रुद्र

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 22 May, 2013 - 14:22

रुद्र ही एक वैदिक देवता आहे. रुद्राचा अविष्कार हा ऋग्वेदापासून आहे,ऋग्वेदात रुद्राचे एकूण ७५ उल्लेख आहे ही देवता शंकरात नंतर विकसित झाली. रुद्र हा शब्द रोदीती अथवा रोदयति अर्थातच रडविणारा या शब्दावरून आला आहे.या देवतेचे वेद्पश्चात शंकर ,शिव यांच्याशी एकीकरण झाले आहे ते फार नंतरचे.रुद्राचे मूलस्वरूप हे फार भीषण ,हिंसक असे आहे, त्यामुळे भक्त त्याला सतत विनंती करतो की माझ्यावर दया कर ,मला मारू नकोस,प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे. रुद्राचे दुसरे स्वरूप भद्र म्हणजे कल्याण करणारा असेही आहे म्हणून रुद्रसूक्त हे त्या भद्र रुपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्नी स्वरुप आहे तसेच जल स्वरुप आहे. तो पंच महाभुतांचा अधिपति आहे. रुद्र हा नागर संस्कृतिच्या आधीपासून सनातन धर्मात अस्तित्वात आहे.

रुद्रसूक्त हा यजुर्वेदाच्या तैतेरीय संहितेचा भाग आहे.आपल्या समाजात रुद्र सूक्ताच्या पठाणाची एकादशणी आणि लघुरुद्र ही दोन रूपे जास्त प्रचलित आहेत.याचीच विस्तरीत आवृत्ती म्हणजे महारुद्र आणि अतिरुद्र होत.एकादशणी मध्ये रुद्र्सुक्ताच्या ११ आवृत्या करायची पद्धत आहे आणि पुढील रुपात आवर्तनाची संख्या ११ च्या पटीत वाढत जाते. लघुरुद्र करताना १२१ आवर्तने होणे आवश्यक असते म्हणून ११ पुरोहित असतात. ११ पुरोहित ११ वेळा पाठ करतात . रुद्र्सुक्तात रुद्राची १०० नावे आहेत म्हणून या सुक्ताला शतरुद्रीय असेही म्हणतात. श्रावणी सोमवार , महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात

रुद्र्सुक्ताचे दोन भाग आहेत :
१] अकरा नमके ज्यात रुद्राच्या नावामागे वंदन असो याअर्थी " नमः"असे पद येते.नमकात आधी देवतेची स्तुती केली जाते आणि त्या स्तुतीने ते अकरा रुद्र प्रसन्न झाले की मग उत्तरार्ध येतो.

२] अकरा चमके म्हणजे ज्यात "च मे " हे शब्द आहेत ज्याचा अर्थ हे मला हवे अथवा मला हे दे.चमकामध्ये स्तोत्रपठण करणारा किंवा करविणारा मग त्या रुद्रांकडे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागतो.
चमक आणि नमक ही नावे पुराणकाळात रूढ झाली,त्याचा व्याकरणाशी संबंध नाही.

याशिवाय रुद्रसुक्ताचा भाग नसलेला "ओम शान्तिः शान्तिः शान्तिः " हा शांतीमंत्र सुरुवातीला आणि शेवटी म्हणतात. घरात सर्वसाधारणपणे होम करतात आणि होमाला या सूत्राच्या आवर्तनाची जोड दिली जाते. ११ रुद्र असल्याने ११ या संख्येला महत्व आहे असे दिसते .सर्वसाधारणपणे लघुरुद्राला ११ ब्राह्मण असतात [अर्थात हे आवश्यक नाही पण तसा रिवाज आहे .] एक ब्राह्मण एक नामक मोठ्याने म्हणतो आणि बाकीचे मनात म्हणतात ,अश्या रीतीने नमकाची ११ आवर्तने झाली असे मानतात . ११ वेळा नमके झाली की एकदा चमकाचा पाठ केलाजातो. आपल्याकडे एक फार चुकीची समजूत आहे की श्लोकाचा अर्थ समजावून घेऊन पठण केले तर फळ कमी मिळते त्यामुळे बरेच याज्ञिकी करणारे अर्थ न समजता नुसताच मौखिक पाठ करतात.

यजुर्वेदकाळातही चोर,डाकू ,दरोडेखोर होते आणि त्यांचे नियंत्रण /त्यांच्यापासून संरक्षण करणे हे काम रुद्राला दिले आहे, फसविणाऱ्या,लबाड लोकांचे ,तलवारी घेऊन हत्या करणाऱ्या चोराचे ,वाटमाऱ्याचे इत्यादीचे पालकत्व रुद्राला दिले आहे. [नमक ३]

तसेच मर्दानी ,घाव घालणाऱ्या स्त्रियांचे,विषयलंपट ,टोळ्या आणि त्यांचे पुढारी , भूत आणि इतर गणांचा अधिपती ज्याचे अक्राळ विक्राळ आणि नानारुपधारी असे अनुयायी आहेत,कुंभार,लोहार,पारधी ,कोळी,शिकारी इ.चा नायक अशीही स्तुती आहे. [नमक ४ ]

सृष्टीवर पूर्ण प्रभुत्व असणारा,वाळवांटात ,बर्फात,धुळीत,खडकात ,जमिनीवर आणि हिरवळीवर असणारा अशी पण स्तुती आहे [नमक ९ ]

त्याचे फार मोठे सैन्य आहे ,आणि आळवणी जी केली जात आहे ती अश्या या सामर्थ्यवान देवाने आपल्याला त्रास देणार्‍या शक्तींपासून आपले रक्षण करावे , कृपा करावी म्हणून हे सुक्त आहे.

आता भक्त ज्या वस्तू त्या काळास अनुसरून मागतो आहे ती यादी बरीच लंबीचौडी आहे आणि एकदा नजरेखालून घालण्यासारखी आहे.त्यात तांदूळ,सातू,मका ,उडीद ,तील,मूग,हरभरे इ.इ. धान्य मागितली जात आहेत.सोने ,लोखंड ,शिसे,बीड,जस्त, कथील हे धातू मागितले जात आहेत .यावरून आपल्या पूर्वजांना हे धातू वेदकाळात माहिती होते हे सिद्ध होते .पूजेचे सामान,यज्ञाचे सामान मागतो आहे. सुक्तपठनकर्ता दूध ,तूप ,मध इ.मागतो आहे.दीर्घायुष्य ,औषधे,सुंदर कांती,धनसंपदा,शेती हे पण मागतो आहे. तसेच आयुष्य ,प्राण,अपान,चक्षु ,कान,मन वाणी,आत्मा इत्यादींची पुष्टी मागतो आहे.

तसेच विषम संख्याची भाजणी ,चारच्या पाढ्याची भाजणी हे मांडून याच्या पटीत सौख्य मागतो आहे. त्यावरून त्याकाळचे गणिताचे ज्ञान दिसते.

रुद्र्सुक्तात मागितलेल्या सर्व गोष्टी या ऐहिक जीवनात उपयोगी पडणाऱ्या आहेत,पारमार्थिक नाही.सुक्तकार हा धनधान्य ,घरदार,बायकामुले,गुरेढोरे ,शेती इ. सगळ्या गोष्टी मागतो आहे ,द्युतासारखी क्रीडाही मागतो आहे.सुक्तकाराच्या पारलौकिक मागण्या या स्वर्गापर्यंत सीमित आहेत.रुद्राचे भयंकर सामर्थ्य आणि सैन्य हे आपल्या शत्रूवर वापरले जावे ही इच्छा तो व्यक्त करत आहे.

हा एक रुद्राचा साधासुधा भक्त आहे ज्याला जनावरे , रान, शत्रू ,चोर,दरोडेखोर आणि रुद्रासारखे भीषण दैवत यांची भीती आहे. हे सुक्त हे रुद्राशी बोलणे आहे ,ज्यात सुक्तकार आधी स्तुती ,आळवणी करून मग आपल्याला काय पाहिजे त्याची यादी देत आहे.हा रुद्र्सुक्तातला लपवालपवी न करणारा साधेपणा फार लोभस आहे. रुद्रसुक्ताचे पठण हा एक अनुभव आहे जेंव्हा उपस्थित ब्रह्मवृंद जर तयारीचा असेल आणि त्यांनी सूर बरोबर लावला असेल तर घनगंभीर आवाजात हे सूत्र जरी बव्हंशी गद्य असले तरी कोसळत येते. त्यात होम ,सोवळे आणि इतर वातवरण निर्मिती जर व्यवस्थित असली तर त्यानंतर कुठेतरी दैवी अनुभव येतो .

या सूक्ताचे पठन करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत, त्यामध्ये एकादशीनी , लघुरूद्र ,महारुद्र ,अतिरुद्र इत्यादि प्रयोग आहेत . श्रावणी सोमवार , महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात .

*(काही संदर्भ फेसबुक /आंतरजाला वरुन साभार )

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती! Happy

>>>>> आपल्याकडे एक फार चुकीची समजूत आहे की श्लोकाचा अर्थ समजावून घेऊन पठण केले तर फळ कमी मिळते त्यामुळे बरेच याज्ञिकी करणारे अर्थ न समजता नुसताच मौखिक पाठ करतात. <<<<
या विधानाबाबत अधिक विचार अन अभ्यास करावा लागेल. मी अशी समजुत असल्याचे पाहिले नाहीये, पण जर ती असेल, तर शब्द उच्चारातून नि:ष्पन्न होणार्‍या "मन्त्रशक्तिचा" विचार करता ती चूकही आहे असे नाही. माझ्या अनुभवाप्रमाणे, संपुर्ण सूक्ताचे भाषान्तर/अर्थ बघितला तर तो अतिसामान्य आहे. कोणतरी श्रेष्ठ आहे, तो का श्रेष्ठ आहे याचे वर्णन, त्याचेप्रती निष्ठा, व त्याचेकडे काही मागण्या! हे तर प्रत्येक्जण आपल्या आईबापान्कडे/बाबत करतच असतो, त्यात नविन काये? अन हा असा विचार "अर्थ" माहित असेल तर नक्किच मनात प्रकटून, आवर्तनातील शब्दोच्चारातील आत्मिक शक्तिच हरण्यास कारण होणार. प्रत्यक्षात, केवळ अक्षरे/शब्दोच्चार विशिष्ट पद्धतीने मोठ्याने करित गेल्यास माझ्या अनुभवाप्रमाणे तरी प्राण शब्दशः डोक्याचे (मस्तकाचे) वरील अर्ध भागात (ताळूजवळ) केन्द्रित होताना जाणवतो. श्वास वरचा वर व खालचा खाली रहातो, व बाकी देहाचे भान सुटते. माझ्यामते, वरील समजुत असेलच, तर "माहित झालेल्या/असलेल्या" अर्थामुळे "मन्त्र" उच्चारण्यात्/आवर्तने करण्यात बाधा येऊ नये हेच कारण असू शकते. थोडक्यात म्हणजे अर्थ माहित होण्यातील अतिपरिचयात अवज्ञा मन्त्राच्या सामर्थ्यास बाधा आणू शकेल असे वाटते. केवळ भक्तिभावाने स्तुतीपर व मागण्यान्करता अर्थासहित सूक्त म्हणणे, हा वेगळा विषय, व मन्त्राधारित शक्तिन्करता त्याच सूक्ताचा शब्दोच्चार विशिष्ट उच्चारात/लयीत/तालसूरात म्हणणे हा वेगळा विषय आहे असे मला वाटते. असो.
जाणकार अधिक खुलासा करतीलच.

धन्यवाद लिंबूजी ,

रुद्रसुक्ताचे पठण हा एक अनुभव आहे जेंव्हा उपस्थित ब्रह्मवृंद जर तयारीचा असेल आणि त्यांनी सूर बरोबर लावला असेल तर घनगंभीर आवाजात हे सूत्र जरी बव्हंशी गद्य असले तरी कोसळत येते. त्यात होम ,सोवळे आणि इतर वातवरण निर्मिती जर व्यवस्थित असली तर त्यानंतर कुठेतरी दैवी अनुभव जाणवतो....ह्याचा अनुभव जरूर घ्यावा

खुपच छान माहिती!!

आजच्या या बाजारू जगात खरा वैदिक मिळणे दुर्लभच. मग असा तयारीचा ब्रह्मवृंद सापडणे आणि रुद्रासारखा मंत्रघोष ऐकायला मिळणे म्हणजे भाग्याचीच गोष्ट आहे.

छान लिहिलेय स्वामीजी.रुद्र या संकल्पनेबद्दल अजून वाचायला आवडेल. रुद्रसंहितांमधील शिवस्तुती हाही जिव्हाळ्याचा विषय.

स्वामीजी,

>> रुद्र हा शब्द रोदीती अथवा रोदयति अर्थातच रडविणारा या शब्दावरून आला आहे.

मला वाटलं की द्रव या धातूवर रुद्र हा शब्द बेतलेला आहे. चूभूदेघे!

लेख छान आहे. माहितीपूर्ण आणि रंजक! त्यानिमित्त धन्यवाद! Happy

आ.न.,
-गा.पै.

स्वामीजी ! प्रणाम !

वातवरण निर्मिती जर व्यवस्थित असली तर त्यानंतर कुठेतरी दैवी अनुभव जाणवतो....ह्याचा अनुभव जरूर घ्यावा > > > > खरी गोष्ट आहे, हा अनुभव आलेला आहे, माझे रोजच्या पूजेत रुद्राध्याय म्हणत असतो, चालीवर म्हणतांना शब्दांच्या उच्चारणाचीही खूप काळजी घ्यावी लागते, आणी त्यामूळे तर आणखीनच आपलेपणा, आवड, उत्साह असतो वाचतांना. तुम्ही जो विदित केलेला अनुभव आहे तो मात्र ईथे शब्दांत सांगता येणार नाही. हा अनुभव आणखीन काही श्लोक व स्तोत्रे म्हणतांनाही येत असतो. रोज पूजा करतांना मन खूपच प्रसन्न आणी अगदी आधांतरी असल्यासारखं वाटतं.

तसा हा विषय खूपच छान आहे, आणखीन सांगाना रुद्रा बद्दल ? अगदी खूप जीव्हाळ्याच्या कोणाबद्दल ऐकल्यासारखं वाटतं हो !

लींबूटींबू, कसे आहात ? बरेच दिवसांनी ?

तुन्ही डोक्यावरच्या टाळूच्या भागाबद्दल म्हणता त्याला बहुतेक " ब्रह्मरंध्र", असे नांव आहे ( आंग्ल भाषेत governing arsh ). हा भाग षट्चक्र भेदन करतांना सहा भागांच्या सर्वांत वर असतो. जर कोणाला ह्या भागावर वा जवळ असे अनुभव येत असतील तर माझ्यामते हे खूपच उत्तम कारण हा प्रकार कुंडलिनी जागृत करतांना होत असतो. एकच काळजी ही घ्यावी हा प्राण जो टाळुच्या भागावर एकत्र झाल्यासारखा वाटतो, तो ह्या ब्रह्मरंध्राच्या बाहेर जाउ देउ नये, त्याचा अर्थ, प्राण शरीराच्या बाहेर आला असा आहे.

सर्वांस, नमस्कार ||

रावण - आल्यामुळे रडवतो तो
रुद्र - गेल्यामुळे रडवतो तो

शब्दौत्पत्ती माहित नाही.

परब्रह्म, त्याला ब्रह्मरंध्रच म्हणतात. तिथेच सहस्रार चक्र असते.
कुंडलिनी मूलाधारात असते ना? ती उर्ध्वदिशेने जाऊन सहस्रारात परिणाम दाखवते का? कुंडलिनी जागृत करतात म्हणजे काय असतं ते माहित नाही, तेवढी कुवत नाही आणि तसा काही प्रयास करायची इच्छाही नाही. उत्सुकता म्हणून विचारते आहे.

साईसच्चरितात म्हटल्याप्रमाणे साईनाथांनी प्राण ब्रह्मांडी लावले होते आणि परत येईपर्यंत माझे शरिर राखून ठेव असे म्हाळसापतींना सांगितले होते. म्हाळसापतींनी त्याचे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन ते ३ दिवस राखले होते. त्या ३ दिवसांत त्यांना पुत्रशोक झाला होता तरी त्यांनी सद्गुरुआज्ञापालन केले. ह्याचा अर्थ सद्गुरुंनी ते ब्रह्मरंध्राबाहेर नेले आणि परत आणले असा होतो ना? अर्थात ती गोष्ट सामान्यांच्या अवाकातली नाहीच, कितीही श्रेष्ठ योगाभ्यासी असला तरी. ती फक्त सद्गुरुंचीच कपॅसिटी.

अश्विनी,
कुंडलिनी मूलाधारात असते ना? ती उर्ध्वदिशेने जाऊन सहस्रारात परिणाम दाखवते का? कुंडलिनी जागृत करतात म्हणजे काय असतं ते माहित नाही, तेवढी कुवत नाही आणि तसा काही प्रयास करायची इच्छाही नाही. उत्सुकता म्हणून विचारते आहे.
> > > >
तुमचा एक प्रतिसाद , तारिख - १७, नोव्हेंबर, २०१२, पुराणातील कथा . . .

हनुमंत मानवा सोबत महाप्राण बनून सुषुम्ना नाडीत असतात. कुंडलिनी ही महाप्राणाची माता अंजना आहे. महाप्राणाचा प्रवास उर्ध्व दिशेने म्हणजेच मुलाधारापासून सद्गुरुंचे स्थान असणार्‍या सहस्रारापर्यंत असतो. सर्व इंद्रियांना आवश्यक असणारी ऊर्जा ही या महाप्राणाच्या अधिपत्याखाली असते. म्हणूनच जितेन्दियं बुद्धिमतां वरिष्ठम.

वरील दोन प्रतिसादांची कृपया सांगड घाला . . . .
-------
बाकि आता उर्ध्वदिशा कशी आणी कुठे म्हणावी हे आधी पाहिले पाहिजे. कुठलिहि शक्ति शरीराच्या घडणीप्रमाणेच आपला प्रभाव दाखविणार. माणसाला जर उलटे लटकवुन जरी ठेविले तरीही ही शक्ति ब्रह्मरंध्रा कडेच जाणार, मग आता ही दिशा अर्ध्व झालीना ?
कुंड लिनी जागृत करण्याचा मूळ उद्देश्य ( पुन्हा एकदा हेच सांगतो - ही एका सुषुप्तावस्थेतली शक्ति चेतनावस्थेत घेऊन येण्याची क्रिया ज्यामुळे आपला मेंदु बुद्धिच्या द्वारे ह्या शक्तिची नोंद घेतो, ओळखतो ) अंतरातील परमात्मा ओळखणे हा आहे ( म्हणजेच स्वतःचे खरे आणी सत्य स्वरुप ओळखणे ), आता अश्या शक्ति जागृत केल्याने त्यांचे आणखीही काही फायदे मनुष्य घेउ शकतो, ह्याचा अर्थ असा नव्हे कि त्या दुसर्‍याच फायद्यांसाठी ही विद्या आहे.
चराचरातील सर्व विद्यांचा अंतिम आणी मूळ उद्देश्य हा एकच असतो, मार्ग वेगळे असु शकतात.
---------
हनुमान हे उत्तर दिशेला पर्वत राशींमध्ये एकांत वासात आहेत, त्यांची माता अंजनी ह्यांना परमगति प्राप्त होऊन गेली त्रेता युगात.
--------
ह्या शरीरांत फक्त परमतत्वाचेच अस्तित्व असते, सदगुरु चे स्थान हे सहस्त्रार चक्र असे काहिही नाही.
ही एक फार पवित्र विचारधारा आहे, विदीत केल्याप्रमाणे वेद-शास्त्रांमध्ये.

सत्य असे आहे कि आपल्या शरीरात मन, विचार, बुद्धि असे जे वर्ग आहेत त्यांचे कार्य आपल्या मेंदूशी फार जवळचे असते, आपल्या वेद-शास्त्रांनी सांगितल्या प्रमाणे नेहेमी देव, आपले गुरु, आणी तत्सम विभुतिंचे ह्यांचे स्मरण असावे . . . . हे स्मरण करणे ह्या मेंदुचे कार्य आणी म्हणुन हे सर्व आपल्या शरीरांत तिथे वास करतात ते विचार रुपाने.
सदगुरु हा एक परमहंस पद प्राप्त झालेला मनुष्य असतो . . . . त्याने आपले म्हणजे परब्रह्माचे स्वरुप ओळखलेले असते, म्हणजेच तो ब्रह्मस्वरुप झालेला असतो, आणी आपले प्रारब्धकर्म संपेपर्यंत तो आपले ज्ञान सर्वांना वाटत असतो तेही कुठलिही फलाची इच्छा न ठेवता. . . . म्हणजेच जेव्हा त्याचे शरीर सोडुन त्याचा आत्मा परमात्म्यात विलीन होतो, तेव्हा त्याची पुढे कुठलाही जन्म वा, मधली कुठली अशी स्थिती नसते कितिथुन तो आपणा सर्वांवर कृपा करीत राहु शकतो.

अश्विनी . . . . अश्या विभुति जेव्हा ईहलोक सोडुन जातात तेव्हा मध्ये कुठेही राहात नाहित. ते फक्त विचार, आठवण रुपाने आपले प्रतिबींब मनात सोडुन जातात.

आणी हो . . . . मुक्त होणे म्हणजे आत्म्याला कुठेतरी जावे लागते त्यासाठी असे नाही, चराचरात परब्रह्म असते, आणी त्यात विलीन होतांना कुठेही जावे लागत नाही, शरीर आहे तिथेच तो मुक्त होतो.

परब्रह्म,
मी ते श्री हनुमंतांबद्दल लिहिले होते. ते उत्तरेत कुठे असतात का माहित नाही, पण महाप्राण म्हणून आपल्यातही असतात. कुंडलिनी कशी सहस्रारात गेली किंवा जाते का ते खरंच मला माहित नाही.

शेवटचे तीन परिच्छेद पटतायत पण साईनाथांच्या कथेत नक्की काय झालं असावं? एक जिज्ञासाम्हणून आजच इतक्या वर्षांनी हा प्रश्न मनात आला ब्रह्मरंध्राचा विषय निघाल्यामुळे. नाहितर सद्गुरुतत्व चराचरात भरलेले असतेच. त्याला रुपाच्या, काळाच्या, गुणाच्या मर्यादा नाहीत. केवळ देह धारण केल्यावर देहाच्या मर्यादा म्हणून त्यांना ते शरिर राखणे वगैरे करावे लागले असेल.

रुद्र ह्या विषयापासून आपण भरकटतोय म्हणून मी इथेच थांबते Happy

अश्विनी . . . . पुढे . . . .

ह्याचा अर्थ सद्गुरुंनी ते ब्रह्मरंध्राबाहेर नेले आणि परत आणले असा होतो ना? अर्थात ती गोष्ट सामान्यांच्या अवाकातली नाहीच, कितीही श्रेष्ठ योगाभ्यासी असला तरी. ती फक्त सद्गुरुंचीच कपॅसिटी. > > > >

मी सुद्धा हेच सांगितले कि प्राण ब्रह्मरंध्राच्या बाहेर आला म्हणजे त्याने शरीर सोडले असा आहे. साई बाबांनी म्हणुनच सांगितले कि माझे शरीर राखून ठेव, कारण त्यांचे कार्य अजुन बाकि होते ते करणे कर्तव्य होते.
हि शक्ति प्रत्येक मनुष्य प्राण्याला मिळालेली आहे. ज्यांना अश्या शक्तिंचा चांगला कल्याणकारी उपयोग करता येतो तो सदगुरु, जो स्वार्थासाठी वा वाईट गोष्टींसाठी करतो तो ? कोण ?

सांगायचा उद्देश्य हाच कि आपण सर्वजण हे करु शकतो म्हणुनच सर्वां मध्यी ती " कॅपॅसिटी ", आहे.
" केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे " . . . .

अहो जास्त काय सांगु आता ?

परब्रह्मच सदगुरु च्या रुपांनी जेव्हा जेव्हा अवतरतो तेव्हा हेच दाखवतो ना कि मी सुद्धा माणुसच आहे ? आणी मी ज्या पातळीवर पोहोचु शकतो तिथे सर्वच पोहोचु शकतात !

मग त्यांना खर्‍या अर्थाने " फॉलो ", करायचे म्हणजे त्यांच्या मागे-मागे कृपा असु द्या, रक्षण करा, सद्-बुद्धि द्या, हे द्या - ते द्या, मी हे करीन आणी मी ते करीन . . . . असंच करीत राहायचं ? आणी ते गेल्यावर त्यांच्या मूर्ति आणी फोटोंना पुजून पुन्हा तेच मागत राहायचं वा म्हणत राहायचे जे त्यांच्या शरीरावस्थेत असतांना म्हणत असायचे ?

माझे मत ईथे वेगळे आहे . . . . ( त्याशी तुम्हाला काही कर्तव्य नाही हे मला ज्ञात आहेच ), तरीही बोलतो . . . . आपले गुरु जे करुन दाखवुन गेले ते त्यांच्या हयातीत त्यांच्या कडुन शिकुन घ्यावं, त्यांच्या बरोबर त्याचा अभ्यास करत राहुन त्या शक्तिंवर आपणहे आपल्या गुरुंसारखेच स्वामित्व कमवावे, आणी पुढे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवुन परब्रह्मात विलीन व्हावे . . . .
तेव्हढी कुवत नाही असे म्हणुन त्या परमेश्वराची अजाणतेपणाने अवहेलना होते. त्याने घडवलेच आहे आपणा सर्वांना ह्या सर्व कुवती बरोबर. आपल्याला फक्त ज्ञानाने ते जाणुन घ्यायचे आणी ह्याचा अभ्यास आपल्याला आपले गुरु करवुन देतात. खरे गोष्ट ही आहे कि घर- संसार- प्रपंचात अथवा ह्या जगात आल्यावर आपणा सर्वांना ह्या बाकिच्या भौतिक गोष्टींचा जो मोह होऊन त्यात आपण गुरफटुन जातो, आणी मग कुठल्यातरी विभुतींना नंतर गुरु मानुन त्यांना गळ घालत राहातो कि , हे करा, ते करा !
ही कुवत आहे आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणी संसारात राहुनही हे आपण करु शकतो . . . .
आपले सर्वच गुरुवर्ग काही ब्रह्मचारी नव्हते, ज्ञानेश्वर ब्रह्मचर्यातच परब्रह्मात विलीन झाले ( समाधी घेऊन -प्राण शरीराबाहेर काढुन . . . . तुकाराम तर पती आणी पिता दोन्ही होते ना ? अहो ते तर सदेहच वैकुंठाला गेले ना ? ) . . . . एव्हढेच काय ? श्रीकृष्णाने तर कलियुगात होण्यार्‍या परिस्थीतींना जाणुन हे सुद्धा दाखवुन दीले कि तुम्ही संसार भोग भोगुन सुद्धा कर्मयोगी वा मुक्त राहु शकता.

स्वामिजी . . . . नमस्कार,

मग ते रुद्राक्ष जे आहेत, त्यांचा भगवान रुद्राशी वा भगवान शंकराशी काय आणी कसा संदर्भ लावावा ?

कारण खरे ते काय आहे हे जाणुन घेण्याची मला खूपच इच्छा आहे, कारण उगाच लोक म्हणतात

म्हणुन काही मानावे जन्मभर आणी शेवटी हे कळावे कि आजपर्यंत चुकिचेच काही समजत राहिलो ,

गोष्टींमागचा खरा संदर्भ ( बेसिक कनसेप्ट ), वेगळाच आहे तर गडबड होऊन जाईल. कृपया प्रकाशीत

करावा हा मार्ग . . . . धन्यवाद

छान चर्चा चालू आहे. थोडेफार विषयान्तर वाटते, पण तसे ते नसावे. अंतिमतः रुद्र पठण वा शिवोपासना तरी शेवटी कशासाठी आहे? तिकडेच तर विषय जातोय, अन पाणी जसे उतारालाच जाणार तसेच हे देखिल. असो.
वर सहस्रारचक्र, कुंडलिनी वगैरेचे बरेच उल्लेख आहेत, माझा त्यावर फारसा अभ्यास नाही, मात्र मला एक सत्य जाणवले आहे, ते म्हणजे असे बघा, की, समोरिल व्यक्ति काळीशार चिन्च हातावरिल पान्ढर्‍या बारीक मीठात बुडवुन चाखत माखत चाटत खाऊ लागलीये... बघा बघा, बघणे दूर, हे वाचेस्तोवरच तोन्डात पाणी आले असेल.
तर असे हे पाणी येणे ही झाली पूर्वानुभूती! चिन्चमीठाच्या केवळ उल्लेखानेही ही अनुभूती जितक्या सहजपणे पुनःप्रत्ययास येऊ शकते, तितक्याच सहजपणे स्वदेहातच स्थित इश्वरीतत्वाचे अनुसंधान केल्यास समाधीवस्थादेखिल व्हायला हवी. यामुळेच निव्वळ नामस्मरण वा भक्तिमार्गही सामान्यान्करता श्रेष्ठ मानला असावा.
कारण काहीसे वर म्हणल्या प्रमाणेच, प्रत्येक मानवी जीवात या अनुभूतीच्या पुनःप्रत्ययाची पक्षी समाधीसाधनेची शक्ति जन्मतःच असते. प्रश्न असतो तो मन बाह्य भौतिक व्यापातुन बाहेर काढून आंतरिक एकाग्र होण्याचा. म्हणले तर फार सोपे, म्हणले तर फार अवघड!
आता असे व्हायला हवे, तर काही पथ्येही आलीच. जसे की चिन्चेची आठवण होताच तोन्डाला पाणी सुटते, पण त्यावेळेस चिन्चेच्या प्रत्यक्ष अस्तित्वाबद्दल, मिळण्यानमिळण्याच्या शक्याशक्यतेबद्दल वा अजुन कसल्याही प्रकारे चिन्चेबद्दल आपल्या मनात शन्काकुशन्का नसतात. पण तेच जर इश्वराची आराधना नामस्मरण वा कोणत्याही मार्गाने अनुसंधान करायचे असेल तर मात्र शब्दशः शेकडो शन्का कुशन्का मनात उद्भवू लागतात, तो आहेच का? असेलच का? माझे ऐकायला त्याला वेळ असेल का? ऐकलेन तरी तो प्रतिसाद देईल का? प्रतिसाद दिलान तरी तो मला साजेलसा, मला भावेलसा असेल का? वगैरे वगैरे.... अन होते काय, की या सर्व वेळेस "मी" विसरलाच जात नाही. चिन्चेच्या वेळेस केवळ चिन्च आठवत असते, अन पाणी सुटते, ती मीच खात असतो/खातोय असेही नसते, तरीही ती तद्रुपता साध्य होते, मग चराचर सृष्टीबरोबरच, प्रत्यक्ष माझ्यात देखिल असलेल्या परमेश्वरी अस्तित्वाशी अनुसंधान बान्धताना मीपणा/अहं आड का यावा? मी उत्तर शोधतोय, यावर मात कशी करायची ते बघतोय. मला उमजलेले गृहितक हेच की जर केवळ चिन्चेच्या आठवणीनेही माझ्या तोन्डास पाणी सुटत असेल, तर केवळ इश्वराच्या एखाद्या रूपाच्या/वा अरूपाच्या आठवणीनेही मला त्याचे अस्तित्वाची जाणिव/अनुभुती मिळायला हवी.

असो.

लिंबू टिंबू ! ! !

कसे आहात ?

त्याला ओळखण्यासाठी आधी आपल्याला स्वतःला ओळखणे आवश्यक आहे. आणी जर तुमच्यासारख्या ज्ञानी मनुष्यास जर हे सर्व मूळ ज्ञान ( वेद्-शास्त्रे, अध्यात्म, परमतत्व, प्रकृती ), आहेच तर वेळ कशाला घालवावा जास्ती ?

तुमच्या मनात कुठेतरी खोलात एक सूक्ष्म अशी वेदना आहे जी बहुतेक तुम्हाला नेहेमी मनाच्या पातळीवर येऊन त्रास देत असावी. असेल तर आधी त्यावर पाणी टाका.

आपले शरीर हे मायेच्या आधारे निर्मिलेले आहे, आणी ज्याला आपण प्राप्त करुन घेऊ इच्व्छिता आहात तो ह्या मायेच्या खूप पलिकडे आहे, म्हणजेच हे मायेचे सर्व आवरण बाजुला सारुन "त्या", ला ओळखणे.

१). तो सर्व चराचरात पूर्ण भरुन राहिला आहे, त्याच्या शिवाय काहिही नाही, हे ध्यानात आणा, जो तुमच्या शरीरात आहे ( मी लिंबूटिंबू, आणी तो माझ्या शरीरात आहे असे अजिबात नाही ). . . . .

२). तर मी त्याच एकाच परमात्म्याचा अंश म्हणजे आत्मा, ह्या शरीरात आहे ज्याचे नांव लिंबूटिंबू आहे . . . .हा विचार ईथे आवश्यक आहे.

३). मी म्हणजे ह्या शरीरातला आत्मा, हे आत्तापासुन अभ्यासायला सुरुवात करा . . . . असे केले कि तुमचे तुम्हालाच अनुभव येईल कि "तो", आणी "तुम्ही", ह्यांत केवळ एक ह्या दृश्य शरीराचाच फरक आहे.

४). देवाला मंदिरात जातांना . . . . मी मंदिरात जातो आहे त्याच्या दर्शनासाठी असे "न", विचार करता फक्त " मी जरा मंदिरातुन जाऊन येतो", असा विचार आरंभ व्हावा नेहेमीसाठी.

५). देव दर्शन करतांना देवा, तु देव आणी मी मनुष्य ( लिंबूटिंबू ), तुझ्या दर्शनासाठी आलो असा विचार करायचा नाही . . . . तर माझ्या अंतरंगातले, ह्या शरीरातले तुझे रुप मंदिरातही डोळे भरुन पाहुन घ्यावे म्हणुन आलो . . . . असा विचार आणी आचरणही हवे आहे.

६). आपण देवाला, देवा तु - आणी मी - मी, असे द्वैत भावनेने पाहिले, वा असा विचार केला रे केला, कि हा अनंत अंतर दूर झालाच म्हणुन समजावे . . . . जसा भाव, तसा देव !

७). लिंबूटिंबू ! ! ! मला खरे तर चिंच आवडत नाही हो ! मग आता ह्या शरीराच्या तोंडात पाणी कसे येणार ? सगळ्यांच्या तोंडाला पाणी आले आणी माझ्या ह्या शराराच्या तोंडाला नाही आले म्हणजे मला आता ह्या चिंचेची आवड निर्माण करणे आवश्यक आहे ना ?
तरच मग जे सगळ्यांच्या तोंडी तेच ह्याही तोंडी होईल . . . .अभ्यास हवा आहे.

८). आता हळु-हळु त्याच्या बरोबर मनोमन संवाद साधायला सुरुवात करा. बोला त्याच्याशी . . . .

लिंबूटिंबू . . . . ! ! ! हा तुम्हाला चक्क जाणवायला लागेल ( मनाने दिलेल्या उत्तरांना त्याची उत्तरे समजायचे नाही. . . . कारण "तो", निर्गुण आहे, आणी उत्तरे द्यायला कुठल्या -ना-कुठल्या गुणांची आवश्यकता असते ). त्याला संवाद साधतांना जाणावे लागेल, ऐकावे नाही.

९). रोज सकाळी पूजा करा ( छोटी-मोठी जी काय असेल ती ), आणी उजव्या तळ हातात आपण आचमनाकरीता घेतो तेव्हढे पाणी घ्या त्याउजव्या तळहाता खाली डावा तळहात ही लावा. . . .देवा समोर ( तो विष्णु चा कुठला ही अवतार असावा. . . . राम, कृष्ण, विष्णु, बाळकृष्ण, नृसिंह, दत्तात्रय ). . . .उभे रहा ( वा बसा ), देवाकडे शक्य तितक्या स्नेहार्द्र दृष्टीने बघावे, ओठांवर एक मंद हास्य आणा . . . .

म्हणा . . . . "हे परमपित्या परमेश्वरा ! हे श्रीकृष्ण, श्रीराम, श्रीहरि, नारायणा ! मी आत्तापर्यंत काया, वाचा, मन, इंद्रीये, बुद्धी ह्यांनी केलेली सर्व कर्मे तुला अर्पण करतो !" . . . .असे तीनदा म्हणुन हातातील ते जल देवाच्या हातावर ( आणखीन कुठेही नाही ), सोडुन द्यावे.

देवाला नमस्कार करावा, म्हणावे " सर्वांचे कल्याण असो !" आणी रोजच्या कामाला लागावे.

१०). आयुष्यात ह्यापुढे सर्व काही खातांना, पीतांना आणी केव्हाही खातांना, पीतांना " श्री कृष्णार्पणमस्तु ", असे म्हणुनच ते पुढे ग्रहण करावे. ( अगदी मांसाहारी, मद्य असलेकाही असले तरीही ).
नुसते पाणी जरी आपण प्यायला लागलो तरी " श्री कृष्णार्पणमस्तु ", असे म्हणण्याची संवय लागली पाहिजे.

तुम्हाला तुमचा अहं , मी पणा पुढे कधीही आड येणार नाही . . . . पण हे खरोखर करायला हवे.

| कल्याणमस्तु |

see you around ! Happy

नमस्कार . . . .

1.<< साईसच्चरितात म्हटल्याप्रमाणे साईनाथांनी प्राण ब्रह्मांडी लावले होते आणि परत येईपर्यंत माझे शरिर राखून ठेव असे म्हाळसापतींना सांगितले होते>>
याचे स्पष्टीकरण असे की ते एक प्रकारचे astral projection असू शकेल .

2. <<कुंडलिनी मूलाधारात असते ना? ती उर्ध्वदिशेने जाऊन सहस्रारात परिणाम दाखवते का?>>
चक्रे ही प्राणदेहात Energy Body असतात . कुंडलिनी मूलाधारात म्हणजे माकडहाडात मध्यभागी असते , व तिच्या उत्क्रांती / जागृतीचा मार्ग ऊर्ध्व असतो . जेव्हा सद्गुरू कृपेने चक्रजागृती होते,तेव्हा गुरु आपल्याकडील चैतन्यशक्ती साहस्ररतून प्रवाहीत करतात . त्यामुळे कुंडलिनी जागृतीचा मार्गा वरुण खाली असा भासतो

परब्रह्मजी, सविस्तर विश्लेषणात्मक उत्तराबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
त्यातील काही बाबी आधीपासूनच अंमलात आहेत, उर्वरित अंमलात येतिलच Happy
धन्यवाद.

धन्यवाद मंदार.

जेव्हा सद्गुरू कृपेने चक्रजागृती होते,तेव्हा गुरु आपल्याकडील चैतन्यशक्ती साहस्ररतून प्रवाहीत करतात . >>> बोल्ड केलेले शब्द खूप महत्वाचे. त्यामुळेच "मी कुंडलिनी जागृत करतो/करते" हे म्हणणे फोल आहे.

पण कुंडलिनी का जागृत करतात? हेतू काय?
---------------
मग त्यांना खर्‍या अर्थाने " फॉलो ", करायचे म्हणजे त्यांच्या मागे-मागे कृपा असु द्या, रक्षण करा, सद्-बुद्धि द्या, हे द्या - ते द्या, मी हे करीन आणी मी ते करीन . . . . असंच करीत राहायचं ? आणी ते गेल्यावर त्यांच्या मूर्ति आणी फोटोंना पुजून पुन्हा तेच मागत राहायचं वा म्हणत राहायचे जे त्यांच्या शरीरावस्थेत असतांना म्हणत असायचे ? >>>>> असं मी कधीच म्हटलं नाही Happy सद्गुरुतत्व भरजरी शेला द्यायला बसले असताना चिंध्या का चोरायच्या? तरी प्रपंचातून पार पडत असताना बारिक सारिक गोष्टी देखिल महत्वाच्या असतात आणि त्यांची काळजीही ते न सांगताच घेत असतात त्यामुळे खास मागण्याची आवश्यकता नसते. मागायचं तर दणदणीत असं शाश्वत ऐश्वर्य मागायचं.

पण समहाऊ, <<< आपले गुरु जे करुन दाखवुन गेले ते त्यांच्या हयातीत त्यांच्या कडुन शिकुन घ्यावं, त्यांच्या बरोबर त्याचा अभ्यास करत राहुन त्या शक्तिंवर आपणहे आपल्या गुरुंसारखेच स्वामित्व कमवावे, आणी पुढे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवुन परब्रह्मात विलीन व्हावे . . . .>>> इथे म्हटल्याप्रमाणे सद्गुरुंची बरोबरी करण्याची कधीच पुसटशी इच्छाही होत नाही. श्रीगुरुचरणसरोजरज होण्याइतकीही प्रगती झाली तरी खूप आहे. वाल्याइतके वाईट नाही आहोत आपण पण वाल्मिकी होण्याचीही अपेक्षा नाही. जे आहोत तिथून पुढे जाणे एवढेच हवे आहे. आणि जे काही पदरात पडेल ते स्वकमाईने नव्हे तर श्रीगुरुंच्या अकारण कारुण्यामुळेच. बाळ आईला बिलगते तसे मिसळून जायचे आहे. "मीच आई" असे म्हणून श्रीगुरुमाउलींच्या तोडीचे नाही होऊ शकत कधीही, निदान मी तरी. अहो, कर्मस्वातंत्र्यामुळे कितीतरी लोच्ये करुन ठेवलेले असतात आयुष्यभर आपण. तेच निस्तरायला लावत असतो आपण श्रीगुरुंना. ते आपल्याला स्वतःच्यात विलिन करुन घेतीलच पण ते आपलं तेवढं सामर्थ्य आहे म्हणून नाही, तर त्यांचा आपल्यावरच्या प्रेमापोटीचा संकल्प म्हणून.... जसे आहोत तसेच गुणदोषांसकट.
----------
त्याशी तुम्हाला काही कर्तव्य नाही हे मला ज्ञात आहेच >>>> हे असं बोलू नका. आपण आपल्याला काय फील होते ते सांगत आहोत. प्रत्येकाचं फिलिंग वेगळं असू शकतं आणि त्याचा आदर करायलाच हवा. मी बरोबर की तू बरोबर हा प्रश्न अनुभुती, भाव यात उद्भवतच नाही Happy
--------

रुद्र रुद्र रुद्र ---- धागा भरकटतोय....
निदान रुद्र म्हणजे काय? आपल्या आयुष्यात, ह्या विश्वात त्याचे कार्य कसे चालते त्याबद्दल तरी लिहा कुणीतरी.

'Rudraaksha' शब्द मूळ
शब्द 'Rudraaksha' दोन शब्द साधित केलेली आहे: '. Aaksha' 'रुद्र' आणि शब्द 'रुद्र' 'वाय' आणि संयोजन स्थापना आहे 'Dru.' 'वाय' म्हणजे उत्तम आरोग्य. 'Dru' rhythmical चळवळ किंवा नृत्य म्हणजे. त्यामुळे 'रुद्र' एक नृत्य आणि वादळी व्यक्ती. तसेच, भगवान रुद्र भगवान शिव थेट manifestations एक आहे हे लक्षात ठेवा. शब्द 'Aaksha' अश्रू म्हणजे. त्यामुळे 'Rudraaksha' रुद्र, एक नृत्य आणि वादळी व्यक्तीच्या अश्रू बाहेर निर्मिती आहे याचा अर्थ.

रुद्र सर्वात लक्षणीय वैदिक देवाता आहे रुद्र सुप्रीम योद्धा, दैवी सैनिक, पॉवर देव आहे. त्यांनी मानवी दृश्य त्यानुसार भयंकर आहे: तो दैवी दृश्य त्यानुसार गतिमान असते. भारतीय पौराणिक च्या लोकप्रिय समजून, रुद्र वादळ-देव किंवा मेघगर्जना-देव आहे.

'Rudraaksha' शब्द मूळ
शब्द 'Rudraaksha' दोन शब्द साधित केलेली आहे: '. Aaksha' 'रुद्र' आणि शब्द 'रुद्र' 'वाय' आणि संयोजन स्थापना आहे 'Dru.' 'वाय' म्हणजे उत्तम आरोग्य. 'Dru' rhythmical चळवळ किंवा नृत्य म्हणजे. त्यामुळे 'रुद्र' एक नृत्य आणि वादळी व्यक्ती. तसेच, भगवान रुद्र भगवान शिव थेट manifestations एक आहे हे लक्षात ठेवा. शब्द 'Aaksha' अश्रू म्हणजे. त्यामुळे 'Rudraaksha' रुद्र, एक नृत्य आणि वादळी व्यक्तीच्या अश्रू बाहेर निर्मिती आहे याचा अर्थ.
<<
काय कल्ला नाय बगा..

कुंडलिनी जागृतीचा उद्देश आत्म्याची परमात्म्याशी भेट घालून देणे ,अहंकार -विलय ,स्व-स्वरूपाची ओळख हा आहे, असे संगितले जाते . प्रत्यक्षात कुंडलिनी जागृतीचे अनेक फायदे आहेत .

अनेक रोगांचे मूळ कारण चक्रातील बिघाडात असते . चक्रा तील बिघाड हे मुख्यत: शरीरातील सात महत्त्वाच्या ग्लॅंड्स च्या हार्मोन मधील समतोल बिघडल्याने होतात . कुंडलिनी जागरण /चक्रशुद्धी / चक्रजागृती यामुळे चक्रातील व पर्यायाने ग्लॅंड्स मधील दोष दूर होवून आरोग्य-प्राप्ती होते

फार छान उद्बोधक चर्चा सुरू आहे .धन्यवाद

परब्रह्म , लिंबूटिंबू , अश्विनी k , Katre , सर्वजणांचे आभार आणि आशीर्वाद

सविस्तर प्रतिसाद सावकाश देतो, सध्या घाईत आहे

क्षमस्व

मंदार कात्रे,
अगदी बरोबर आहे, हाच धागा थोडा पुढे न्या म्हणजे अश्वीनी साठी हे समाधान होईल कि
हा रुद्राला अगदी सोडुन विषय नाही आहे . . . .

स्वामिजी,
आभार . . . .वाट पाहू |

abhay9,

आभार, मार्गदर्शनाबद्दल . . . .

गेले काही वर्ष अमेरिकेने अवकाशात सोडलेल्या हबल व कोबे या अन्तरिक्ष यानांनी पाठविलेल्या माहितीमुळे महास्फोट सिद्धांताला तडा जाण्याचा संभाव निर्माण झाला आहे!!! आपल्या विश्वाचे बाहेर दिसणारे पांढरे,धूसर पट्टे व ठिपके हि खूपच पुरातन काळापूर्वी निर्माण झालेल्या इतर विश्वाची बाल्यावस्था आहे.(बेबी युनिव्हर्स)असा अंदाज या यानात बसविलेल्या दुर्बिणीने वर्तविला आहे.त्यामुळे अनेक महाविस्फोट होवून आपल्या विश्वाबरोबर इतरही विश्वे निर्माण झाली असावीत असे अनुमान निघते.यातील सत्य हे अधिक शोधातूनच पुढे येईल, पण हा महास्फोट सिद्धांत आपल्या शास्त्रातील सिद्धाताशी जुळणारा आहे.

अव्यक्तादीनि भूतानि व्याक्त्मध्यानि भारत
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना
( भ.गीता २-२८)

आशय; सर्व सृष्टी,भुवने,आरंभी म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी अव्यक्त म्हणजे शून्यावस्थेत असतात,त्यांची उत्पत्ती नंतरची मधली अवस्था व्यक्त असते,आणि ज्या ज्या वेळी त्यांचा संपूर्ण नाश होतो,त्यावेळी ते पुन्हा अव्यक्त अवस्थेत विरून जातात .मग शोक कशाला???

यावर ज्ञानेश्वर माउली म्हणते,-

हे अव्यक्तपणे थिजले,तेचि मग विश्वाकारे वोठीजले,
तैसे अमूर्तमिया विस्तारले,त्रैलोक्य जाणे.(ज्ञानेश्वरी ९.६६)
हा ७००० व ७०० वर्षापूर्वी मांडलेला महास्फोटाचा सिद्धांत नाही का???अजून पुढे बघा महर्षी व्यास याबाबत काय म्हणातात तेही बघू,खालील श्लोक बघा!!!

दिवी सुर्यसहस्रस्य भवेद्युग पदुत्थिता
यदी भा: सदृशीसास्याभ्दासस्तस्य महात्मन:
(भ.गी.११-१२)

आशय; अवकाशात अगणित सूर्यांचा एकदम उदय झाला असता जी प्रभा प्रकटलेली दिसेल,ती त्या विश्वरूपाची बरोबरी क्वचितच करेल!!!अ९एथे सहस्र हा शब्द केवळ संख्यावाचक नसून असीम,अगणित या अर्थी योजलेला आहे)

आणि माउली यावर म्हणते आहे:

एथ अग्निचीही दिठी करपत
सूर्य खद्योत्यु तैसा हारपत
ऐसे तीव्रपण अद्भुत,तेजाचे यया!! (११.३००)

आशय; ह्या विश्वरूप तेजाचा अलौकिक,तीव्र,व विलक्षण प्रखारापानाचा असा चमत्कार आहे कि,त्यापुढे अग्नीची दृष्टी करपून जाते,आणि सूर्यही या तेजात काजव्य सारखा मावळून जातो.

(साभार )

अश्विनी,
पण कुंडलिनी का जागत करतात? हेतू काय?
मुलात ईश्वर प्राप्ति सथि दोन माग्र आहेत पैकि एक भक्ति मार्ग व दुसरा योग मार्ग . योग मार्गमधे दोन प्रकार एक हथ योग व सह्ज योग सहज योग हाच शक्तिपाथ किन्वा कुन्दलिनि जार्गुति होय.

परब्रह्म,
सद्गुरुंचे स्थान हे आज्ञा चक्रा मागे आसणार्या पारद पदुका मधे असते म्हणुन दत्त समप्रदायामधे पदु़काना फार महत्व आहे ते स्थान सहस्रारामधे नाहि.

पादुका म्हणजे चरणच असतात. म्हणूनच आज्ञाचक्र चरणांवर किंवा पादुकांवर टेकले जाईल असे मस्तक टेकवले जाते. पण सहस्राराचा स्वामी सद्गुरुच असतात.

भो: दत्तगुरु
कृपया समागच्छ
सर्व रुपाणि दर्शय
मम हृदये प्रविश्य
मम सहस्रारे प्रतिष्ठ
ॐ नमो नमः

ह्म्म्म. योग मार्ग Happy

Pages