" वृक्ष म्हणजेच "अजान वृक्ष" असे म्हटल्याचे वाचले आहे. तिथे "अजानवृक्ष" असा उल्लेख नसून "अजान वृक्ष" अशी नामाची फोड आढळते.

श्रीक्षेत्र आळंदी येथे श्रीज्ञानेश्वरांच्या मंदिराच्या आवारात असलेल्या व पवित्र मानलेला ‘अजान वृक्ष’ हा वर वर्णन केलेला दत्रंग (धत्रंग) वृक्षच असावा. श्रीज्ञानेश्वरांच्या हातातील काठी याच वृक्ष्याची असून समाधीच्या वेळी ती त्यांनी बाजूस ठेवली व त्यापासून जवळच अजान वृक्ष पुढे वाढला, अशी आख्यायिका आहे.

[वरील जाड ठशीतील माहिती विश्वकोशात आहे]

अजान = अज्ञान असाही एक समज प्रचलित होता, त्यामुळे अजान वृक्षाखाली बसून ज्ञानसाधना केली तर अज्ञान दूर होते म्हणून त्या वृक्षाला अजान असे नाम प्राप्त झाले....असे मत वेळोवेळी व्यक्त केले गेले आहे.