गोडाचिन मल्की आणि गोकाक धबधबा

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गोकाकला जाण्याचा योग आला शेवटी. गेले दोन वर्षे मी फक्त घोकत होते जायचंय जायचंय म्हणुन, पण योग मात्र ह्या वर्षी होता.

बेळगाव-गोकाक रस्त्यावर सुगरण पक्षांची एक वसाहत लागली. बांधकाम अगदी जोरात सुरू होते....

gokak_022.jpg

gokak_071.jpg

गोकाकच्या अलीकडे गोडाचिनमल्की हा अजुन एक धबधबा लागला. रस्ता सांगणा-यांनी हा पण पहाच असा आग्रह केला म्हणुन येथे वळलो. आणि अक्षरक्षः अवाक झालो. मी आतापर्यंत असले मोठे धबधबे कधिच पाहिले नव्हते. माझे धबधबे म्हणजे घाटातले घबधबे.

गोडाचिनमल्की मार्कंडेय नदीवर आहे. सुरवातीला शांतपणे वाहणारी नदी अचानक सँडस्टोनच्या पाय-यांवरुन अल्लद उड्या मारायला लागते..

gokak_032.jpg
gokak_034.jpg

आणि एका मोठ्या खडकावरुन खाली झेपावते...

gokak_043.jpg

gokak_044.jpg

gokak_054.jpg

पुन्हा सारे कसे शां...त शां....त....

gokak_050.jpg

गोकाकला थोडी निराशा झाली. पाणि बरेच आटले होते. ह्याला भारताचा नायगारा म्हणतात असे बेळगावच्या वेब साइटवर वाचले होते. पाहुन फक्त कल्पना करावी लागली. पाणी दोन बाजुच्या कोप-यातच उरलेले होते.

gokak_094.jpg

gokak_110.jpg

gokak_111.jpg

हा घबधबा घटप्रभा नदीवर लागतो. (आंबोलीला हिरण्यकेशी नावाने जन्म घेणारी नदी कर्नाटकात घटप्रभा नावाने ओळखली जाते) कोप-यात १८ व्या शतकात उभारलेले भारतातील पहिले विज निर्माण केंद्र दिसतेय.

खाली उतरुन शांत वाहणारी घटप्रभा आणि तिच्या काठावर फुललेली संपन्नता.

दोन विडीओ शुट केलेले ते अपलोड करायचे राहुनच गेले....

पुढच्या वर्षी भर पावसात इकडे यायचे असे ठरवुन निघालो.


साधना, फोटो छान आले आहेत. फोटो बघुन मलाही भेट द्यायची ईच्च्छा होतेय.



फोटो मस्त आले आहेत. स्मित
तुलाहि सुगरण पक्ष्यांची कॉलनी दिसली काय ग्रेट.
गोडाचिनमल्की मस्त आहे की.
गोकाकच्या धबधब्याची भव्यता वरच्या फोटोंमध्ये दिसतेच आहे. स्मित
मी प्राथमिक शाळेत असताना जावुन आलोय इकडे सहलीला.
मजा आली होती. त्या झुलत्या पुलावर चालुन पाहिल की नाही?? स्मित
फोटोत दिसतोय तो तोच आहे बहुतेक.
गोकाक आणि हिडकल डॅम अशी सहल होती.
तुम्ही गेला होतात काय हिडकल डॅमला?
गोकाका किती लांब आहे? मुंबई किंवा पुण्यापासुन?



साधना, ग्रेट फोटोज् एकदम... गोकाकचा धबधबा दोनच कोपर्‍यात असला तरी त्याचा फोर्स अगदी व्यवस्थित जाणवतोय.... सुगरण कॉलनी तर एकदम बेस्टच.



बेळगाव मुंबईपासुन ५५० किमी आणि गोकाक बेळगावहुन ६० किमी.
झुलता पुल दिसतोय फोटोत.. मजा येते चालायला त्यावरुन.

आमची ट्रिप अगदी धावपळीत होती. बेळगावातच ११ वाजले, तिथून गोकाक ६० किमी पण रस्ता एकदम खराब त्यामुळॅ ३-४ तास लागले. हि़डकल डॅम चा प्रोग्रम ड्रॉप केला मग्....रात्री मुंबईला परतायचे होते. १२ वाजले रात्री घरी यायला..

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.



साधना तुला नायगारा पाहिल्याच भाग्य लाभलं... आम्हालाही लाभो... स्मित

फोटो मस्तच... खास करून प्रवाहाचे फोटो



पाहण्यासारखं भरपुर आहे रे.. ते पाहण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभो... स्मित

आपल्या आजुबाजूला एवढे सगळे पडलेय पाहण्यासारखे आणि आपण ऑफिसात बसुन.............. अरेरे (प्रचंड दु:खात बुडालेली बाहुली)



साधना, मस्तच आहेत फोटो. आत्ताच जावेसे वाटतेय तिथे स्मित



साधना,
सर्व फोटो एकसे एक आहेत. अप्रतिम! स्मित



एवढ्या सुंदर फोटों करता शतशः धन्यवाद !!!!!!!!!!!!



फोटो आणि वर्णन सही!



बेळगावातच ११ वाजले, तिथून गोकाक ६० किमी पण रस्ता एकदम खराब त्यामुळॅ ३-४ तास लागले>>>>>>>>
धन्यवाद माहितीबद्दल.
दिवाळीच्या सुट्टीत कोल्हापुरला जाणार आहे. त्यावेळी जमेल का त्याचा अन्दाज घेत होतो.
पण साठ किमीसाठी ३-४ तास अरेरे
कठीण आहे.
एका दिवसात होण्यासारख नाहिये म्हणजे.



अहो होईल... आम्ही बेळगावातुन गेलो म्हणुन खराब रस्ता लागला.. अरेरे

सरळ कोल्हापुर बेळगाव एक्प्रेसवे पकडायचा. तवंडी घाट पार केल्यावर २०-२५ मिनिटात पुढे संकेसुरला एक्प्रेसवे सोडुन आत जायचं (उजवीकडे) आणि मग अगदी नाकासमोर सरळ रस्ता पकडायचा. खड्डे बिड्डे काहिच नाहित. चारपदरी रस्ता. एकदम मस्त जाल.... परत येताना असेच आलो.

पण गोकाकला पाणि अजुन कमी झाले असेल अरेरे. गोकाकपासुन गोडाचिन मल्की १० किमी. तोही रस्ता चांगला आहे. आणि पाणीही भरपुर आहे. स्मित



जबरी रे .... गोकाक माहीत आहे, जाऊन आलो आहे (करंगळी एवढी धार होती धबधब्याला तेव्हा) .. पण इतकी वर्षं बेळगावला जातोय पण कधी गोडाचिन मल्की बद्दल ऐकलं नाही.

परागकण



फोटोज खुपच छान आहेत....



मस्त फोटोज आलेत सगळे... मी बर्‍याचदा गेलो आहे गोकाकला
पावसाळ्यात खरी मजा असते गोकाकचा धबधबा पहायची !



मस्त फोटो सगळेच स्मित



साधना, फोटो मस्तच आलेत. आता गोकाक, गोडाचिनमल्कीला जायलाच हवं पुढच्या पावसाळ्यात.. तू जो रस्ता सांगितलास तो फाटा अंबोली फाट्यानंतर येतो का??



हो, आंबोली फाट्यानंतर साधारणपणे २०-२५ मिनिटांनी येतो..

प्रतिसादांबद्दल धन्यवाद. मी दोन व्हीडिओ पण शुट केले आहेत, सुरवातीला टाकायचे राहुनच गेले. आणि आता रोज सकाळी घरी भारनियमन असते, रात्री मटेनिलीचे ब्रॉडब्रँड नीट चालत नाही. त्यामुळे अपलोड करायला मिळतच नाही. आज रात्री ट्राय करेन.