निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिरा, शांकली, साधना उत्तरासाठी खुप धन्यवाद !

शांकली : मी नांद्रुका हे नाव पहिल्यांदाच ऐकले, नेटवर सर्च केले तेव्हा माहिती मिळाली, पण फुलांच्या बाबतीत ह्या झाडाशी जुळत नाही.

साधना: मलाही हे झाड पिंक टॅबूबिया वाटले, आणि मग इथे ती झाडे बहरात निष्पर्ण असतात आणि फोटोत पाने तशी वाटत नाहीये. तुला जमेल तेव्हा नक्की टाक फोटो.

सॅमसंग गॅलेल्सी मोबाईलच्या वॉलपेपरवर उलट्या छत्री सारख्या म्हातार्‍या उडताना दिसताहेत, त्या कुठल्या झाडाच्या आहेत.

नितीन, पिवळ्या फुलांचे एक तण असते ते. ( आपल्याकडे फार नाही ते ) त्याची पाने सलादमधे खातात.
ते आहे ते त्याचे बोंड असते. माझ्या कुठल्यातरी लेखात फोटो आणि माहिती असणार.

सुदुपार,

शांकली,वर्षू,
धन्स !
काल हायवे (चांदणी चॉक) जवळ बसमधुन झकरांदा आणि बहावाची झाडे दिसली,ओळखता आली, निगच्या पानावर मिळणार्‍या अनमोल माहितीमुळे, खुप छान वाटलं,आता एकदा (ल.ल) फोटो घ्यायचे आहेत,दिनेशदानी सांगितलेला ऑर्चिडचा फोटो देखील अजुन पेंडिग आहे.
गायत्री च झाड कस दिसतं, गुगल वर देखील मिळाल नाही.

बहरावर लिहिताना मला तिवर / नेवर चा विसर पडला ( या दोन्ही नावानी ते झाड ओळखले जाते. ) खरं तर हा बहर आपल्यासाठी नसतोच कारण क्वचितच बघायला मिळतो.
कारण सुर्याची पहिली किरणेच काय पहाटेची कोकिळेची शिळ देखील या बहराला नाहीसे होण्यासाठी पुरेसा इशारा ठरतो. आपण बघतो त्यावेळी झाडावर केवळ लांबलचक तारा, त्याच्या टोकाशी मूक कळ्या आणि क्वचित बिमलीसारखी दिसणारी फळे देखील दिसतात. पण फुले नाहीतच.

झाडाखाली किंवा जवळ जर जलाशय असेल तर मात्र त्या पाण्यावर अंथरलेला तरंगता गालिचा दिसतो. लाल गर्भरेशमी धाग्यांनी विणलेला पण हलत्या जळाने जरा विस्कटलेला. कुणी शापित यक्ष जणू रात्र सरताच नाहीसा झाला आणि त्याची प्रेयसी त्याची आर्जवे करतेय, असे वाटते. सुखाची आठवण आहे पण त्यात कुठेतरी कणभर न्यून आहे. आणि ते न्यून कदाचित एका क्षणभराच्या सहवासाने फिटेल असे वाटते. मग ती प्रेयसी आर्जवे करते,

" अब मोरे कांता, मोरे संग पलछिन... " थेट बिलासखानी तोडी... हि रचना थोडी गंभीर आहे, पण इथे लिंक देतोय त्यातले मन्ना डे आणि सुलक्षणा पंडीत ने गायलेल्या, " बितायी रतिया " मधेही हा भाव जाणवेल.

http://www.dhingana.com/marathi/lavani-jhali-ga-ragini-songs-oldies-2eff3d1

आता तूम्हाला हे झाड बघायची नक्कीच उत्सुकता लागली असेल. पुर्वी वसईला रहाट असत त्याच्या काठावर हि झाडे दिसत. सायन हॉस्पिटलजवळ मानव सेवा संघाजवळही हे झाड होते पण गालिचा बघायचा असेल तर
राणीच्या बागेतच जावे लागेल. अंधारत उमलाणारी बहुतेक फुले धवल रंगाची असतात पण ही मात्र लाल असतात. पाकळ्यांपेक्षा नाजूक पुंकेसरच जास्त नजरेत भरतात. लांबलचक लोंबत्या काडीवर चहूबाजूने उमलतात. किंचीत बॉटलब्रशसारखी पण त्या फुलांपेक्षा मोठी असतात.
मी आणि जिप्स्यानेही याचे फोटो टाकले आहेत इथे.

धन्स दिनेश दा.. नवीन झाडाबद्दल माहिती बद्दल

हे नेट वर सापडलेलं तिवर/ नेवर चं झाड

अरे कित्ती गप्पा मारताय लोकांनो.. Wink मला म्हणायचं होतं की कित्ती छान गप्पा मारताय लोकांनो. Happy

जबरदस्त माहिती/फोटो/चर्चा आहेत. वर्षु ताई : मुलाखातीची लिंक मेल मधे दे ना प्लीज.

दिनेशदांनी लिहिलेली गाणी माहित असलेली लोकं कमी असतील इथे कदाचित पण निसर्गाचा थोडाच पण मस्त सन्दर्भ असलेलं एक नवीन गाणं माझं अत्यंत आवडतं आहे. मुंबई-पुणे-मुंबई सिनेमा मधलं 'कधी तू..' हे ते गाणं. "ती'चं वर्णन करायला कवी/गीतकारानी खूप छान उपमा वापरल्या आहेत निसर्गातल्या. कदाचित त्यामुळेच ते गाणं इतकं भावतं. चाल मस्तच आहे, पण शब्द ही सुरेख. काही ओळी देते इथे :

"कोसळत्या धारा, थैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरा..
सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओली रात..."

वाह.. बिजलीची नक्षी .. क्या बात ! 'चिंब पावसाची ओली रात' ऐकलं की तर मला जागच्या जागी भिजल्यासारखं च वाटतं. 'आहों'सोबत पहिल्यांदा महाबळेश्वर ला गेलेले पावसात त्याचीच आठवण होते Wink

"कधी तू, अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी, रातराणी वेड्या जंगलात
कधी तू, हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात"

आ हा हा.. काय पण काळजात रुतलेल्या फुलांच्या आठवणी काढल्या आहेत ! वाह.. Happy

बाकी रातराणी जंगलात पण असेल का ? मला आपलं उगीचच ते झाड पळीव (म्हणजे बागेतलं हो.. Happy ) वाटतं.

असो.. खूप लांबली पोस्ट. निसर्ग कमी आणि गप्पा जास्त झाल्यात ह्या पोष्टित. सॉरी बरका लोक्स Happy आता थांबते. वाचन विल कंटिन्यू Happy

have fun ppl.. Punekar : enjoy potential rainy days Happy

हो वर्षू, हेच झाड ते. या झिरमिळ्या अगदी आपल्या डोळ्यासमोर असतात. ( म्हणजे त्या पातळीवर )
अगदी पहाटे बघितले तर सगळ्या कळ्या उमललेल्या असतात.

शकुन, छान आहे ते गाणं.

वा खुप छान गप्पा रंगल्या आहेत. सगळ्यांना सवडीने प्रतिसाद देईन.

दिनेशदा तुमचे वर्णन खुपच छान.

काल आमच्याकडे अशी गुलबक्षी फुलली होती. माझ्याकडे फक्त पिवळीआणि त्यावर थोडे लालसर ठिपके असणारी गुलबक्षी आहे. तरीपण ह्याला असा दुरंगी रंग आला होता.

वॉव्..जागु.. काय सुंदर रंग दिस्तोय गुलबाक्षीचा.. पहिल्यांदाच पाहिली दुरंगी.. काही न करताच दुरंगी झाली??

जागू, पावसाळ्यात कलमाचा प्रयोग करुन बघ. पांढरी गुलबक्षी पण मिळव तोपर्यंत.
खरं तर पांढर्‍या आणि पिवळ्या गुलबक्षीचे नव्याने बारसे करायला हवेय. कारण गुलबक्षी हे त्या खास रंगाचेही नाव आहे.

<<<<<कारण गुलबक्षी हे त्या खास रंगाचेही नाव आहे.>>>>हो खरंच की दिनेशदा, गुलबक्षीचे फूल म्हणताना हे मी खरंतर विसरूनच गेले होते.

आमच्या गावी नदीच्या डोहाजवळ नेवराचे झाड आहे. त्याला येणारी फुले गजर्‍यासारखी दिसतात म्हणुन त्याला आम्ही गजर्‍याचे झाड म्हणतो. नेवर हे नाव आज कळले.

बाकी दिनेशदांनी सांगितलेले वर्णन तंतोतंत जुळते.

नदीकिनारी असले तरी हे झाड पाण्याकडेच जास्त झुकते, बहुतेक पाण्यावर आपल्या फुलांचा सडा टाकण्यासाठी.

कडीपत्त्याच्या रोपाला फांद्या फुटण्यासाठी काय करावे लागेल ? दिड वर्षाचे कुंडीत लावलेले रोप मस्त जोमाने वाढलेय , १ १/२ फूट उंच आहे पानांच्या डहाळ्या खूप आहेत, पाने एकदम तजेलदार. (येथे सातत्याने येत असल्याने मला एखादातरी प्रश्न पडला..... Wink

गमभन, कुठले गाव ? हि झाडे कोकणातच जास्त आहेत.

प्रज्ञा, अगदी वरचा शेंडा खुडायचा म्हणजे फांद्या फुटतील.

हो खरच गुलबक्षी रंग. काहीजण गुलबकावली पण म्हणतात.

प्रज्ञा एवढ छान जोमान वाढतय तर कशाला त्याला फांद्या फुटायला त्रास देतेस. तसा कढीपत्ता हळू हळूच वाढतो. माझ्याकडील कढीपत्ता ६-७ वर्षे झाली उंच होत नाही. कारण त्याच्या बाजूला खुप फुटावे म्हणजे नवीन झाडे धरली आहेत मुळ झाड कोणते हेच आता कळत नाही. मी टाकाऊ ताक नेहमी ह्या कढीपत्याला टाकते. त्यामुळे वेगळीच तजेलदार होतात पाने.

गमभन, द्या टाळी.. आम्ही पण मूळ राजापूरचेच !
जागू, प्रज्ञाचे झाड प्रज्ञापेक्षा उंच झालेय. Happy तसेही ते कुंडीतच आहे, फुटवे यायची शक्यता कमी आहे.
कढीपत्ता असा वाढला असेल तर खुडत राहणेच चांगले, आजुबाजूला काही वाढू देत नाही तो.

( टिकाऊ चटणी करता येते. )

गोव्यात खोबर्‍याबरोबर आवर्जून कढीपत्ता वापरतात. खोबर्‍यातील कोलेस्ट्रॉलला त्याने आळा बसतो.

अरे वा, दिनेशदा!!

इथे हैद्राबादमध्ये कढीपत्ता सगळ्या भाज्यांत, सांबारात, चटण्यांत घालतात. मुख्य म्हणजे लोक तो भाजीतुन वेगळा न काढता खातात. मला तर याचे आश्चर्यच वाटायचे कारण महाराष्ट्रात कढीपत्ता जेवणात टाकला तरी सहसा कोणी खात नाही.

कढीपत्त्यात लोह असते आणि केसांसाठी चांगला असतो. केसांचे कारण पटते कारण इथे लोकांचे केस भरपुर दाट आणि (मुलींचे) लांब असतात.

ऐका ऐका ऐका................एक आनंदाची बातमी ऐका...!!! दोनेक महिन्यांपूर्वी माळ्याकरवी बहाव्याच्या बिया रुजवल्या होत्या....आणि त्यातून मस्त पैकी ६ बाळं; आपलं रोपं.. उगवली आहेत.........आनंदी आनंद गडे...जिकडे तिकडे चोहीकडे.... अशी अवस्था झालीय माझी..!!! या नव्या पिल्लांचे फोटू.................

IMG_2832.JPGIMG_2839.JPG

त्याच्या जोडीला हा मैत्रिणीने दिलेला नागचाफा सुद्धा छान वाढतोय. हा बहुधा तीनेक वर्षांचा असावा. मला तिने दत्तक दिला. आणि गंमत अशी की बहाव्याच्या पिल्लांना बघून किंवा काय माहित नाही पण याच्या नाजूक फांद्या चक्क त्यांच्याकडे झुकल्या गेल्याएत. मला खात्री आहे की हा त्यांच्याशी खेळत असावा...

IMG_2829.JPG

आणि ही गुळवेल...ही सुद्धा त्याच मैत्रिणीने दिली... आता हिला एरियल रूट फुटलंय. अनेक वृक्षांवर दोर्‍या लोंबत असल्या सारख्या दिसतात...त्या दोर्‍या नसून हिचीच एरियल रूट्स असतात असं ती सांगत होती.

IMG_2841.JPG

अभिनंदन शांकली Happy
जागुताई गुलबक्षी सुंदर आहे.

गुलबक्षी हे ऊर्दु नाव आहे का ? गुल - गुलाबीरंग बक्षी- देणारी. - हे आपल असच विचारतोय. Happy

जागू, गुलबक्षीतल्या लाल - पिवळ्या रंगांनी एरिया वाटून घेतल्या सारखं दिसतंय ना!! सुंदर दिसतंय फूल. कानडीमधे याला फार सुंदर नाव आहे - 'सांज मल्लिगे'... मल्लिगा म्हणजे मोगरा. ही गुलबक्षी दुपार टळून गेलिये आणि सायंकाळ व्हायची आहे अशा वेळी फुलते, म्हणून की काय असं नाव ठेवलं असावं असं वाटतं.

कढिपत्त्यात काय किंवा शेवग्यात काय खूप खनिजे, व्हिटॅमिन्स असतात. दोन्ही खूप औषधी आणि रोज खाण्यात असावीत अशी आहेत. श्री. श्री.द. महाजनांच्या मते तर शेवगा हा पूर्णान्न होऊ शकतो इतकी त्यात घटकद्रव्यं आहेत.

गमभन , दिनेश दा..... राजापूर शी खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नवरोबांचा जन्मच तिथला. आणि मूळ गाव कशेळी(कनकादित्य मंदिर).
दरवर्षी जाणं होतंच.

Pages