फ्रिस्को..... !!!!!!!

Submitted by विशाल कुलकर्णी on 20 February, 2013 - 12:46

यावेळच्या डेनव्हर दौर्‍यात ट्रेनींगचे पहीले दोन दिवस पार पडल्यावर दुसर्‍या दिवशी डिनरला 'लिसा'ची भेट झाली. 'लिसा वेदरबी' कोलोराडो प्रांतासाठी आमच्या कंपनीची (Trimble Positioning Group) बिझीनेस एरीया डायरेक्टर म्हणून काम पाहते. कुणीही प्रथमदर्शनी प्रेमात पडावे असे व्यक्तीमत्व आहे या बयोचे. मी ही पडलोच. Wink

जेवण (आणि अर्थातच वाईनही) संपल्यावर लिसाने अचानक विचारले...

Hey Vishal, are you not coming for skiing?

झाले असे होते की दुसर्‍या दिवशी स्कीईंगला जायची टूम निघाली होती. मला काय सांगावे सुचेना कारण स्कीईंगचा अनुभव नसल्याने मी आधीच एप्रिलला नाही म्हणून सांगितले होते.

"Sorry Lisa, but I had never been to skiing and I don't even have necessary clothing for that with me."

"So what? you are coming with us tomorrow and don't worry about outfits, I will arrange that."

विशल्याची बोलती बंद. कारण माझ्या अप्रेझलचा रिव्ह्यु लिसाच करते. (मध्ये बसलेली लाल स्वेटरमधली 'लिसा' आहे)
1

दुसर्‍या दिवशी सकाळी ७.३० वाजता बस येणार होती. सात वाजता हॉटेलच्या अटेंडंटने मला एक बॅग आणुन दिली.
Lisa left this for you. त्यात सगळा गरम कपड्यांचा जामानिमा होता. आता कुठलेही कारण न सांगता तयार होणे भाग होते. बाहेर पडताना लिफ्टमध्ये 'अलॉईस' (ट्रिंबल, जर्मनी) भेटला. त्याने सांगितले, त्यात घाबरण्यासारखे काही नाहीये. तुला स्कीईंग नसेल करायचे तर ट्युबींग कर. ते तुलनेने सेफ आणि सोपे आहे. ट्युबींग म्हणजे काय तर मोठ्या-मोठ्या रबरी ट्युब असतात (अर्थातच फुगवलेल्या), त्या घेवून चढावर (उंच भागावर) जायचे. त्यात छानपैकी बसायचे आणि ट्युब वरून ढकलून द्यायची. ती प्रचंड वेगाने खाली जाते. अर्थात ट्युबींगसाठी खास ट्रॅक तयार केलेले असतात. त्यामुळे फारशी भीती नाही. झालाच तर थोडासा वेगाचा त्रास होइल इतकेच. मग कुठे जरा धीर आला. मी 'लिसा'ने दिलेली बॅग गळ्यात अडकवली आणि खांद्याला कॅमेरा आणि एका नव्या अनुभवासाठी सिद्ध झालो.जिथे आम्ही स्कीईंग/ट्युबींगसाठी जाणार होतो ते ठिकाण 'फ्रिस्को अ‍ॅडव्हेंचर क्लब' ब्रुमफिल्डपासुन साधारण दोन तासाच्या अंतरावर रॉकी पर्वतरांगामध्ये होते. त्यामुळे बस ठरवलेली होती. एकदाचे निघालो......

हॉटेलबाहेर ही परिस्थिती होती.
2

बस रॉकीजच्या मार्गाने निघाली आणि गोंधळ सुरू झाला. साऊथ आफ्रिकेहून आलेला 'झुयेर' आपल्यासोबत 'पोंगो'सारखे एक वाद्य घेवुन आलेला होता. त्याच्या सुरावर बसमध्येच थिरकणे सुरू झाले. माझे सगळे लक्ष बाहेर लागले होते. समोर रॉकीजच्या पर्वतरांगा दिसायला लागल्या आणि मी सावरून बसलो. रॉकीजच्या त्या पहील्या दर्शनानेच जाणिव झाली की आपण काय गमावणार होतो?
3

थोड्याच वेळात बसने रॉकीजच्या प्रांगणात प्रवेश केला...
456

हळु-हळू बसमधला कल्ला बंद पडून सगळेच बाहेरच्या निसर्गात रमायला सुरूवात झाली होती.

दोनेक तासात आम्ही 'फ्रिस्को'च्या परीसरात येवून पोहोचलो होतो.
78

दोन महिन्यांपूर्वी केरळमध्ये फिरताना रंगांची जादू अनुभवली होती. पण पांढरा रंगदेखील इतके वेडे करू शकतो हा अनुभव नवीनच होता माझ्यासाठी.
9

एकदाचे आम्ही आमच्या डेस्टीनेशनला येवून पोहोचलो..
बाह्यदर्शन...
1011

या इमारतीचेच फ्रिस्कोच्या आतील मैदावरून घेतलेले प्रचि
12

थोड्याच वेळात तिथल्या प्राथमिक औपचारिकता (म्हणजे ट्युबींग्/स्कीईंग करताना तुम्हाला काही झाल्यास फ्रिस्को जबाबदार नाही हे ठासून सांगणार्‍या कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे) पुर्ण करून आम्ही ट्युबींग्/स्कीईंगसाठी तयार झालो.
13

इथे आल्यावर माझ्या लक्षात आले की स्कीइंग करणारे खुप कमी होते. बहुतेकांनी ट्युबींगचाच पर्याय निवडला होता. आम्ही पण आपल्या वाट्याची ट्युब ताब्यात घेतली आणि निघालो.
(यावेळी का कोण जाणे मला स्वतःचाच क्रुस खांद्यावर घेवुन जाणार्‍या ख्रिस्ताची आठवण येत होती Wink ) उगाचच मनात भीती वाटत होती की ट्युब वेगाने घसरत खाली येताना जर चुकून आपण त्यातून ट्युबच्या बाहेर फेकले जावून खाली घसरलो तर......

आपापले क्रुस आपलं ट्युब्स ओढत निघालेला आमचा जत्था...
1415

सुदैवाने वरपर्यंत जाण्यासाठी सरकत्या पट्ट्याची (एस्कलेटर ?) सुविधा उपलब्ध होती, त्यामुळे त्या जडच्या जड ट्युब्स ओढत समोरचा चढ तोही बर्फाच्छादीत कसा चढणार ही काळजी दूर झालेली होती.

मी माझा कॅमेरा क्लबवरच ठेवलेला होता. त्यामुळे हे सगळे फोटो माझ्या ब्लॅकबेरीने काढलेले आहेत.

161718192021

शेवटी एकदाचे वरच्या टोकाला जाऊन पोहोचलो. तिथे क्लबचे दोन कर्मचारी आमचा कडेलोट करायला सहर्ष आणि सुहास्य वदनाने हजर होते. Wink

त्या हिरोने दात दाखवतच आम्हाला ट्युबवर बसवले आणि एक, दोन साडे माडे तीन करत खालच्या दिशेने ढकलून दिले. ट्युब थोडा वेळ वेगाने सरळ खाली उतरली, मध्येच एका ठिकाणी किंचीत चढ होता, त्यावर चढताना गरकन स्वतःभोवतीच फिरली आणि त्यानंतर जवळ-जवळ तीन ते चार मिनीटे तशी स्वतःभोवती गरगर फिरत वेगाने खालच्या बाजूला सरकत राहीली. सुरुवातीला काहीवेळ डोळे गरगरले, पण नंतर मजा यायला लागली. मग काय त्यानंतर तासभर हेच चालू होते. ट्युब ओढत वरच्या बाजूल घेवुन जायची. छानपैकी पाय पसरून ट्युबवर बसायचे आणि बुंsssssग...

काही वेळानंतर तर आम्हाला त्या कर्मचार्‍यांचीसुद्धा गरज पडेनासी झाली. स्वतःचा पळत-पळत ट्युब ओढत आणायची आणि शेवटच्या क्षणाला स्वतःला ट्युबवर झोकून द्यायचे. अर्थात हे सगळे प्रकार करताना कॅमेरा, अगदी मोबाईलचाही वापरण्याचा अविचार केला नाही. अगदी निग्रहाने तो मोह टाळला त्यामुळे ते प्रत्यक्ष फोटो, शुटींग नाही घेता आले. पण मझा आला....
"थँक्स लिसा, तू जर आग्रह केला नसतास तर मी एका विलक्षण आनंदाला मुकलो असतो."

वरून वेगात येणार्‍या ट्युब्स बर्फाच्या या ढिगार्‍यावर येवुन स्लो व्हायच्या..
242526272223

इथे मनसोक्त खेळून झाल्यावर अर्थातच पोटातच कावळे ओरडायला लागले होते. त्यामुळे जवळच्याच एक 'ब्रुअरी'( ब्रुअरी म्हणजे जेथे बीअर तयार केली जाते) कडे प्रस्थान केले गेले. तिथेच खादाडी आणि पिदाडी सुद्धा.... Lol

आधी अर्थातच तिथे रोजच्या रोज तयार केल्या जाणार्‍या ताज्या, घरगुती बीअरचा मनमुराद आस्वाद घेतला.
हे बघा तिथे तयार होणार्‍या बीअरचे 'पिगलेट्स' Wink

29

आणि त्यानंतर खादाडी करून परतीच्या वाटेला लागलो.

28

बाकीचं पुढच्या वेळी...

(मी क्रमशः लिहीलेलं नाहीये बर्का)

इरसाल म्हमईकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यामुळे जवळच्याच एक 'ब्रिवरी'(याचा बरोबर उच्चार कोण सांगू शकेल? ब्रिवरी म्हणजे जेथे बीअर तयार केली जाते) कडे प्रस्थान केले गेले. तिथेच खादाडी आणि पिदाडी सुद्धा.... >> ब्रुअरी असा होतो त्याचा उच्चार.
मस्त आहेत फोटो.
ट्युबींग् मधे खुप मजा येते अगदि! .

खूप मस्त वर्णन. पार्श्वभाग शेकला गेला कि नाही मस्त?
आम्ही मागच्या वर्षी पोकोनोज ला गेलो होतो ट्यूबिंगसाठी. मजा येते.
त्या एस्कलेटरवर पडून झालेय अस्मादिकांचे Happy

मस्त रे. फोटो आणि वर्णनही.

आम्ही ब्रुअरी म्हणतो, खरा अमेरिकन उच्चार त्याच्या जवळपासच असेल. ट्युबिंगला मजा येतेच, पण इतर स्नो वाले खेळ नव्हते का तेथे? ते गरम कपडे बहुतेक ठिकाणी भाड्यानेही मिळतात.

मस्त फोटोज!
ट्युबिंग करायला खुप मजा येते Happy
मी बिअर नाही पितं त्यामुळे मस्त गरमागरम वाफाळते हॉट चॉकलेट त्यावर मार्शमेलोज.... आहाहा...

मस्त मस्त. आर्टिफिशियल स्नो मध्ये दुबई आणि सिंगापुरला ट्युबिंग केलंय. खर्‍याखुर्‍या वातावरणात तर कित्ती धमाल येत असेल याची कल्पना येतेय.

मस्त लिहिलंयस विशाल. नेक्स्ट टायमाला स्कीइंग पायजेल हाय हां. Happy

जबरी ! कोलोरॅडो आणि रॉकी माउंटन्स निव्वळ सुंदर आहेत ! तुझ्या मागच्या लेखावरच्या प्रतिक्रियेत मी बहूतेक विचारलं होतं की माउंटन्समध्ये नाही गेलास का म्हणून.. ह्यावेळी जाऊन आलास तर.. Happy

हेय कस्ली धम्माल! आम्ही केले होते स्कीईंग.. लेक ताहो ला.. स्कीईंग कस्ले धडपडण्यातच सगळा वेळ गेला होता Wink पण सॉलिड धमाल आली होती. बरे झाले तुम्ही हा अनुभव घेतलात. Happy

'प्रिया७' ब्रुअरीच्या उच्चारासाठी धन्यवाद !
मामी, स्कीईंग यावेळीदेखील केलं मी. पण त्याचा अनुभव तेवढासा उत्साहजनक नाही. डावा तळहात जवळ-जवळ तीन दिवस बँडेजमध्ये गुंडाळून फिरत होतो. पण पुढच्यावेळी प्राधान्य स्कीईंगलाच हे मात्र नक्की Happy
पराग.. Happy

सर्वांचे मनःपूर्वक आभार !

पुढच्यावेळी प्राधान्य स्कीईंगलाच हे मात्र नक्की >>>> पुढच्या वेळेला आधीच बँडेज बांध...म्हणजे नंतर बांधायचा त्रास नाही होणार Wink

वि कु.....सहीच गड्या.....इतके वर्ष युरोप मधे राहून पण ही मजा घेता आली नाही......यालाच कर्मदरिद्रि म्हणत असावेत....but its splendid....

Pages