केरळमध्ये ३ दिवस फिरायला जायचं आहे. प्लीज प्लान्स सुचवा.

Submitted by झुझी on 26 February, 2014 - 03:52

केरळमध्ये ३ दिवस फिरायला जायचं आहे. प्लीज प्लान्स सुचवा. तीन संपूर्ण दिवस हाताशी आहेत. झू, पद्मनाभस्वामी मंदिर, मुन्नार वगैरे सारखी लांबची ठिकाणं वगळून इतर कोणती ठिकाणं पाहता येतील? बैकवॉटर राईड चालेल. स्टे नको. राहण्याची व्यवस्था thycaud मध्ये आहे. (पद्मनाभस्वामी मंदिरा पासून ३ किमी).

टाईप करता येत नाहीये. पीसी मध्ये इश्यू आहे. त्यामुळे लिखाण थोडं रूड वाटेल. क्षमस्व. Sad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला नेमकं काय हवंय ते कळालं नाहीये पण-
तीन दिवस तसे खुप कमी आहेत केरळ फिरण्यासाठी आणि तुम्हाला मुण्णार नकोय म्हणुन :
कोची मध्ये उतरलात तर -
१)बॅकवॉटर एक दिवस करता येईल.(पुर्ण एक दिवस लागतोच Sad )
२)त्यानंतर दुसर्‍या दिवशी थोडं उशीरा उठुन खालील पॉईंट्स करता येतील :
दिवसभर चेराई बिच, संध्याकाळी लूलू/ओबेरॉन मॉल किंवा मरिन ड्राईव्ह
३)तिसर्‍या दिवशी, फोर्ट कोची (इथे बघण्यासारखे बरेच पॉईंट्स आहेत).
तिसर्‍या दिवशी रात्री घरी परत निघता येईल Happy

पद्मनाभम मंदीर करणार असाल तर एक पुर्ण दिवस लागेल आणि गुरुवायुर मंदीर पण करता येईल. पण मग मंदीरं मंदीरंच फिरुन होतील.

मुळात कोची संध्याकाळी ८ ला पुर्णपणे बंद होतं त्यामुळे जे काही फिराल ते ८च्या आधीच फिरावं लागेल Happy

तुमचा बाकीचा प्लॅन माहीत नाही. पण मी तर सल्ला दिला असता की एक दिवस मुणार आणि दुसर्‍या- तिसर्‍या दिवशी कोडाईक्नॉल, मधुराई, आणि कन्याकुमारी कराल तर बरं आहे Happy

१.Pad'swami मंदिराच्याच तळयासमोरचा पुतिनमलिका वाडा (सोमवारी बंद ,९ते१, ३ते५ )आणि शहरातली प्र स्थळे

थंपानूर बस डेपोच्या शेजारी
असलेल्या केरळ टुरिझम केन्द्रातून रोज टुअर निघतात .
फक्त माहिती पत्रके घ्या .

२कन्याकुमारीच्या वाटेवर

पदनाभपुरम वाडा (लाकडी दालने,आणि खास काळी फरशी)

९ते१ ,२ते४ सोम बंद

शुचिंद्रम मंदिर (वाजणारे दगडी
खांब)

३.पोनमुडी आणि
कोयिक्कल वाडा /नेय्यर डैम

अजून बरीच ठिकाणे आहेत
पण आपल्या वयानुसार निवडा .पहिले दोन राजवाडे पाहाच
असे कुठेच नाहीत .

एकदा गूगल म्याप घेऊन जागांची नावं पहाणार का प्लीज?

>>
झू, पद्मनाभस्वामी मंदिर, मुन्नार वगैरे सारखी लांबची ठिकाणं वगळून
<<
हे समजलं नाही.
झू अन पद्मनाभस्वामी मंदीर "दूर" नाहिये थायकड पासून. ३ किमी जर दूर वाटत असतील, तर काही सुचविणे कठीण आहे.
पीसीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल तर पुन्हा एकदा डीटेल लिहा नक्की काय मदत हविये ते Happy

झुझी मी नुकताच २२ जानेवारी ते २६ जानेवारी केरळला जाऊन आलो. माझी ट्रीप मुन्नार-थेक्केडी-अल्लेपी अशी होती. त्यात हिल स्टेशन-जंगल-बॅकवॉटर असा लांबच लांब प्रवास होता. तुमचा प्रेफरन्स कळला (हिल स्टेशन कि जंगल कि बॅकवॉटर) तर सविस्तर प्रतिसाद देता येईल Happy

>>>>झू, पद्मनाभस्वामी मंदिर, मुन्नार वगैरे सारखी लांबची ठिकाणं वगळून
इब्लिस Ghaait type kelyamule arthacha anartha zala.. Sad Kshamaswa

mala mhanayche hote ki.. munnar vagaire sarkhi lamb chi thikane ani zoo, padmanabhaswami vaglun.. dusra kahi pahata yeil ka.. n post taklyavar chook lakshat yeun suddha kahi karanastav durust karta aale nahi..

>>>>एडी .. tumcha pravasa cha plan kasa hota he thodkyat sangta ka? mhanje mala vegvegle paryay padtalun pahta yetil. Happy

>>>>रिया. Its ok.. Happy

>>>>Srd Thanks for the detailed info. Happy

My PC has issues with marathi unicode typing.. Sad
whenever I do a mistake and erase the letters, the next time I try to type something, Junk characters appear which get appended to what I have already typed and the whole thing gets converted to the string of junk characters.. Sad
Any solution for this?