बॅंकीग संगणक प्रणाली: काही प्रश्न, अनुत्तरीत....

Submitted by चौथा कोनाडा on 20 March, 2014 - 05:18

मागील महिन्यात बॅंकीग क्षेत्रात खळबळ माजवणारी घटनेने वृत्तपत्रांचे मथळे व्यापले. दुप्पट तोटा अन खुप प्रमाणात वाढलेली अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) या मुळे भारतातील एक महत्वाची प्रमुख बॅंक, युनाइटेड बॅंक ऑफ इंडिया अचानकपणे चर्चापटलावर आली.

याची चर्चा चालू असतानाच, बॅंकेच्या चेयरपर्सन/एमडी अर्चना भार्गव स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली. पदाची कारकीर्द दोन वर्षांनी पूर्ण होण्याआधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. जाता-जाता त्यांनी वाढीव एनपीएचे खापर “फिनॅकल” या बॅंकीग संगणक प्रणालीवर फोडले (संदर्भ: दै.लोकसत्ता, अर्थसत्ता, २२ फेब्रु २०१४)

त्या अगोदर बॅंकेने देखील जाहीररीत्या “फिनॅकल” या संगणक प्रणालीला दोषी ठरवून या प्रणालीतल्या त्रुटींमुळेच एनपीए चे तपशिल चुकीचे नोंदले गेले व परिणामी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे असे प्रतिपादन केले. (संदर्भ: दै.लोकसत्ता, अर्थसत्ता, २० फेब्रु २०१४)

एका बॅंकेने व बॅंकेच्या अनुभवी वरीष्ठ व्यवस्थापकाने “फिनॅकल” सारख्या उच्च दर्जाच्या बॅंकीग संगणक प्रणालीवर आरोप करणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे.

अर्चना भार्गव या दिल्लीच्या अत्यंत हुशार अश्या गोल्ड-मेडलधारक आहेत. पंजाब नॅशनल, केनरा बॅंक आदि संस्थात यशस्वी कारकिर्द केली. ग्रेट ब्रिटेन सहित यूरोप व आफ्रीकी देशांत त्यांनी या संस्थांचा व्यवसाय वाढवला. अश्या व्यक्तिने संगणक प्रणालीवर दोषारोप करणे यात काहीतरी तथ्य असावे असे वाटते.

युनाइटेड बॅंकेमध्ये जगप्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिस यांची “फिनॅकल” ही कोअर बॅंकींग ही संगणक प्रणाली वापरली जाते. सार्वजनिक क्षेत्रातील अन्य बॅंकादेखील ही प्रणाली वापरतात. “फिनॅकल” सारख्या नावजलेल्या प्रणालीवर एव्हढा मोठा आरोप होवून देखील याबाबत इन्फोसिसने यावर काहीच स्पष्टीकरण दिले नाही, म्हणजे माझ्या, वाचण्यात बघण्यात आलेले नाही.

या संदर्भात मी बॅंकेतील काही अनुभवी अन वरीष्ठ लोकांशी चर्चा केली. त्यांच्यामते ही प्रणाली अतिशय सक्षम असून त्या प्रणालीला वेळोवेळी कठोर चाचणीचे दिव्य पार पाडूनच मग ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात येते. त्यांच्यामते बॅंकेनेच चुकीच्या एन्ट्रीज करून गहाळपणा केला असावा व त्याचा दोष “फिनॅकल”ला देत असावेत.

आता प्रश्न असा पडतोय की यात दोष कोणचा? बॅंकेचा की इन्फोसिसच्या “फिनॅकल” या संगणक प्रणालीचा? जर यातल्या कोणा एकाचा आणी दोघांचाही असेल तर आपल्या सारखे सामान्य ग्राहक, ठेवीदार अश्याच प्रकारच्या “संगणक प्रणालीच्या” घोटाळ्याचा बळी पडला तर आपल्यासारख्याला वाली कोण?

यावर बॅंकीग क्षेत्रातली तज्ज्ञ जाणकार मंडळी अधिक प्रकाश टाकू शकतील काय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<एकंदरीतच बॅंक सार्वजनिक असो वा खासगी/ सहकारी "गरीबांच्या" नावाखाली/ उद्योगपतींना पुढे करून एनपीए जनरेट करून सामान्य प्रामाणिक ग्राहकांना गाळात घालण्याचे काम होत आहे हे नक्की.>>>>

Don't agree with this sweeping generalization.

भरत, मी व्यक्त केलेल्या सरसकटीकरणाशी आपण असहमत आहात याचा आदर आहे. आपण दर्शवलेली सदिच्छा प्रत्यक्षात आली तर आनंदच आहे.

या विषयावरची ताजी बातमी: संदर्भः इंग्रजी दै. डीएनए, डीएनए मनी हे सदर.

युनाइटेड बॅंक ऑफ इंडियाने दिलेल्या निवेदनानुसार बॅंक व सॉफ्टवेअर दिग्गज इन्फोसिस यांचा “फिनॅकल” या दोषपुर्ण बॅंकीग संगणक प्रणालीवरून चाललेला वाद संपुष्टात आलेला आहे. इन्फोसिस त्यांच्या सुधारीत प्रणालीची चाचणी कोलकत्यातील बँकेच्या मुख्य शाखेत करत असुन लवकरच सर्व शाखांमध्ये ती लागू करणार आहे.

बॅकेच्या निवेदनात पुढे असेही म्हटलेले आहे की, प्रणालीतल्या त्रुटींमुळे एनपीए चे तपशिल चुकीचे नोंदले गेले व परिणामी बँकेला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागल्या नंतर बँक इन्फोसिसकडे याबाबत सातत्याने पाठ्पुरावा करीत होती. याला इन्फोसिसने प्रतिसाद देवून प्रणालीची फेरतपासणी सुरू केली. चार महिन्यांच्या या प्रक्रियेनंतर आता सुधारित प्रणालीतल्या कार्यान्वित होईल.

या वरून हे स्पष्ट होत आलेय की अतिशय विश्वासार्ह बॅंकीग संगणक प्रणालीत देखील दोष असू शकतात. नथिंग इज परफेक्ट !

http://www.dnaindia.com/money/report-ubi-infosys-bury-hatchet-work-on-ne...

"We had issues with our software and had long discussions with our vendor Infosys. They sat in our head office for four months and corrected it and the software is now performing as per our satisfaction. In fact, Infosys is testing on a pilot basis the new software to determine stressed assets which will be implemented across all branches this quarter," United Bank's executive director Deepak Narang said.

हीच बातमी का?

"बॅकेच्या निवेदनात पुढे असेही म्हटलेले आहे की, प्रणालीतल्या त्रुटींमुळे एनपीए चे तपशिल चुकीचे नोंदले गेले व परिणामी बँकेला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागल्या " असे कुठे अहे बातमीत?

सॉफ्टवेअरमुळे एन्पीए वाढलेले दिसले तर ""Due to our recovery efforts we could turnaround in the fourth quarter. We plan to take it forward during the year. We are creating capacity building at the regional offices and branch level giving training to managers in monitoring management of loans and advances and how to do credit assessment. Daily reports to RBI are being given. We have created a special team to monitor all accounts under the charge of a general manager." हे का करावे लागले?

Pages