दशग्रंथी ब्राह्मण कोणास म्हणावे?

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 27 April, 2013 - 02:27

दशग्रंथी ब्राह्मण हे मुख्यत्वेकरून ऋग्वेदसंहितेशी जोडले गेले आहे आणि जे ऋग्वेदसंहितेच्या सर्व अंगात पारंगत असत त्याना ही अतिशय मानाची पदवी पूर्वी काशीला अथवा पैठणला जाउन अभ्यास करून आणि परीक्षा देऊन मिळत असे. आता ते दशग्रंथ आणि दशांगे कुठली ती बघू यात . रावण हा दशग्रंथी होता.

१] ऋग्वेदसंहिता: त्यामध्ये ऋग्वेदसंहिता मंडल १ ते १० ज्यामध्ये ९८५३ ऋचा येतात,ही सगळी संहिता मुखोद्गत असावी लागते.

२] ब्राह्मणसंहिता: प्रत्येक वेदाबरोबर "ब्राह्मण " संहिता असतात, ब्राह्मण संहिता ह्या त्या त्या वेदाबद्दल भाष्य करते आणि यज्ञ करताना काय काळजी घ्यावयाची ही माहिती देते. हे पुस्तकाचे नाव आहे आणि ज्याचा ब्राह्मण जातीशी काहीही संबंध नाही.
ऋग्वेदाबरोबर दोन ब्राह्मण संहिता आहेत "ऐतेरीय " [५० अध्याय]आणि 'सांख्यायन "[४० अध्याय] ब्राह्मण संहिता.
या पैकी ऐतेरीय ब्राह्मणसंहिता ही सोमरस, त्याची आहुती आणि उपयोग ही माहिती देते.

३] आरण्यक : प्रत्येक ब्राह्मणाबरोबर आरण्यक [अरण्यात जाउन गाण्याचे ] पुस्तक असते. ऋग्वेदाबरोबर जे आरण्यक आहे त्याचे नाव एतेरीयारण्यक आहे .त्यात अरण्यात जाऊन करण्याची काही "महाव्रते " दिली आहेत .यातच एतेरीय उपनिषद आहे जे काही तत्त्वज्ञान चर्चेत आणते .
दुसरे ऋग्वेदी आरण्यक आहे कौशितकी आरण्यक .यातील १५ अध्यायात कौशितकी उपनिषद आहे ,तसेच काही थोडे तत्त्वज्ञान ,अग्निहोत्र अशी माहिती आहे .

४] शिक्षा: वेदाबरोबर सहा वेदांगे आहेत त्यापैकी एक शिक्षा आहे. वेदांत उच्चार आणि उच्चारशास्त्र फार महत्वाचे आहे .कारण मंत्रांची शक्ती ही त्यांच्या योग्य उच्चारावर अवलंबून असते हा समज होता.प्रत्येक वेदाला अनुसरून त्याच्या उच्चाराचे पुस्तक मौखिक स्वरुपात आहे त्याला शिक्षा असे म्हणतात. त्यापैकी दशग्रंथी ब्राह्मणाला शिक्षेची ऋग्वेद शाखा ज्याचे नाव “ऋग्वेद प्रतीशाख्य” आहे हे पाठ असावे लागते.

५] कल्प : हे सुध्दा ६ वेदांगापैकी एक आहे. यज्ञामध्ये आहुती आणि बळी देण्याची जी पध्दत होती त्यामुळे त्यासाठी अनुरूप ऋचा यात दिल्या आहेत .
कल्पसुत्रे ही दोन प्रकारची आहेत
१] वेदासाठी: ज्याला श्रुतीसुत्रे म्हणतात.
२] स्मृतीवर आधारलेल्या समारंभासाठी : ज्याना स्मार्तसूत्रे म्हणतात. स्मार्तसूत्रात पुन्हा दोन उप प्रकार आहेत अ] गृह्यसुत्रे : ज्यात घरगुती समारंभ जसे जन्म,नामकरण,लाग इ.वेळेस लागणारे मंत्र ब] धर्मसूत्रे ; ज्यात सामाजिक व्यवहार ,वाळीत टाकणे,सामाजिक जबाबदाऱ्या इ. गोष्टींची सूत्रे आहेत.प्राचीन भारतातील बहुतेक कायदे या सूत्रातून आले.
याशिवाय यजुर्वेदात यज्ञाचा मंडप,वेदी इ. गोष्टींच्या बांधकामाचे गणिती नियम आणि सूत्रे आहते ज्याचे नाव शुल्ब सूत्रे आहे.

दशग्रंथी ब्राह्मणाला ऋग्वेदाशी सलग्न अशी श्रुतसूत्रे पाठ करणे अनिवार्य असे ,जसे आश्वलायन आणि सांख्यायानाची सूत्रे

६] व्याकरण : ऋग्वेद हा मौखिक असल्याने त्याचे उच्चार ,ऱ्हस्व -दीर्घ ,शब्द कसे झाले . त्याचा व्याकरणदृष्ट्या विचार इ. शास्त्राला व्याकरण म्हणतात. यात रूढीला फार महत्व आहे.दुर्दैवाने ऋग्वेदकालचे बहुतेक सर्व ग्रंथ नष्ट झाले आहेत. ऋग्वेदाचे व्याकरण [ज्याला पदपथ अर्थात पायवाट हा मोठा गोड शब्द आहे] ते आहे साकल्यमुनींचे ऋग्वेद पदपथ .
याशिवा संपूर्ण पाणिनी पाठ असणे जरुरी होते.

७]निघंटु: हा जगातला कदाचित पहिला शब्दकोश [dictionary and thesaurus ] आहे . ज्यामध्ये शब्दाचे अर्थ जे रूढ कार्य ,धर्मासाठी लागतात ते विस्ताराने दिले आहेत याचे ५ भाग आहेत . अर्थात याला शब्दकोश म्हणणे तितकेसे योग्य होणार नाही शब्दाच्या अर्थाबरोबर त्याची रूपे, धातू,संधी इ. सर्व दिले आहे. उदाहरण द्यावयाचे तर उदक या शब्दाची १०० रूपे दिली आहेत . अर्थात हे सगळे मौखिक असल्याने पुन्हा पदरुपात आहे. चौथ्या भागात एका शब्दाला समानार्थी शब्द दिले आहेत . या पुस्तकातील पद संख्या १७७० आहे.

८] निरुक्त: अर्थ: व्याख्या, व्युत्पत्तिसंबंधी व्याख्या)शब्दांची व्युत्पत्ती [Etomology ] हे एक नवीन शास्त्र आपल्या लोकांनी तयार केले होते .
निरुक्त पाच प्रकारचे असते १]वर्णागम (अक्षर वाढविणे ) २] वर्णविपर्यय (शब्दातील अक्षरे मागेपुढे करणे ), ३]वर्णाधिकार (अक्षरे बदलणे ), ४] नाश (अक्षर गाळणे ) ५] धातुच्या अनेक अर्थापैकी एक अर्थ सिद्ध करणे. निरुक्तावर यास्क या मुनीनी फार काम केले आणि त्यामुळे त्याना निरुक्तकार म्हणतात. यास्कांच्या पुस्तकात अर्थ काढण्यासाठी छोटी छोटी सूत्रे पद रुपात दिली आहेत कारण हे सगळे मौखिक असल्याने लक्षात ठेवणे पदरुपात सोपे जाते. याशिवाय कठीण शब्दांचे अर्थ आणि वैदिक शब्दांचे अर्थ संदर्भासहित दिले आहेत.

९] छन्द: आपले हे सगळे ज्ञान हे पदरुपात मौखिक मोठ्याने घोकायचे असल्याने ज्ञान संपन्न ब्राह्मणाला कवितेचे नीरनिराळे प्रकार,ते ओळखणे ,तालासुरात म्हणणे आणि तशी पदे रचणे हे सगळे माहित असणे आवश्यक आहे .एकट्या ऋग्वेदात जगती,त्रिष्टुभ,गायत्री ,विराज आणि अनुष्टुभ हे छन्द आहेत .त्यामुळे हे सगळे शास्त्र हे छन्द या नावाखाली येते. छन्दामध्ये अक्षरसंख्या, मात्रा ,गती ,यति [pause ] ह्या कसौट्या असतात आणि त्यामुळे हे खूप कठीण शास्त्र आहे. ऋग्वेदात याची चर्चा आहे. दशग्रंथी ब्राह्मण हे पदे रचण्यात वाकबगार असत.

१०] ज्योतिषशास्त्र : हेही वेदान्गापैकी एक आहे आणि याला शास्त्र हे त्याच्या खालील उपविभागामुळे म्हणतात पण आपल्याकडे अज्ञ धार्मिक फक्त फलज्योतिष हेच ज्योतिष समजतात . ज्योतिषशास्त्रचे प्रकार आहेत
अ] खगोलशास्त्र [ astronomy ]
ब] सिद्धान्तज्योतिष अथवा 'गणित ज्योतिष' (Theoretical astronomy)[कधी ग्रहण होईल हे ठरविणे ]
क] फलितज्योतिष (Astrology)
ड] अंकज्योतिष (numerology)

आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले असेल की दशग्रंथी ब्राम्हण होणे हे का महाकठीण काम आहे ,कारण हे सगळे समजून घेणे आवश्यक होते त्याशिवाय ही सगळी अफाट पदसंख्या पाठ करणे आणि धर्मपीठापुढे त्याची परीक्षा देणे आवश्यक असे. इतके काही करून हे सगळे ज्ञान मौखिक स्वरूपात आपल्या पूर्वजांनी जतन केले म्हणजे ते काय तैल बुद्धीचे असतील याचा विचार तर करा.....

<<आधारित - https://www.facebook.com/groups/kbvsdb/- >>

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व अभ्यासू सदस्यांना धन्यवाद. विशेषतः स्वामी विश्वरूपानंद, limbutimbu , परब्रम्ह, वरदा, हरिहर Happy

ब्राम्हण हा दशग्रंथी आहे कि नाही ही प्रथा कलियुग सुरु झाल्यानंतर जवळ-जवळ १६०० वर्षां नंतर तथाकथित धार्मिक पंडितांनी स्वार्थासाठी प्रचलीत केली. आधार?

एक बारीक शंका : अशा अवघड कुळातल्या प्रत्येकालाच वेद विद मुखोद्गत करावे लागतात का ते फक्त पहील्या मेंबरालाच लागु आहे? कारण असे दशग्रंथी मठ्ठाड पाहीले आहेत. मी गेले १५ वर्ष मठ्ठाड I. T. managers बरोबर काम करतो आहे. (मी स्वतः embedded programming ची वाट लावतो- पण हे managers पूर्ण प्रोजेक्ट्सची वाट लावतात.) मुद्दा हा की अपवाद सगळीकडे असतात. मी स्वतः काही व्युत्पन्न वैदिक ब्राह्मण (दशग्रंथी नव्हते) जे उच्च दर्जाचे उपासक होते - पाहिलं आहेत.

प्रगति कि दुर्गति ? हा एक लेख मी लिहीणार आहे, त्यात ह्या सर्व गोष्टींचा समावेश असेल. जरूर लिहा - लवकर लिहा.

जेंव्हा लोक विचार, मुद्दे यांना सोडून व्यक्तिगत पातळीवर उतरतात, तेंव्हा धाग्याची वाट लागते. हे मायबोलीवर बरेचदा होते. काय करणार!

limbutimbu, भाग्यवान आहात Happy

झक्की काका,
अहो, प्रत्येकाने आपले अनुभवच तर लिहिले आहेत.
मी तुमचे अनुभव आहेत ते काय व कसे ते इमानदारीत विचारतो आहे. असं काय करताहात?

सर्व अभ्यासू सदस्यांना धन्यवाद. विशेषतः स्वामी विश्वरूपानंद, limbutimbu , परब्रम्ह, वरदा, हरिहर >>आकाशनील यांच्याशी सहमत. खूपच माहितीप्रद धागा. धन्यवाद.

मी तुमचे अनुभव आहेत ते काय व कसे ते इमानदारीत विचारतो आहे. असं काय करताहात?

मी नम्रपणे असे सांगू इच्छितो की मी ज्ञानी नसल्याने मला जे अनुभव आले किंवा त्यावरून माझी मते काय बनली याला फारसा अर्थ नाही. तरीहि मी माझी मते मांडली. त्यात काही चुकले असल्यास कृपया सांगावे. (अमेरिकन सेक्रेटरि ऑफ स्टेट ,जॉन केरी याने असे सांगितले की लोकशाहीत स्टुपिड असणे मान्य आहे, त्यांना पण मत प्रदर्शित करण्याचे स्वातंत्र्य आहे. मी त्याचा पुरेपूर फायदा घेत असतो.)

आकाश नील,
नमस्कार ! परब्रह्माच्या " एको हं बहुस्याम", ह्या आदी-ईच्छेनंतर विश्वरचनेच्या रचनारंभातले सर्वांत पहिले महाभूत ( पंचमहाभूतांपैकि ), तुम्ही - आकाश !
भगवान श्रीकृष्णाच्या स्वधाम गमना ( ह्याला भगवंताच्या कुठल्याही अवताराला संबोधितांना कधीहि परमधाम म्हणु नये ), नंतर कलियुगाचा आरंभ झाला हे सर्वांस माहिती आहेच.
कारण भगवंताचा " प्रत्यक्ष" ( म्हणजे physically अथवा materialistically visible ) अवतार श्रीकृष्ण असेपर्यंत कलियुगाचे आरंभ होणे कदापि शक्य नव्हते.
आता अवगत ( म्हणजे आत्तापर्यंत माहित असलेला ), इतिहास ( म्हणजे घडलेल्या घटना - नुसत्या गोष्टी नव्हेत ), आणी प्रत्यक्ष भगवंताची वाणी ह्या दोन्हींचा पडताळा ह्याच बरोबर, श्रीकृष्णाच्या पृथ्वीवर अवतरित ( ह्याला आजकाल श्रीकृष्ण जन्म म्हणतात, जो खरं म्हणजे झाला नव्हता - अवतरला होता ) होण्याच्या ग्रहांच्या स्थितीवरुन आणी पुढे श्रीकृष्णाच्या स्वधाम गमनापर्यंतचा जो अवघि आहे तो जवळ-जवळ १२५ ते १३० वर्षांचा आहे, ह्याचा अर्थ भगवंताने पृथीवर १२५ ते १३० वर्षे राहुन कार्ये केली.
भगवंताच्या यादव कुळाचे वंशज तर नंतर राहिले नाहित, पण अर्जुनाचा नातु " परिक्षित ", ह्याने काहि कारणासाठी ( आता ही कारणे ईथे सांगत बसलो तर पुष्कळ वेळ लागेल ), कलियुगाचे दमन करण्याचे ठरवुन त्यास आव्हान केले असता कलियुग मूर्तिमंत ( कलि ), होऊन राजा परिक्षितीला शरण गेला. तेव्हा पृथीवर त्यास राहु द्यावे म्हणजे लोकांना भक्तिमार्गाने जाऊन कलियुगात परमेश्वराची प्राप्ति करुन घेता येईल म्हणुन त्याला सोडुन देतांना त्याच्याकडुन वचन घेतले कि यज्ञ्-यागादि कार्यांचा लोप होणार असल्यामुळे भक्ति हा एकच मार्ग लोकांपुढे दैववशात येईल, तरी धर्माचे स्वाभाविक रितिने रक्षण अनिवार्य आहे " तेव्हा तू धर्माचा पूर्ण लोप न करता क्षय मार्गाने त्यास फक्त क्षीण करु शकशील, ह्यावर कलियुगाने ( कलि ) त्यास पुढील दोन सहस्त्र वर्षे धर्माच्या वाटेस न जाण्याचे आश्वासन दिले.
पण त्याच्या स्वतःच्या प्रभावाने त्या अवधि आधिच हा संकर जाणवला आहे.
कारण पुढे ही जी छोटी राष्ट्रे होती, त्या-त्या राजांनी एक परंपरा ( खरंतर चढाओढ ), चालविली कि सर्व शास्त्रे वा कलांमध्ये पारंगत व्यक्ति फक्त आपल्याच राज्यसभेत असावी. कारण वरील घटनेनंतर ऋषी आणी मुनींचा पुष्कळ अभाव झाला होता ( कलिच्या प्रभावाने वानप्रस्थाश्रमाचा लोप झाला कारण चोर्-लुटारुंच्या सुळ्-सुळाटामुळे ती कार्ये अशक्य झाली ), अर्थातच ह्या सर्व विद्या आणी कलांमध्ये पारंगत गुरु वर्ग राहिला नाही, तर शिष्यवर्गही लोप पावला - अर्थात ब्रम्हचार्याश्रम ही गेला, राहता राहिला गृहस्थाश्रम . . . . जो आजहि आहे, ह्या सर्व घोटाळ्यात अती मध्ये अती करुनहि सर्वविद्या अवगत
असलेला गुरु मिळणे फार कठीण गेले, आणी हळु-हळु जिज्ञासुंनी आपआपल्या क्षमतेनुसार त्या-त्या विद्यांचे अर्जन केले जे त्यांच्या पोटापाण्याच्या व्यवस्थेत येतील, ईथुनच पुढे जो काळ आला त्यात घराणेच्या घराणे त्या विद्येत आचार्यत्व धरुन राहिले. ईथुनच बहुतेक हा गुरु वर्ग निरनिराळ्या विषयांमध्ये पुढे गेला, होता-करता ऋग्वेदाचे भाग केले, तद्धत यजुर्वेदाचे, अथर्ववेदाचे, सामवेदाचेही भाग केले.
आयुर्वेद हे त्यातुन वाचला नाही, त्याचे ही भाग झाले ( आज आपण मेंदुचे, ह्रुदयाचे, हाडांचे, शल्यक्रियेचे निपुण वैद्य म्हणजे डॉक्टर पाहातो हा त्याच कलिचा प्रभाव म्हंटले तर अतिशयोक्ति होणार नाही ).
आणी हे सर्व संकरण होता-होता अगदी राजा पुरुरवा ( पोरस ह्या नांवाने प्रसीद्ध ) पर्यंत अगदी धड-धडीत सुरु झाले.
ईथपर्यंत कलिच्या प्रभावामुळे दोन ऐवजी १६०० वर्षांमध्येच हा प्रखरपणे जाणवला.
कारण ह्याच कालावधित विष्णुगुप्ताने ( चाणक्य / कौटिल्य ) राजा महानंदी ( महापद्म नंदी , हा जरासंधाचा वंशज ) चा सर्वनाश केला चंद्रगुप्ताच्या द्वारे, ज्याला त्यानेच शिक्षा देऊन शेवटी सम्राट बनविले कारण ही सर्व छोटी राज्ये एका छत्राखाली आणुन त्याने एक मोठे गणराज्य स्थापन कर विले.

मला वाटते एव्हढे ईथे पुरे आहे!

मी काही बाकि सर्वांसारखा ज्ञानी नाहि अथवा पारंगत ही नाही, जितके उमजुन बोलु शकलो, तेव्हढे सांगितले. बहुतेक सुसंगत न वाटावे ! ! !

आणी सगळ्याच गोष्टी आयुष्यात सुसंगत झाल्या , तर मनुष्याला आपले डोके चालवायची गरज पडणार नाही.

पण आवर्जुन सांगेन कि ही नुसती माहिती नाही.

<<<हा अमूल्य ठेवा आजच्या अभ्यासकांपर्यंत, समाजापर्यंत पोचला आहे त्याचे श्रेय मान्य करायलाच हवे. हे कधीही न फिटणारं ॠण आहे >>>>

<<<<<अभिमान मानायचा स्वतःच्या संस्कृतीचा तर या अशा गोष्टींसाठी मानायचा असतो. उगाच वेदात/आमच्या जुन्या साहित्यात्/संस्कृतीत सगळंसगळं आहे अशी पोकळ शेखी मारून काही उपयोग नाही.
>>>>>

कश्याला अभिमान बाळगायचा ? ज्या संस्कृतीने वेद दिले त्यासाठी का ते पाठ करायला एवढे
मार्ग दाखवले त्यासाठी ??

मी नम्रपणे असे सांगू इच्छितो की मी ज्ञानी नसल्याने मला जे अनुभव आले किंवा त्यावरून माझी मते काय बनली याला फारसा अर्थ नाही
>>>
वाचकहो, फसू नका. हा त्यांचा विनय्-बिनय काहीही नाही. ते खरोखरच ज्ञानी नाहीत आणि त्यांची मते खरोखरच निरर्थकच असतात Proud

परब्रम्ह,

प्रतीनमस्कार आणि धन्यवाद. आपल्या उत्तरावरून आपला व्यासंग दिसतोच आहे. (आणि आकाश हे परब्रह्माच्या खालीच आहे, वर नाही Happy )

मी काही बाकि सर्वांसारखा ज्ञानी नाहि अथवा पारंगत ही नाही, जितके उमजुन बोलु शकलो, तेव्हढे सांगितले. बहुतेक सुसंगत न वाटावे ! ! ! नाही - आपले (आणि ह्या धाग्यातील बऱ्याच जणांचे) विचार वाचून खूप काही कळले.

पण आवर्जुन सांगेन कि ही नुसती माहिती नाही. हे वाक्य महत्वाचे वाटले पण कळले नाही.

आकाश नील,
तुमच्या पहिल्याप्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न इइथे करतू आहे.
प्रतीनमस्कार आणि धन्यवाद. आपल्या उत्तरावरून आपला व्यासंग दिसतोच आहे. (आणि आकाश हे परब्रह्माच्या खालीच आहे, वर नाही ) > > > >
आकाश, धन्यवाद,
स्वामि विश्वरुपानंद ह्यांची क्षमा मागुन ( कारण तुमच्या वरील वाक्याचे पृथक्करण करुन आता जे काहि मी तुम्हा सर्वांबरोबर वाटुन घेणार आहे , त्याला फार्-फार मोठे महत्व आहे , पण ते इथल्या मूळ धाग्याला धरुन नाही आहे ), मी तुमच्याशी एक आदी सत्य इथे वाटुन घेतो आहे.

आकाश, हे परब्रह्माच्या खाली नाही. आकाश हे सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे, आकाश कश्यात नाही अशी कुठलिही गोष्ट ह्या चरचरात नाही.
कसं ते सगळं इथे अगदी थोडक्यात सांगतो . . . .
अनादी काळात ( जेव्हां काळ, वेळ, दिशा, ग्रह, तारे, संपूर्ण विश्व, हे काहिही नव्हते ), तेव्हांपासुन ( हे आजच्याकाळातले तिथपर्यंतचे ज्ञान, त्या आधी किती काळ(?) लोटला होता हे कोणासहि ज्ञात नाही ), एक शक्ति आपल्या आपण अस्तित्व धारण करुन होती. ह्या शक्तिच्या स्वतः च्या स्फुरणाने वा प्रभावाने म्हणा, एक आणखीन शक्तिची स्वनिर्मिती झाली ( ह्या साठी चुंबक आणी त्याचे चुंबकत्व लक्ष्यात घ्यावे, लोखंडाला चुंबक खेचित नाही, त्याला खेचते ती चुंबकाची शक्ति - चुंबकत्व- magnetic power ).
आदी शक्ति म्हणजे परमतत्व वा परब्रह्म आणी स्वनिर्मित शक्ति ही प्रकृती वा माया.
मायेची निर्मिती होताच मायेच्या प्रभावाने एक आदी ( त्यावेळेस जे जे काय घडत गेलं ते सर्व आदीच होतं, कारण त्या आधी कधीहि झालेलं नव्हतं ), इच्छा निर्माण झाली, " एको हं बहुस्याम ", एकच आहे, बहु म्हणजे एकापेक्षा जास्ती व्हावे.
इच्छा निर्माण होण्यासाठी गुण लागतो, पण परब्रह्म हे निर्गुण आहे, हा मायेचा ( प्रकृती ) चा प्रभाव, मायेचा आधार घेऊन हा सर्व कार्ये करतो. म्हणजेच ह्या चराचरात जे काहि आहे, घडले, घडणार, दृष्य, अदृष्य, वस्तु, पदार्थ, प्राणीमात्र, पंचमहाभूत, हे सर्व-सर्व मायेचा प्रभावाने.
बरं मग आता बहु व्हावे, म्हणजे काय व्हावे ? कारण काय व्हायचं वा काय बनवायचं त्यासाठी काहितरी सापेक्ष हवे ना ? त्यावेळेस काहिच नव्हतं तर कसं कळावं कि काय व्हावं ?
आता आपल्याला सांगितले कि काहितरी बनवा, मग आपण विचारु ना ? कि, काय बनवु ? चित्र , घोडा, गाडी, मनुष्य , पशु, पक्षी, पाणी, काहिही ! पण हे सर्व तेव्हां होतं कुठे ?
होतं ते फक्त एकच तत्व . . . . ते स्वतः .
म्हणुन स्वतः सारखीच एक आदी सृष्टी निर्मिली गेली . . . . आकाश ( space ). हे सर्वांत पहिले महाभूत आहे ( भूत ह्याचा इथे अर्थ सृष्टी असा आहे ).
आता एकापासुन बहु झाले तसे गुणही झाले.
परमतत्व / परब्रह्म हे निर्गुण आहे.
आता आकाशात एक गुण आला - ते आहे, फक्त अस्तित्व ( त्याला आकार, स्पर्श, चव, रंग, रुप काहिच नाही ).
त्यानंतरची सृष्टी ही आहे वायु.
वायुत आता दोन गुण आले - ते आहे , त्याला स्पर्श आहे.
त्यानंतर अग्नी निर्माण झाला - ह्यात तीन गुण आले - ते आहे, त्याला स्पर्श आहे, त्याला रुप आले.
ह्यानंतर झाले पाणी / जल - ह्यात चार गुण आले - ते आहे, त्याला स्पर्श आहे, त्याला रुप आहे, आता त्याला चव आली ( आपण ते पिउ शकतो ).
तद् नंतर शेवटी झाली पृथी - ह्यात पांच गुण आले - ते आहे, त्याला स्पर्श आहे, त्याला रुप आहे, त्याला चवही आहे ( लहानपणी मनुष्य माति का खात असावा ह्या प्रश्णाचे उत्तर / रहस्य बहुतेक ह्या दृष्टीकोनातुन पाहिल्यास मिळु शकेल), आता पांचवा गुण आला तो आहे गंध ( मातित पाणी पडले कि त्यास एक गंध येतो ).

आणी आता ह्या सर्व गुणांच्या आधारे ( base ), पुढची सर्व सृष्टी निर्मिली आहे. पुढील सर्व वस्तु, पदार्थ, मनुष्य, पशु, पक्षी, जलचर, झाडे-वेली-वनस्पती, ग्रह,तारे ह्या सर्वांमध्ये ह्यांतील दोन वा पांचही महाभूत समाविष्ट होतात.
उदा: आपल्या शरिरात हे सर्व पंचमहाभूत आहेत.
आकाश - आपले काहि अवयव आतुन पोकळ असतात ( ह्रुदय, फुप्फुस, जठर, आंतडे इ. )
वायु - सांगायची आवश्यकता नाही कि आपण जन्मभर श्वास घेत जगतो.
अग्नी - आपल्या शरिराचे तापमान नेहेमी ९७*से. असते, ते वाढले कि आपण म्हणतो ताप आला.
पाणी - आपल्या शरिरात ६७ टक्के पाणी असते.
पृथी - आपले अवयव, रक्त, हाडे, मांस, त्वचा, हे सर्व पृथीच्या स्थूल रुपाचेच प्रतिक आहेत.

आणी हे शरिर जेव्हां गर्भात अंकुरित होते, तेव्हां हे परमतत्वाच्याच भोवती घडत जाते, कारण हे परमतत्व सगळीकडे आहे, हाच जो अंश आपल्या शरिरांमध्ये जखडला जातो, हाच तो आत्मा, परमात्म्याचा अंश. पुढे शरिर जस-जसे घडत जाते तसे-तसे ५ इंद्रीये +५ कर्मेंद्रीये ( इंद्रीये आणी कर्मेंद्रीये असल्याशिवाय पंचमहाभूतांचे वैशिष्ट्य समजणे शक्य नसते ), ५ महाभूते स्वतः , एक मन, अश्या १६ कलांनि युक्त अश्या शरिर नांवाच्या पुरात ( पुर-गाव-शहर ) तो वास करतो म्हणुन त्यास पुरुष असे नांव आहे.

हेच आपले शरिर कार्य संपल्यावर ह्या पंचमहाभूतांसच अर्पण होत असते.
अग्नी संस्कार म्हणा अथवा पुरुन ( burry ) देणे म्हणा.

सर्व धर्मा मध्ये हीच प्रथा आहे. ( म्हंटलं होतं ना . . . . सर्व गोष्टींचे मूळ ( बेस ) अजुनही तसेच आहे, माणसाच्या समजुती फक्त बदललेल्या आहेत ).

कृपया इथे पुरुष म्हणजे स्त्री-पुरुषांतला पुरुष असा अर्थ घेवू नये.

आकाश - म्हणजे स्पेस, हे सर्वत्रच आहे, अहो हे सर्वांच्या सर्व अणु-रेणुं मध्येही आहे, म्हणुन म्हंटले कि आकाश सर्वत्र आहे कारण हेच महाभूत आहे जे परब्रह्माच्या प्रमाणेच सर्वत्र आहे आणी अस्तित्वात असण्याशिवाय त्यात आणखीन दुसरा कुठलाहि गुण नाही . . . . म्हणजे हे सुद्धा जवळ-जवळ निर्गुणच म्हणा ना !

अहो घटात ( मडक्यात ), आकाश ( space ), असते आणी घटाच्या बाहेरही आकाश ! मग इथुन-तिथुन हे आकाश सारखेच ! फक्त घटाच्या भौतिक-दृष्ट्या समोर असल्यामुळे हे आकाश वेगळे होत नाही ( तसे दिसते पण असत नाही ).
उद्या जर हा घट फुटला कि आंतले आकाश बाहेरिल आकाशांत विलीन होते . . . . हे कळते पण दिसत नाही . . . .?
माती ही घटाचे कारण असुन ती घटापासुन वेगळी-अलिप्त असते. मातीचा, घटातील वा बाहेरील तत्वांशी संबंध नसतो ( हे पंच महाभूत ही असेच असतात ). ह्या शरिराचे कारण आहेत पण कर्ते नाहित.

ह्या घटांचा कर्ताही वेगळाच असतो . . . .

संत गोरा कुंभार ही हेच सांगुन गेला नाही का ? त्यांचे ते भजन आपण ऐकलेच असावे ?

फिरत्या चाका वरशी देशी, मातीला आकार,
विठ्ठला, तु वेडा कुंभार . . . .

आकाश . . . . तुमच्या दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न इथे करतो . . . . गोष्टी अनुभवल्या आहेत.
काय आणी कसं दिसलं अथवा काय अनुभव आला ह्याला महत्व आहे.

उदाहरणार्थ : एक स्टीलचा पेला, एक त्याचच ताट, त्याचीच वाटी, त्याचेच चमचे, त्याचीच भांडी हे सर्व वरुन पाहिले तेव्हा सर्व वेगळे दिसले - ह्या सर्व वस्तुंचा उपयोगही वेग-वेगळा उमजुन आला.
परंतु पुन्हा एकदा नीट पणे शांत मन ठेवुन, अगदि परमावधीच्या एकाग्रतेने पहात राहिलो आणी झटकन लक्ष्यात आलं कि हे फक्त एकच स्टील आहे वेग-वेगळी आकार दिलेलं वेग-वेगळ्या उद्देश्यांसाठी.

आणी मजेची गोष्ट ही, कि ह्या सर्व वस्तुंची घडण- जडण आणी कार्ये जरी वेगळी असली तरी ह्या सर्व वस्तुंचा मूळ उद्देश्य हा एकच आहे. जसे खाणे / जेवणे इ.

ह्यालाच बहुतेक मनःचक्षु असे म्हणतात, एकाग्रतेने विचार केला आणी सर्वत्र परब्रह्मच जाणवले.
आंत-बाहेर- मागे-पुढे-वर -खाली - सर्व दिशांना.

आकाश , स्वामि विश्वरुपानंद ! ! ! !
एकदा पुनःश्च क्षमा प्रार्थना, धागा सोडुन बोलण्यासाठी . . . . नमस्कार

परब्रह्म, पंचमहाभूतान्चे सुन्दर विवेचन, इथे दिल्याबद्दल धन्यवाद
>>>>>
आकाशात एक गुण - ते आहे, फक्त अस्तित्व
वायुत दोन गुण - ते आहे , त्याला स्पर्श आहे.
अग्नी - ह्यात तीन गुण - ते आहे, त्याला स्पर्श आहे, त्याला रुप आले.
पाणी / जल - ह्यात चार गुण - ते आहे, त्याला स्पर्श आहे, त्याला रुप आहे, आता त्याला चव आली
शेवटी पृथ्वी - ह्यात पांच गुण - ते आहे, त्याला स्पर्श आहे, त्याला रुप आहे, त्याला चवही आहे, अन गंधही आहे
<<<<<<
या माहितीचा संदर्भ मी ज्योतिषातील नक्षत्र/राशी यान्चे तत्वाशी लावू पहातो आहे. कदाचित अधिक निरिक्षण/अभ्यासाअंती कळू शकेल की त्या त्या तत्वाच्या नक्षत्रे/राशीच्या व्यक्ति मधे तत्समान गुणवैशिष्ट्यांचे प्रकटीकरण आढळू शकेल. जरा नीट अभ्यासले पाहिजे.

परब्रह्म,
खुप छान लिहिता तुम्ही. सोप्या भाषेत अर्थ समजावुन सांगता. एखादा लेख लिहिलात तर उत्तमच!

लिंबुटिंबु, परब्रम्ह ,

विषेश धन्यवाद, आजही सामन्य जनात पंचमहाभुतां विषयी फारशी माहिती नाहीय.

पंचमहाभुते ही आपल्या चराचरांची तसेच शरीरांचे मुलभुत घटक आहेत. तसेच प्रत्येक चराचरातील
घटक, वस्तू वा शरीर हे सर्व पंचमहाभुतां पासुन बनलेले असते. पाचांतील प्रत्येक महाभुतांचे प्रमाण
एकमेकापेक्षा कमी जास्त असु शकते.

ह्या पंच महाभुतांत अग्नी महाभूत हे सर्वांत शुद्द गणले जाते. कारण बाकीचे चार महाभुत हे अशूद्द होऊ
शकतात. पण अग्नी अशुद्द होऊ शकत नाही.

आयुर्वेदातील त्रिदोष हे सुद्दा याच पंचमहाभुतांनी बनलेले आहेत. उ. दा.

१. पित्तः अग्नि + जल
२. वातः वायु + आकाश
३. कफः प्रृथ्वी + जल

शरीरात अग्निचा वास कोठे असतो, जिथे जिथे पित्त तिथे तिथे अग्नि !

पोटातील जठरांग्नी साठी आपण जेवण घेतो. अन्न भक्षण हे यज्ञ कर्म आहे हे आपल्याला माहित असेलच.
ह्या जठराग्नीसाठी समिधा म्हणजे अन्न आणि ते अन्न ह्या अग्निपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो "आपान
वायु". आपान वायु अन्नाला पोटात पुढे ढकलत असतो.
आता खर्या यज्ञात समिधा टाकतांना जी मुद्रा वापरतात त्याला ही "आपान मुद्रा" म्हणतात.

वरील उल्लेख फक्क्त पंचमहाभुते किती गुंतागुंतीची आहेत हे दाखवण्यासाठी उदाहरणा दाखल दिलेले
आहे.

विषयांतराबद्दल क्षमस्व !!

लिंबूटिंबू, गमभन, नाईक,
आपणा सर्वांचे अनेक धन्यवाद.

लिंबूटिंबू,
अवश्य संबंध आहे ह्यांचा ज्योतिषशास्त्राशी. हातांची पाचही बोटे ही पंचमहाभूतांशी संबंधित असुन त्यांची मूळ कार्यप्रणाली ही मूळ तीन गुणांवर आधारित आहे ( सत्व, रज, तम ) ज्यामुळे आपल्या प्रत्येक बोटांचे मुख्य तीन भाग दृष्टीगोचर असतात.
आणी दशग्रंथात दिल्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रातील अंक ज्योतिष हा भाग ईथे पृथक्करण करुन पाहिला, कि बर्‍याच गोष्टींचा सरळ उलगडा होउ शकेल.

गमभन,
आभारी आहे, आपल्या सारख्या जाणकारांमुळेच आपली संस्कृति अजुन तग धरुन आहे.
ही सगळी खरी रहस्ये अजुनही आहेत, पण आताच्या युगात विसरली गेली कारण सर्वांचे राहाणीमान ही पुष्कळ बदलले.
लेख अवश्य लिहीणार आहे.
सध्या आणखीन एक नविन पानावर मी " काय होतं आणी काय होतं आहे", हा विषय घेउन गप्पा सुरु केल्या आहेत. त्यात मी, खरी मूळ कारणे आणी मूळ उत्पति आणी आताची लोकांची त्याबद्दल समज, ह्या आधारवर बोलत आहे.

नाईक,
प्रतिसादाबद्दल आभार,
तुमचा रोख बरोबर आहे, पंचमहाभूतांच्या आपल्या आणी बाकिच्या सर्व जीव्-भूतांशी सरळ संबंध आहे.

एकदा का ह्या सर्व धाग्यांचा प्रवाह बरोबर कळला कि, सर्व कसे स्पष्टपणे दिसुन येईल.

अग्नीचा आणखीन एक खूपच आश्चर्यकारक गुण हा आहे कि, हा नेहेमी जीव्-भूतांच्या शरिराभोवती एक अदृश्य वलयांकित रुपात ( aura ), सतत उपस्थित असतो आणी ह्या वलयाच्या रंगामध्ये जो निर-निराळा भेद उत्पन्न होत असतो, तो त्या-त्या प्राण्याच्या शारिरीक आणी मानसिक अवस्थेवर अवलंबुन बदलत असतो.
ही वलये देवतांना सुद्धा चुकलेली नाहित, देवांच्या चित्रांमध्ये नेहेमी डोक्याच्या मागे एक तेजोवलय दाखविण्याची प्रथा आहे, पण ते मुळांत काय ते असं आहे.

जास्ती जुनी गोष्ट नाहिये ही . . . . चीन देशाने बळाचा दुरुपयोग करुन जेव्हां तिबेट पादाक्रांत केला, त्यावेळे पर्यंत तिथल्या ( तिबेट लामा सेरी - पोटाला, चाकपोरि इ. ), आरोग्य-शास्त्राच्या विद्यार्थी लामांना, ह्या वलयाची अवस्था व रंग पाहुन रोगाचे निदान करणे आणी अचुक औषधीही देणे ह्याचे शिक्षण दिले जात असे, आणी सर्वांत मुख्य गोष्ट म्हणजे ह्या सर्व शिक्षण प्रदाना पूर्व त्यांचे नाकातुन काही शल्यक्रिया करुन त्यांचा तिसरा नेत्र कार्यरत करित असत , ज्या द्वारे ही वलये मनुष्य अगदी स्पष्ट पाहु शकतो.

प्रत्येक मनुष्यास जन्मतःच हा तिसरा नेत्र लाभलेला आहे, कारण हा ह्या मनुष्य प्रकार शरिराचाच भाग ( जसे भगवान शंकर ), असुन निव्वळ सीद्धी आणी ज्ञान द्वारा हा कार्यरत होऊ शकतो.

दश ग्रंथात ह्या विषयी काही मुद्दे असावेत.

>> संत गोरा कुंभार ही हेच सांगुन गेला नाही का ? त्यांचे ते भजन आपण ऐकलेच असावे ?
फिरत्या चाका वरशी देशी, मातीला आकार,
विठ्ठला, तु वेडा कुंभार . . . .
<<
अहो, ते संत ग.दि.माडगूळकरांनी लिहिलंय ना?

अहो, ते संत ग.दि.माडगूळकरांनी लिहिलंय ना?

हा मुद्दा इथे अत्यंत महत्वाचा आहे. वर एव्हढे सगळे भारूड लिहीले आहे त्यापेक्षा हा प्रतिसाद अत्यंत उच्च दर्जाचा, लेखकाच्या ज्ञानाचा नि अभ्यासाचा निदर्शक आहे.

कारण मायबोलीचा नियमच आहे की तळ्यातल्या कमळांचे सौंदर्य न पहाता, तिथल्या चिखल नि त्यातल्या किड्यांकडे पाहून नाके मुरडणे, हे अत्यंत उच्च अभिरुची असल्याचे, विद्वान असल्याचे लक्षण आहे.
Light 1

झक्की,
गदिमांचे लेखन संत गोरा कुंभारांच्या नावावर खपवणे याला अज्ञान म्हटले, तर तिथे अधिकारवाणीने ब्रम्हचर्चा सुरू आहे, ती कोणत्या अभ्यासाच्या आधारावर? या प्रश्नाला किडा म्हणावे, कमळ म्हणावे, की चिखल?

==================================शुद्धी===================================
@ऋग्वेदाबरोबर जे आरण्यक आहे त्याचे नाव एतेरीयारण्यक आहे >>> ''अरण्यक'',,,''ऐतरेय अरण्यक''

@१] वेदासाठी: ज्याला श्रुतीसुत्रे म्हणतात.>>> ''श्रौत सूत्र''

@दशग्रंथी ब्राह्मणाला ऋग्वेदाशी सलग्न अशी श्रुतसूत्रे पाठ करणे अनिवार्य असे>>> ''श्रौत सूत्रे''
==============================================================
@आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले असेल की दशग्रंथी ब्राम्हण होणे हे का महाकठीण काम आहे ,कारण हे सगळे समजून घेणे आवश्यक होते त्याशिवाय ही सगळी अफाट पदसंख्या पाठ करणे आणि धर्मपीठापुढे त्याची परीक्षा देणे आवश्यक असे. इतके काही करून हे सगळे ज्ञान मौखिक स्वरूपात आपल्या पूर्वजांनी जतन केले म्हणजे ते काय तैल बुद्धीचे असतील याचा विचार तर करा..... >>> आजही वेदपाठ शाळांमध्ये याच पद्धतीने शिकविले/शिकले जाते... एका शाखेचा क्रमांती(दशग्रंथी) होण्यास (पात्रता असेल तर...) १० ते १४ वर्षांचा कालावधी लागतो.यात लेखी अभ्यास कुठेही नाही.दररोज ८ ते १० तास आणी शेवटच्या काही वर्षात हाच अभ्यास कालावधी दररोज १४ ते १६ तास इतका असतो. सर्व अभ्यास पाठांतर याच स्वरुपात असतो.आणी गेल्या १५ वर्षात अगदी २० ते २५ वयोगटातले (जवळपास प्रत्येक शाखेचे) बरेच क्रमांती भारतात तयार झालेले आहेत. Happy

बाकि लेखात माहिती उत्तम दिलेली आहे...धन्यवाद.

झक्की,

+ १०००००००००००००००००००००००००

हो ते थर्ड आय (T Lobsang Rampa ) हे पुस्तक एक फिक्शन म्हणून वाचायला अत्तिशय मनोरंजक आहे Proud

फिक्षन चा अर्थ पहात होतो जरा ..
Fiction - Wikipedia, the free encyclopedia

Fiction is the form of any work that deals, in part or in whole, with information or events that are not factual, but rather, imaginary and theoretical—that is, invented ...

परब्रह्म,

आपण इतके उत्कृष्ट विवेचन केले आहे कि त्यावर अधिक काही लिहिणे योग्य नाही. आणखी एका प्रश्नाचा उलगडा करू शकाल? (ह्या धाग्यावर योग्य नसेल तर स्वतंत्र धाग्यावर),

हे विश्व फक्त (परब्रम्हाच्या) कल्पनेतच आहे (...अकल्पयत ...), कि त्याला काही अस्तित्व आहे? (प्रश्न कदाचित थोडा चुकीच्या शब्दात विचारला आहे).

What did Einstein mean when he said "Reality is merely an illusion, albeit a very persistent one"?

धन्यवाद.

मला एक बेसीक प्रश्न आहे, की हे येवढे पाठांतर करुन आणि आभ्यास करुन काय उपयोग झाला? जातीय संस्था निर्माण करुन भारताची जेवढी "काशी" झाली आहे तेवढी आणि कशाने झाली नसेल. पुजेला किंवा यज्ञ करताना जे मंत्र म्हंटले जातात त्यांचे अर्थ त्या ब्रम्हणाला तरी कळतो का कुणास ठाऊक.
आणि येवढ्या ऋचा आणि मंत्रा पाठ करुन कोणी कसा काय विद्वान होऊ शकतो? हे तर घोकंपट्टी करून पास झालेल्या डॉक्टर्स आणि इंजिनिअरस सारखं आहे ज्यांच्या पदवी मिळवण्या पलिकडे काही उपयोग नाही.

मी तर गणितं देखिल पाठ करणारे इंजिनिअर्स पाहीले आहेत

इतके काही करून हे सगळे ज्ञान मौखिक स्वरूपात आपल्या पूर्वजांनी जतन केले म्हणजे ते काय तैल बुद्धीचे असतील याचा विचार तर करा..... >> ह्यात तैल बुद्धीचा संबंध आला कोठुन? शेतीकरी, चांभार, सोनार, लोहार, शिंपी ह्याच्या ज्ञानाच काय? त्यांच्या ज्ञानाचा उपयोग तरी आहे. मंत्र उच्चारत काटक्या (समिधा) जाळुन कोणाचा काय फायदा होतो कोणास ठाऊक?

तुम्ही वर जो इतिहास लिहीला आहेत त्यात बोध घेण्या सारख काय आहे? अरे कलीचा प्रभाव वगैरे सगळं फार मजेशिर आहे असं वाटतं नाही का? सगळ्या अराजकतेचं खापर कलीवर फोडण्यात काय अर्थ आहे. आणि भारतात राहुन सगळी कडेच अराजकता माजली आहे असं समजण्यात काय अर्थ आहे?

मी गेली बरिच वर्ष मायबोलीवर आपल्या संस्कृतीच्या बाजुने खुप भांडलो. पण लोकांचे विचार ऐकुन आणि एकंदरीत परिस्थिती पहाता दहा गोष्टी चांगल्या आहेत तर नव्वद टक्के गोष्टीं मुर्खपणा आहेत.

हे जे मौखिक स्वरूपात आलेल ज्ञान कितपत मुळ रुपात आहे कींवा उअरल आहे हा मुद्दा वेगळाच. ह्या ज्ञानात काळानुरुप चांगले बदल केले गेले असते तर ठीक, अजुनही शनि सुर्यपुत्र आणि राहू केतू नी काय काय त्याच स्वरुपात चालल आहे. आजच्या काळात कुठला खगोलतज्ञ हे ऐकुन घेणार आहे आणि मान्य करणार आहे?

रावणाचा संहार करायला अवतार घ्यायची काय गरज होती हे अवतार घेण्या पेक्षा देव हे डायरेक्ट का करत नाही? रावण दशग्रंथी होता का शतग्रंथी होता ह्याची चर्चा करुन काय साध्य होणार आहे? त्या एकाही ग्रंथाबद्दल आम्हाला ओ का ठो माहीती नाही आणि जे चर्चा करता आहेत त्याना तरी ते माहीत आहेत का? मग फिरते चाक तुकाचे का गदिमांचे येथ पर्यंतच मजल जाऊ शकते.

त्यामुळे ह्या धाग्याचा उद्देश नक्की काय आहे हे उलघडुन सांगावे?

Akaash Neel,
हे विश्व फक्त (परब्रम्हाच्या) कल्पनेतच आहे (...अकल्पयत ...), कि त्याला काही अस्तित्व आहे? (प्रश्न कदाचित थोडा चुकीच्या शब्दात विचारला आहे).

What did Einstein mean when he said "Reality is merely an illusion, albeit a very persistent one" > > > >

Giving one of the statements from a reputed site.
Quote . . . .
"albeit using all the scientific evidence gathered to date - and the universe could well be unthinkably bizarre. If we are on the right track with current theories, it could be terrifyingly bizarre. We just don't know yet.
This particular experiment, which remains one of the most famous and tantalizing experiments of quantum mechanics to date, implies that there are multiple realities where every possible outcome is played out in a parallel universe. Each scientist in each universe observed a different outcome, throwing our original question - what is reality? - into more chaos, as now we have infinite realities ".
Unquote . . . .

That's exactly what I think, Einstein was trying to mention, means what we have achieved today or discovered or even invented, can be truly totally different if we understand it from different perspectives, Thus there will not be any established identification of our understandings as it's real ! It actually can be different also . . . .

Rest of the answers to all our other maa.bo. members will receive soon, till then . . . .hang on please . . . .

गिरीजा,

आपले वरील वक्तव्य ईथे आम्हा सर्वांसाठीच आहे असे समजुन घेतो.

हो, अगदी बरोबर आहे तुमचे, कितीही केलं तरी सर्व वेद हे कर्मांनीच भरलेले आहे, आणी त्रीगुणांनी ( सत्व, रज, तम ), व्यापलेल्या ह्या विश्वात, मनुष्य ह्या कर्मांच्याच रगाड्यात अडकुन गेला कि आणखीनच लिप्त होत जातो, म्हणुन ह्या सर्व कर्मांच्या वा गुणांच्या ही पलिकडे जो "तो" ( त्रीगुण रहित, परमतत्व वा परब्रह्म ), आहे, तो आपले खरे ध्येय, खरे लक्ष्य, त्याच्यावर दृष्टी ठेवुनच आपली सर्व कर्तव्ये करावित आणी सर्व कर्मे ही त्यालाच अर्पण करावित म्हणजे सर्व स्थितींमध्ये आपण कर्मफलाची ईच्छा न ठेवल्यामुळे मुक्त राहु शकतो.

अर्जुनास भगवान श्रीकृष्णाचे उपदेश . . . .

सविनय आभार . . . .

सत्यजित ,

आजकाल प्राचीन भारतीय संस्कृती आणि उज्ज्वल इतिहास यांची टेर खेचणे / अपमान करणे / निंदा करणे याची फॅशन कम लाट आली आहे, त्या लाटेचा परिणाम तुमच्यावरही झाला काय ?

वैदिक- इ.स.पूर्व 8000 ते इ.स. पूर्व 2000

पौराणिक - इ.स. पूर्व 2000 ते इ.स. 100

आणि ऐतिहासिक - इ.स. 100 ते इ.स. 2000 असे तीन कालखंड आहेत

शनि सुर्यपुत्र आणि राहू केतू , कलीचा प्रभाव वगैरे विषय हे पौराणिक काळातील आहेत म्हणजे पुराणात तसे उल्लेख आहेत . वेद किंवा उपनिषदात नाही,हे लक्षात घ्या

पुराणे ही अनेक कपोलकल्पित व प्रक्षिप्त गोष्टींनी भरलेली आहेत ,पण म्हणून तुम्ही सगळ्या आध्यात्मिक वेदिक ज्ञांनाला एकाच साच्यात बसवून टीका करू नका.

आधी अभ्यास करा ,मग बोला !

आकाश नील,
तुम्हाला जर राग येणार नसेल तर आपण तुमच्या वरील प्रश्नांबाबत दुसर्‍या पानावर बोलु कारण हे पान खरे पाहता स्वामिजींचे दशग्रंथाबद्दल आहे, आणी आधीच मी धागा सोडुन बोललो आहे त्यामुळे . . . . नाहितर स्वामिजी म्हणायचे " काय आरंभ केला आणी हे त्या धाग्यास कुठे घेऊन आले !"

तुम्हाला मी आमंत्रीत करतो कि कृपया माझ्या " काय होतं आणी काय होतं आहे ", ह्या धाग्यावर या, ईथे विषयांतर नको.

आणी हो ! एक गोष्ट सांगायची आहे, मला तुम्हा सर्वां एव्हढे ज्ञान नाही ह्या मा.बो. वर लिखाणांचे, चुकुन हे पान दोनदा बनवले,त्यांत तुम्ही त्या पानावर या ज्यात प्रतिसाद असतील २-३.

आभार . . . .

इब्लिस, स्वाती, वरदा,

धन्यवाद . . . . गदिमांचे बोल गोरा कुंभाराच्या नांवावर नाही खपविले, ते तर तुमच्याच म्हणण्याप्रमाणे गदिमां नी स्वतःच लिहुन त्या तुम्ही ज्या चित्रपटाची गोष्ट करता आहात त्यात गोरा कंभाराच्या तोंडुन वदवले ना ?
तेच मी पुढे सांगितले ! माझी चुक आहे ती निश्चितच, मला हे म्हणायला हवे होते कि, गदिमांचे बोल जे गोरा कुंभाराने त्या चित्रपटात गायिले ते . . . .

आता ज्ञानेश्वरीतले काही श्लोक जर हे म्हणुन सांगितले कि, संत ज्ञानेश्वर अमुक म्हणाले तर ते असे समजावे का कि, अहो ते ज्ञानेश्वरांनी नाही, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते ना ?

असो, पण तुम्ही खरेतर जी चुक दाखवुन दीली त्याबद्दल आभारी आहे, अहो चुका नाही कळाल्या तर कसे समजावे चुक झाली आहे म्हणुन ?

चुकिच्या Happy प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! ! !

आधी अभ्यास करा ,मग बोला !

छे: छे:! भलतच काहीतरी!!

असे केले तर बर्‍याच लोकांना मायबोलीवर काही लिहिताच येणार नाही!!उलट ज्या प्रमाणात विषय अधिक गहन, समजण्यास कठीण, त्या प्रमाणात त्यावर अचकट विचकट प्रतिसाद अधिक

गदिमा की गोरा कुंभार हेच वरच्या सगळ्यातून ज्यांना महत्वाचे वाटते, त्यांच्याकडून वेद वेगळे, पुराण वेगळे, इतिहास वेगळा, नि भाकडकथा वेगळ्या हे समजण्याची अक्कल कुठून अपेक्षित? प्रत्येक गोष्टीचे विडंबन करण्यातच अक्कल खर्च करणे हा येथल्या बर्‍याच लोकांचा उद्योग! मग कुठेतरी ऐकलेल्या भाकडकथा वेदात सांगितले असे म्हणायचे नि वेदच चुकीचे असे म्हंटले म्हणजे लोक आपल्याला शहाणे म्हणतील असे यांना वाटते.

Proud

मंदार,
१९८७ मध्ये तिबेट च्या काही संन्याशांशी ओळख झाली होती ( त्यावेळी मी नेपाळला होतो कामा निमित्ताने ), ह्या राम्पा लामाचे पुस्तक तद् नंतरच ६ वर्षांनी एकदा मुंबईच्या विमानतळावरील पुस्तकांच्या दुकानातुन घेतले, वाचुन छान वाटले, पण मी म्हणतो त्याचा, ईथे काही संबंध नाही,

तिबेटच्या धार्मिक ईतिहासाची पाने वाचता तर आली नाहित, पण त्यांच्याकडुन ऐकुन खात्री पटली होती . . . . जास्त काहीच नाही, पण एखाद्या माणसाने फार जपुन पाळलेली आपली गाय ( जीच्यावर त्याचे पूर्ण निर्वाह चालतात ), हरवली तर तीला शोधण्यार्‍यांना ईतके खरे वर्णन करावे कि, ऐकणार्‍याला त्या गाईचे रंग-रुपच काय, पण तिच्या दुधाचीही चव उमजुन यावी . . . . ह्यापेक्षा दुसरे उदाहरण नाही माझ्याकडे.
आपण जर आज कुठल्या अमेरिकन माणसाला ज्याने कधीच भारतात पाऊल ठेवले नसावे, जर संत ज्ञानेश्वराचे चरीत्र ऐकवले, तर तो सुद्धा हेच म्हणेल कि हे फिक्शियस आहे.

काही लोकांना फक्त आपलं ते सोनं आणी दुसर्‍याचं ते पितळ असं वाटणं ह्यात साहाजिकच असतं.

असो . . . . काही समस्या नाही, कारण ते किती खरं आहे हे मला अवगत आहे.

सत्यजीत ,

बरीच वर्षे भांडुन काही मिळाले नाही तर त्याचे खापर का बरं ईथे ( ह्या पानां वर ), फोडता ?

आणी तरीही बोध घेण्यासाठी अजुनही ह्याच मा. बो. वर पाने चाळता आहात ना ?

वर जे काहीही ज्यांनी लिहीले असेल तर त्यातुन ज्यांना बोध घ्यायचा, त्यांनी घेतला असावा, तुम्हीही तो घ्याच असा काही आग्रह नाही, नसेल उमजत तर तसे सांगावे, पण ओशाळुन असे अजुनही भांडतच राहिलात तर कसे होईल ?

सत्याचीच जीत होते हे तुमच्या नांवावरुन कळाले नाही, ही गोष्ट आधीपासुनच सर्वज्ञात आहे, पण आज सत्याला भांडुनही जीत मिळाली नाही आहे, तर वेगळे काही सांगणे न लगे ?

तुम्ही आता असे काहीतरी बोलुन ( काटक्या, जाळुन इ ० ) त्रास करुन घेऊ नका.

प्रतिसादाबद्दल आभार . . . .

बरीच वर्षे भांडुन काही मिळाले नाही तर त्याचे खापर का बरं ईथे ( ह्या पानां वर ), फोडता ? >> मी कुठे कुणावर खापर फोडतो आहे?

आणी तरीही बोध घेण्यासाठी अजुनही ह्याच मा. बो. वर पाने चाळता आहात ना ? >> मला हा प्रश्न कळाला नाही.

असो, परब्रम्ह माझा प्रतिसाद नीट वाचला असतात तर उपहासात्मक उत्तरे दिली नसतीत.

माझे दोनच मुद्दे आहेत, जातीय वाद टाळावा कारण जात आणि धर्म हे आपल्या प्रगती आड येता आहेत. सावरकरांचा हिंदू कोणास म्हणावे हा लेख वाचता मी स्वतःला हिंदू का म्हणावे ह्याच अचुक कारण मिळतं. तो लेख वाचता अस जाणवत की त्या काळच्या हिंदू समाजात ही हिंदू धर्मा बद्दल अपसमज असावेत आणि ते राष्ट्र विघातक असावेत आणि म्हणुनच त्या सच्च्या देशभक्ताने तो लेख लिहीला असावा. त्यातही काही मला न पटणारे मुद्दे आहेत पण सावरकरांनी ते १०० वर्षा पुर्वी लिहीले आहे त्या परिस्थितीत तेच योग्य असवं, तेंव्हा तो दोष सावरकरांना जात नाही. आज तो लेख वाचताना आपण काय बोध घ्यावा हे महत्वाच.

वरिल लेखात, वेद पठण ब्राम्हणानी काराव किंवा ब्राम्हण ह्या शब्दाला जो "quote" वगैरे केला आहे ते घातक आहे, जर वेदातही जाती पाती बद्दल लिहीले असेल तर तेही आजच्या घडिला काही कामाचे नाहीत. वेदातलं जे ज्ञान आहे ते सर्व सामान्यांना समजण्या जोगं आणि आजच्या घडीला साजेस करुन लोकांन पर्यत पोहचलं तर जास्त उपयोगाच नाही का? वरिल लेखात वेदांचा पाठांतर आणि काव्यरचना करता येणे या पलिकडे जाऊन काय उपयोग आहे ते कळाले नाही. आणि हे पाठांतर केले म्हणुन दशग्रंथी ब्राम्हण ग्रेट आणि दशग्रंथी ब्राम्हण होणे कसे अवघड आहे ह्या साठी हा लेख लिहीला असेल तर ब्राम्हण पौढी मिरवण्या पलिकडे ह्या लेखाचा उद्देश दिसत नाही.

झकीर नाईक ह्यांचे तुम्ही इस्लाम वरती भाषण ऐकले आहे का? नसेल तर त्यांची काही भाषणं ऐका (सभार यूट्यूब), तो जे काही बोलतो त्यावरुन त्याचे पाठांतर प्रचंड आहे (ते खरं आहे खोट आहे हे माहीत नाही), तो कुराण, वेद आणि बायबल कोळून प्यायल्या सारखी बडबड करतो. मुद्याला अनुसरुन रेफरंसेस देतो आणि हिंदू वेद पंडिताना ओपन चॅलेंज करतो. त्याला प्रतिउत्तर म्हणुन काही वेदाचार्याचेही व्हिडिओ ही सापडतिल आणि ते ऐकुन मला माझीच हिंदू असण्याची किव वाटली. आणि हे लोक आम्हा हिंदूचे प्रवत्के त्या पेक्षा झकीर नाईक परवडला.

आजकाल प्राचीन भारतीय संस्कृती आणि उज्ज्वल इतिहास यांची टेर खेचणे / अपमान करणे / निंदा करणे याची फॅशन कम लाट आली आहे, त्या लाटेचा परिणाम तुमच्यावरही झाला काय ? >> नाही ते असं का करतात याची कारणं मिळाली. प्राचीन भारतीय संस्कृती आणि उज्ज्वल इतिहास जो लोकां पर्यंत पोहचाला आहे कींवा धर्म प्रचारकानी पोहचवला आहे किंवा आजचे संस्कृती रक्षक ज्याला आपली संस्कृती म्हणुन मिरवतात ती हास्यास्पद नाही घृणास्पद आहे. ह्या प्रचारक लोकांनी घसा फोडला म्हणुन बकीचे ऐकणार आहेत का? ऐकता आहेत का?
आता माझ्या प्रतिक्रियेवरचे तुमचेच प्रतिसाद बघा. ते मला माझ्या प्राचीन भारतीय संस्कृती आणि उज्ज्वल इतिहासा पासुन दुर नेण्या साठी पुरेसे आहेत. तुम्हाला दोष देण्याचा मुद्दा नाही पण हे असच आहे.

कोणी एका ने छी-थू केली म्हणुन सगळेच करतात अशातला भाग नाही आहे, केव्हा चार लोकांना काही ना काही न पटण्या सारखं असतं तेव्हा ते एकत्र येऊन त्याचे लाटेत रुपांतर होते. लाट का तयार झाली ह्याचा विचार आपण करतो आहोत का? वेदा योग्य पद्धतिने लोकां पर्यंत पोहचवतो आहोत का? रामदेवा बाबा आणि श्री श्री यांच्या मागे जाणाते लोक वेद शिकायला मिळतात म्हणुन जातात का? जगभर लोक योगा करतात ते भारतिय संस्कृतीचे चाहते आहेत म्हणुन करतात की फॅड म्हणुन करतात? तेच ब्राम्हणांनांच फक्त योगा करता येतो , कामसुत्र हे वक्त उच्च जातियांसाठी आहे असं म्हणा मग उद्या बरेच लोक ह्या पासुनही दुर जातिल. वेद म्हणजे भरतिय संस्कृती असं आहे का?
भारतिय संस्कृती आणि हिंदू धर्माचा उपयोग झाला तर प्रचाराची गरज नाही. अंवेडकरानी अकारण हिंदू धर्म त्यागला असं म्हणायच आहे का तुम्हाल. आधी ब्राम्हण-दलित हे वाद आता मराठा-ब्राम्हण वाद, कसली संस्कृती नी काय. आता भारतिय संस्कृतीचा इथे काही संबध नाही असं म्हणाल,पण सर्व सामान्य ते मानतात का?

मला माहीती आहे मी फार भरकटलेलं लिहीलं आहे पण मला नक्की काय म्हणायच आहे ते तुम्हाला
नक्कीच कळाल असेल.

वेद आणि प्राचीन संस्कृती आजच्या घडीला कशी अनुकुल आहे किंवा होऊ शकते हे समजून घेण आणि त्यात योग्य ते बदल करणं गरजेच आहे येवढाच माझा मुद्दा आहे. नुसती प्रैढी मिरवण्या काही होणार आहे का? आपली संस्कृती तोलायला आयन्स्टाईनच माप आणलत त्यातच सगळ काही आलं, पण त्यात माझी काहीच हरकत नाही. आज जर तेच सर्वमान्य असेल तर तेही चालेल.

सध्या भारतात दशग्रंथी ब्राह्मण किती आहेत व कोण कोण आहेत याची माहिती कुठे मिळेल? पुढे नवग्रंथी अष्टग्रंथी करत शुन्य ग्रंथी ब्राहमण असतात का?

मला खरा ब्राह्मण कोणास म्हणावे हा प्रश्न पडला आहे. धर्मशास्त्रात या बाबत काय सांगितले आहे? ते निकष लावले तर आज केवळ जन्माने ब्राह्मण असलेले किती टक्के लोक त्यातून गळून पडतील? असे अनेक प्रश्न आहेत.

आजच वैदिक ब्राह्मणाबद्दल बातमी वाचली. यांनाही जैन, मुसलमान, या धर्मांप्रमाणे "अल्पसंख्यांक दर्जा" देण्यात येणार आहे, असे काहीसे होते. वैदिक ब्राह्मण हा हिंदूंव्यतिरिक्त इतर काही धर्म आहे का?

>> वेद आणि प्राचीन संस्कृती आजच्या घडीला कशी अनुकुल आहे किंवा होऊ शकते हे समजून घेण आणि त्यात योग्य ते बदल करणं गरजेच आहे येवढाच माझा मुद्दा आहे. नुसती प्रैढी मिरवण्या काही होणार आहे का?

बरोबर बोललात सत्यजीत. बाकी झकीर नाईक साठी श्री श्री यांचे एकच भाष्य पुरेसे आहे.
पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय ।
ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय ।।

निसर्ग नियमानुसार कॉंप्लेक्स टू सिंपल या न्यायानेच संस्कृत भाषा, वेद पुराणे मागे पडून सुटसुटीत नवीन भाषा तयार झाल्या. मराठीत तर रोज नवीन शब्दांची भर पडत आहे. उपयुक्तता हा गुण कोणत्याही गोष्टीसाठी लागू आहे. सोपं, आणखी सोपं व त्याहूनही सोपं असा प्रवास हरेक गोष्टीचा सुरू आहे व राहीलही.

रावण तर राक्षस होता ना मग राक्षस ब्राह्मण असू शकतो काय? >> रावण हा विश्रवा मुनीन्चा मुलगा व कुबेराचा भाऊ. रावणाला वैश्रवण असे पण एक नाव आहे. त्याशिवाय राक्षस म्हणजे असुर म्हणजे जे सुर अथवा देव नाहित ते.

रावण हा विश्रवा मुनीन्चा मुलगा व कुबेराचा भाऊ. रावणाला वैश्रवण असे पण एक नाव आहे.>>>>> माहितीकरिता धन्यवाद!

Pages