उत्तुंग स्वप्न - एव्हरेस्ट बेसकँप ट्रेक - भाग २

Submitted by शापित गंधर्व on 21 May, 2013 - 02:42

आधिचे भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा.
उत्तुंग स्वप्न - एव्हरेस्ट बेसकँप ट्रेक - भाग १
...........................................................

"भरवश्याच्या म्हशिला टोणगा" या उक्तिचा पुरेपुर अनुभव मी ट्रेक सुरु होण्यापुर्विच घेतला. हा ट्रेक कुठल्याही ट्रेकिंग कंपनि मार्फत न करता आपण स्वतःच करायचा हे सुरवातिलाच ठरवलं होत. त्या अनुशंगाने ७/८ महिन्यांपासुन आंतरजालावरुन ट्रेक चा रुट, सुयोग्य काळ, अंदाजित खर्च अशी माहिती गोळा करणे चालु होते. आणि या पुर्व तयारीत विनय (माबो आय डी - मस्त कलन्दर) सतत माझ्या सोबत होता. इतका की "बाकी कोणि येवो ना येवो, आपण दोघांनी हा ट्रेक करयाचाच" हे पण बोलुन झालं होतं त्याच. पण शेवटच्या क्षणि ऑफिसच्या कामाच निमित्त देऊन तो टांगारु झाला. विनयच्या या हो-नाही, हो-नाही च्या गोंधळात आमच्या कडुन एक मोठी चुक झाली. मुंबई ते काठमांडू विमान प्रवासाचे तिकीट काढायचे राहुन गेले. १५ दिवस आधि १८००० रुपयात मिळणार्‍या तिकीटाची किंमत आठवडाभर आधि ३०००० रुपये झाली होती. दोन तिकीटां मागे २४००० चा फटका. आमचं सगळ बजेटच कोलमडुन गेलं असतं. म्हणुन मग पैसे वाचवण्या साठी मी आणि संदिपने स्वस्तात मिळणार्‍या तिकिटावर प्रवास करायचं ठरवलं. संदिप बँगलोरला होता आणि मी मुंबईत. ६ एप्रिल च्या रात्री आम्ही दोघांनी दिल्ली ला भेटायचे ठरवले. ७ एप्रिल ला दिल्ली ते काठमांडू प्रवास सोबत करायचा. परत येतांना संदिप काठमांडू-दिल्ली मार्गे बॅंगलोर ला परत जाणार आणि मी काठमांडू-कलकत्ता मार्गे मुंबईला. अम्ही फक्त दिल्ली-काठमांडू प्रवासात सोबत असणार होतो पण त्याला काही इलाज नव्हता. पैसे वाचवणं गरजेच होतं.

ठरल्या प्रमाणे ६ एप्रिलच्या रात्री मी अणि संदिप दिल्ली विमानतळा वर भेटलो. एके काळी २४ तास सोबत असणारे आम्ही ३ वर्षांनी भेटत होतो. काय करणार, "पापी पेट के सावाल ने" एकाला बँगलोर ला तर एकाला दक्षिण अफ्रिकेत पाठवलं होत. आमचं विमान सकाळी ७:३० ला होतं आणि चेक-इन टाईम ५:३०. भरपुर वेळ मिळाला आम्हाला गप्पा मारायला आणि ३ वर्षांची कसर भरुन काढायला. वेळ कसा गेला ते समजलच नाही. सहज घड्याळावर नजर टाकली तर ५:३० झाले होते. दोघांनी मस्त एक-एक कॉफि मारली आणि चेक-इन काऊंटरला गेलो. तिथे आम्हाला आमच्या ट्रेक मधला पहिला झटका बसला. संदिप कडे पासपोर्ट नाहीये आणि नेपाळ साठी पासपोर्टची गरज पण नाही. भारतिय नागरीकत्वाचा फोटो आय डी असणारा कुठलाही पुरावा चालेल या भ्रमात आम्ही होतो. संदिप कडे चालक परवाना, पॅन कार्ड आणि आधार कार्ड होतं पण काऊंटर वरची मुलगी मतदान ओळखपत्रा (वोटर कार्ड ) साठीच अडुन बसली. वोटर कार्ड असल्या शिवाय बोर्डिंग पास देणार नाही म्हणाली. खेळ खल्लास. संदिपला बोर्डींग पास मिळाला नसता तर आमचा ट्रेक सुरु होण्याआधी दिल्ली विमानतळावरच संपुष्टात आला असता. काऊंटरवाल्या पोरिला म्हटलं की तुझ्या मॅनेजरशी बोलु का तर म्हणाली... "मॅनेजर कशाला? तो काय वेगळं सांगणार?" म्हटलं "एकदा बोलु तर दे".. तर तोंड वेड-वाकडं करत त्या पोरीने तिचा मॅनेजर बसला होता त्या दिशेला बोट करुन, "तो तिकडे बसला आहे, जा भेटा" म्हणत आम्हाला तिकडे पिटाळलं. मॅनेजर जरा समजुतदार होता. त्याने समजावुन सांगितलं की प्रॉब्लेम एअरलाईन चा नाही. एअरलाईन ने बोर्डींग पास दिला तरी इमिग्रेशन वाले प्रॉब्लेम करतिल. ते पोर्ट क्रॉस करु देणार नाहित. त्यानेच सल्ला दिला की जाऊन इमिग्रेशन इनचार्ज ला भेटा. त्याने परवानगी दिली तर आम्ही बोर्डींग पास देऊ. लगेच आमची वरात इमिग्रेशन इनचार्जच्या दारात पोहोचली. पण त्याने पण नियमावर बोट ठेवलं. म्हणाला वोटर कार्ड पाहिजेच. बराच वेळ त्याच्या मिन्नतवार्‍या केल्या. त्याला समजवलं की आमच्या कडे भारतिय नागरिकत्वाचे ३ पुरावे आहेत आणि "आधार कार्ड शुल्ड हॅव मोर वेटेज दॅन वोटर कार्ड". १५ मिनिट त्याची मनधरणि केल्यावर त्याचं मन द्रवल आणि त्याने आम्हाला परवानगी दिली. संदिप आणि मी दोघांनी एकाच वेळी सुटकेचा निश्वास सोडला. त्या इमिग्रेशन इनचार्जचा विचार बदलण्या आधि चेक-इन काऊंटर ला पळालो, बोर्डींग पास घेतले, इमिग्रेशन क्लियर केलं आणि गेटला जाऊन बसलो.

प्रचि १: दिल्ली विमानतळ
७ एप्रिल २०१३

भारतिय प्रमाण वेळेनुसार ७:३० चं विमान अगदि वेळेवर म्हणजे ८:०० वाजता दिल्लीच्या आकाशात झेपावलं आणि तासा भरात काठमांडूच्या आकाशात पोहोचलं. पण धुक्यामुळे वैमानिकाला काठमांडु विमानतळाची धावपट्टीच दिसत नव्हती. दिड तास आमचं विमान काठमांडू शहरावर घिरट्या घालत होतं. शेवटी १०:३० च्या सुमारास एकदाची धावपट्टी दिसली आणि आमचं विमान काठमांडू विमानतळावर उतरलं.

प्रचि २: नेपाळ मधे स्वागत

काठमांडू विमानतळ खुपच लहान आहे. एकदम जुनाट इमारत. कुठल्यातरी पोस्ट ऑफिस मधे आल्या सारखं वाटलं. अर्ध्या तासात इमिग्रेशन चे सोपास्कर आटपुन विमानतळाबाहेर पडलो. दरम्यान सेलफोन चालु करुन बघितला तर व्होडाफोन ची रेंज मिळत होती. पण रोमिंग असल्यामुळे दर खुपच जास्त होते. ७५ रुपये प्रति मिनीट. ते परडवण्यासारख नव्हतं म्हणुन बाहेर पडल्या पडल्या काठमांडू टेलिकॉमचे सिम कार्ड विकत घेतले. विक्रेत्याने बेसकँप पर्यंत रेंज मिळेल आणि २.५ नेपाळी रुपयात भारतात कॉल करु शकाल असे सांगितल्यामुळे तेच प्रेफर केले. मधल्या वेळेत टॅक्सी ड्रायव्हर्स आणि हॉटेल एजंट्सचा आमच्या भोवती गराडा पडला होता. काठमांडू ते लुकला प्रवासाचे विमान तिकीट काढायचे होते आणि स्लिपिंगबॅग्ज भाड्याने घायच्या होत्या. ते सगळं काठमांडूच्या थामेल भागात मिळेल याची माहिती होती. म्हणुन मग त्यातल्या त्यात योग्य वाटणार्‍या हॉटेल एजंटला बाजुला घेतले आणि त्याला आमची गरज आणि बजेट सांगितले. एकच रात्र काठमांडू मधे रहायच होतं त्यामुळे ३००/४०० रुपयात रुम मिळेल अस हॉटेल आणि विमान तिकीट, स्लिपिंगबॅग्जची सोय करु शकेल अशी ट्रेकिंग कंपनी सजेस्ट करायला सांगितली. खुश झालं बेण. लगेच त्याच्या पंटरला हाक मारली. "याच्या सोबत जा. हा दाखवेल तुम्हाला २/३ होटेल्स. तुम्हाला योग्य वाटेल ते सिलेक्ट करा. एअरपोर्ट पिक-अप फ्रि आहे. तुम्हाला टॅक्सीचे भाडे देण्याचि गरज नाही" पंटरपण तयारीचा होता. हातात आलेलं गिर्हाईक सुटु नये म्हणुन आमच्या हातातल्या बॅगा अक्षरश: खेचुन घेऊन टॅक्सी कडे चालु पडला आणि आम्ही त्याच्या मागे पळालो. टॅक्सी कसली ती तर अगदी अँटिक पिस होती. ७० च्या दशकात चित्रपटात दाखवायचे तशी लांब लचक आणि अवस्था पण अशी की ही १००मिटर चालेल का ही शंका यावी. मी ती ड्रायव्हर ला बोलुन पण दाखवली तर ते साहेब माझ्या पेक्षा ही वरचढ, "डरो मत सहाब. अपनी रामप्यारी एकदम टकाटक चलती है. आपको दिल्ली तक भी पहुंचा सकती है". माझी बोलतिच बंद झाली. चुपचाप टॅक्सित बसलो. माझी अवस्था बघुन संदिप गालातल्या गालात हसत होता. पंटर आणि ड्रायव्हर ने मिळुन आमच्या बॅगा त्या लांबलचक गाडिच्या आखुड डिकीत कोंबल्या आणि आम्ही थामेल कडे कुच केली. विमानतळ आवाराच्या बाहेर आलो तर सगळी कडे शुकशुकाट. रस्त्या वर सगळी कडे पोलीस दिसत होते आणि अगदि तुरळक गाड्या ये-जा करत होत्या. पंटरला कारण विचारलं तर त्याने सांगितलं की कुठल्या तरी राष्ट्रीय पक्षाने आज नेपाळ बंद पुकारला आहे त्यामुळे सगळी दुकानं आणि गाड्या बंद आहेत. म्हटलं मग विमानतळावरच्या टॅक्सी कशा काय चालु आहेत. तेंव्हा त्याने सांगितले की टुरिझम आणि त्याच्याशी संबंधित उद्योग हे नेपाळचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. त्यामुळे बंदच्या काळातही टुरिस्ट्सची काही अडचण होणार नाही याची काळजी सरकार आणि सगळेच पक्ष घेतात. रस्त्यावर या ज्या थोड्याफार गाड्या दिसत आहेत त्या सगळ्या टुरिस्ट व्हेहिकल आहेत. २०/२५ मिनीट शहराच्या विविध भागांतुन फिरत आम्ही थामेल मधे पोहोचलो. इथेही सगळी दुकानं बंद होती. बंदच्या काळात आपल्याकडे दिसतं; म्हणजे रस्त्यावर क्रिकेट खेळणे वगैरे, असेच चित्र इथे पण दिसत होतं. दुकानं दुपारी ३ नंतर उघडतिल असे पंटरने सांगितले. एका हॉटेल समोर टॅक्सी थांबली. संदिप टॅक्सितच बसला मी आणि रुम पहायला गेलो. रुम स्वच्छ आणि निटनेटकी होती. अॅटॅच्ड बाथरुम आणि गरम पाण्याची सोय होती. काऊंटर वरच्या मॅनेजर ने दिवसाचं ४०० रुपये भाडं सांगितलं. लगेच रुम फायनल केली आणि संदिपला सामाना सहित वर बोलवुन घेतले. टॅक्सी ड्रायव्हर ने हॉटेलवाल्या पोराला सोबतिला घेऊन आमचे सामान रुम मधे नेऊन ठेवले आणि तो निघुन गेला. "आता सगळी दुकानं बंद आहेत. त्यामुळे बाहेर जाण्यात काही अर्थ नाही. मी दुपारी ४ वाजता परत येतो मग आपण तुमच्या तिकीटाची आणि स्लिपिंग्बॅग्जची सोय करु" अस म्हणत पंटर ने पण कल्टी माराली. आम्ही पण तिथे काऊंटरलाच जेवणाची ऑर्डर देऊन रुम मधे गेलो. दोघांची अंघोळ होऊन फ्रेश होईतो जेवण पण आलं. पोटभर जेवण करुन दोघांनी पण ताणुन दिली.
कसल्यातरी आवाजाने जाग आली. डोळे उघडुन बघितले तर संदिप उठला होता आणि त्याच्या बॅग मधे काही तरी शोधा-शोध करत होता. त्या आवाजानेच जाग आली होती. घड्याळावर नजर टाकली तर ४ वाजुन गेले होते. पंटर आता येतच असेल म्हणुन मी पण उठलो आणि आवरायला घेतलं. संदिपने चहाची ऑर्डर आधिच देऊन ठेवली होती. माझं आवरुन होईतो चहा पण आला. चहा घेता घेता गप्पा मारत आम्ही पंटरची वाट पहात होतो. ४:३० झाले तरी पंटर काही येइना, मग जास्त वेळ त्याचि वाट न बघता आम्ही स्वताच खाली बाजारात जायच ठरवलं. पंटर आला तर त्याला आमच्या मोबाईल वर फोन करायला सांगा असा निरोप ठेऊन आम्ही थामेलच्या बाजारात उतरलो.
एव्हाना बरीच दुकानं उघडली होती. ट्रेक साठी लागणार्‍या सामाची दुकाने, ट्रॅव्हल एजंट, ट्रेकिंग कंपनी, मनि एक्सचेंज, हॉटेल्स, फेरीवाले यांची अगदी रेलचेल होती.

प्रचि ३: थामेल
प्रचि ४: थामेल

कुठलाही ट्रॅव्हल एजंट किंवा ट्रेकिंग एजन्सी तुमच्या तिकीटाची आणि स्लिपिंगबॅग्जची सोय करु शकतो अशी माहिती हॉटेलवाल्या कडुन मिळाली होती. नेपाळी, इंडियन आणि नॉन इंडियन, या सगळ्यांचे विमान तिकीटाचे दर वेग वेगळे असतात. इंडियन्स च्या तिकीटाचे दर नेपाळी लोकांपेक्षा थोडे जास्त आणि नॉन इंडियन पेक्षा खुप कमी असतात. त्यामुळे तिकीट काढायच्या आधी तुम्ही इंडियन्स आहात हे सांगायला विसरु नका हा सल्ला पण मिळाला. एक मोठसं ट्रेकींग कंपनिच दुकान बघुन त्यात शिरलो आणि आम्हाला आमच्या ट्रेक मधला दुसरा झटका मिळाला.

लुकला के लिये दो तिकीट चाहिये, इंडियन!
कब जाना है सहाब?
कल.
पॉसिबल नही सहाब!
क्या?
लास्ट दो दिन से खराब मौसम के कारन कोई भी फ्लाईट नही उडा है! बहोत बॅक लॉग है! एयर-लाईन नया टिकीट इश्यु नही कर रही है!
प्लिज कोशिश करो. हमारे पास टाईम बहोत कम है! २० तारीख को वापस जाना है!
बहोत मुश्किल है सहाब, फिर भी कोशिश करके देखता हुं!

मग त्याने २/४ ठिकाणी फोन केले पण उद्याचच काय परवाच पण तिकीट मिळत नाहिये म्हणाला. परत एकदा खेळ खल्लास. हि गोष्ट आम्ही विचारतच घेतली नव्हती. १२ दिवस ट्रेक ला आणि एक दिवस काठमांडू फिरायला, असा साधा सरळ हिशोब करुन आम्हि २० तारखेची परतीची तिकिट काढली होती. आणि कुठल्याही परिस्थितीत संदिपला २२ तारखेला ऑफिस जॉईन करायच होत. मी संदिप कडे पाहिल तर तो एकदम शांत वाटला.

काय करायच रे?
चल दुसरी कडे बघु. हा असच येडा बनवत असेल
(हे अर्थातच मराठीत)

ओके. येतो थोड्या वेळात म्हणत आम्हि त्याच्या दुकानातुन निघालो आणि दुसर्या दुकानात शिरलो. तिथेही तेच. उठलो आणि तिसर्या दुकानात शिरलो.

सहाब, ८ और ९ तारिख का तिकिट कोई भी नही देगा! मै ९ तारिख का आखरी फ्लाईट का तिकीट दिलवा सकता हुं! १००० रुपया एक्स्ट्रा लुंगा! पर फ्लाईट उडेगा की नही उसका गॅरंटी नही!
और अगर ९ को फ्लाईट नही उडा तो?
तो १० को पक्का! १० के पहले या दुसरे फ्लाईट में ही अॅड्जेस्ट करके दुंगा आपको!
ये पहला/दुसरा फ्लाईट क्या है?
देखो सहाब, यहा पे सिर्फ दो एअर-लाईन लुकला जाती है! तारा और सिता! तारा के पास ४ प्लेन है और सिता के पास दो! सिता के दोनो प्लेन खराब हो गये है इसलिये सिर्फ तारा ही उड रहा है! सुबह ६:०० बजे काठमांडू से पहिला प्लेन निकलता है और फिर हर १५/२० मिनट में अगला! ये चारो जब काठमांडु से उड जाये तो उसे हम लोग पहिला फ्लाईट बोलते है!

१००० रुपयची रिस्क घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. हातात दिवस फार कमी होते आणि प्रत्येक दिवस मोलाचा होता. मग त्याच्याशिच घासाघिस करुन त्याला ट्रेक साठी पोर्टर, TIMS कार्ड, नॅशनल पार्क परमिट आणि स्लिपिंगबॅग्जची सोय करायला सांगितली. TIMS कार्ड बनवण्या साठी २ पासपोर्ट साईझ फोटो, पसपोर्ट आणि आधार कार्डाची प्रत आणि थोडे पैसे अॅडव्हान्स दिले. तिकिट आणि बाकिचे पेपर्स कलेक्ट करायला उद्या संध्याकाळी येतो असे सांगुन आम्ही तिथुन बाहेर पडलो.

एकदाचा निर्णय झाल्यामुळे आता बरं वाटत होत. दोन-अडिच तास खुपच तणावात गेले होते. एका दोघांनी सल्ला पण दिला की तुम्ही फार मोठी रिस्क घेताय. तुमच्या हातात दिवस फार कमी आहेत. घाई केलित तर तुम्हाला अल्टीट्युड सिकनेस चा त्रास होऊ शकतो. आणि ट्रेक जरी पुर्ण केलात तरी पर येतांना तुम्ही खराब हवामानामुळे लुकला मधे अडकुन पडु शकता (गेल्या दोन दिवसाचं उदाहरण डोळ्या समोर होतच). एव्हरेस्ट करण्या पेक्षा तुम्ही अन्नपुर्ण रिजन करा. ७/८ दिवसात पुर्ण करु शकाला अन्नपुर्णा ट्रेक. पण एव्हरेस्ट आमच्या डोक्यात असा घट्ट बसला होता की त्या साठी आम्ही कोणतिही रिस्क घ्यायला तयार होतो. त्यातल्या त्यात रिस्क कमी करण्या साठी पोर्टर सोबत घेण्याचा निर्णय घेतला. ट्रेक दरम्यान काही कमि-जास्त झालचं तर एखादी स्थानिक व्यक्ती सोबत असणे फायद्याचे ठरणार होते. त्याच बरोबर कुठे रस्ता वगैरे चुकण्याचा प्रश्नही निकालात निघणार होता. म्हणुन आता बरं वाटत होत.

बाहेर आलो तर बाजार पुर्ण गजबजला होता. सगळी दुकानं उघडली होती आणि रस्ते पर्यटकांनी ओसंडुन वहात होते. सगळी कडे गोरी-गोमटी लोकं फिरतांना दिसत होती. ट्रेकिंग आणि पर्वतारोहणा साठी लागणार्‍या सामानाच्या दुकांनांची तर भरमाड होती. जिकडे बघावं तिकड तिच दुकानं. हातमोजे, ट्रेकिंग शुज, सॅक, डाऊन जॅकेट्स, स्लिपिंग बॅग्ज, वॉकिंग स्टिक्स, आईस एक्स, रोप्स हे सारं विकत तर मिळत होतच पण ते भाड्याने (प्रति दिवस) पण मिळत होतं. नॉर्थफेस सारखे उंची ब्रँड्स उपलब्ध होते. आम्हि पण मग उगाच या दुकानातशीर याचा भाव विचार, त्या दुकानातशीर त्याचा भाव विचार करत इकडे तिकडे भटकलो आणि रात्रिच जेवण बाहेरच करुन हॉटेलवर परतलो. उद्याचा हातात असलेला दिवस सत्कारणी लावायचा होता. हॉटेल मॅनेजरला सकाळी १० वाजता सिटीटुर साठी गाडिची व्यवस्था करायला सांगुन रुम मधे गेलो. दुपारी झोप झाल्यामुळे दोघांनाही लवकर झोप येत नव्हती. परत एकदा गप्पा रंगल्या आणि मधेच कधितरी डोळा लागला.

८ एप्रिल २०१३
सकाळी जाग आली तेंव्हा प्रसन्न वाटत होतं. दोघांनी आवरलं आणि ब्रेकफास्ट करायला खाली उतरलो. ब्रेकफास्ट करुन रिसेप्शनला आलो तर गाडी तयारच होती.
दिवसभराची सिटीटुर करुन संध्याकाळी ६:३० ला हॉटेल वर परतलो. (सिटीटुर खुपच छान झाली. त्या बद्दल एक वेगळा धागा काढेन).
फ्रेश होऊन कालच्या ट्रेकिंग एजन्सीच्या ऑफिस मधे गेलो. त्याने सगळी कागदपत्र तयार ठेवली होती. काठमांडु-लुकला परतिच्या प्रवासाचे विमान तिकीट, Trekker’s Information Management System (TIMS) कार्डस आणि एक बंद पाकिट आम्हाला दिलं.

ये पाकिट में क्या है??
हमारा पोर्टर आपको लुकला में मिलेगा! पाकिट पे उसका नाम और मोबाईल नंबर है! ये पाकिट उसको दे दो!
नॅशनल पार्क का परमिट भी देनेवाले थे आप, वो किधर है?
फिकर मत करो सहाब, वो आपको मोंजो में मिलेगा! पोर्टर दिलायेगा आपको! उसका पैसा भी इस पाकिट में रखा है! आप टेंशन मत लो, आराम से जावो!

परत एकदा मिळालेले कागपत्र तपासुन घेतले, उरलेली रक्कम अदा केली आणि आम्ही तिथुन बाहेर पडलो. काल संपुर्ण बाजार फिरुन झाला होता त्यामुळे आज त्यात काही रस वाटत नव्हता. दिवसभर भटकंती झाल्यामुळे दमलो पण होतो. त्यामुळे जेवणकरुन लवकरच हॉटेलवर परतलो. सकाळी सातच्या दरम्यान विमानतळा वर पोहोचायच होतं.त्या हिशोबाने हॉटेल मॅनेजरला सहा वाजता गाडी तयार ठेवायला सांगितली. सकाळी सकाळी घाई गडबड नको म्हणुन त्याच्या हिशोब पण चुकता करुन टाकला. रुम वर गेलो आणि बेडवर पडल्या पडल्या झोप लागली.

९ एप्रिल २०१३
५ चा गजर बरोबर ५ ला वाजला आणि दोघांची झोपमोड झाली. थोडी जास्तिची झोप मिळेल म्हणुन संदिपला पहिले आवरुन घ्यायला सांगितले तर तो पण असा बदमाष की १५/२० मिनिटात तायार होऊन मला ढुश्या मारु लागला. मग उठावच लागलं. सगळं आवरुन बॅगा भरल्या आणि खाली आलो. गाडी तयारच होती. सहाच वाजले होते पण शहराला बर्‍यापैकी जाग आली होती. ड्रायव्हर अगदी ८ वी ९ वीत शोभेल इतका छोटा पोरगा वाटत होता पण अगदि तयारीचा. कुठल्या कुठल्या गल्ली बोळातुन फिरवत त्याने आम्हाला बरोबर २५ मिनिटात विमानतळावर पोहोचवलं
आंतर राष्ट्रिय आणि आंतर्देशिय देशीय, दोन्ही विमानतळ बाजु बाजुलाच आहेत. आंतर्देशिय देशीय विमानतळाची इमारत खुपच छोटी होती. प्रवेशद्वारा वर एकच पोलिस होता आणि तिकिट वगैरे काहिही न बघता तो सगळ्यांना आत सोडत होता. आत गेलो तर सगळा सावळा गोंधळ. कुठल्या तरी रेल्वे स्टेशनच्या वेटींगरुम मधे आलो आहे असं वाटलं. एक छोटिशिच रुम, तिथेच बोर्डिंगपास मिळणार आणि तिथेच सिक्युरीटी चेक पण होणार. साधे बसायला बाकडे पण नव्हते. खुप गर्दी झाली होती तिथे.

प्रचि ५: काठमांडु आंतर्देशीय विमानतळ
प्रचि ६: काठमांडु आंतर्देशीय विमानतळ

तारा एअरच्या कांउटरवर गेलो आणि तिकीट दाखवलं
Wait, your flight is at 9:45.
How is weather ?
First flight is in progress. Two planes took off.

विमानं उडतायेत एकुन बरं वाटलं. बॅगा घेऊन एका कोपर्‍यात जाउन बसलो, आमच्या फ्लाईटची अनाउन्समेंट होण्याची वाट बघत. अर्धातास झाला तरी कुठलिच अनाउन्समेंट कानावर येईना, मग समजलं की इथे अनाउन्समेंट होतच नाहिये. ताराच्या काउंटरवर गेलो तर परत “Wait” ऐकायला मिळालं. मग दर पंधरा मिनिटांनी काउंटरला जायचो आणि “Wait” ऐकुन परत यायचो.
८:३० वाजले होते. अजुन आमचा नंबर लागला नव्हता. पण गर्दी हळु हळु कमी होत होती. आणि जस जशी गर्दी कमि होत होती तस तसं आम्हाला बरं वाटत होतं. आमचा पण नंबर लागेल ही आशा पल्लवित होत होती. पण थोड्याच वेळात समजलं की ही गर्दी माऊंटन फ्लाईट्सची होती. ताराच्या काउंटरवर, खराब हवामाना मुळे लुकला विमानतळ बंद झाला असल्याचा बोर्ड झळकत होता. काऊंटरला चौकशी केली तर “Wait, it may open again. So wait” चा सल्ला मिळाला. झालं, आम्ही परत कोपर्‍यात जाउन बसलो. ११ वाजेपर्यंत वाटबघितली, पण ८:३० नंतर एकही विमान उडाले नव्हते. थोड्याच वेळात काऊंटर वरची ताराच्या स्टाफची माणसं पण गायप झाली. एका दोघांना विचारलं तर आजच्या साठी लुकलाच्या फ्लाईट बंद केल्याच समजल. काय करावं काहिच कळेना म्हणुन ट्रेकिंग एजन्सीला फोन लावला. त्याने पण लुकला विमानतळ आजच्या दिवसा साठी बंद झाल्याचे सांगितले आणि उद्या पहिल्या फ्लाईट मधे अ‍ॅडजेस्ट करुन द्यायची हमी दिली.
आता हॉटेलवर परत जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता. विमानतळा बाहेर आलो, टॅक्सी केली आणि परत त्याच हॉटेलवर आलो. आम्हाला परत आलेलं बघुन हॉटेलवाल्याला अजिबात आश्चर्य वाटले नाही. बहुतेक या प्रकाराची त्याला सवय असावी. बरेच ट्रेकर्स असे परत येत असावेत. बॅगा रुम मधे टाकल्या. आता उरलेला दिवस काय करावे या विवंचनेत होतो आणि त्याच वेळी संदिपने एक मस्त उपाय सुचवला. काल परवा बाजारात फिरतांना हॉटेलच्या जवळच एक स्पा बघितला होता तिकडे जाउ म्हणाला. दुसरं काहि करण्या सारखं पण नव्हतं. मग हॉटेलवरच एक एक सँडविच खाऊन आम्ही स्पा ला गेलो. सोना, मग २ तास आयुर्वेदिक मसाज आणि शेवटी स्टिम बाथ.... एकदम रिलॅक्स झालो... चार तास मस्त गेले. उरलेली संध्याकाळ हॉटेलवरच घालवली. रात्रिच जेवण पण रुमधेच घेतलं. उद्या सकाळी आजच्या पेक्षा लवकर जायच होतं. ४ चा गजर लावला आणि झोपी गेलो.

१० एप्रिल २०१३
रात्री लवकर झोपल्यामुळे असेल कदाचित, सकाळी वेळेवर जाग आली. दोघांनी आरामात आवरलं आणि ५ वाजता खाली आलो. रात्रीच सांगुन ठेवली होती पण गाडि अजुन आली नव्हती. येईल म्हणुन तिथेच रिसेप्शनला वाट बघत बसलो. ५:१५ झाले तरी गाडी येईना मग आमची चुळबुळ चालु झाली. पहिली फ्लाईट ६ ला होती आणि काहिही करुन आम्हाला ती चुकवायची नव्हती. रिसेप्शनवरच्या माणसाला आमची अडचण सांगितली. त्यानेही तत्परतेने हॉटेलच्या गाडिची वाट न बघता एक लोकल टॅक्सी उपलब्ध करुन दिली आणि सहाच्या जरा आधि आम्ही विमानतळावर पोहोचलो. धावत पळत ताराच्या काउंटरला गेलो, तिकीट दाखवलं आणि परत एकदा...
Wait
What?
Sir you are in 2nd flight. You will have to wait.
I should be in first flight, will you please check again?
No sir, you are in 2nd flight at 7:45AM. If first flight fly and weather is good, we will issue boarding pass at 7:00AM.

त्या ट्रेकींग एजन्सिवाल्याला मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहिली. पण आता वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हत. परत कालच्याच कोपर्‍यात जाउन बसलो. पण आज नशिब चांगल होत. सात वाजता काउंटरला गेलो तर पहिल्याच फटक्यात आम्हाला बोर्डिंग पास मिळाला. लगेच बॅगा चेक-इन करुन गेटला जाउन बसलो (इथे बाकड्यांची सोय होती). दर १५/२० मिनिटांनी तारा लुकला तारा लुकला ओरडत स्टाफची माणसं यायची, आम्ही बोर्डींग पास दाखवुन पुढे जायला लागलो की आम्हाला थांबवायचे आणि बाकिच्यांना पुढे पाठवायचे. आम्हाला कळेच ना ते असं का करतायेत ते. विचारल्यावर समजलं की प्रत्येक बोर्डींग पास वर एक कोड आहे आणि ज्या कोडचा पुकारा होतोय त्यांनाच विमानात जाउ दिल जातय. आमच्या बोर्डींग पास वर "T" कोड होता. आता तारा लुकला सोबत "T" कोडचा पुकारा होण्याची वाट बघत बसलो, ७:३०-७:४५-८:००-८:१५ झाले तरी "T" चा पुकारा काही होईना. आज तरी लुकलाला जायला मिळतय की नाही या टेंशन मधे आमचा जीव खाली वर होत होता. शेवटी एकदाचा ८:३० ला "T" चा पुकारा झाला आणि आम्ही चटकन बस मधे जाऊन बसलो. बस विमानाकडे निघाली आणि आमच्या चेहर्‍यावर हसु फुललं Happy

प्रचि ७: मेरा नंबर कब आयेगा? Sad
प्रचि ८: बस मधुन विमानाकडे जातांना

प्रचि ९: हमारी सवारी
प्रचि १०:
प्रचि ११:

यथा अवकाश त्या छोट्याश्या विमानाने आकाशात झेप घेतली आणि लुकला कडे प्रयाण केले. १०/१५ मिनिटात शहराच्या खुणा मागे पडल्या आणि हिमालयाच्या रांगा दिसु लागल्या. आहाहा. भान हरपुन टाकणारे दृष्य होते ते. फोटो काढायच विसरुन मी त्या निसर्गाचा आनंद घेऊ लागलो. हा एव्हरेस्ट असेल का? नाही बहुतेक तो बाजुचा त्याची उंची जास्त वाटतेय... नाही नाही तो पलिकडचा... तो सगळ्यात उंच वाटतोय .. असे माझ्या मनाचे खेळ चालु होते आणि तेव्ह्ड्यात पोटात एक प्रचंड गोळा आला. समोर ढगांचा एक मोठ्ठा पुंजका दिसत होता आणि त्याला चुकवण्या साठी पायलट विमान वर खाली करत होता. एव्हडसं ते विमान, जरा काही बदल झाला (उंची, वेग, ढगातुन जाणे) की थरथरायला, हेलकावे खायला लागायचे आणि इकडे आमच्या कपाळात जायच्या. आई शप्पथ सांगतो, या फ्लाईट समोर सिक्स फ्लॅग ची सुपरमॅन राईड पण किस झाड की पत्ती असाला अनुभव होता तो. लँडींगच्या आधिची शेवटची पाच मिनिटं खतरनाक थ्रिलिंग होती. सगळ्यात पुढच्या सिट वर बसल्यामुळे पायलट समोरच्या काचेतुन समोरचं सगळ दिसत होतं. एका डोंगराला वळसा घालुन पायलटने विमानाचे नाक जमिनी कडे वळवले आणि लुकलाची छोटिशी धावपट्टी नजरेस पडली. विमान जमिनी पासुन इतक्या कमिउंचीवर असुन देखिल अक्षरश: फुटपट्टी एव्हडी दिसत होती ती धावपट्टी. आता हा इथे कसा काय उतरणार म्हणे पर्यंत विमानाची चाकं जमिनीला टेकली आणि १००/१५० मिटरवर जाउन विमान आरामात थांबले. पायलट्च्या स्किल ला सगळ्यांनिच टाळ्या वाजवुन दाद दिली आणि सुखरुप उतरवल्या बद्दल आभार मानले.
विमानातुन उतरुन विमानतळाच्या इमारतित प्रवेश करण्या आधिच एक माणुस आमच्या नावाचा फलक घेऊन उभा असलेला दिसला. त्याला जवळ बोलवुन तोच आमचा पोर्टर आसल्याची खात्री करुन घेतली. सुशिल नाव होतं त्याचं. त्याला हिंदि समजत होतं पण बोलता येत नव्हत. पण इंग्रजी छान बोलत होता. संदिप आणि सुशिल आत बॅगा कलेक्ट करायला गेले आणि मी फोटो काढायला लागलो.

प्रचि १० : रेडी टु टेक-ऑफ
प्रचि ११: काठमांडू शहर - विमानातुन
प्रचि १२: लुकला विमानतळ
प्रचि १३: लुकला विमानतळ
प्रचि १४: ट्रेकिंग एजंट ने दिलेली माहिती बरोबर होती. सिता एअर चे एक विमान इथे नादुरुस्त उभे होते
प्रचि १५: हिच ती छोटिशी धावपट्टी
प्रचि १६:
प्रचि १७: हम उडने केलिये तय्यार है
प्रचि १८: और उड गये Happy

||क्रमशः||

पुढिल भागातः
ट्रेकचा पहिला दिवस - लुकला ते फकडींग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच माहिति ...व फोटो...इथे एकट्याने सर्व अ‍ॅरेंज करायच म्हणजे खरच जबरि हिंमत व धाडसिपणाच आहे.

शांग दा भारीच डेरींगबाज आहेस
लेख छान लिहिलायस फोटो तर मस्तच आहेत.
आणि ते प्रचि ११: काठमांडू शहर - विमानातुन
>>>>>> कसलं देउळ आहे का?

||क्रमशः|| वाचले आणि भानावर आलो.
सुंदर सुंदर. भारी प्र.चि आणि वर्णन.
जास्त वेळ वाट पहायला लावू नका शा.ग.

ज ब र द स्त !!!

तुझ्या सोबत आमचीही सफर सुरू झाली. Happy

पुढचा भाग लवकर येऊ दे. Happy

प्रचंड जळजळ >>>>+१००० Happy

दर १५/२० मिनिटांनी तारा लुकला तारा लुकला ओरडत स्टाफची माणसं यायची>>>>मी ते "तारा लुकलुकला" असं वाचलं. Proud

सहि रे, लेख नंतर वाचतो पण एक प्रश्न, प्रचि १७ आणि १८ कशा टिपल्या आहेत? तु विमानात असताना तुला त्या कशा घेत्या आल्या? की हॉलीवुड मधल्या हीरो सारख प्रचि टीपल्या नंतर पळत जाउन आणि नंतर उडी मारुन प्लेन पकडल?

असा गंधर्व परत येणे नाही.. म्हणून थामेलने २ दिवस थांबवले असेल.

डिटेलवार वृत्तांत अगदी मस्त जमला आहे.

प्रचि आवडले.. टेक ऑफ आणि लँडिंगचे सहीच.

प्रचि १७ आणि १८ कशा टिपल्या आहेत? तु विमानात असताना तुला त्या कशा घेत्या आल्या? की हॉलीवुड मधल्या हीरो सारख प्रचि टीपल्या नंतर पळत जाउन आणि नंतर उडी मारुन प्लेन पकडल? >
.
.
.
सचिन............हे इमान येगल आहे त्याचे इमान येगल.......:खोखो:

कस्ला भारी अनुभव
पण एक शंका..तिथे एअरपोर्टचे, विमानांचे फोटो घेताना कुणी अडवत नाही का..
आपल्या इथे कसले स्ट्रीक्ट आहे...कॅमेरा बॅगेतून सुद्धा बाहेर काढून देत नाहीत...
त्यामानाने तिकडे अगदीच निवांत कारभार दिसतोय.

आता प्रत्यक्ष चालायला सुरुवात केल्यानंतरचे अनुभव वाचण्यासाठी जबरदस्त उत्सुकता लागून राहीली आहे

एकदम मस्तच! ईबीसी माझ्याही लिस्टवर आहे. या मालिकेचा उपयोग होईलच.
झकास ओघवते वर्णन.. किमुं च्या प्रतिसादाला अनुमोदन. Happy

तुझ्या सोबत आमचीही सफर सुरू झाली. सही!
>>>+१
मला तर अस वाटत होतं की मीच अनुभवतेय सगळं Happy

पण तो मेरा नंबर कब आयेगा, बस मधुन विमानाकडे जाताना वाला फोटो मला काही दिसेना Uhoh
कारण काय असावं???
सकाळी हापिसातुन पाहिलं तर तेंव्हाही दिसला नाही... मला वाटलं ऑफिसमध्ये काही साईट ब्लॉक असतात त्यामुळे असेल
पण घरुन ही दिसत नाहीये तो फोटो! Uhoh

Pages