मनात काही

Submitted by जयन्ता५२ on 28 November, 2008 - 10:19

आहे मनात काही
नाही खिशात काही!

नुसतेच भेटणे की
आहे मनात काही?

आषाढ हा कसा रे?
नाही नभात काही

नेईल काय कोणी?
नाही घरात काही

दे दुःख, आसवांची
नाही ददात काही

माझे असेच आहे
नाही कशात काही

(जयन्ता५२)

गुलमोहर: 

>>नुसतेच भेटणे की
आहे मनात काही? Happy

छानच.

माझे असेच आहे
नाही कशात काही

आपल्या कवितेबद्दल छातीठोकपणे हे कबूल करता येतं हे काय कमी आहे

नाही नाही म्हणतांना खूप काही आहे.
सुंदर आहे.

नेईल काय कोणी?
नाही घरात काही

इथे "नेईल" ऍवजी "पळवेल" काय कोणी म्हटले तर?

अलका,
पळवतात फक्त चोर! अन्य कायदेशीर कारणांनीही घरातले सामान नेले जाऊ शकते.उदा.कर्ज न फेडल्याने जप्ती इ. म्हणून नेईल काय कोणी?
सुचवणीबद्दल धन्यवाद

जयन्ता५२

पेशवा... छोटा बहर... एकदम मस्त!!
चिन्नूला मोदक... मलाही तो शेर आवडला विशेष!

विशेष म्हणजे मी प्रत्येक सानी मिसर्‍यातील 'काही' अन 'नाही' ह्या शब्दांची अलटापालट केली तरीही ही गजल व्यवस्थित म्हणजे आहे तोच अर्थ पोचवते... क्या बात है!! (२ रा शेर अपवाद) Happy व्वाह!!