ज्ञानरवि

Submitted by sandeepguru on 26 November, 2008 - 01:55

हे विद्यार्थ्या उठ चल आता सतेज कर या पृथ्विला |
तुझ्या रुपाने ज्ञानरवि तो अवतरला या धरतिला ||

ज्ञानसंपदा तुझि हि आता अर्पित कर या विश्वाला |
तुझ्या निश्चयि विश्वासाने प्रेरीत कर या जगताला ||

कीर्ति तुझि ती क्षितिजा वर्ति मात करुनि पसरावि |
तुझ्या प्रगतिची दिव्य तारका मुक्त नभि य झळ्कावि ||

ज्ञानसगरि तुझ्या कितितरि व्याकुळ्लेले शमवावे |
तुझाच आदर्श ठेऊन पुढती ज्ञानरवि ते उगवावे ||

गुलमोहर: 

कविता चांगली आहे. पण याला ग़ज़ल खचितच म्हणता येणार नाही. या काव्यातसुद्धा मात्रांच्या काही चुका आहेत. उगाचच काही दीर्घ उच्चाराचे शब्द र्‍ह्स्व केले आहेत. ते जरा तपासून घ्यावेत. कविता पुन्हा पुन्हा वाचली तर त्या चुका तुमच्या आपोआप लक्षात येतील. बाकी तुमच्यात ग़ज़ल लेखनाची क्षमता असावी असे वाटते. कृपया www.sureshbhat.in वर ग़ज़लची बाराखडी वाचावी. पुलेशु. Happy

शरद, मराठि व्याकरणाच्या अजानतेपणाबद्दल प्रथम क्षमा मागतो.
मनात आणि आनुभवात येणार्‍या गोष्टि पद्यात बांधन्याचा हा प्रयत्न,
बाकि......
मज पामरा काय थोरपन.................

केलेल्या सुचनांचे मनःपुर्वक स्वागत.

मनात आणि आनुभवात येणार्‍या गोष्टि पद्यात बांधन्याचा हा प्रयत्न,
बाकि......<<
यालाच गझल म्हणायला हव,! खुप छान गझल!