एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनोद तसे बरे आहेत. नवीन कलाकारांचा भरणा आहे. मोहन जोशी गोडबोलेंच्या सिरिअल मधून मध्येच पळ काढतात म्हणून ते घर सोडायला निघाले की वाटते हा दत्ताराम पुढच्यावेळेस वेगळाच दिसणार बहुतेक!

इशाच्या (स्पृहा ) आईचे काम कोण करत आहे? चेहरा माहितीचा आहे पण नाव माहिती नाही. त्यांचे काम आवडले.
>>>> नाव मला हि नाहि माहित पण हिने स्टार प्रवाह वर 'पुढ्च पाउल' मध्ये 'ढोले पाटिल' हि व्हिलन कम कॉमिक भूमिका हि चांगलि केलि होति अणि 'तुझ माझ जमेना' मध्ये 'मिसेस जोशिं' चि भूमिका केलि होति

पंचेस मस्त आहेत....विनोद अजून हायलाईट केले असते तर अजून मजा आली असती....कथेचा वेग खूप छान आहे...

कालच्या एपिसोडमध्ये दिवाळीची मजा दाखवली होती...

ईशाला अनारसे खूप आवडतात आणि ते तिला फोन करून कोणाकडून तरी मागवून घ्यावे लागतात हे कळल्यावर तिची भावजय मोठ्ठ्या आईकडून म्हणजेच इशाच्या काकू कडून ईशासाठी खास अनारसे बनवून घेते.

मोठ्ठ्या काकूने आणलेलं ईशा साठीच स्थळ बघण्यात कोणालाच रस नाही असे वाटून काकूबाई थोड्या नाराज होत्या...पण अनारसे बनवता-बनवता ईशाची आई आणि भावजय तिची नाराजी गोड बोलुन दूर करतात...किल्ला बनवल्या नंतर सगळ्या वानरसेनेसोबत ईशाला तिचे आवडते अनारसे सरप्राईज म्हणून देतात....

इकडे ओमच घर मास्तर आणि त्याची होणारी बायको सजवून सुंदर बनवतात..आणि त्या दोघांना धन्यवाद म्हणताना, ओम 'माझ घर' शब्द खोडून 'आपलं घर'असा उल्लेख करतो...

आणि आता खऱ्या अर्थाने, ओम त्याच्या परिवाराबरोबर दिवाळी साजरी करतो....

या सिरियलमध्ये फक्त उमेश कामत, मोहन आगाशे आणि मोहन जोशी आणि त्यातल्या त्यात सागर तळाशिलकर... आणि किंचित ती दाते... बाकी शून्य.

हो, तो संदेश कुलकर्णीच आहे.
इशाच्या घरी नक्की कोण कोण आहे आणि कोणाचं कोण आहे काही पत्ता लागलेला नाही! बॉबकटवाली एक काकू असावी. तिचा काका आय मीन पती दिसलेलाच नाही अजून. का दिसलाय, पण मला दिसला नाही? Uhoh

उमेश कामत मात्र गोड आहे Happy

पौर्णिमा फक्त उमेश कामतच काय तो गोड आहे.

त्याच्या शेजारच्या घरात राहणारा तो एक म्हातारा तर माझ्या डो$क्या$त जातो Angry उगिचचं घुसडलेलं पात्रं आहे ते. काल काय तर म्हणे लपून बसला होता का तर तरूण मुली भाऊबीजेला ओवाळतील म्हणून...

त्याच्या शेजारच्या घरात राहणारा तो एक म्हातारा तर माझ्या डो$क्या$त जातो>> माझ्या पण अगदी पहिल्या सीन पासून.

संदेश कुलकर्णी आहे का?... अमृता सुभाष चा नवरा?>>>>>>>>> हं.............तरीच चेहेरा ओळखीचा वाटत होता पण कळत नव्हतं!
बाकी सिरीयल मला तरी नाही आवडली .

<<इशाच्या घरी नक्की कोण कोण आहे आणि कोणाचं कोण आहे काही पत्ता लागलेला नाही!>> +१ शेवटच्या शिरगणतीत आजोबा, आजी आणि आई एवढेच क्लिअर झाले. बाकी नात्यांबद्दल मस्त गुप्तता पाळली आहे.
उमेश कामतची आजी - शुभा खोटे - रहस्यमयरित्या गायब झाल्या होत्या त्या आल्या का परत?. शुभांगी गोखलेना फार कमी सीन्स दिलेत.

ह्या लग्नात आगाशे, मोहन जोशी इत्यादी ज्येष्ठांचा खूपच मान ठेवला गेलाय; " तुम्हाला जमेल, यावंसं वाटेल तेंव्हा या. दोन अक्षता टाका, दोन घांस खा आणि जा. पण यायचं हें मात्र नक्की बरं का ! ", असं आग्रहपूर्वक त्याना सांगितलं गेलंय आणि त्यानी मोठ्या मनाने तें मान्यही केलंय !! Wink

कालचा मोहन जोशींचा भावूक अभिनय छान होता. पुढच्या प्रसंगात बंदूक संदेश कुलकर्णीच्या बाजूला वळवल्यावरचे संदेशचे हावभावही मस्तच... मैत्रिण रसगुल्ला ओरडत गेली तेव्हाही मस्त हसू आलं Happy स्पृहाचा आईबाबांसोबतचा प्रसंग आणि तिचा निरोप समारंभ मात्र त द्द न फा ल तू !

किती कौतुक ते त्या स्पृहाचं आणि उगिच गहिवरून भरून आल्यासारखं वागायचं. कोणती फॅमिली असते हो अशी? Uhoh आणि चुलत भाऊ टॅब देतो म्हणे कैतरीच... सगळं नुसतं स्वप्नरंजन.

इशापेक्षा कितीतरी बरा.

आई काहीतरी सांगतेय तर हिच्या एक्स्प्रेशन्स म्हणजे जणू काही अगदी कित्ती त्रास होतोय. इतकं प्रेम मिळतं ते पचत नाही का? Uhoh पण एकूणच इशाच्या घरचे सगळे प्रसंग शिक्रणासारखे गोड गिट्ट आणी नाटकी वाटतात,
शिरेलित सगळं टोकाचंच का दाखवतात देव जाणे.
एक म्हणजे प्रचंड चांगलं/सोशिक्/सहनशिल
आणि दोन म्हणजे अत्यंत अतार्किक/खलनायकी
दोन्हीत समन्वय तो काय नाहीच. Uhoh

आणि झाडून सगळ्यांचं प्रेम फक्त आणि फक्त इशावरच. बाकीच्या लहानांनी अगदी घोडी मारलीत यांची.
>>>>>>>>>>>> दक्स......:खोखो:

चिडचिड नाही अगं... आश्चर्यचकित होते मी असे प्रसंग पाहून.
अशा सिरियल्स जास्तीत जास्त वास्तवात आणतात आपल्याला.

स्पृहाची मैत्रिण जामच आवडायला लागली आहे मला.. मस्तच काम करतेय ती.

तिलाही आपल्यासारखंच हे मान्य आहे 'इशाच्या घरचे जरा अतीच आहेत' म्हणुन!!

Pages