किल्ला ओळखा

Submitted by इंद्रधनुष्य on 26 December, 2012 - 03:44

प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२

डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.

किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन

*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्‍याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस गॉट इट
२३. राजमाची > अभिनंदन Happy

जुलैच्या पावसात आम्ही तीन जण कोडिंवडे कडून चढत गुहेपाशी आलो. गुहेपाशी बसलेल्या चहावाल्याने सांगितलेल्या प्रमाणे पुढे गेलो तर वाटेत दरड कोसळ्याने पुढचा मार्ग बंद झाला होता... म्हणून आडवाटेने मार्गक्रमण केले आणि त्याची परिणीती वाट चुकण्यात झाली. तेव्हा एका पठारावरुन घेतलेला हा राजमाचीचा बालेकिल्ला मनरंजंनचा फोटो Happy

मनोज... माहिती नेहमीप्रमाणे छान पण हा मोहनगड आहे. भोर जवळचा. माणगावचा इथे काहीही संबंध नाहीये. >> अगदी अगदी १०००% अनुमोदन

प्रबळगड,रायगड,सुधागड ... नाही Happy
प्रचि २४. अजुन एक क्लु .. याचा एक छोटा भाऊ आहे.. पण त्यावर अजुन कोणी गेलेल नाही.

प्रचि. २४ मनोहरगड
कारण मनसंतोषगडावर अजून कोणी गेले नाही असे ऐकून आहे.
हे उत्तर चूक असेल तर माझा पास..

हो आंबेवाडीतून काढला आहे. तसेच कुलंगच्या शेजारील पलंग गडावर (हे नाव गावकर्‍यांनी सांगितले आहे) जाता येत नाही.

प्रचि २४ . कुलंग ... बरोबर इंद्रा Happy
पलंगवर जाता येत नाही ...पण मी छोटा भाऊ उल्लेख केला आहे तो आहे ... छोटा कुलंग ... Happy

Pages