आपल्या गावचा गणपती म्हणजे आपला खास जिव्हाळ्याचा विषय... मग तो गावच्या जुन्या देवळातला असो की नव्याने बांधलेल्या मंदिरातला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा असो की आपल्या घरातला- त्याला आपण आपल्या मनाच्या गाभार्यात जपून ठेवतो. तसेच त्याची स्मृती कायमची कोरली जावी म्हणून आपल्या कॅमेर्यातही छायाचित्राच्या रुपात जतन करतो. आता वेळ आली आहे ती छायाचित्रे आपल्या मायबोलीकर मित्रांसोबत शेअर करण्याची.
तर मित्रहो, लवकर लवकर कामाला लागा आणि आपापले फोटो ह्या धाग्यावर अपलोड करा.
हे लक्षात ठेवा :
१.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या गृपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६) फोटो इथेच प्रतिसादात द्यायचे आहेत.
काय म्हणता? तुम्ही अजून काढलेच नाहीत? मग चला! लवकर लवकर फोटो काढा आणि सर्वांना दाखवा बरं!!!!
चला लोकहो, तुमच्या घरच्या
चला लोकहो, तुमच्या घरच्या बाप्पाचं दिलंत, तसंच गावच्या बाप्पाचंही लवकर दर्शन द्या! आम्ही वाट पहात आहोत..
रेडीचा स्वयंभु द्विभुज
रेडीचा स्वयंभु द्विभुज गणपती.
तालुका - सावंतवाडी, जिल्हा - सिंधुदुर्ग.
सतीश छान आहे फोटो.
सतीश छान आहे फोटो.
रेडी हे गाव कुठे
रेडी हे गाव कुठे आहे?
अष्टविनायकांच्या गावी रहाणारे कोणी माबोकर नाहीतच की काय?
धन्यवाद सतीश या सुंदर
धन्यवाद सतीश या सुंदर प्रचिसाठी.
रेडी म्हणजे गोंयचे की कोकणातले?:)
मावळंगे हे गाव पावस पासुन ६-७
मावळंगे हे गाव पावस पासुन ६-७ किमी अंतरावर आहे. तिथे एका आमराईत डागडुजी करताना एक गणेशमुर्ती सापडली. त्या आमराईतच, आमराईचे मालक शिंदे यांनी हे मंदिर बांधले.
मंदिराच्या दारातून एक झरा बारा महिने वाहत असतो. मंदिराच्या दाराजवळ दोन मोठे वटवृक्ष एखाद्या द्वारपालासारखे उभे आहेत.
अतिशय शांत, रम्य आणि छोटेसेच मंदिर आहे. गावकरी मंडळी सोडुन विशेष कोणी येत नाही. त्यामुळे कलकलाट वगैरे नसल्याने अगदी प्रसन्न वाटते.
हे बाप्पा

हे मंदिर

हे तिथेच एका झाडाच्या खोडात प्रकटलेले बाप्पा
गमभन __/\___
गमभन __/\___
गमभन, तिसरा फोटो अगदी,,
गमभन, तिसरा फोटो अगदी,, 'निर्गूण निराकार' च्या विषयाला फिट्ट आहे.
जयंत साळगावकर यांनी बांधलेल
जयंत साळगावकर यांनी बांधलेल मालवण मधील सुवर्ण गणेश मधील


चैत्राली + १ )
चैत्राली + १ )
किल्ले सिंधुदुर्ग वरील वाळुचा
किल्ले सिंधुदुर्ग वरील वाळुचा गणपती..


पुणे-बंगलोर हाय-वे वरील
पुणे-बंगलोर हाय-वे वरील कोल्हापुर नजिक ८० फुट ऊंच चिन्मय गणेश..
गणपतीच्या कपाळावर टिळा नसुन ते मधमाश्यांचे पोळे आहे..
सारा महाराष्ट्रच माझा,
सारा महाराष्ट्रच माझा, महाराष्ट्रातील सगळी गावेही माझीच
लेण्याद्री गिरिजात्मज
व्वा. कसले सुंदर आहेत प्रचि.
व्वा. कसले सुंदर आहेत प्रचि. गणपती बाप्पा मोरया ...
झाडाच्या खोडातला, पाषाणाचा,
झाडाच्या खोडातला, पाषाणाचा, सोन्याचा श्रीगणेश.. किती वैविध्य !
सगळे बाप्पा सुंदर. सर्वांना
सगळे बाप्पा सुंदर. सर्वांना नमस्कार.
चिन्मय-गणेश किती भव्य आहेना, मस्तच. मधमाशांचे पोळे टीळयासारखेच भासतेय.
वा ! छान आहेत सर्व बाप्पा!
वा ! छान आहेत सर्व बाप्पा!
लालबागचा राजा.... विसर्जनाचे
लालबागचा राजा.... विसर्जनाचे फोटो...
हे त्याचे मुखदर्शन
आणि, हे चरणदर्शन..
आणि, हे चरणदर्शन..
आणि हा आमच्या माझगावचा
आणि हा आमच्या माझगावचा राजा....
हे त्याचे मुखदर्शन..
आणि हे चरणदर्शन..
आणि हे चरणदर्शन..