Visiting Ladakh - 5

Submitted by इंद्रधनुष्य on 16 September, 2013 - 00:23

Visiting Ladakh - 4

Pangong Tso

लडाख टुर ठरल्या पासुन ज्या दिवसाची उत्कंठतेने वाट पहात होतो.. तो दिवस उजाडला. १३,९०० फुटांवरिल 'पँगाँग त्सो'ला जाण्यास सगळेच उत्सुक होते. तिबेटियन भाषेतील बँगाँग म्हणजे लांब आणि अरुंद असा मंत्रमुग्ध करणारा परिसर म्हणुन ज्याची ख्याती आहे तो हा पँगाँग लेक. ३ Idiot मधिल आमिर आणि करिनाच्या प्रेमाचा साक्षिदार.

पँगाँगला जाण्यास तसे सगळेच उत्सुक होते. पण काही संमिश्र भावना मनात घेऊन... ज्यांच्या सोबतीने गेल्या आठवडे भराचा खडतर प्रवास केला होता, त्यातील पाच जण उद्या परतणार या जाणिवेने मन थोडं उदास झाले होते. प्रकृतीच्या कारणास्तव प्रतिक, अमित, जिवेश, प्रज्ञा उद्या लेह वरुन माघारी फिरणार होते... तर माधवीचं टिकिट आधीच बुक झालेल होतं.

प्रचि १

'कल के लिए आज को ना खोना, आज ये ना कल आएग'... मनातली मरगळ दुर सारुन सगळ्यांनी आजचा दिवस पुर्णपणे enjoy करायचे ठरवले. हॉटेल मधुन निघण्या पुर्वी जिवेशने एक वेगळाच फतवा काढला. पँगाँग लेकच्या निळ्याशार पार्श्वभुमीवर रंगीत कपड्यातील नमुने अगदी उठावदार दिसतात... म्हणुन सगळ्यांना चटेरीपटेरी टिशर्ट घालण्याची ताकिद देण्यात आली. मग काय... पडत्या फळाची आज्ञा मानून प्रत्येक जण रंगीत वस्त्र परिधान करुन हजर.

प्रचि २

गाडीचे सारथ्य करणार्‍या नामखर सोबतचाही आज शेवटचा प्रवास.. शिरस्त्या प्रमाणे त्याने बिस्लरीसाठी गाडी थांबवली. तीन दिवसात त्यालाही आमची सवय झाली होती. नामखरने CD playerवर 'आपली आवड' लावली की, मागून आमची टकळी सुरू व्हायची. मग तो मजबुरीने मी दिलेलं SD Card टाकून हिंदी गाणी लावायचा.. पण ते ही फार थोडा वेळ.. नामखर हिंदी गाण्यांनी बोर झाला की परत आपली आवड सुरु.. बराच वेळा या Card आणि CDच्या दंद्वात नामखर बाजी मारत असे.

प्रचि ३

साधारण २२० किमीच्या पँगॉंग प्रवासा साठी सकाळी लवकरच निघालो.. 'कारु'च्या चेक पोस्टवर Inner Line Permitची नोंद करुन पुढे निघालो. गेले तीन दिवस ज्या गाडीने छान सोबत केली होती त्या गाडीचा आज मुड बिघडलेला होता. इंजिन मधे काही तरी दोष उद्धभवला होता. नामखर आणि त्याचा जोडीदार हात तोंड काळे करुन दोष काढुन टाकत. पण परत दहा-पंधरा मिनिटात इंजिन दम तोडत असे. असे तीनचार वेळा झाल्यावर गाडी व्यवस्थीत सुरु झाली. या सगळ्या रहाटगाड्यात कडी म्हणजे नामखरला शॉर्टकटची हुक्की आली. मग काय इंजिनचा धुर आमच्या तोंडा वाटे निघू लागला. :p

प्रचि ४

हाशहुश करत गाडीने चांगला गाठला खरा... पण चांगला अजिबातच चांगला नव्हता. म्हणजेच 'चांगला'चा रस्ता तसा वाईटच होता. त्या पुढचा रस्ता बरा होता... पुढे एका टांगेत Durbuk गाठलं तर दुसर्‍यात Tangse.. मधेच एका गावात मॉनेस्ट्री बांधण्याचे काम सुरु होते. नामखर तिथे सढळ हस्ते मदत केली.

प्रचि ५ वाटेत सश्या सारख दिसलेला गुबगुबित प्राणी.

प्रचि ६ वाळवंटातील हिरवळ

मजल दरमजल करत पॅंगाँगच्या शेवटच्या टप्प्यात पोहचलो. डोंगर माथ्या वरुन दिसणार ते निळशार पाणी पँगाँग आल्याची वर्दी देत होतं. त्या प्रथम दर्शनाने सगळे तहानभुक विसरुन गेले आणि गाडीत एकच चैतन्य पसरले.

प्रचि ७

प्रचि ८

लहान बाळ जस खेळण्याच्या ओढीने दुडदुडत त्या खेळण्या कडे पळत सुटतं... तसच गाडीतून उतरताच प्रत्येक जण पँगाँगच्या किनार्‍याकडे धाव घेऊ लागला. त्या तांबट, पिवळसर डोंगररांगेच्या पार्श्वभुमीवर पँगाँगचा निळाशार तलाव डोळ्यांचं पारणं फेडत होता.

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

गेल्या सहा तासांच्या प्रवासाचा शीण घालवणारा तो नयनरम्य नजारा पाहताना भान हरपून गेले होते. कितीही फोटो काढले तरी काही मन भरत नव्हते... शेवटी कॅमेरा बंद करुन तो सुंदर नजारा पापण्यांच्या Lens मधुन मनातल्या Memory Card कायमचा साठवून घेतला.

Pangong Tsoचा पुर्वे कडील ७०% भाग चीन मधे आहे. पुर्वेला दुरवर नजर जाते तो पावेतो फक्त भारताच क्षितीज दृष्टीस पडत... पुढे चीन मधे शिरलेला तलाव भारतातून दिसत नाही.

त्या अविट सौंदर्याचा मनसोक्त आनंद उपभोगुन आम्ही जण अंत:करणाने परतीचा प्रवास सुरु केला. येताना वाटेत आडव्या आलेल्या नाल्यांनी एव्हाना नदीचे रुप धारण केले होते. या हिमनगांच्या डोंगराळ प्रदेशात फिरताना बर्फ वितळल्यामुळे रस्ते बंद होण्याचे प्रमाण अधिक आहे. याचे भान ठेवून वेळीच परतीचा मार्ग स्विकारणे योग्य असते, अन्यथा रात्र पँगाँगच्या थंडीत काढण्याची तयारी ठेवावी लागते.

प्रचि २१

लेह टुर मधला पँगाँग हे एकमेव पर्यटन स्थळ असे आहे... जिथे पोहचण्यास पाच ते सहा तास लागतात. देशी बायकर्स सोबत बरेचसे परदेशी पर्यंटकही इथे मुक्काम ठोकतात... तर काही हौशी पर्यंटक फक्त सायकल वरुन हा खडतर प्रवास पार करतात. या त्यांच्या धैर्याला, जिद्दीला आणि मेहनतीला मनोमन सलाम ठोकून आम्ही रात्री उशिरा हॉटेलवर परतलो.

प्रचि २२

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिवेशने एक वेगळाच फतवा काढला. पँगाँग लेकच्या निळ्याशार पार्श्वभुमीवर रंगीत कपड्यातील नमुने अगदी उठावदार दिसतात... म्हणुन सगळ्यांना चटेरीपटेरी टिशर्ट घालण्याची ताकिद देण्यात आली. मग काय...>>>>>>>>>>>are mg te रंगीत कपड्यातील नमुने cha pn photo yeu det na.

धन्यवाद मंडळी

लली... Happy
चट्टेरी-पट्टेरी फोटोच्या प्रतिक्षेत होते! > जिप्सीच्या वृत्तांत दिसतीलच.. मला काही ते अँगल जमले नाहीत.

इंद्रा superb लिहिलंय , सुंदर प्रची , प्रची १. कातिल आहे.

माझा अनुभव थोडक्यात मांडत आहे.
लदाख हे नाव एकलं कि आपल्या मनात लगेच एका निळ्या रंगाच्या तलावाची प्रतिमा समोर उभी होते. कारण लेह लदाख चे प्रमुख aattraction म्हण्जेय pangong tso lake .
लेह लदाख मध्ये ५ दिवस उलटून गेले होते पण आम्ही अजूनही या लाके च्या दर्शन पासून वंचित होतो.
माझी बायको प्रज्ञा प्रवासाला फार कंटाळली होती, तिला मुळीच इच्छा नवती, अजून काही बघायची.
पण मी तिची फार समजूत काढली आणि ती pangong tso ला यायला तयार झाली.
शेवटी तो दिवस उजाडला, आम्ही सकाळी ६ वाजता निघालो फार excitement होती.
मध्ये परत एक घाट म्हणजेच pass (changala la ) लागला. अंदाजे चढून उतरून ७० किमी चा घाट आहे.
याआधी नुब्रा valley ला जाताना खारदुंग ला (१८३८० ft) या घाटा ने जीव काढला होता. त्यामुळे फार रुक रुक लागली होति.
चक्कर तर नाही येणार , उलटी सारख तर नाही वाटणार. परत डोक तर नाही धरणार. पण नशिबाने जाताना अजिबात त्रास झला नाही , altitude sickness चा.
घाट उतरल्यावर मनाला तलावाच्या दर्शनाचे वेध लगले. दूर दूर जीतावर नजर जाईल तीत्वर मन तलावाचा कानोसा घेऊ लागल . ह्या डोंगराच्या पलीकडे असेल , तो गेला कि मग अजून समोरच्या डोंगर पलीकडे असेल. सारख सारखा मनाचा पोपट होत राहिला.
वाटेत दिसणारे सुंदर landscapes कॅमेराचा triger दाबायला मजबूर करत होते.
पिवळसर डोंगर आणि त्याला लागून हिरवळ असे मस्त contrast लूक मिळत होता. मधेच वाटेत काही गाड्या उभ्या दिसल्या,
लोक उतरून एक खरू ताई सारख्या दिसणाऱ्या प्राण्याचे फोटो काढत होते, आम्ही पण वेळ घालवला नहि.
ननतर आम्ही पुढे निघालो आता तर तब्बल ६ प्रवास केला होता आणि सर्व जन lake च्या दर्शनासाठी आतुर झाले होते.
तब्बल ६. ३० तास प्रवास करून आम्ही आमच्या destination ला पोहोचलो.
गाडीत wow नावाचा गजर सुरु झाला. आम्ही सोयीस्केर अश्या जागी थांबलो आणि सर्व जन या हिमालयाच्या कुशीत घुसलो.
आणि सर्व जन या jannat जागेचा फिल घेऊ लागले.
या निळ्याशार पाण्या मध्ये पाय बुडायचं आनंद काही वेगळाच होता. या जागेचे वर्णन कदाचित कोणताच कॅमेरा करू शकणार नाही.
तरीही माझ्या कॅमेर्याने जे काही प्रची घेतले आहेत ते मी तुमच्या समोर मांडत अहे.
प्रची साठी पुढील लिंक तपासा.

http://www.flickr.com/photos/54841045@N04/

जिप्सी , इंद्रा आणि आमचा सर्व लदाख च्या मित्र परिवाराचे मनापासून आभार .