अननोन चायना - भाग १

Submitted by वर्षू. on 23 April, 2014 - 04:25

अननोन चायना -भाग २- http://www.maayboli.com/node/48669

अननोन चायना - भाग ३ - http://www.maayboli.com/node/48684

अननोन चायना भाग ४ - http://www.maayboli.com/node/48706

चीन मधील तेरा वर्षांच्या वास्तव्यात आमचा कटाक्ष तेथील अश्या स्थळांना भेट द्यायचा असे , जिथे परदेशी

टूरिस्ट्स सहसा जात नाहीत. किंबहुना बहुतेकांना त्या स्थळांची माहिती ही नसते. अतिरिक्त गर्दी टाळण्याकरता

चीनी सरकार काही साईट्स ची इंटरनॅशनल स्तरावर जाहिरात करत नसावे. पण नेटवर या ठिकाणांची माहिती

उपलब्ध आहे.

या एप्रिल मधे आम्ही कामानिमित्त ,' क्वांग चौ' ला गेलो असताना नेट वर सछुवान प्रांतातील ,' चियुचायकोउ' चे

फोटो पाहिले आणी अक्षरशः प्रेमातच पडलो . या चायना भेटीत इथे भेट द्यायचीच हे ठरवून टाकले. त्याप्रमाणे

नेटवर चायनीज साईट वरून ग्रुप टूर बुक ही करून टाकला. (क्वांगचौ , साऊथ चायना तील क्वांगडाँग प्रॉविन्स

ची राजधानी असून , सछुवान प्रॉविंस , साऊथवेस्ट मधे लोकेटेड आहे.)

टूर ऑपरेटर ला मात्र कुणी फॉरिनर्स या ग्रुप मधे सामिल होणार या गोष्टीचं प्रचंड प्रेशर आल्यासारखं वाटलं.

तिने दहांदा फोन करून वॉर्न केलं कि जर तुम्हाला खरोखरच मँडरिन येत असेल तरच हा टिपिकली चायनीज

ओरिएंटेड ग्रुप टूर जॉईन करा. शेवटी ( उतणार नाही मातणार नाही, घेतला टूर सोडणार नाही.. असं मनात

म्हणत..) तिची खात्री पटवून दिली तेंव्हा कुठे ती शांत झाली.

ठरल्याप्रमाणे १३ एप्रिल ला क्वांग चौ हून सछुवान एअर लाईन्स च्या विमानाने तीन तासांचा प्रवास करून आम्ही

सछुवान ची राजधानी ,' छंग तू' च्या विमानतळावर उतरलो. इथे बहुतेक प्रत्येक प्रॉविंस ची स्वतः ची एअर लाईन

आहे ,याशिवाय केंव्हा केंव्हा तर एखाद्या शहरा ची आपलीच एअर लाईन दिसून येते. तेथील म्युनिसिपल कार्पोरेशन

स्वतःच्याच खर्चावर ही विमान सर्विस चालवतात. उदाहरणार्थ पुणे एअर लाईन किंवा महाराष्ट्र एअर वेज ,

असं नुस्तं इमॅजिन करून पाहा!!! Happy

चीन मधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांत , छंग तू चा नंबर चौथा लागतो. १४ मिलिअन लोकं इथे

आणी आसपास च्या भागात राहतात. हे जायंट पांडा चे माहेरघर आहे. तिबेट ला जायला छंग तू हे एकमात्र

प्रवेशद्वार आहे.

१३ तारखेला दुपारी पोचल्यामुळे, हॉटेल च्या आसपास फिरून घेतलं. जिथपर्यन्त नजर जाईल तिथपर्यन्त

सहा लेन्स चे रस्ते , मेन रस्त्या ला लागून १५ फूट रुंदीचा फुटपाथ, ज्याचा उपयोग फक्त आणी फक्त पादचारीच

करतात ( ऊप्स!! अविश्वसनीय सत्य !!!). रंगीबेरंगी फुलांनी सजलेले डिवायडर्स, चौक , रस्त्या च्या कडेने

शिस्तीत उभे असलेले डेरेदार वृक्ष दिसत राहतात.

जवळच एक वॉकिंग आणी शॉपिंग स्ट्रीट दिसली.. आधी लहानशी वाटलेली.. एक किलोमीटर चाललो तरी संपण्याची

काही चिन्हंच दिसत नव्हती. मग त्या स्ट्रीट ला अजून काही रस्ते इकडून तिकडून फुटू लागले.. येऊन मिळू लागले.

जागोजागी कचर्‍याचे व्यवस्थित झाकण असलेले डबे ठेवलेले असले आणी नागरिक त्यामधे कचरा

टाकण्याची नैतिक जबाबदारी घेत असले तरी एका हातात लांब दांडक्या चे खराटे वजा झाडू आणी दुसर्‍या हातात

कचरा उचलण्याकरता लांब हँडल चा ट्रे घेऊन सफाई कामगार सतत फिरत होते. याशिवाय त्यांच्या जवळ अजून एक

लांब दांडा होता ज्याच्या टोकाला चिमटा बसवलेला होता. त्याच्या सहाय्याने कागदाचे बोळे सदृष्य कचरा( असलाच

तर!!) सहजपणे उचलला जात होता.

सगळी कडे मोठाले शॉपिंग मॉल्स, फूड मॉल्स, शेकड्यांनी लोकं रमत गमत चालत होते, कुणी खरेदी करत होते

तर कुणी नुसतेच (आमच्यासारखे) भटकत होते. मग पाय दुखायला लागल्यावर मुकाट्याने हॉटेलकडे परतलो. नंतर

कळलंही या ८५ वय वर्षं असलेल्या स्ट्रीट ने जवळ जवळ २० हेक्टेअर ची जागा व्यापलेली आहे. Happy

दुसर्‍या दिवशी चिउचायकोउ ला जाणारे विमान सकाळी साडे सहा ला सुटणार होते. त्याकरता पहाटे चार वाजता

टूर ऑपरेटर कंपनी ची गाडी आम्हाला पिक करून एअरपोर्ट ला सोडणार होती.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षू, अप्रतिम आहेत गं फोटो! तेरा वर्षात चिनी भाषा शिकलात का नाही? चिनी भाषा खूप अवघड आहे असे माझा चीन दुतावासातील दिर सांगतो.

थँक्स ,पुण्याची विनिता, हो गं अवघड तर आहे..

मला मँडरिन खूप चांगलं येतं .. इथे स्पोकन मँडरिन चे वर्ग घ्यायची ऑफर आलीये Happy

सुंदर ! खरंच जावेसे वाटतेय.
वर्षू, शक्य असल्यास मँडरीन न येणार्‍यांसाठी एखादा टूअर ऑपरेटर पण सांग ना. ( तूच जर हा व्यवसाय सुरु करणार असशील तर प्रश्णच नाही Happy )

दिनेश मुश्किल है..

या ठिकाणी पुर्‍या तीन दिवसात आम्हाला वगळून एकच फॉरिनर दिसला ,त्याची बायको चायनीज होती..

भाषे व्यतिरिक्त जेवणा चे फार्र्र्र्र्र्र्च हाल आहेत.. इमॅजिन माझ्या जेवणाचेही हाल झाले.. वेजीस करता ही जागा वर्ज्यच

समज.. Proud

मी फळं खाऊन राहीन... असे पराक्रम मी केलेत पुर्वी.. आणि तसेही असे निसर्गसौंदर्य बघितल्यावर तहानभूकेची आठवण नाही होत.

वर्षूदी, मस्त फोटो सगळे. Happy

मेन पिक्चर अभी बाकी है दोस्त.. >>>>>>पिक्चर लवकर रिलीज करा. Proud जास्त वाट पहायला लावू नका. Happy

फळं.. हम्म.. दिनेश.. फळं मिळतील पण खूप काही पिकत नाही इकडे..

जिप्स्या.. नो इंतजार ..ऑलरेडी टाकला दुसरा भाग

वा! सुरेखच आहेत फोटो.

आलुबुखार (प्लम्स), तुती, आणि ती आंब्यासारखी दिसणारी कोणती फळे आहेत?....

शिवाय मोठी चीनी द्राक्षेही दिसत आहेत.

सुंदर !

हायला आमच्या मनपाला बस चालवता येत नाहीत. चायनामधली मनपा विमान कंपनी चालवतात ?

साहेबांच्या ( पवार ) कानावर जायला नको ! नाहीतर पुण्यात चालवतील पुणे ते बारामती विमान सेवा ( खर्च पुणे मनपा )

मस्त! सगळीच माहिती नवी.
शहराची स्वता:ची एअरलाइन.......मी केली कल्पना.....नगरी एअरलाइन्स!
फोटोही नेत्रसुखद!
खरं म्हण्जे कुणालाही वाटेल ...नेक्स्ट टूर इथेच करावी का ...पण जेवणाचे तुझेच हाल झाले मग आमचं काय खरं नाय!

नि३ Rofl

मानुषी.. नगरी एअरलाईन्स ची आयडिया चांगलीये .. औरंगाबाद हून बाय रोड येताना बरीच हाडे खिळखिळी झाली ती .. नगर क्रॉस करताना नक्कीच दोन चार निखळून पडली असतील Uhoh

मानुषी.. नगरी एअरलाईन्स ची आयडिया चांगलीये .. औरंगाबाद हून बाय रोड येताना बरीच हाडे खिळखिळी झाली ती .. नगर क्रॉस करताना नक्कीच दोन चार निखळून पडली असतील

Happy

मस्त फोटो.. अब जाती मै मेन पिक्चर देख्ने.

वर्षू मग आमच्या नगरी एअरलाइन्सच्या विमानथांब्यावर नक्कीच लक्षमण देशपांड्यांच्या "वर्हाड" मधलंच दृश्य दिसेल.
Proud

हा भाग आत्ता बघितला.

मस्तच. मला कोरियाची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. Happy

वेजीस करता ही जागा वर्ज्यच Sad निसर्गसौंदर्य कितीही छान असलं तरी फळाफुलांवर मी तरी नाही राहू शकत त्यामुळे फोटोच बघून घेते कसे.

ट्रेलर झक्कास! फोटो मस्तच आहेत वर्षुताई. Happy

हायला आमच्या मनपाला बस चालवता येत नाहीत. >>> नितिनचंद्र, भारीच अपेक्षा तुमच्या मनपाकडून. आधी त्या मनपाला स्वत:चा कारभार तरी चालवता येऊ द्यात. मग बस आणि मग पुढच्या सहस्त्रकात विमानं उडवूदेत.

आडो Lol

अगा घरून खाकरे, बिस्किटं, रेडीफूड ची पॅकेट्स आणायची ना.. हाकानाका.. हाँ ..पण तिथे गरम बिरम करून काही मिळणार नाही.. Sad

.. साधारण साऊथ ईस्ट एशिअन देशातील सिटीज ही अश्याच दिसतात.. आणी सोल, टोकियो सारख्या नॉर्थ मधील सिटीज ही
मानु.. विमानतळ पे एल के चं वर्‍हाड दृष्य ?? ओ एम जी... गुड इमॅजिनेशन Proud

अत्यंत बोलके फोटोज आणि रंजक माहिती.दिनेश यांची सूचना मनावर घे वर्षू Happy
चीनबद्दल खूप काही सांगू समजावू शकतेस तू, कृपया अधिक लिहीत जा..

वर्षूताई,

इथे महाराष्ट्रात तांबडकवडा एअरलाईन्स उघडायचं मनावर घ्याच म्हणतो मी! Wink

आणि ते छंगतू आहे होय! मी बापडा इंग्रजीतनं चेंगडू वाचत होतो. सीचुआनचं सछुवान होतं हेही नवीनच! शेजवान सॉस इथलाच का? तर छंग तू तिबेटाप्रमाणेच युनानचेही प्रवेशद्वार दिसते आहे (जय गुग्गुळाचार्य!). बरोबर बोललो का मी?

आ.न.,
-गा.पै.

यस्स बरोब्बर... यूनान चा यू म्हणताना तोंडाचा चंबू करून ईयुनान असा उच्चार करायचा..

युनान ला जायला बरेच रस्ते आहेत..

बाय द वे.. चायनीज इंग्लिश मधे बी चा उच्चार पी , डी चा उच्चार त..इ.इ. इ. असल्याने चेंगडू इज छंग तू.. Happy

चाखतच आलेय.. पण त्या सॉस चा आपल्याकडील शेझवान सॉस शी( नावात जर्रासे साम्य सोडल्यास )

काडीमात्र संबंध नाही!!! ना चवीत ना इन्ग्रेडिएंट्स मधे.. इट्स डिफरंट, यू नो!!!! Happy

अप्रतिम फोटो आणि वर्णन दोन्ही. शेअर केल्याबद्दल धन्यवाद कारण वेजीसाठी वर्ज्य असेल तर वर्षुताई तुमच्यामुळे फेरफटका झाला.

वर्षूताई,

>> पण त्या सॉस चा आपल्याकडील शेझवान सॉस शी( नावात जर्रासे साम्य सोडल्यास )
>> काडीमात्र संबंध नाही!!! ना चवीत ना इन्ग्रेडिएंट्स मधे.. इट्स डिफरंट, यू नो!!!!

ऐतेन! मग आपल्या इथल्या सॉसला शेजवान कुठून नाव पडलं?

आ.न.,
-गा.पै.

Pages