Submitted by मिल्या on 24 November, 2008 - 12:33
मळभ मंदीचे नभी दाटेल आता
मेघ आषाढातही आटेल आता
काळजाला ती घरे पाडून गेली
वर तिचा संसारही थाटेल आता
पेच माझी ’मी’ पणाशी लागलेली
कोण कोणाला बघू काटेल आता!
साकडे त्याच्याकडे घालू कसे मी?
भय असे की दु:ख तो वाटेल आता
सुप्त ओलावा नद्यांचा लुप्त झाला
सागराला कोरडे वाटेल आता
जन्मत: मी फाटका होतो तसाही
शोक का मग जर कफ़न फाटेल आता?
मी असा ठिपक्यात आहे विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता?
तू कुठे होतोस त्यांना सहन मौना
गप्प करण्याचे तुला घाटेल आता
जिंदगी अस्पृश्य तर होतीच माझी
कावळा त्यांचा म्हणे बाटेल आता
गुलमोहर:
शेअर करा
जिंदगी
जिंदगी अस्पृश्य तर होतीच माझी
कावळा त्यांचा म्हणे बाटेल आता
>>
एकदम झकास!
मिल्या,
मिल्या, खुप छान..
मी असा ठिपक्यात आहे विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता?
तू कुठे होतोस त्यांना सहन मौना
गप्प करण्याचे तुला घाटेल आता >>> हे तर फारच आवडले..
मी असा
मी असा ठिपक्यात आहे विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता?
क्या बात है मिल्या.......!!
पेच, कफन,
पेच, कफन, रांगोळी आणि मौन आवडले. शेवटचा तर फारच सही.
***
अर्धा रिकामा की अर्धा भरलेला
वाद कशाला घालायचा ?!
पूर्ण भरलेला मागवायचा.
मिल्या,
मिल्या, सही है...
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....
काळजाला ती
काळजाला ती घरे पाडून गेली
वर तिचा संसारही थाटेल आता >> मस्त रे...
मी असा
मी असा ठिपक्यात आहे विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता? >> व्वाह! खासच रे मित्रा!
कायम
कायम लक्षात राहावी अशी गझल!
जयन्ता५२
वा! थाटेल,
वा!
थाटेल, वाटेल आणि रेखाटेल हे शेर विशेष आवडले.
धन्यवाद
धन्यवाद दोस्तांनो
================
जरी आंधळा तरी जगाची
नेत्रपल्लवी कळू लागली
पेच माझी
पेच माझी ’मी’ पणाशी लागलेली
कोण कोणाला बघू काटेल आता!
मस्त.. रांगोळी-ठिपका आवडले.
धन्यवाद
धन्यवाद चिन्नु
================
जरी आंधळा तरी जगाची
नेत्रपल्लवी कळू लागली
वाह!
वाह! मिल्या मस्तच जमलीये. आवडली.
~~~~~~~~~
वावा.... काळज
वावा....
काळजाला घरे च्या शेरात घरे आणि संसार ही शब्दयोजना फार फार आवडली...
साकडे त्याच्याकडे घालू कसे मी?
भय असे की दु:ख तो वाटेल आता
तू कुठे होतोस त्यांना सहन मौना
गप्प करण्याचे तुला घाटेल आता
हे ही आवडले...
*********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!
मिल्या..
मिल्या.. मस्त जमलीये..
आवडली
तू कुठे होतोस त्यांना सहन मौना
गप्प करण्याचे तुला घाटेल आता
क्या बात है!!
~~~~~~~~~~~~~~~~~
आलो कुठून कोठे तुडवून पायवाट
काटे सरून गेले उरली फुले मनांत
मीनू,
मीनू, नचिकेत, किरु खूप धन्यवाद
किरु काय रे बर्याच दिवसांनी दिसत आहेस इकडे...
================
जरी आंधळा तरी जगाची
नेत्रपल्लवी कळू लागली