मन्गलागौरीची आरती हवी आहे

Submitted by smitagogate on 27 August, 2013 - 04:06

मन्गलागौरीची आरती हवी आहे
श्रावण मास आज हा आला करु आरती चला गौरीला

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही आहे का पाहा.

जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।
रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।
मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।
तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया। ।1।।
पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।।
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।।
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली।।2।।
साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।3।।
डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।
शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।4।।
न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।5।।
सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।
करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।।6।।
लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।
मागुती परतु‍नीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।
देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।7।।

पिप, ...माझी आई ही आरती म्हणत असे त्यामुळे मला किंचितशी चाल माहीतही आहे जी पारंपारिक चाल आहे...पण आता पूर्ण चाल काही आठवत नाहीये...
नव्याने चाल लावावी तर हे काव्य अस्ताव्यस्त पसरलेलं आहे आणि त्यातले काही शब्द तर डोक्यावरून जाताहेत, त्यामुळे त्या बाबतीतही आनंदच आहे. Happy
एकूण प्रकरण, तू म्हणतेस तसे कठीणच आहे.

या आरतीतल्या काही शब्दांचे अर्थ कळत नाहीत.

जसे अयोषण, सोळा तिकटीं, नंदेटें तगरें, पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली, माउली मंगळागौर भिजवूं विसरली

कोणाला या शब्दांचे अर्थ माहिती आहेत का?

मला वाटतं हि आरती मोहनतारा अजिंक्य यांच्या आवाजात आहे.
चल ग सये वारुळाला, हे पण गाणे त्यांच्या आवाजात ऐकल्याचे आठवतेय.

अवांतर, त्या आमच्या घरमालकीण होत्या.