Submitted by जयन्ता५२ on 22 November, 2008 - 14:59
ओठी तुझ्या गझल माझी
बघ कुठवरी मजल माझी!
ही काळजाच्या किनारी
शब्दासवे सहल माझी
हल्ले किती त्या सुखाचे
दु:खे परी अचल माझी
सुकले जरी ओठ माझे
ही लोचने सजल माझी
दुनियेस ह्या का न समजे?
ही वेदना सरल माझी
नजरेस तू नजर देता
झाली सफल गझल माझी
(जयन्ता५२)
गुलमोहर:
शेअर करा
मतला सही!
मतला सही! लोचने सजल आवडले.
शेवटी 'सफल' बदलता आल्यास फ्लो चांगला राहील असे वाटते.
मतल्याने
मतल्याने तोडलंच एकदम!!!!:)
मस्त गझल!
*****************
सुमेधा पुनकर
*****************
आय हाय.....
आय हाय..... मतला एकदम कातिल !!
आह... क्या
आह... क्या बात है!! मतला कातिल!!
मी तर शेवटची ओळ 'झाली 'गझल' गझल माझी' अशी वाचली आणि अजूनच मजा आली!!
मतला तर
मतला तर एकदम कातिल !
>> सुकले जरी ओठ माझे
>> ही लोचने सजल माझी
हा शेर विशेष आवडला
मतला खरच
मतला खरच कातिल!
सगळेच सुंदर शेर आहेत, जयंत. तरीही खास आवडलेले -
सहल आणि अचल.
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया
मतला तुफान
मतला तुफान आहे!!
सुखाचा शेरही आवडला.
पुलस्तिला
पुलस्तिला अनुमोदन ...
मतला, सुखाचे हल्ले आवडले
================
जरी आंधळा तरी जगाची
नेत्रपल्लवी कळू लागली
सुंदर !
सुंदर !
mankya बढिया!
mankya
बढिया! तुमच्या परवानगीने हीच ओळ ठेवूया.
मनापासून धन्यवाद.
जयन्ता५२
मस्तच.. मतल
मस्तच..:)
मतला विशेष आवडला...:)
फारच सुंदर
फारच सुंदर