माझ्या मिसेस चे वय ३० वर्षे आहे. खूप दिवस झाले म्हणजे साधारण गेले ५ ते ६ वर्षा पासुन तीला सर्दी चा त्रास आहे. महिन्यातून किंवा २ महिन्यातून सर्दी तीला होत असते. त्याच बरोबर डोकेदुखी सुद्धा असते. फमिली डॉक्टर कडे नेहमीची औषधे चालू होती. तेवढया पुरते तीला बरे वाटते आणि नंतर ये रे माझ्या मागल्या. सर्दीच्या गोळ्या हेवी असल्याकारणामुळे तीला त्या सहन होत नाहीत. नेहमी गुंगी असल्या सारखे वाटते.
मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी सल्ला दिला कि और्वेदिक उपाय करा. तो सुद्धा केला. साईट एफेकत (effect) काही नाही झाले. पण और्वेदिक औषध महिनाभर खावे लागते.
डॉक्टरांनी निदान केले आहे कि Sinuses त्रास आहे. ENT Specialist कडे जायला सांगितले आहे. सतत त्रास आहे तर आपरेसन (opration) करा.
माझ्या मित्राचे आपरेसन (opration) झाले आहे पण सफल (success) झाले नाही. त्याने आता और्वेदिक उपाय चालू केला आहे.
आता मला सुचत नाहि काय करायचे. आपरेसन (opration) करायचे का और्वेदिक उपाय करायचा? कोणाला काही माहित असेल तर प्लीज मला मदत करा.
तब्येत पण तीची पातळ झाली आहे. मला खूप काळजी वाटत आहे. मी नवी मुंबईत राहतो. मुंबई किंवा नवी मुंबईत ENT Specialist नाहीतर और्वेदिक उपाय कुठे चांगला मिळेल ते सांगा. मायबोलीकर तुमच्या उत्तराची मी वाट पाहत आहे.
होमिओपॅथी ने माझा दिरांना फरक
होमिओपॅथी ने माझा दिरांना फरक पडलाय....तुम्ही ट्राय का करत नाही ते??? आयुर्वेदिक चा अनुभव नाही.....पण होमिओपॅथी काय आयुर्वेदिक काय या प्रकारांमधे बरे वाटते पण वेळ लागतो फार....
माझ्या नवर्या लाही same त्रास
माझ्या नवर्या लाही same त्रास होता, आधी पुण्यातील एका प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांचे उपचार घेतले, पण बिलकुलच फरक पडेना तेव्हा ईएनटीची ट्रीटमेंट घेतली. आता 95% फरक आहे.
होमिओपॅथी मधे औषधे सतत घ्यावी
होमिओपॅथी मधे औषधे सतत घ्यावी लागतात का? मला वाटते होमिओपॅथी ला साईट effect नसावेत …
पुण्यात असाल तर डॉ. संदीप
पुण्यात असाल तर डॉ. संदीप करमरकरांना गाठा. ०२०-२५४६८५७२
मी कित्येक वर्षांच्या सर्दीतून त्यांच्यामुळे एका अगदी साध्या टेस्टने मुक्त झाले आहे...
पुण्यातले क्र. १ चे नाक-कान्-घसा तज्ज्ञ आहेत ते.
डहाणूकर सर्कलचे करमरकर का?
डहाणूकर सर्कलचे करमरकर का?
नाक कापुन टाकणे हा एक जालीम
नाक कापुन टाकणे हा एक जालीम उपाय ...अक्सीर इलाज ठरु शकतो
मला कमीत कमी दहा वर्ष हा त्रस
मला कमीत कमी दहा वर्ष हा त्रस होत. आयुरवेदीक, होमीओपथी, अॅलोपथी सर्व उपाय केले. नाकाचे ऑपरेशनही केले पण काही फरक पडला नाही. रामदेव बाबांचे कारेक्रम पाहुन प्राणायम चालु केले. दहा वर्षापासून सायनसपासून मुक्ती आहे........... घरच्या घरी खात्रिदायक उपाय आहे.
माझेही नाकाचे ऑपरेशन झाले
माझेही नाकाचे ऑपरेशन झाले होते.पण काही फायदा झाला नव्हता.म्हणजे वर्षातून १-२ वेळा सर्दी व्हायची.काही वर्षांनी मी कैवल्यधाममधे जाऊन प्राणायाम व इतरयोगासने शिकले.नंतर कमी कमी होत गेली.चुकून सर्दी झालीच तर त्रिभुवनकिर्ती घेते.
तुमच्या मिसेसना सायनसचा त्रास आहे तर होमियोपथीत चांगली औषधे आहेत.पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.
क्वीक रिलीफसाठी अॅलोपथीचे उपचार घ्या.
प्रथम योग्य निदान आवश्यक
प्रथम योग्य निदान आवश्यक
सायनस चा त्रास म्हणजे नेमका कसा आहे ते समजून घ्या
यात प्रामुख्याने नाकाचे हाड वाढल्यामुळे श्वसन क्रियेत येणारा अडथळा असू शकतो,
किंवा
वातावरणातील बदल किंवा अॅलर्जीमुळे सायनसला आलेली सूज असू शकेल किंवा इतर काही बाबी आहेत.
नाकाचे हाड वाढले असल्यास (ते डावीकडे किंवा उजवेकडे सरकले असल्यास किंवा बाहेरील बाजूस उंचवटा तयार झाला असल्यास) , ऑपशन हा इलाज असला तरी फक्त ऑपरेशनने हा आजार पुर्णपणे बरा होत नाही मात्र तो बरा होण्यास चांगली मदत होते.
जसे
श्वसनक्रियेत अडथळा असल्यास नाकाचे ऑपरेशन (सेप्टोप्लास्टी) करुन श्वसनाचा मार्ग ब-यापैकी मोकळा करता येतो त्यासाठी एक दिवसाचे ऑपरेशन आणि साधारन ३० ते ४५ दिवस घरी आराम असा दिनक्रम करावा लागेल. त्याचबरोबर प्राणायम व इतर योगासने केल्यास निश्चितच फायदा.
( टीप : नाकाचे हाड अचानक वाढत नाही हा त्रास त्यांना लहानपणापासून असेल तरच ऑपरेशनची गरज भासेल ( इएनटी एक्स्पर्ट कडे जाणे उत्तम
आयुर्वेदीक उपाय बेस्त आहे.
आयुर्वेदीक उपाय बेस्त आहे. त्यात नस्य म्हनून एक तन्त्र वापरले जाते. त्यात वेग्वेगळी तेले नाकावाते सोडली जातात. तसेच नाकाला मसाज करून हाद सरळ केले जाते. (अर्थात हाद किती सुजले आहे वगैरे वरून हे वैद्य थरवतील) मझि सर्दीचि समस्य कायमची गेली मत्र त्याचे थोदे बहुत श्रेय tonsils च्य ओप्रेशन ला ही जाते. आयुर्वेदीक उपचाराल भयन्कर सयम आणी मनसीक तयरी लागते (पथ्य पळन्यसथी) हे केलत तर गुण नक्की येइल. स्वानुभवाचे बोल.
कॉलेजात गेल्यापासून त्यानंतर
कॉलेजात गेल्यापासून त्यानंतर अनेक वर्षे मी नाकाच्या हाडवाढीमुळे होणार्या क्रॉनिक सर्दी-डोकेदुखीचा त्रास भोगला. अॅलोपॅथी आणि होमिओपॅथी करून झालं. शेवटी एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी सारं बंद करून फक्त 'अणूतेल' वापरा- असं सांगितलं. हे बोटावर घेऊन नाकाच्या आत हाडाला लावायचं, दिवसातून २-३ वेळा आणि विशेषतः रात्री झोपताना. मात्र हे न थकता, परिणाम न दिसल्याने निराश होऊन सोडून न देता. सलग अनेक वर्षे लावायचं. मी वापरायला सुरूवात केल्यापासून साधारण वर्षभरात फरक दिसू लागला. आता सायनस आणि इतर प्रॉब्लेम्स संपूर्ण बरे झाले असं नव्हे, पण त्रास ७०% कमी झाला- असं म्हणायला हरकत नाही. ऑपरेशन करावं लागलं नाही, आणि असह्य त्रास होत होता, तो आटोक्यात आहे.
साजिर्या अणूतेलासाठी
साजिर्या अणूतेलासाठी अनुमोदन. श्वसनमार्गात येणारे अडथळे दूर करण्यास अणू तेल उत्तम.
'अणूतेल' म्हणजे काय ???कुठे
'अणूतेल' म्हणजे काय ???कुठे मिळेल??
अनिश्का, पिन्कि ८०, Saee,
अनिश्का, पिन्कि ८०, Saee, arjun1988,देवकी,
किरण कुमार (प्रथम योग्य निदान आवश्यक : अनुमोदन)
धानी१, साजिरा, दक्षिणा, सुखदा ८ ('अणूतेल' : प्रश्नाचे उत्तर अजून आले नाही)
प्रसाद गोडबोले (भयंकर उपाय सांगितला आहे !)
उपयुक्त माहिती. मी सर्वांचा अत्यंत आभारी आहे.
नितीन अणुतेले बर्याच
नितीन अणुतेले बर्याच संस्थांची आहेत, आणि कुठच्याही मेडिकल शॉपमध्ये मिळायला हवीत.
आयुर्वेद रसशाळेच्या साईटवरचे त्यांच्या अणुतेलाचे डिटेल्स इथे पेस्ट करतो.
Anu Tel (For External Use Only) << Back
A) Reference : Ashtanga Hrudaya.
B) Nature of Product : Medicated Oil.
C) Dosage : 2 Drops in each Nostril Two Times.
D) Indications : Chronic & recurrent cold with predominant sneezing
& headache. early graying and hair fall. Improues function of
special senses, Used in cevical spondylosis and frozen shoulder
for Nasya.
अणुतैलम हा खात्रीशीर उपाय
अणुतैलम हा खात्रीशीर उपाय आहे. तसेच नस्यबस्ती आणि सूत्रनेती हे सुद्धा आयुर्वेदिक वैद्याच्या सल्ल्यानुसार केलेले उत्तम..
मला सुधा १० वर्श त्रास होता.
मला सुधा १० वर्श त्रास होता. त्यामुळे बेसिक माहिती आहे. मुळात नाकाचे हाड वाढत नाही. ते डावीकडे किंवा उजवेकडे सरकते. त्यामुळे श्वसनाचा त्रास होतो. मी ७ वर्शांपुर्वी १ ओप्रेशन केले. ते सफल झाले नाही. २ वर्शांपुर्वी परत dr. ashok purohit, sangli इथे १ ओप्रेशन केले. त्यानी खर्च बराच सन्गितला. पूर्ण बरे व्हाय्ची हमी दिली. मी म्हणले की १० पैकी ९ बरे होतात तर मी ती १० वी असते. त्या अगोदर ५ वर्श आयुर्वेदीक वर ड्बल खर्च झालाच होता. काहीही फरक नव्हता.
पण आता २.५ वर्श काहीही त्रास नाही. नावाजलेल्या इएनटी एक्स्पर्ट कडे जाणे योग्य.
साजिरा अणुतेला बद्दल बरीच
साजिरा अणुतेला बद्दल बरीच माहिती मिळाली. पिंगू छान सल्ला. बापरे! ननि खुपच त्रास सहन केलेला दिसतोय. तुम्ही किती पेशन्स ठेवलेले आहेत. सगळ्यांना धन्यवाद.